बिनभिंतीची शाळा - Binbhintichi Shala

नमस्कार🙏
आम्ही हेमा आणि कमलेश.
स्वागत आहे आमच्या या नवीन you tube चॅनेल वर..
तुम्हाला या चॅनेल वर पालकत्व,मातृत्व,बाल संगोपन इत्यादी वर माहिती तसेच vlogs देखील पहायला मिळतिल..
मुलं वाढवत असतांना स्वतःची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे..
तसेच 21व्या शतकातील आधुनिक व नवीन पालकांसमोर कोणती नवीन आव्हानं आहेत त्याबद्दल शास्त्रोक्त माहिती एकदम सोप्या भाषेत समजावून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हाच आमच्या चॅनेल चा मुख्य उद्देश आहे..त्याचसोबत आमचा पालकत्वाचा प्रवास आमच्या बालका सोबत तुमच्यासमोर उलगडवणार आहोत.लहान मुलं ही आपला आरसा असतात, आनंदी पालक आनंदी बालक हा आमच्या पालकत्वाचा कणा आहे असं आम्ही मानतो कारण जे गुण आपल्यात आहे तेच आपल्या मुलांमध्ये येतील आणि जे आडात नाही ते पोहऱ्यात कसं बरं येईल?? बिनभिंतीची शाळा हे चॅनेल अशा लोकांसाठी तयार केले आहे जे पालक्तवाच्या सुंदर जगात पाऊल ठेवत आहेत किंवा या प्रवासाला सुरुवात करण्याची तयारी करत आहेत.
hemakamlesh14@gmail.com

Follow us on Facebook: www.facebook.com/profile.php?id=100086551814515&am…