MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

राजकीय | सामाजिक | क्रीडा | साहित्य | शिक्षण | मनोरंजन | देश-विदेश बातम्यांसाठी आमच्या @MAHAnewsportal या चॅनलला Subscribe करायला विसरु नका.


MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती वर कोणाची सत्ता येईल?

9 months ago | [YT] | 9

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

कोण होईल बार्शी चा नगराध्यक्ष

9 months ago | [YT] | 19

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

बार्शी नगर परिषदेची अध्यक्षपदाची आज सोडत जाहीर होणार!
आपला अंदाज काय?
बार्शी नगरपालिका कोणाला सुटणार...
#MAHANews #महा_न्युज

11 months ago | [YT] | 0

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

रणवीर राऊत यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवड

बार्शी – बार्शीतील युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले रणवीर राऊत यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत सक्रीय असलेल्या राऊत यांना ही जबाबदारी मिळाल्याने राऊत गटात आनंदाचे वातावरण आहे.

रणवीर राऊत हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र असून, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाच्या विविध स्तरांवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

1 year ago | [YT] | 0

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

रणवीर राऊत यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवड

बार्शी – बार्शीतील युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले रणवीर राऊत यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत सक्रीय असलेल्या राऊत यांना ही जबाबदारी मिळाल्याने राऊत गटात आनंदाचे वातावरण आहे.

रणवीर राऊत हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र असून, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाच्या विविध स्तरांवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

युवकांमध्ये प्रभावी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने भाजपने रणवीर राऊत यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी भविष्यातील पक्षवाढीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

बार्शी परिसरातील राजकीय, सामाजिक आणि नागरिकांकडून रणवीर राऊत यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

#ranvirraut #BJP4Maharashtra #barshi #MAHANews #रणवीर #राऊत #भाजपा #बार्शी #महा_न्युज

1 year ago | [YT] | 0

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

बार्शी शहरात मोठा अंमली पदार्थ साठा जप्त – तिघांना अटक, गावठी पिस्तूलसह कारवाई

बार्शी – दि. 17 एप्रिल 2025 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी परांडा रोडवरील स्वराज हॉटेलजवळ मोठी कारवाई करत तब्बल 13 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून अंमली पदार्थ, गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन आणि एक आलिशान टोयोटा कोरोला आल्टीस कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. आरोपी हे संशयास्पदरीत्या वाहनात थांबलेले असताना पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यात एकूण 20.04 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हे अमली पदार्थ असलेले नऊ पॅकेट्स, एक गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, तीन मोबाईल हॅन्डसेट, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, आणि रोख रक्कम मिळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये असद हसन देहलुज (वय 37, रा. परांडा), मेहफुज महंमद शेख (वय 19, रा. बावची), आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय 32, रा. काझीगल्ली, बार्शी) यांचा समावेश आहे.

ही कारवाई करताना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित आरोपींविरोधात NDPS कायदा, भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोसई माकणे यांच्या मार्फत सुरू असून, अधिक तपासातून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

#बार्शी_पोलीस #अंमलीपदार्थविरोधीकारवाई #गावठीपिस्तूल #बार्शीघटना #पोलीसएक्शन #महाराष्ट्रपोलीस #गुन्हेवार्ता #NDPSकायदा #बार्शीसमाचार #पोलीसहिरो #बार्शी #पोलीसकारवाई #महा_न्युज #NDPSAct #CrimeNews #DrugBust #illegalweapons #solapurpolice #BreakingNews #crimereport #maharashtrapolice #barshinews #PoliceAction #barshi #MAHANews

1 year ago | [YT] | 2

MAHA News बातमी आपल्या महाराष्ट्राची

कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

1 year ago | [YT] | 5