जागरूक पालघर हे एक हिंदी आणि मराठी न्यूज चॅनल आहे, जे साप्ताहिक वृत्तपत्र जागरूक पालघर अंतर्गत कार्यरत आहे. जागरूक पालघरचा उद्देश आहे — आपल्यापर्यंत सत्य आणि अचूक बातम्या सर्वात आधी पोहोचवणे.
जागरूक पालघर क्राइम, राजकारण, सामाजिक घडामोडी, क्रीडा, मनोरंजन आणि विविध विषयांवरील बातम्या आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते.
हिंदी आणि मराठी बातम्यांसाठी जागरूक पालघर सोबत जोडलेले राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत सत्य पोहोचवू शकू आणि सत्याचा आवाज आणखी बुलंद करू शकू.
📞 संपर्क: 8177934210
Jagruk Palghar
पालघर पोलीस दलातील एकूण १५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला अति उत्कृष्ट / उत्कृष्ट सेवा पदक जाहीर
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Jagruk Palghar
पालघर पोलीस अधीक्षक मा. श्री. यतिश देशमुख सर यांना
"पोलीस शौर्य पदक" प्राप्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Jagruk Palghar
‘भारत सरकार’ची पाटी अन् भाजपचा झेंडा लावून गुटख्याची तस्करी
पालघर पोलिसांची धडक कारवाई; 20.60 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
4 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Jagruk Palghar
हवामान विभागाचा मोठा इशारा; मुंबईसह पालघर, ठाणे आणि कोकणाला रेड अलर्ट
#Palghar #mumbai #thane
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Jagruk Palghar
मा. जिल्हाधिकारी पालघर यांचे यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप आकाऊंट तयार करुन आरोपींना झारखंड राज्यातून अटक करुन गुन्हयात गेलेली १००% रक्कम हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश
दिनांक १७/०५/२०२६ रोजी सायंकाळी वेळ ४.४९ ते ६.३८ वाजेच्या दरम्यान फिर्यादी श्री. विनीतकुमार मुंशीलाल मीणा, वय २८ वर्ष, रा. वागुळसार पालघर पश्चिम हे त्यांच्या राहते घरी असतांना, त्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात धारकाने त्याचे व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर पालघर जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी यांचा फोटो लावुन स्वतः "जिल्हाधिकारी श्रीमती इंदु राणी जाखड़ असल्याची खोटी ओळख दाखवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, फिर्यादी यांना बँक खातेक्रमांक देवुन त्यावर ५०,०००/- रुपये पाठविण्याचा व्हॉट्सअॅप मेसेज पाठविला. त्यावरुन फिर्यादी यांनी पैसे पाठविले. तद्नंतर आरोपीत यांनी मा. जिल्हाधिकारी यांचा फोटो लावुन फिर्यादीची फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ०१/२०२६ भा.न्या.स. कलम ३१८(४), ३१९(२) सह माहीती तंत्रज्ञान अधिनीयम २००० कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे दिनांक १८/०१/२०२६ रोजी दाखल आहे.
गुन्हयातील फिर्यादी यांनी पैसे ट्रान्सफर झालेल्या बँक खातेधारकाची माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषण करून अधिक तपासाअंती आरोपी १) बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल, वय २६ वर्षे, रा. मनोरमनगर कला भवन जवळ ता. जि. धनबाद राज्य झारखंड २) राजुकुमार दुखन खानी, वय २२ वर्षे, रा. बैंक कॉलोनी, के. जी. आश्रम गोविंदपुर, धनबादता. जि. धनबाद राज्य झारखंड यांना जि. धनबाद, राज्य - झारखंड येथुन अटक करुन गुन्हयातील अपहरीत रक्कम ५०,०००/- रुपये हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, अतिरिक्त, कार्यभार सायबर पोलीस स्टेशन, पालघर हे करत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, अति, कार्यभार सायबर पोलीस स्टेशन, पालघर, पोलीस उपनिरीक्षक, समीर भोसले, नेम-सायबर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक, रोहित खोत, पोलीस उपनिरीक्षक, विशाल शिर्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, राजेश वाघ, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/कपील नेमाडे, नेम स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोअंम./रामदास दुर्गेष्ट, पोअं/ रुपेश पाटील, पोअं/अक्षय शेट्ये मपोअं/ऋषिका बारी, मपोअं/स्नेहल शेलार नेम पोलीस स्टेशन, पालघर यांनी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Jagruk Palghar
पालघर जिल्हा पोलीस दला तर्फे वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी शिबीर
पालघर जिल्हा मा.पोलीस अधीक्षक सो, पालघर श्री. यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेतर्फे दिनांक ०६/०६/२०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ मुंबई अहमदाबाद महामार्गावर कासा टोलनाका येथे वाहन चालक व स्थानिक नागरीकांकरीता मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीरासाठी इंन्फीगो आय केअर सेंटर हॉस्पीटल, पालघर येथील तज्ञ डॉक्टरांची उपस्थीती लाभली. शिबीरात डॉ. श्रीमती भक्ती गाढे, डॉ. श्रीमती सुष्मीता पाटील व डॉ श्री. कल्पेश भोईर असे तज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवून नेत्र तपासणीचे कार्य पार पाडले.
सदर शिबीरामध्ये वाहन चालक व स्थानिक नागरीक असे एकुण ५५७ ईसमांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच तपासणी दरम्यान चष्मा लावणे आवश्यक असल्याचे आढळून आलेल्या नागरिकांना योग्य नंबरच्या चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदरवेळी ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नव्हते अशा वाहनांना मोफत रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत. या उपक्रमास वाहन चालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलीस विभागास सहकार्य करावे, असे श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे. मा. पोलीस अधीक्षक, श्री.यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल व्हटकर, सहाय्यक पालीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व त्यांचे अधिनस्त अंमलदार यांनी सुयोग्य नियोजन करुन नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न केला आहे.
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Jagruk Palghar
Palghar fraud case, पालघरमध्ये 133 मच्छीमार महिलांची फसवणूक
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Jagruk Palghar
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
Jagruk Palghar
4 months ago | [YT] | 6
View 0 replies
Jagruk Palghar
4 months ago | [YT] | 10
View 0 replies
Load more