भावनांच्या विश्वात तुमचं मनःपूर्वक स्वागत! माझं नाव महेश चव्हाण, आणि इथे, MaheshChavanKavita चॅनेल मध्ये, प्रत्येक शब्द एका नवीन कथेची आणि भावनेची सुरुवात करतो.
हे चॅनल म्हणजे माझ्या मराठी कवितांचा एक अनमोल संग्रह आहे. इथे तुम्हाला प्रेम, विरह, निसर्ग, नाती आणि आयुष्यातील लहान-मोठ्या क्षणांवर आधारित कवितांचा अनुभव घेता येईल. माझा प्रयत्न आहे की माझ्या शब्दांतून तुमच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा आणि मनाला शांती मिळावी.
तुम्हालाही या शब्दांच्या प्रवासाचा एक भाग व्हायचं असेल, तर आजच MaheshChavanKavita चॅनल Subscribe करा आणि आपल्या कविता प्रेमींच्या कुटुंबात सामील व्हा.
चला, आपण मिळून कवितांचं हे जग आणखी सुंदर करूया.
इंस्टाग्रामवर मला फॉलो करा: @MaheshChavanKavita
Mahesh Chavan kavita
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सरले वर्ष, सरली वेळ,
नव्या आशांची पालवी फुटू दे...
माझ्या शब्दांच्या या मैफिलीत,
तुमची साथ मात्र कायम राहू दे!
माझ्या सर्व फॉलोअर्सना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🥂
तुमच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. यापुढेही माझ्या कविता वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी Follow करा आणि आपल्या या काव्यप्रवासात सहभागी व्हा. 📖✨
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Mahesh Chavan kavita
"तू नसताना..."
पुढे कोणती ओळ तुमच्या मनातल्या भावानांना व्यक्त करते? वेगळी काही ओळ सुचली तर कमेंट करू शकता..
1 week ago | [YT] | 0
View 2 replies
Mahesh Chavan kavita
संपला तो खेळ आता, नवे डाव मांडू नकोस,
परत येऊन पुन्हा, खोटी आस सांडू नकोस.
शिकलोय मी आता, एकट्याने ताठ जगायला,
भीक नको तुझ्या प्रेमाची, माझी वाट अडवू नकोस!
पुढं काही सुचलं तर लिहा..
1 month ago | [YT] | 3
View 2 replies
Mahesh Chavan kavita
या कवितेची शेवटची ओळ म्हणून कोणती ओळ चांगली वाटते??
तुला वाटलं असेल, मी सगळं विसरून जाईन,
नेहमीसारखं भांडून, पुन्हा शांत होऊन जाईन..
पण यावेळी तू शब्द नाही, तर विश्वास तोडला आहेस,
.....................................................................
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Mahesh Chavan kavita
खाली लिहिलेल्या ओळींमध्ये अजून एक ओळ लिहून कडवं पूर्ण करता येईल का?? जमल्यास रिप्लाय जरूर करा.. (अवघड वाटलं तरी काळजी नको, मी रिप्लाय करेन)
कोजागिरीचं चांदणं आज जमिनीवर पडलंय,
तुझं सारं लक्ष मात्र मोबाईलवरच खिळलंय..
या शीतल प्रकाशातही मन माझं जळतंय,
....................................................
2 months ago | [YT] | 1
View 4 replies
Mahesh Chavan kavita
"माझ्या आयुष्यातला रावण, कधीच जळून गेलाय..."
कवितेतून एक प्रश्न मनात आला... आपल्या आयुष्यात असे अनेक "दहा तोंडी" मुखवटे भेटतात. जर तुम्हाला अशा व्यक्तींना दसऱ्याचं सोनं द्यायचं असेल, तर कोणत्या नात्याने द्याल?
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Mahesh Chavan kavita
आत्ताच पोस्ट केलेली " स्वॅगच वेगळा.. " ही कविता वाचली का??
त्या कवितेनुसार " आजकालच्या पोरींच्या स्वॅग " मधली कोणती गोष्ट तुम्हांला सगळ्यात जास्त खरी वाटते???
3 months ago | [YT] | 0
View 1 reply
Mahesh Chavan kavita
माझ्या 'महेश चव्हाण कविता' या चॅनलच्या कुटुंबात तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत!
गेल्या काही दिवसांत तुम्ही माझ्या कवितांना जे प्रचंड प्रेम दिलं, त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्यामुळेच मला रोज नवीन लिहिण्याची प्रेरणा मिळते.
आता, माझ्या पुढच्या कवितेसाठी मला तुमची मदत हवी आहे. मी पुढची कविता कोणत्या विषयावर करू, हे तुम्हीच सांगा!
3 months ago | [YT] | 0
View 2 replies