Hello Everyone, I am a Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Rolex Marathi.

Welcome to our YouTube Channel "Rolex Marathi"

Here we are for spreading the knowledge in the Marathi Language.

All Updates about Maharashtra Government Schemes, Educational Updates, GR, Online forms & Education Related information.

Stay connected for the latest updates and changes
Rolex Marathi.


Rolex Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार

-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील ३१ जुलै पर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

-३१ जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरु आहे.

-जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँके कडे पाठवली जाते.

ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे.

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना

1 year ago | [YT] | 9

Rolex Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये - महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत.

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना

1 year ago | [YT] | 11

Rolex Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू.
मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.यातील जवळपास १कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.या योजने अंतर्गत अधिकाधिक माता-भगिनी पर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.

1 year ago | [YT] | 3

Rolex Marathi

👧 आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, 🔥१७ तारखेपर्यंत सर्वांचे जमा होतील...!!

1 year ago (edited) | [YT] | 4