Brand Shetkari

“ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा” किंवा “मी पुन्हा येईन!” हे डायलॉग आणि तात्या विंचू हे कॅरेक्टर . एक अप्रतिम रचना १९९३ ला महेश कोठारेंनी बनवली. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कलेने हे कॅरेक्टर एवढे लोकप्रिय केली की हे कॅरेक्टर आज हि आम्हा सगळ्यांच्या जन-मनातून जात नाही. या तात्या विंचू लोकप्रिय कॅरेक्टर बरोबर स्काऊट हॉल , दादर येथे कोकण बझार या एक्झिबिशन मध्ये आले असता फोटो काढायचे संधी मिळाली . खूप बरं वाटलं . जे कॅरेक्टर टीव्हीवर बघून आम्ही लहानपणी घाबरत होतो, या बाहुल्यात आत्मा आहे असे आम्हाला वाटत होतं. पण गेले ते दिवस .या झपाटलेल्या चित्रपटाविषयी जुन्या आठवणी कायम मनात राहून गेल्या आहेत. झपाटलेले चित्रपटाविषयी किंवा तात्या विंचू विषयी जर तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की आपल्याशी शेअर करा.😊🙏 #शेतकरी

1 month ago | [YT] | 975

Brand Shetkari

रायगड मध्ये जन्मलेले देवदत्त नागे सर यांनी बॉलीवूड मध्ये तसेच मराठी चित्रपटांमध्ये खास ठसा उमटवलेला आहे. 2020 साली आलेला तानाजी द अनसंग वॉरियर चित्रपटामध्ये सूर्याजी मालुसरे यांचे अप्रतिम भूमिका साकारली होती. तर ‘जय मल्हार’ या झी मराठी मालिकेत भगवान खंडोबाची भूमिका साकारून ते संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय झालेली व्यक्तिमत्व . याचबरोबर फिरोज मुजावर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लावणी डान्सर, कोरिओग्राफर, परफॉर्मर आणि शिक्षक आहेत. आज महाराष्ट्रातील पारंपरिक लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी फिरोज सर हे काम करतात. कथ्थक आणि लावणी डान्स च ते पुण्यामध्ये प्रशिक्षणही देतात. अशी ही दोन उच्च व्यक्तिमत्व यांची पुण्यामध्ये जो आपण एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावला होता या ठिकाणी भेट दिली. सरांनी आपल्याकामाचं तोंड भरून कौतुकही केलं. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा जसं प्रेम माझ्या पाठीशी आहे तसंच या दोन व्यक्तिमत्त्वाच्या कौतुकाने माझ्या पाठीवर थाप मारल्यासारखं मला जाणवलं. मला फक्त एकच गोष्ट समजते तुम्ही फक्त धडपडत काही ना काही तरी करत पुढे जायचं आहे. आज तुमचा द्वेष करणारे तुम्हाला मागे ओढणारी अनेक लोक असतील परंतु एक दिवस अशा ठिकाणी पोहोचायचं की , तुमच्याकडे बघताना लोकांनी मान वर करून बघितलं पाहिजे. फक्त अभ्यासू व्यक्तिमत्व आणि लढाई ठेवायची , मागे कधी हटायचं नाही !

2 months ago (edited) | [YT] | 2,991

Brand Shetkari

शेती परवडत नसल्याने वडिलांचे शेतीतून पलायन. वडिलांची गुजरात सारख्या परराज्यात पोटापाण्यासाठी नोकरी पकडली. त्यांच्या मुलीला शेतीची आवड. डोंगर दर्यात राहणाऱ्या शेतकरी मुलाशी लग्न केलं. सुरुवातीला पारंपारिक शेती केली , त्यानंतर आधुनिक शेती सुरू केली. शेतीमध्ये जम बसवला. त्याच्यापुढे जाऊन शेतातील उत्पादनावर प्रक्रिया करून त्याचे सेल्फ लाइफ वाढवुन विकण्यासाठी कंपनी रजिस्टर केली. उत्पादक ते ग्राहक हा एकमेव मार्ग निवडला . अगदी ऑरगॅनिक क्वालिटी प्रॉडक्ट तयार केले. गाव सोडून पहिले प्रमोशन कंपनीचं कराडमध्ये केलं. आता पुन्हा कंपनीच्या प्रमोशनसाठी मुंबईतील दादर मध्ये आले आहे. मी फक्त कष्ट करत गेले , रोज अभ्यास करत गेले , आणि त्या अभ्यासपूर्ण गोष्टी सोशल मीडियावर मांडू लागले. महाराष्ट्रातून आज एवढी आपुलकी तयार झाली किती शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. याचे एक उदाहरण मला कराडमध्ये भेटलेल्या लोकांकडून ते मिळालेच . शिवाय आज दादर मध्ये आल्यानंतर अनेक लोक भेटायला आली. कोणी भेटवस्तू आणल्या कोणी जेवण आणलं. एवढी आपुलकी पाहून माझं मन भरून आलं. यापुढेही अभ्यासपूर्ण गोष्टीच मी मांडत राहीन. खऱ्याला खरा आणि खोट्याला खोटं बोलायचे मी ताकत ठेवीन. कदाचित हीच गोष्ट काही लोकांना आवडत नसेल परंतुअनेक लोकांना मोटिवेशन मिळतं आणि ही गोष्ट ते भेटल्या नंतर शब्दातून वर्णन करतात हेच माझ्या कामाची पावती आहे. बाकी मुंबई परिसरात किंवा दादर मध्ये जर तुम्ही असलात तर नक्की या मलाही भेटायला खूप बरं वाटेल...🙏 #शेतकरी #mumbaikar #dadarkar

3 months ago | [YT] | 837

Brand Shetkari

नमस्कार मंडळी 🙏
हा फोटो मी आज पोस्ट केलाय .... मी एक शेतकरीन हातात कॉक्रोच धरून उभी आहे. तुम्ही म्हणाल का असा फोटो पोस्ट केलाय? याचं कारण एवढच की , आता आम्हाला असंच वाटतंय. गेली १२ वर्षं आम्ही शेतकरी आणि आमचे तरुण मुलं यांना आशा दाखवली गेली. "अच्छे दिन" येणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, मुलांना नोकऱ्या मिळणार, शिक्षण स्वस्त आणि चांगलं होणार... पण काय झालं?
उत्पादन खर्च तिप्पट झाला, पण उत्पन्न तसंच राहिलं. आमचे मुलं पदवी घेऊनही बेरोजगार बसलेत. शिक्षणाचा बाजार झालाय, आरोग्य महाग झालंय. आणि ज्यांच्यावर बलात्कार, अपराधाचे आरोप आहेत, ते लोक आजही बिनधास्त सत्तेत बसलेत.
आम्ही शेतकरी माणसं कष्ट करतो, पण आमच्या कष्टाचा फायदा दुसऱ्यांना होतो. आमच्या मुलांना न्याय मिळत नाही.
आता कॉक्रोच जनता पार्टी (CJP) सारखी चळवळ सुरू झालीय. जर यातून खराखुरा बदल घडू शकतो अशी आशा आहे, आमच्या मुलांना रोजगार मिळावा, उत्तम आरोग्य सेवा सरकारी दवाखान्यात मिळावी खाजगी दवाखान्यात नव्हे.
शेतकऱ्यांचं खरं उत्पन्न वाढावं आणि न्याय मिळाला... हिच आमची अपेक्षा आहे. आमच्या मनात कोणतेही जातिपातीचे राजकारण बिंबवण्याचा प्रयत्न यांनी या राजकारण्याने करू नये असे मला वाटतं. जीवन एकदाच आहे जीवन आनंदी जगायचे, या जातीपातीच्या विळख्यात गुंतून आयुष्य खराब करायचे नाही.
जर या CJP च्या या चळवळीतून जर आमच्या मध्ये कोणत्या आशा जन्म घेत असतील तर नक्कीच या चळवळीला आम्ही पाठिंबा करू. आम्ही शेतकरी या चळवळीच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू. हे माझे वैयक्तिक मत आहे . कारण आता आम्हाला फक्त आश्वासनं नकोत, कृती हवी आहे.
तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.
#CJP #CockroachJanataParty #शेतकरी #बेरोजगारी #न्यायहवा

3 months ago (edited) | [YT] | 3,031

Brand Shetkari

पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे आणि आधुनिक शेतीतून शेतीपुरक व्यवसाय कडे चाललेली वाटचाल खूप अवघड होती . मात्र जिद्द , चिकाटी जर कायम असेल तर कोणतंच ध्येय गाठणं अवघड असत असं नाही. या शेतीने मला एवढी साथ दिली की आज या शेतीने मला एक स्वतःचा ब्रँड तयार करून दिला. आणि याच ब्रँडच्या प्रमोशनसाठी मी आज कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मल्टीपर्पज हॉल येथे माझ्या कंपनीचे प्रोडक्ट्स व कंपनी प्रमोशनसाठी स्टॉल्स घेऊन आपण हजेरी लावलेली आहे. आपल्या कंपनीचे जाम व मध टेस्ट करण्यासाठी नक्कीच तुम्ही या एक्झिबिशन ला येवून आपल्या स्टॉलला भेट द्यावी ही विनंती. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मुलं आहेत ज्यांना काही ना काहीतरी उद्योग करायचा आहे काही ना काही तरी प्रॉडक्ट्स किंवा सर्विस तयार करून ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे . कृपया या लोकांनी देखील स्टॉलवर येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावे. जेणेकरून तुमच्याकडून ही मलाही काही शिकता येईल. 16 , 17, 18, 19 मे रोजी मी यशवंतराव चव्हान मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आहे. तर चला या कराडमध्ये .. नक्की भेटुया..😊

3 months ago (edited) | [YT] | 4,883

Brand Shetkari

🙏 मनापासून आभार 🙏
पंढरपूरहून आमच्या West Field Products (WeFPro) युनिटला आणि शेतीला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक स्वागत आणि आभार! 🌾
या भेटीदरम्यान आपण सर्वांनी शेतीविषयक मार्गदर्शनपर चर्चा केली, अनुभवांची देवाणघेवाण केली आणि शेतीतील नवनवीन संधींबद्दल विचार मांडले. शेतामध्ये स्ट्रॉबेरीचा आनंद घेतला आणि आमच्या नॅचरल स्ट्रॉबेरी जॅम ची चवही घेतली, याचा आम्हाला खूप आनंद झाला. 🍓
तुम्ही पंढरीच्या विठुरायाची जी सुंदर मूर्ती आम्हाला भेट दिली, तो क्षण खरोखरच भावनिक होता. 🙏
या विठू रायाच्या रूपाने सकारात्मक ऊर्जा सदैव आमच्या पाठीशी राहील, असा विश्वास आहे.
आपला असा प्रेम, विश्वास आणि सहकार्य कायम राहो हीच अपेक्षा.
पुन्हा भेटूया… आणखी शिकूया… आणि एकत्र पुढे जाऊया! 💚
#WeFPro #WestFieldProducts #FarmerMeet #StrawberryFarming #NaturalProducts #Pandharpur #VitthalBlessings

4 months ago | [YT] | 1,639

Brand Shetkari

एका खेडेगावात राहून काही वर्षे पारंपारिक शेती केली , पारंपरिक शेतीचे रूपांतर काहि दिवसांनी आधुनिक शेतीत केले , यानंतर आधुनिक शेतीचे रूपांतर शेतीच्या उत्पादनां द्वारे बाय प्रोडक्ट बनवण्यावर केले . ज्या उत्साहाने मी शेतकऱ्याची लेक म्हणून या शेतीमध्ये प्रामाणिकपणे कष्ट सुरू केले , आजवर त्याच उत्साहाने मी शेतीचे रूपांतर एक प्रगतशील शेतीपुरक व्यवसायात केले आहे. फक्त शिकण्याची इच्छा कायम ठेवली म्हणजे कोणतीच गोष्ट अवघड राहत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते सरकारच्या भरवशावर राहून आपल्या माल विक्री होईल हा विचार डोक्यातून काढून आपल्या मालावरच आपल्याला प्रक्रिया करून त्याचे सेल्फ लाईक वाढवून कसा बाजारात आणता येईल हे आपण बघितले पाहिजे. फक्त मार्केटचा अभ्यास केला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. एकदा पाऊल उचललेलं की सगळ्या गोष्टी आपोआप होतात. अनेक वेळा अपयश येत पण अपयशातूनच शिकून आपल्याला सातत्य ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. आज शेतकरी आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक अशी माझी ओळख तयार झाली आहे आणि या ओळखीमुळे मला मान सन्मान मिळतो. हा मान सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण शेतकरी वर्गाचा आहे . आज शेतकऱ्यांनी पाऊल उचलून पुढे जाणे गरजेचे आहे आपला माल बाजारात आपल्या ब्रँड नावाने विकणे गरजेचे आहे. हाच एकमेव मार्ग आहे समृद्ध होण्याचा बाकी सरकारच्या भरवशावर मालविक्री करायचं म्हणलं तर खूप कठीण आहे. एका खेडेगावात राहणारी महिला जर यशस्वी उद्योजक बनू शकत असेल तर तुम्ही का नाही . चला आजच पाऊल उचला आणि सुरुवात करा. बाकी कोणती मदत हवी असल्यास माझा कस्टमर केअर नंबर 9405836623 सदैव आपल्यासाठी खुला आहे. बाकी होलसेल व रिटेल मध्ये आपल्या कंपनीचा माल विक्रीसाठी जर हवा असेल तर नक्की संपर्क साधा.

5 months ago | [YT] | 2,008

Brand Shetkari

प्रॉडक्ट जर उत्तम असेल तर असे अति उत्तम रिव्ह्यूज येणारच. प्रॉडक्ट खरोखर नॅचरल आहे प्रॉडक्ट जर उत्तम नसेल तर असे अतिउत्तम रिव्ह्यूज कशी येतील. प्रॉडक्ट खरोखर नॅचरल आहे त्याचं हे रिफ्लेक्शन. आणि हीच क्वालिटी आपल्याला कायमस्वरूपी टिकवायची आहे. आणि हीच क्वालिटी आपल्याला कायमस्वरूपी टिकवायची आहे. लोकांचा विश्वास जो आपल्यावरती आणि आपल्या प्रॉडक्ट वरती आहे हा असाच राहिला पाहिजे यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. भारतात 74 टक्क्यांपेक्षा जास्त स्ट्रॉबेरी टाकून जर कोणी जाम बनवत असेल तर तो आपल्या wefpro ब्रँड शिवाय इतर कोणाचाही नाही. हे का शक्य आहे तर आपण शेतकरी असल्याने कच्चामालहा आपला स्वतःचा आहे . म्हणूनतर आपण एवढी ओरिजनल स्ट्रॉबेरी हि जाम मध्ये ही वापरूच शकतो. शिवाय कोणतेही प्रिझर्वेटिव्ह व केमिकल न वापरता असा बनवलेला हा जाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जिभेची चव वाढवत आहे. म्हणून तर देशातील सर्वोत्तम असा नॅशनल स्ट्रॉबेरी जामची जर चव चाखायची असेल तर आपण 940586623 या नंबर वरती व्हाट्सअप मेसेज किंवा कॉल करून ऑर्डर करू शकता. हा जाम अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय आपला जाम होलसेल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे नक्की आपण संपर्क साधू शकता.
amzn.in/d/098Eek17
#celebritystylist #rafaelnadal #product #wefpro #strawberryjam #mahabaleshwar

5 months ago (edited) | [YT] | 230

Brand Shetkari

महाबळेश्वर ट्रिप......... खऱ्या अर्थाने पाहिले तर ही ट्रिप अविस्मरणीय राहिली ती फक्त दोन व्यक्तीच्या भेटीने, एक म्हणजे प्रख्यात महान लेखक, आम्हा पुरोगामी लोकांचे मार्गदर्शक, डॉ आ. ह. साळुंखे सर आणि शेतकऱ्यां करिता आपला सोसिअल मीडिया वर परखड पणे आवाज उठविणारी, स्वतः शेती करत सेंद्रिय पद्धतीने स्ट्राबेरी चे उत्पन्न घेणारी तसेच स्वतःचा Wefpro ब्रँड तयार करून त्याद्वारे स्ट्राबेरी जॅम तयार करून ऑनलाईन पद्धतीने तसेच ऍमेझॉन वर सुद्धा आपला प्रॉडक्ट लॉन्च करून व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा निर्माण करणारी अशी आमची शेतकरी ब्रँड या यु ट्यूब चॅनेल ची शीतल ताई. शीतल ताईचा पाहुणचार न विसरणारा, आम्हाला पोटभर स्ट्राबेरी खाऊ घातले, तसेच अजून दोन प्रकारचे बेरी पण खाऊ घातले, आपली शेती दाखवली, स्ट्राबेरी जॅम कंपनी दाखवली, आम्हला मस्त चहा पाजला. गप्पा रंगल्या अजून वेळ झाला, वेळ कधी जात होता, कळत नव्हतं, माझी मुलगी तर त्यांच्याकडील असलेल्या मांजरात गुंगून गेली होती, कोणालाच बोर होत नव्हतं, अन त्यांचा निरोप सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. अजून थोडा वेळ गेला, शीतल ताई, पोहे करण्यासाठी आपल्या मुलीला सांगितले, आम्ही हलका नकार दिला, पण ताईने मस्त पोहे करायला लावले, आम्ही पोटभर पोहे खाल्ले, आम्ही थोडा फराळ आणला होता, तो ताईंना दिला पण ताईंनी त्यांच्याकडील सुवासिक असा तांदूळ ते भी पाच सहा किलो तसेच,आमटी करण्यासाठी काळ्या रंगाच्या धान्य, त्याला काय म्हणतात आठवत नाही, ते निदान एक किलोभर आणि एक मोठा गोल भोपळा, हे फक्त एक अस्सल शेतकरी च देऊ शकतो..... आम्ही कोण तर फक्त एक दिवस काही क्षणा पुरते भेटणारे, काहिच परिचय नसणारे असे आम्ही कोसो दूर असणारे, पुन्हा भेट होईल की नाही दोघांनाही माहित नाही, पण ही आपुलकी थक्क करणारी. अश्या आमच्या मोठ्या मनाच्या ताईचे सर्व स्वप्न पूर्ण होवो, त्याना भरपूर यश संपादित होवो अशी शिवचरणी अपेक्षा व्यक्त करतो.....
आपला स्नेहांकित
Dr Biradar Kishanrao,
Lecture colony,
In front of water Tank,
Bhalki. Dt Bidar.
Karnataka

5 months ago | [YT] | 803

Brand Shetkari

महाबळेश्वरच्या थंड वातावरणात पिकलेली हि स्ट्रॉबेरी जशी मोहक वाटते तशीच चवीलाही उत्तम अगदी गोड. पुर्ण देशभरातून व महाराष्टातून या स्ट्रॉबेरीला उत्तम मागणी असते. काहि ग्राहक या स्ट्रॉबेरीची कुरीयर मार्फत मागवण्यासाठी विनंती करतात . स्ट्रॉबेरी ची शेल्फ लाइफ हि अवघी तीन दिवसाचीच असल्याने कुरियर मार्फत आपल्याला स्ट्रॉबेरी पाठवता येत नाही कारण कुरियर पोहोचायला किमान चार ते पाच दिवस लागतात. म्हणून तर या उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरी वर प्रोसेसिंग करून आपण स्ट्रॉबेरी जॅम बनवतो व तो ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. जामची प्रोसेस एवढी नॅचरल ठेवलेली आहे की त्यामध्ये कोणताच कलर प्रिझर्वेटिव्ह किंवा लॅब मेड फ्लेवर न वापरता आपण ओरिजनल अशी आपल्या महाबळेश्वर मधील शेतातील स्ट्रॉबेरीची चव ही ग्राहकांपर्यंत पोहचवतो. स्ट्रॉबेरी तर लांब दूर पोहोचवणे थोडे अशक्य होतं मात्र जाम हा आपण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो.
एक शेतकरी ते व्यावसायिक असा प्रवास कशासाठी? तर फक्त हे सिद्ध करण्यासाठी की शेतकरी जो जन्मजातच हुशार आहेतू कोणत्या क्षेत्रात मागे पडू शकत नाही. त्याला समृद्ध होण्यासाठी सरकारचा तर काही सपोर्ट नाही मात्र स्वतःच्या बुद्धी कौशल्याने तो परिस्थितीवर मात करू शकतोहे दाखवणे हाच माझा उद्देश आहे.

7 months ago | [YT] | 5,443