जय शिवराय मंडळी!

मी प्रथमेश राणे आणि 'RWR सेना' कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत आहे.

छत्रपतींच्या स्वराज्यात दाखल झालेल्या प्रत्येक गडकोटाची माहिती या चॅनेलवरुन देण्याचं ध्येय नजरेसमोर आहे. हे काही एकट्यादुकट्याचं काम नाही. तुम्हा सर्वांची साथ आम्हाला लागणार आहे. जबाबदारीने हे कार्य करत राहृू इतका शब्द देतो.

बाकी सूज्ञास सांगणे न लगे.. अवघे मावळे जमवावे, गडकोट किर्ती पसरवत जावे

महाराष्ट्रातील गड-कोटांची माहितीपूर्ण सफर, अज्ञात वास्तूंचा अभ्यास आणि Responsible Tourismचा संदेश. तसंच कुटुंबासोबत सुरक्षितपणे कुठे जावे? बजेट, राहण्याची सोय आणि तिथल्या रस्त्यांची अचूक माहिती.

तमाम प्रेक्षकांसाठी आपल्या प्रत्येक व्हिडिओनं 'गडकोट नुसतंच पाहण्यापेक्षा ते अनुभवण्यासाठी मदत करणारा उत्तम 'साथीदार' व्हावं हीच आमची इच्छा आहे'

अर्थात आई भवानी त्यासाठी बळ देईलच. जगदंब.

चला तर मग, या सुंदर प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा. चॅनेलला 'Subscribe' करा आणि आपली ही 'RWR सेना' वाढवूया नि एकत्र गडकोट धुंडाळूया..

For Business Inquiries & Sponsorships : 📩 Email: roadwheelrane@gmail.com


RoadWheel Rane

व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो होतो. जसं तुम्ही डिएम, मेल करुन विचारत आहात.. की व्हिडीओ का पडत नाहीयेत.. तसंच आमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनी देखील जाणीव करुन दिली की सर खूप जास्त गॅप पडतोय.

त्यामुळे..


३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुढची रिल स्केड्यूल करुन ठेवली आहे..

शनिवारी आणि रविवारी आम्ही तुंग तिकोना आणि कोरीगड या त्रिकूटाची रेकी करणार आहोत.

त्यानंतर प्रत्यक्ष शूटचे व्हिडीओ येतीलच.

पण बेस्ट पार्ट इज रेकी करतो म्हणजे आपण काय करतो, कशी करतो हेही शूट करणार आहोत. आणि ते देखील अपलोड करणार आहोत.

आता हे शूट Members Only ठेवायचे की For All ठेवायचे याबद्दल डिसीजन झाला नाहीये. पण जी मंडळी सातत्याने Membership घेऊन सपोर्ट करत आहेत त्यांना Extra Perks देणे ही आमची जबाबदारी आहें. अर्थात सर्वजण तितकेच प्रिय आणि महत्त्वाचे आहेत. लवकरच निर्णय घेऊ..

सदैव सोबत राहा. प्रेम करत राहा. जगदंब!♥️

आम्ही पुन्हा येत आहोत.

3 weeks ago | [YT] | 114

RoadWheel Rane

याबद्दल काय सांगाल?

5 months ago | [YT] | 43

RoadWheel Rane

तुम्ही सांगा कशा पद्धतीने पुढे जाऊया?🙌🏻

5 months ago | [YT] | 65

RoadWheel Rane

आज रविवार..
प्रचंडगड अर्थात दुर्ग तोरणाचा भाग १ नक्की पाहून घ्या♥️🫶🏻

भाग दुसरा आज दुपारी १२ वाजता?

जगदंब♥️

6 months ago | [YT] | 103

RoadWheel Rane

रोडव्हील राणे टीमच्या कामाला आता आणखीन शिस्त हवी यासाठी आता ही नवी जबाबदारी नव्या शिलेदाराला द्यायचं ठरवलं आहे. मधल्या काळात मीच एडीटची जबाबदारी सांभाळत होतो. (अर्थात त्यामागे आर्थिक गणितं ही बाजू होती) मात्र त्यामुळे बराच वेळ खर्ची पडत असल्याने सातत्य राखता येत नव्हतं. व्हिडीओ Frequency वाढवता येत नव्हती.

त्यामुळे यावेळी थोडं हार्ड डिसीजन घेणं गरजेचं होतं. त्यानुसार आता आपण आपली टीम हळूहळू वाढवणार आहोत आणि व्यापही…
अधिकाधिक गडकोट आणि रोज अर्धा तास दुर्गभ्रमंती हे आपलं पुढील ध्येय आहे.

त्याची सुरुवात आपण ही जागा भरून करणार आहोत.

धन्यवाद. जय शिवराय..

6 months ago | [YT] | 94

RoadWheel Rane

येत्या शुक्रवारपासून आपण दुर्ग तोरणा अर्थात प्रचंडगड सिरीज सुरु करत आहोत.


मध्येच वेळ मिळेल तसं कोल्हापूर येथे जाऊन पन्हाळ्यावरील जो भुयारी मार्ग Explore करायचा राहिला आहे. तोही निश्चितपणे जाऊन रिशूट करु. जय शिवराय!♥️

6 months ago | [YT] | 135

RoadWheel Rane

प्रिय पुणेकर…

परवा भेटतोय आपण!🔥

स्टॉल क्रमांक G-08

न्यू ईरा पब्लिकेशन हाऊसचा स्टॉल!

स्थळ - पुणे बुक फेस्टिव्हल, फर्ग्युसन कॉलेज, पुणे!🙌🏻

दिनांक - बुधवार, १७ डिसेंबर २०२५!

दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

शिवविचारांचा जागर करुया♥️🙏🏼

8 months ago | [YT] | 78

RoadWheel Rane

पन्हाळा Loading..

9 months ago | [YT] | 78

RoadWheel Rane

दुर्ग सुधागडचा भाग १ कसा वाटला? येत्या शनिवारी दुसरा भाग अपलोड करु.
त्यानंतर गोपाळगडाचे शूट करून मुंबईत परतलो आहोत. तर तेही लवकरच एडीट करून शेअर करु.
जय शिवराय!

1 year ago | [YT] | 228

RoadWheel Rane

छत्रपती म्हणे - अभिप्राय क्रमांक १ (आदेश रासकर)

०००

जय शिवराय दादा..

मी आदेश रासकर शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये राहतो. 🙏
छत्रपतींच्या कृपाशीर्वादाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी आपल्या युट्युब चॅनलशी ओळख झाली. आपण स्वराज्यातील गडकिल्ले यांची देत असलेली माहिती खूप आवडली आणि आपण अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता ही त्यासोबत वाढत गेली. आपली मराठी माणसाला गडकिल्ल्यांविषयी जी माहिती देण्याची तळमळ बघून आपल्याशी संपर्क करण्याचा मोह आवरला नाही 😊 त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या छत्रपती म्हणे या पुस्तकाची माहिती मिळाल्यानंतर मी पुस्तक ऑर्डर केलं आणि पूर्ण वाचून झाल्यानंतर खरंच या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा अभिमान वाटला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अवलंबलेल्या काही गोष्टी तत्त्व नियम आणि स्वराज्य निर्मिती प्रति असलेली त्यांची निष्ठा ही आपल्या शब्दातून मला अनुभवायला मिळाली, कठिण पारिस्थिती संयम कसा राखावा हे सुद्धा पुस्तक वाचताना अनुभवायला मिळालं शत्रूच्या गोटातही एखादा अनमोल हिरा आपल्याला मिळू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरलं आणि या पुस्तकांमध्ये तो प्रसंग मांडून तुम्ही आमच्या जीवनाचा रस्ता सुखकर करून दिला.

आपण आयुष्यात वेळोवेळी नवनवीन बदल केले पाहिजे हे छत्रपतींच्या जीवन चरित्रातून आपल्याला नक्कीच शिकायला मिळते. आपल्या सहकाऱ्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे दर्जा द्यावा हे महाराजांकडून शिकायला मिळते.
आपण खूप सुंदर उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे असं मला वाटतं.

हे पुस्तक प्रत्येक आईने प्रत्येक मुलाने, मुलीने व्यावसायिकाने नोकरी करणाऱ्या व्यक्तीने तसेच ज्या व्यक्तीने आयुष्यात आत्मविश्वास गमावला आहे त्या व्यक्तीने तर नक्कीच हे पुस्तक एकदा वाचावे असं मला वाटतं बाकी तुम्ही यामध्ये मांडलेल्या सर्व गोष्टी या आजच्या युगाला धरून आहेत आणि सर्व तरुणाईच्या मस्तकात एक वेगळा प्रकाश पाडणारे आहे आपल्याला द्यावे तितके धन्यवाद कमी आहे तरीसुद्धा मला आलेला अनुभव थोडक्यात आपल्या जवळ व्यक्त करतो. शिवछत्रपतींच्या कृपाशीर्वादाने आपली भेट लवकर होईल अशी आशा बाळगतो 🙏🚩😊

1 year ago | [YT] | 152