Welcome to Filmy Gappa for all things मराठी & Bollywood!
Get your daily dose of मराठी Bollywood news, celebrity gossip, movie reviews, and insightful discussions on the latest happenings in the industry. We'll also take you behind the scenes with exclusive interviews and in-depth analysis.
Subscribe for a front-row seat to the glamorous world of Bollywood!


Filmy Gappa

झी मराठीचे कलाकार आणि ‘दशावतार’चा खास संगम.
झी मराठीवर ‘दशावतार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर.

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेला चित्रपट ‘दशावतार’ आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या ह्या चित्रपटाचा २१ डिसेंबर २०२५ रोजी झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. चित्रपटगृहात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या हा अनुभव घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

‘दशावतार’ची कथा कोकणातील पारंपरिक दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांच्याभोवती फिरते. वैयक्तिक दु:खामुळे हादरलेल्या मेस्त्रींच्या आयुष्यात खाण प्रकल्पामुळे गावावर आलेले संकट, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मुलाच्या मृत्यूमागील सत्याचा शोध अशा अनेक थरांचा प्रवास उलगडत जातो. लोककला, श्रद्धा आणि आधुनिक वास्तव यांचा संगम साधत, बाबुली मेस्त्रींची शेवटची दशावतारी कामगिरी चांगल्या आणि वाईटातील थरारक लढाई ठरते.या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने झी मराठीने एक अनोखा उपक्रम राबवला तो म्हणजे झी मराठी मालिकांमधील कलाकार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू, जयंत, संतोष आणि वेंकी, ‘तारिणी’ मालिकेतील केदार, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील रोहन, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील सारंग, तसेच ‘कमळी’ मालिकेतील हृषी हे सर्व कलाकार ‘दशावतार’मधील विविध अवतारांमध्ये दिसले. त्यांच्या या उपक्रमामधून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि आदर स्पष्टपणे जाणवला. ह्या सर्व कलाकारांची रंगभूषा केली ती म्हणजे 'दादा राणे कोनस्कर' आणि 'उदय राणे कोनस्कर' त्यांची सेटवरील उपस्थिती हा क्षण आणखी खास बनवणारी ठरली. खऱ्या आयुष्यातील दशावतारी नाटकांचे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर गेली ३४ वर्षे दशावतारी रंगभूमीवर कार्यरत आहेत. तसेच या दोघांनी आजपर्यंत ७००० पेक्षा अधिक प्रयोगांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. *परंपरा, संस्कृती आणि थरार यांचा संगम असलेला ‘दशावतार’ पाहण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नका. २१ डिसेंबर २०२५ संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
‪@zeemarathi‬

1 day ago | [YT] | 656

Filmy Gappa

लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी अविस्मरणीय

आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत- शिवानी सोनार

 झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने २०२५ या सरत्या वर्षातल्या तिच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले. शिवानीसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरल. शिवानी म्हणाली, “२०२५  माझ्यासाठी  खूप खास आहे. जानेवारी २०२५  मध्ये माझे लग्न झाल आणि माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली. लग्नानंतर जीवनात बरेच बदल होतात आणि माझ्या बाबतीत हे सर्व बदल सकारात्मक होते.  कुटुंबापासून दूर राहण्याची सवय न्हवती तर ती गोष्ट नवीन आहे माझ्यासाठी आणि मी नक्कीच  माझ्या कुटुंबाला खूप मिस करते. माझा धाकटा भाऊही यावर्षी कामासाठी बंगलोरला गेला. पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर आहे, पण तो त्याच करिअर बनवतोय, आयुष्यात पुढे जात आहे हे बघून मला आनंदही आहे. व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, या वर्षी मला ‘तारिणी’  ही नवीन मालिका मिळाली. मी साकारत असलेल पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. झी मराठी आणि निर्मितीसंस्थेसोबत हे माझं पहिलच असोसिएशन आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा मला खूप आनंद मिळतोय. २०२५  मधील अविस्मरणीय क्षणांपैकी एक सांगायचं तर  माझा लग्न आणि माझी 'तारिणी' मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भलीमोठी लागलेली होर्डिंग्स. मी अतिशय आनंदी होती ते पाहून. या वर्षी आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता न आल्याची खंत मला आहे. त्यामुळे पुढील वर्षात व्यायाम, झोप आणि एकूणच दिनचर्या सुधारण्याचे ठरवले आहे. हे सध्या 'वर्क इन प्रोग्रेस' आहे. २०२५  तू माझं आयुष्य सकारात्मक केलस. नववर्ष साजरे करण्याबाबत शिवानी म्हणाली, दरवर्षी मी कुटुंब-मित्रपरीवार सोबत नववर्ष साजरे करते. पण यंदा कदाचित मी ‘तारिणी’च्या शूटवर असेन. तरीही शूट सांभाळून माझ्या प्रियजनांसोबतच मी नवीन वर्षाचे स्वागत करेन.
‪@zeemarathi‬

3 days ago (edited) | [YT] | 2,113

Filmy Gappa

सिद्धूच्या सुटकेसाठी भावनाने मोजली नात्याची मोठी किंमत

 विश्वाच्या साखरपुड्यात भावना–सिद्धू आणि जान्हवी आमनेसामने?

 महामालिका ‘लक्ष्मी निवास’ मध्ये सध्या सिद्धू, भावना, जान्हवी, विश्वा आणि जयंत यांच्यातील नाट्यमय संघर्ष उंचावले आहे. ही मालिका प्रेक्षकांना दररोज नवनवीन ट्विस्ट्स आणि भावनिक वळणांसह आपल्यात गुंतवून ठेवत आहे. सध्या मालिकेत सिद्धूला जेल मधून बाहेर काढण्यासाठी भावनाचे प्रयत्न सुरु आहेत. भावना, सिद्धूला जेलमध्ये भेटते आणि ठाम शब्दात सांगते की, “ती काहीही करून सिद्धूला बाहेर काढेल.” परंतु या सगळ्यात सिद्धूला जेलमध्ये मारहाण होते, ज्यामुळे भावना अत्यंत तणावात आहे आणि  घरच्या लोकांसमोर विनंती करते कि सिद्धूला बाहेर काढण्यासाठी जे करता येईल ते ती करेल. आता सिद्धूला सोडवण्यासाठी भावनाला एक कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. त्या परीक्षेत भावना जिंकून सुद्धा हरणार आहे. कारण सिद्धूला बाहेर काढण्यासाठी तिला सिद्धूशी कायमच दूर जावे लागणार आहे. तिच्या समोर घटस्फोटाचे कागदपत्र ठेवले जातात, तर दुसरीकडे, सई, जयंतच्या डब्यातून चिठ्ठी पाठवते, पण ते जेवण जेवून जयंतला जान्हवीच्या हातच्या जेवणाची आठवण येते. जयंत, विश्वाला  शोधत असताना दोघांना मध्ये एका गैरसमजातून वाद होतो. विश्वा आणि सई ची इंगेजमेंट आहे म्हणून दिग्विजय पत्रिका द्यायला लक्ष्मीकडे आलाय.

 
आता काय होईल जेव्हा सिद्धू जेलमधून बाहेर येईल?  विश्वाच्या साखरपुड्यात भावना, सिद्धू आणि जान्हवी, विश्वा आमनेसामने येतील ? यासाठी बघायला विसरू नका 'लक्ष्मी निवास' दररोज रात्री ८ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
‪@zeemarathi‬

5 days ago | [YT] | 2,011

Filmy Gappa

समर स्वानंदीच्या हनिमून ट्रीप ची सुरवात झाली कुणकेश्वर मंदिरापासून ‪@zeemarathi‬

5 days ago | [YT] | 1,670

Filmy Gappa

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा वाढदिवस
कमळीच्या वाढदिवसाला तारिणीने दिलं खास सरप्राईझ
मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात भेट देण्याची संधी मिळाली- विजया बाबर

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “कमळी” मधील कमळीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तारिणी आणि निंगी यांनी एक अनोख सरप्राईझ प्लॅन केल. कमळीचे डोळे झाकून तिला महाराष्ट्रातील पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नेल गेल आणि जेव्हा तिचे डोळे उघडले, तेव्हा कमळीचा आनंद तिच्या पाणावलेल्या डोळ्यात व्यक्त होत होता. मंदिरात पोहोचल्यावर कमळीने महाराजांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतला आणि भावनिक होऊन आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली. या खास प्रसंगी कमळीने मंदिरात आलेल्या शाळेतील मुलांसमोर भाषण केलं आणि शिवस्तुती गेली. कमळीने महाराजांच्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारावे आणि त्यांच्या मूल्यांचे पालन करावे असे म्हणत मुलांना प्रोत्साहित केल. या खास दिवसाचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी बंड्या आणि ऋषी सर सुद्धा ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवला.

कमळीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या 'विजया बाबर' हिने या अनुभवाबद्दल सांगितले की, “मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात प्रथमच भेट देण्याची संधी मिळाली. कमळीच्या भावनेत मिसळून मी ही महाराजांचे आशीर्वाद घेतला. हा माझ्यासाठी एक अद्वितीय अनुभव होता.”

आपली ऐतिहासिक मूल्ये, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धती आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करणे किती महत्त्वाचे आहे हे कमळीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालिकेच्या चाहत्यांना एक सुंदर संदेशही दिला.

तेव्हा बघायला विसरू नका "कमळी" दररोज रात्री ९ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर. ‪@zeemarathi‬

1 week ago (edited) | [YT] | 3,304

Filmy Gappa

कमळीने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केलेल्या वाढदिवसाचे व्हिडिओचे bts अपलोड केले आहेत आपल्या ‪@Filmy_Gappa‬​ चॅनेल वर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/d3JCFimwXhI?si=r9BRm...

1 week ago (edited) | [YT] | 797

Filmy Gappa

तारिणीने दिले कमळीला वाढदिवसाचे सरप्राईज. सर्व व्हिडिओ अपलोड केले आहेत आपल्या ‪@Filmy_Gappa‬​ चॅनल वरती. व्हिडिओ पाहण्यासाठी खालती दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/usD3BaJMGoo?si=I_n1I...

1 week ago (edited) | [YT] | 1,358

Filmy Gappa

नात्यांच्या गुंत्यातून उमलणारी प्रेमकथा – "शुभ श्रावणी”
मी ९ वर्षांनंतर अभिनय करणार आहे - लोकेश गुप्ते
"शुभ श्रावणी" लवकरच झी मराठीवर

कुटुंबातील नात्यांची उब, मनातील न सांगितलेलं दुख: आणि हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा यांचा मोहक संगम “शुभ श्रावणी” मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या कथेत केंद्रस्थानी आहे श्रावणी राजेशिर्के, शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के यांची मुलगी. चैतन्यमय, आनंदी आणि सगळ्यांना हसवत ठेवणारी श्रावणी आपल्या मनातील दुःख मात्र कुणासमोर व्यक्त करत नाही. भूतकाळातील काही कटू घटनांमुळे वडील विश्वंभर तिच्यापासून दुरावले आहेत, इतके की तिच्या सावलीलाही ते जवळ येऊ देत नाहीत. वडिलांनी एकदाच का होईना, प्रेमाने जवळ घ्यावं—ही श्रावणीची आयुष्यभराची अपूर्ण इच्छा आहे.
याच भावनिक संघर्षाचा साक्षीदार आहे शुभंकर शेलार, विश्वंभर यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी. सावलीसारखा श्रावणीच्या सोबत राहणारा शुभंकर तिच्या वेदना, तिचं एकटेपण, तिचं न सांगितलेलं दुःख जवळून पाहतो. सगळं समजून घेणारा, शांत, समंजस आणि प्रगल्भ शुभंकर तिच्या आयुष्यात अनाहूतपणे एक आधार बनत जातो. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहेत वल्लरी विराज, सुमित पाटील आणि मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ व प्रेक्षकांचे लाडके अभिनेते लोकेश गुप्ते तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झालेआहेत.

या पुनरागमनाबद्दल बोलताना लोकेश गुप्ते म्हणाले, “मी ९ वर्षांनंतर अभिनय करणार आहे. या ९ वर्षांत मी प्रामुख्याने दिग्दर्शन आणि लेखनावर लक्ष केंद्रित केल होत. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनी पुन्हा अभिनयाच्या कॅनव्हासला स्पर्श करताना वेगळीच ऊर्जा जाणवतय. अभिनयातून ब्रेक घेण्यापूर्वी मी झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका केली होती. आणि खरं सांगायचं तर, माझ्या बहुतेक मालिका मी झी मराठी सोबतच केल्या आहेत. आता या ब्रेकनंतर पुन्हा एका झी मराठीच्या एका नवीन शोमधून कमबॅक करत आहे, आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

कुटुंब, भावना आणि प्रेम यांचा हृदयाला भिडणारा नवी मालिका "शुभ श्रावणी" लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‪@zeemarathi‬

1 week ago | [YT] | 1,053

Filmy Gappa

तुमची लडकी "लीला" म्हणजेच वल्लरी विराज दिसणार सुमित विजय सोबत झी मराठीवरील नवीन मालिकेत.
प्रेमाने भरलेल्या घरात राहणारा 'शुभंकर'
आणि
पैशाने भरलेल्या राजवाड्यात राहणारी 'श्रावणी' ....
पाहूया यांची गोड कहाणी.

नवी मालिका 'शुभ श्रावणी'
जानेवारीपासून
आपल्या झी मराठीवर.
‪@zeemarathi‬

1 week ago | [YT] | 1,077

Filmy Gappa

नव्या गोष्टीने वाढणार गोडी,
तुम्हाला काय वाटतं कोण असेल नवी जोडी?

नवी मालिका,लवकरच,आपल्या झी मराठीवर

2 weeks ago | [YT] | 315