सत्यशोधक ✍️💪


सामान्य जनसमुदायाने उत्स्फूर्तपणे चालवलेली *सत्यशोधक चळवळ*ही आधुनिक भारतातील "पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ" होती.
सत्यशोधक चळवळीने सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मानवाच्या सर्वंकष मुक्ततेचा आग्रह धरला. स्वातंत्र्याची संकल्पना राजकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित न ठेवता, राजकीय स्वातंत्र्याबरोबरच जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा सत्यशोधकांनी आग्रह धरला.'अस्पृश्यता निर्मूलन’ हे सत्यशोधक चळवळीचे अंगीकृत कार्य होते.'शेतकरी-कष्टकरी-श्रमिक वर्ग' हा सत्यशोधक चळवळीचा केंद्रबिंदू होता.सत्यशोधक चळवळीने 'प्राथमिक शिक्षणाच्या' प्रसारावर सर्वाधिक भर दिला.ज्योतिबा फुले यांनी हंटर आयोगापुढे ‘झिरपण्याच्या सिद्धान्तास' विरोध करून कनिष्ठ वर्गातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी केली होती. ज्योतिबा फुले यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ 'स्त्री-शिक्षणापासून' केला.

✍️या youtube channel च्या माध्यमातून मी याच "सत्यशोधक विचारांना" केंद्रस्थानी ठेवून shorts,videos आणि audio books बनवून लोकांपर्यंत पोहचवण्याचा माझ्यापरिने छोटासा प्रयत्न करत आहे.😊



Bansi H

शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा💐💐
बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..👏👏
• १८६९ मधे सत्यशोधक ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी प्रथम शोधून काढली आणि पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला.
#शिवजयंतीचे जनक सत्यशोधक ज्योतिबा फुले🙏

3 days ago | [YT] | 22

Bansi H

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन💐👏

1 week ago | [YT] | 12

Bansi H

2 weeks ago | [YT] | 27

Bansi H

3 weeks ago | [YT] | 5

Bansi H

सर्वोच्च न्यायालयातील वकील एड. दिशा वाडेकर यांनी रोहित वेमुला व डॉ. पायल तडवी यांच्या आईंच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केले होते व त्यासाठी संशोधन देखील करून महत्वाचा आधारभूत डेटा न्यायालयात सादर केला होता.
रोहित वेमुला व पायल तडवी यांची उच्च शिक्षणातील जातीयवादा मुळे संस्थात्मक हत्या झाली, पुन्हा कुणी दलित आदिवासी यास बळी पडू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नियमावली निश्चित करून द्यावी यासाठी ही याचिका आहे. दरम्यान यासाठी अनेक सुनावण्या झाल्या व त्यात दिशा व ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी जबरदस्त युक्तिवाद केले.
त्याचा परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला(UGC) यासंदर्भात पाऊल उचलावे असे आदेश दिले होते. कोणते नियम व तरतुदी लागू कराव्यात हे देखील ऍड. दिशा वाडेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
त्यानुसार अलीकडेच म्हणजे १३ जानेवारी रोजी यूजीसीने आदेश जारी केले आहेत व त्यानुसार आता उच्च शिक्षणातील जातीयवादास पायबंद घालण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. यूजीसीने जारी केलेल्या नियमाविरोधात सवर्ण लोकांकडून निषेध सुरू केले आहेत.

3 weeks ago | [YT] | 0

Bansi H

🌷मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी🌷
गोड नाही आम्ही सत्य बोलतो.!😎

#सत्यशोधक💪✊

1 month ago (edited) | [YT] | 3

Bansi H

1 month ago | [YT] | 11

Bansi H

केवळ एक नव्हे तर दोन छत्रपती घडवुन जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना जयंती दिनी मानाचा मुजरा!!!!!👏
व सर्व बहुजनांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
जय जिजाऊ !! जय शिवराय !!!
जय शंभुराजे !! जय मूलनिवासी !!!!

1 month ago | [YT] | 18

Bansi H

👏बहुजन नाईका, भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका, वंदनीय सत्यशोधक फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त समस्त बहुजन समाजाला खूप खूप शुभेच्छा💐💐..व
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏

1 month ago | [YT] | 26

Bansi H

✊💙भीमाकोरेगाव 'विजय दिनाच्या' सर्व बहुजनांना मंगलमय शुभेच्छा💐💐
शहीदांना आदरांजली🙏
#विजयस्तंभ💙
#शौर्य दिन💪

1 month ago (edited) | [YT] | 60