DD Sahyadri News 

Official YouTube channel of DD Sahyadri News.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.


DD Sahyadri News

सेशेल्सहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाचा संदेश:

माझ्या सेशेल्स भेटीचा संदेश स्पष्ट आहे:

भारत अशा हिंद महासागराची कल्पना करतो

जिथे सागरी सुरक्षेसोबतच वाढती आर्थिक समृद्धी असेल;

जिथे आमची भागीदारी ही परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित असेल;

आणि जिथे आम्ही प्रत्येक देशासोबत 'एकजुटीने' वाटचाल करू.

भारतीय महासागराला ‘संधींचा महासागर’ बनवणे हेच आमचे ध्येय आहे.

#PMModiInSeychelles #IndiaSeychelles

1 month ago | [YT] | 5

DD Sahyadri News

सेशेल्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' हा किताब प्रदान

'ब्लू होरायझन' ते 'ग्रीन व्हिजन': पंतप्रधान मोदींचा जागतिक प्रभाव

पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील नेतृत्वासाठी, सेशेल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च सन्मान असलेला 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' (Guardian of the Blue Horizon) हा किताब प्रदान केला आहे.

शाश्वत विकासासाठी पंतप्रधान मोदींनी दिलेला दीर्घकालीन A आग्रह आणि त्यांची 'ग्रीन व्हिजन' (पर्यावरणपूरक विकासाची दृष्टी) या पुरस्काराद्वारे अधोरेखित करण्यात आली आहे.

हवामान कृती, शाश्वत विकास आणि हरित विकास (ग्रीन ग्रोथ) या क्षेत्रांतील पंतप्रधान मोदींच्या कार्याची दखल घेणाऱ्या जागतिक सन्मानांच्या मालिकेतील हा एक नवीन सन्मान आहे.

यापूर्वी मे २०२६ मध्ये, अन्न आणि कृषी संघटनेने त्यांना अन्नसुरक्षा बळकट करणे, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे यांसाठी 'ॲग्रीकोला मेडल' देऊन सन्मानित केले होते.

त्याआधी, २०१८ मध्ये शाश्वत आर्थिक विकास, जागतिक सहकार्य आणि सर्वसमावेशक विकासाला चालना दिल्याबद्दल त्यांना 'सोल पीस प्राइज' प्रदान करण्यात आला होता.

२०१८ मध्येच, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना प्रतिष्ठित 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

#PMModiInSeychelles #IndiaSeychelles

1 month ago | [YT] | 42

DD Sahyadri News

"ईशान्य भारतात शांतता क्रांती!"

दशकांपासून प्रलंबित राहिलेले गुंतागुंतीचे वाद आता इतिहास जमा होत आहेत. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आसाम-मेघालय सीमाविवाद आणि बंडखोर संघटनांसोबतचे शांतता करार यशस्वी झाले आहेत. संवादाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या ऐतिहासिक शांततेमुळे 'नॉर्थ ईस्ट' आता प्रगतीचे नवे 'पॉवरहाऊस' बनत आहे.

#12YearsOfRisingNorthEast

2 months ago | [YT] | 68

DD Sahyadri News

ईशान्य भारतातून ऐतिहासिक आणि अत्यंत दिलासादायक बातमी! केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे २०२६ मध्ये मिझोरम अधिकृतपणे पूर्णपणे बंडखोरीमुक्त झाले आहे.

बंडखोरीच्या घटनांमध्ये ८२% आणि नागरी मृत्यूंमध्ये ९७% ची विक्रमी घट झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या धोरणामुळे 'नॉर्थ ईस्ट' आता प्रगतीचे नवे केंद्र बनले आहे.

#12YearsOfRisingNorthEast

2 months ago | [YT] | 25

DD Sahyadri News

ईशान्य भारताच्या प्रगतीचे एक यशस्वी दशक!

केंद्र सरकारच्या विशेष धोरणांमुळे ईशान्येकडील राज्यांचा चेहरामोहरा बदलला आहे. दळणवळणाच्या क्रांतीपासून ते आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनापर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ॲक्ट ईस्ट' (Act East) धोरणाने या भागाला देशाच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन बनवले आहे.

#12YearsOfProgress #ActEastPolicy #NorthEastTransformation

2 months ago | [YT] | 60

DD Sahyadri News

💎 भारताच्या रत्ने व आभूषणे निर्यातीत मे महिन्यात ६.६६% ची लक्षणीय वाढ; निर्यात पोहचली २.५३ अब्ज डॉलर्सवर!

जागतिक बाजारपेठेतील सातत्यपूर्ण मागणीमुळे भारताच्या 'Gems & Jewellery' क्षेत्राची कामगिरी उंचावली आहे.

भारतीय कारागिरीचा समृद्ध वारसा, आधुनिक डिझाईन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे हे क्षेत्र भारताच्या एकूण निर्यातीचा एक मजबूत स्तंभ ठरत आहे. 🇮🇳✨

#IndiaExports #GemsAndJewellery #ExportGrowth #EconomicUpdate #MakeInIndia #DDSahyadri

2 months ago (edited) | [YT] | 51

DD Sahyadri News

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात भारताने लक्षणीय प्रगती साधली आहे. देशातील क्षयरोगाचा प्रादुर्भाव दर 1 लाख लोकसंख्येमागे 237 रुग्णांवरून 187 रुग्णांपर्यंत कमी झाला आहे. सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा, रोगाचे लवकर निदान आणि लोकसहभाग यांमुळे हे यश शक्य झाले आहे.

#12YearsOfSwasthBharat

2 months ago | [YT] | 21

DD Sahyadri News

2014 मध्ये भारतात केवळ 8 एम्स संस्था होत्या. आज ही संख्या वाढून 23 झाली आहे. एकेकाळी मोजक्या ठिकाणी मर्यादित असलेली ही आरोग्यसेवा व्यवस्था आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत असून, जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देत आहे.

#12YearsOfSwasthBharat

2 months ago | [YT] | 28

DD Sahyadri News

गेल्या दशकात भारताच्या आरोग्यसेवा क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 मधील 842वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत आज त्यांची संख्या 2100 हून अधिक झाली आहे.यामुळे हजारो होतकरू डॉक्टरांसाठी संधी निर्माण झाल्या असून,देशभरातील आरोग्यसेवा अधिक बळकट आणि सुलभ झाली आहे.

#12YearsOfSwasthBharat

2 months ago | [YT] | 35

DD Sahyadri News

भारताने महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यावर काय बदलले?

पिढ्यानपिढ्या भारतीय महिलांनी कुटुंबे घडवली, समाजाला बळ दिले आणि राष्ट्राच्या प्रगतीची स्वप्ने जपली. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या स्वप्नांना नवी संधी, नवे सामर्थ्य आणि नवी दिशा मिळाली.

बँक खात्यांपासून उद्योजकतेपर्यंत, शिक्षणापासून नेतृत्वापर्यंत, आरोग्यापासून सशस्त्र दलांपर्यंत नारीशक्ती आज भारताच्या विकासयात्रेचे नेतृत्व करत आहे.

#12YearsOfNariShakti #NariShakti

2 months ago | [YT] | 59