JustGoodThings

पूर्वी बोरन्हाणला छोटी - छोटी गावरान बोरं मुलांच्या डोक्यावर टाकली जायची... लहान मुले ती आनंदाने गोळा करून खायची पण आज काल बोरांची जागा Chocolates And Biscuit ने घेतली. बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन ज्याचे बोरन्हाण करतात. लहान मुले बोरे, गोड- गोड उसाचे पेर, तिळाची लाडू उचलून खातात किंवा घरी घेऊन जातात. एकूणच काय तर त्यातील आवश्यक असे पदार्थ मुलाच्या पोटात जातात. शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू लावले जाते. आणि त्यांना तिळगूळ देखील वाटले जाते. सध्या काळ बदल्यामुळे बोरन्हाण देखील थोड वेगळं झालं आहे. कारण हल्लीच्या लहान मुलांना आवडणारे पदार्थ देखील या बोरन्हाणात घालण्यात येतात. लिमलेटच्या गोळ्या, चाॅकलेट यात टाकण्यात येतात. बोरन्हाण करण्यामागे शास्त्रीय कारण असल्यामुळे ते केले जाते. बदलत्या वातावरणात लहान मुलांना लागणारी उष्णता बोर, उसाचे पेर यातुन मिळते असा या मागे विश्वास आहे. जर तुमच्या लहान मुलाचे बोरन्हाण करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात बोरन्हाणाची ही प्रथा अत्यंत प्रचलित आहे.

11 months ago | [YT] | 4