KARATE SHOTO FEDERATION - SHOTOJUKU INDIA

karate videos ...
Temple vlogs video hindi marathi video
How to create karate india office classes

traval volg

Life staels vlogs
Karate tips & tricks



ANMOL IKS

*!! श्री गणेशाय नमः !!*

*!! श्री गुरूदेव दत्त !!*

*श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध*

*अध्याय सोळावा*

*शिष्य-ज्ञान प्रबोध*

*सिद्धमुनींना नामधारकांनी पुढे प्रश्न केला. सर्व शिष्यांना तिर्थयात्रेला पाठवल्यावर श्री गुरुंजवळ कोण राहिले आणि तिथे पुढे काय झाले.* *नामधारकाचा प्रश्न ऐकून सिद्ध मुनी संतुष्ट झाले व म्हणाले तू खरंच धन्य आहेस आणि तुझ्यामुळे मी ही धन्य झालो कारण तू विचारलेल्या प्रश्नांमुळे मला पूर्वकथांची आठवण येते त्याचे चिंतन होते आणि कथा सांगण्यामुळे श्रीगुरुंचे अनुसंधान होते तू एकचिते ते सर्व ऐकतोस त्यामुळे तुझेही मन श्री गुरुचरणी तल्लीन होते. उभयता लाभ लक्षात येऊन मी तुला सर्व कथन करीत असतो. तर आता एक सर्व शिष्यांना तिर्थयात्रेला पाठवल्यावर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री वर्षभर होते. मी त्यांच्या समवेतच होतो. तेथे एक वर्षभर गौप्य होऊन राहिले. अर्थात गौप्यतेचा अर्थ अदृष्य अवस्था नसून ते लोकाभिमुख असले तरी आपला परिचय श्रीगुरु असा न होऊ देता राहिले. त्यावेळी एक मुनी तेथे आला आणि श्री गुरु दिसताच साष्टांग नमस्कार केला आणि विनवणी करू लागला, स्वामी माझ्या भोवती अज्ञानाचा अंधार पसरला आहे. यातून मला सोडवा ज्ञानामृत पाजा. आतापर्यंत मी अनेक जप-जाप्य अनुष्ठाने केली, परंतु चित्त एकाग्र होत नाही आणि चित्ताची एकाग्रता न साधल्यामुळे सर्व तप:साधना ही शरीर क्लेश करून राहिली आहे, आज तुमचे दर्शन झाले आणि मनाला एक प्रकारची शीतलता प्राप्त झाली आहे. माणसाला आपली प्रिय व्यक्ती दृष्टीस पडली तरी चित्तवृत्ती मोहरतात. लेकराला फार प्रतिक्षेनंतर आई दृष्टी पडली तर जसे उचंबळून येते तसेच आईलाही प्रेम पान्हा फुटत असतो. गुरु ही माऊलीच आहे. ज्ञानामृत पाजून पुष्ट करणारी! या मुनीला तसेच झाले आणि तो भरभरून बोलला. गुरु म्हणाले तुला गुरूपदेश नाही. मग मुनी कसा झालास. मुनी म्हणजे ऋषी आणि ऋषींच्या व्याख्येत "ऋषीदर्शनात" असे म्हटले आहे. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, जे एका गुरुमुळे प्राप्त होऊ शकते. गुरूच नाही तर ज्ञान कसे होणार असे म्हणताच मुनी म्हणाले स्वामी मला एक गुरु होते. नेहमी कठोर बोलत शिवाय जे करू नये ते करावयास सांगत. कधी वेदाध्यायन सांगत नसत. ते म्हणत तुझे अंतःकरण स्थिर नाही. त्यामुळे विद्या येणार नाही. पुन्हा इतर कामे सांगत. मी नकार दिला तर अजून रागावत त्यामुळे असे अनेक दिवस सहन करून असह्य झाल्यावर इकडे निघून आलो. त्याचे हे कथन ऐकून गुरूंनी हास्य केले व म्हणाले अरे तू तर आत्मघातकी आहेस. स्वतःच देव्हाऱ्यात घाण टाकून नशिबाला दोष देतोस. अरे मुर्खा स्वतःच नाक कापून समोरच्याला अपशकुन करणारा आहेस तू. स्वतःचे अवगुण विचारात घेत नाहीस. मात्र श्री गुरूंच्या दोषाचा वारंवार विचार करतोस. तुला ज्ञान प्राप्ती कशी होईल. काय आहे! स्वतःचे दोष स्वतःचे न्यूनत्व किंवा स्वतःच्या अज्ञानाची जर जाण होत नसेल तर बुद्धीचा विकासच खुंटला असे समजावे त्यामुळेच आत्मस्तुती हे महापातक समजल्या गेले आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग आला आहे. पांच पांडवांची पत्नी झाल्यामुळे द्रौपदीच्या पत्नीत्वाची वाटणी क्रमप्राप्तच होती. त्याचे काही नियम ठरवणे, आचारसंहिता ठरवणे अर्थातच आवश्यक होते. त्याप्रमाणे ते तसे ठरलेही होते.

3 months ago | [YT] | 0

ANMOL IKS

🎆 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆

सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
या आनंदाच्या सणानिमित्त 15 ते 25 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी असेल.

सुट्टीमध्ये देवळीत दररोज सकाळी ५:३० वाजता उठून अभ्यास सुरू करावा.
अभ्यासानंतर खालील गोष्टी दररोज कराव्यात 👇

1️⃣ वाचन
2️⃣ एक्सरसाइज (व्यायाम)
3️⃣ पहिली कथा आणि दुसरी कथा वाचन
4️⃣ २४ स्टेप्स पूर्ण करणे
5️⃣ १६ स्टेप्स हनुमान डन (हनुमान व्यायाम)
6️⃣ दररोज ५० ॲप्स
7️⃣ दररोज एकूण १०० ॲप्स मारायचे (सकाळी आणि संध्याकाळी)

📖 दिवाळीचा अभ्यास कार्यक्रम:
दररोज सकाळी उठून अभ्यास आणि संध्याकाळी पुनरावृत्ती करायची.
रोजचे प्रश्न लिहायचे — आणि सुट्टीनंतर मी तुमचा अभ्यास व फिटनेस तपासणार आहे.

✨ शिस्त, अभ्यास आणि फिटनेस हेच तुमचे खरे दीप आहेत! ✨

3 months ago | [YT] | 1

ANMOL IKS

*🌹 जीवनशैली 🌹*
---------------------------------------------------
"दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणाऱ्याच आयुष्य नेहमी राख होतं तो स्वतः काही करत नाही फक्त इतरांचं मोजत बसतो ना झोप लागते ना समाधान मिळतं कारण त्याचं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या ताटात असतं..!"

माणसामाणसात पण किती फरक असतो ना..?? काही माणसं आयुष्यभर इतरांच्या चांगल्यासाठी झिजतात तर काही माणसं इतरांचं चांगलं झालेलं पाहून झिजतात...!!

"महत्व"माणसाचं नसतं तर ते त्याच्या उत्कृष्ट "स्वभावाचं"आणि उत्तम "आचरणाचं"असतं कोणी एका "क्षणात"आपलं मन "जिकून" जातं.
तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही "परकच" राहतं.
उत्तम,चांगला सल्ला देणारे लोक आपल्याला आवडत नाहीत. परंतु मनात कपट ठेवून, गोड बोलनारे आणि चेहरा हसरा ठेवून विश्वासघात करणारेच लोक आपणास आवडतात.
वेळ अति महत्त्वाचे असते. वेळेचा सदुपयोग करा. एक वेळ प्रत्यक्ष देव येऊन माफ करेल पण वेळेचा निरर्थक टाईमपास केला तर, वेळ निघून गेल्यावर वेळ कधीच माफ करणार नाही.
जगात सर्व काही मिळेल. पण वेळ निघून गेल्यावर आणि आईबाप निघून गेल्यावर कधीच मिळत नाहीत. वेळ आणि आईबाप यांचा सदैव सन्मान करा.
माझ्याशिवाय तुला पर्यायच नाही. असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यात तोंड बघू नका. कारण असा व्यक्ती विषारी कोब्रा नागापेक्षा घातकी विषारी असतो.
*********************************
*जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज*

5 months ago | [YT] | 0

ANMOL IKS

स्मरणमात्र संतुष्टाय -- केवळ स्मरण केले असता जे संतुष्ट होतात अर्थात दत्त महाराज --- हे स्मरण कधी करावे ? कधीही करा . याला मूहूर्ताची गरज नाही ,कोणताही काळ अशुभ नाही . कुठे केले असता चालू शकते ? कुठेही करा . याला कुठल्याही आसनाची गरज नाही ,शरीर कोणत्याही अवस्थेत का असेना -- हरकत नाही . इतकी मुभा दिलेली असून हे स्मरण होत का नाही हा खरा प्रश्न आहे .

काय केले असता हे स्मरण नित्य घडेल ? तर महाराजांकडे प्रार्थना करताना या भक्तीचे मागणे मागणे अवश्य आहे . देवांनी देखील दत्त महाराजांकडे हि भक्ती मागितली आहे . भक्ती द्यावी निश्चयेसी l दिवा निशी प्रेमयुक्त ll (द मा ५/९३) दिवस असो रात्र असो ,हे स्मरण नित्य होऊ लागले कि अन्य काही करायची गरज आहे का ?

या स्मरणाला साधने कोणती ? ग्रंथ आहेत ,पुस्तके आहेत त्यातील लीला वाचनाने ,चिंतनाने स्मरण होते . या लीला सांगण्याने अर्थात कीर्तनाने आणि त्या तशाच ऐकण्याने अर्थात श्रवणाने स्मरण होते . अहो आम्ही तर हे प्रसार माध्यम देखील स्मरणाचे साधन केले आहे . कोणत्याही मार्गाने का होईना ,स्मरण होणे अगत्याचे आहे .

दिवसभर मायेने गुरफटलेल्या मनाला या स्मरणाचा विसावा मिळाला कि हि माया किंचित का होईना आपला पाश सैल करते .या मायेच्या जोखडातून मुक्त होणे कठीण असले तरी अशक्य निश्चितच नाही . हे स्मरण एक ना एक दिवस हा मायेचा विळखा अलगद दूर करेल आणि विळखा दूर होताच जे समाधान लाभेल ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे . अवश्य प्रयत्न करा ,आणि करत रहा . श्रीगुरुदेव दत्त !!!--

7 months ago | [YT] | 1

ANMOL IKS

🙏🏼🙏🏼
शनिवार : 31 मई, 2025
*!! ॐ गं गणपतए नमः !!*
🔔
*तृतीय ज्योतिर्लिंग*
*महाकालेश्वर ज्योतिर्लिंग*
*उज्जैन धाम से*
*आज के मंगलकारी पावन दर्शन*
🚩🚩
☀️तदनुसार…☀️ *उदयातिथिनुसार* ~
*सूर्योदय* ~ वृन्दावन ~ *5: 25:32 am*
📯 *विक्रमी संवत् ज्येष्ठ* शुक्ल पक्ष (सुदी)
* *पंचमी (०५)* ~ आज रात्रि (२०:१४:४५) 8:15 pm तक
🍂 *तत्पश्चात्*
*षष्ठी (०६)* शुरू

🎼 🎼🎼🎼🎼🎼🎼
*पर्व, व्रत एवं त्योहार* आदि का विवरण.. ⤵️
‼️💅🏼📯‼️
👾👾 *सूर्यग्रहण के समकक्ष महत्वपूर्ण पुण्य फलदाई तिथियां ⤵️*
*1️⃣ रविवारी ~ ७,*
*2️⃣ सोमवती ~ ३०,*
*3️⃣ मंगलवारी ~ ४* और
*4️⃣ बुधवारी ~ ८*
‼️👾👾‼️
📯 📯📯📯📯
🌞🌞 *तारीख 2 जून तक नो-तपा*
🍂🍂 *गंगा दशहरा पर्व ~ 5 जून तक*
* *ॐ ह्रीं गंगाये ॐ ह्रीं स्वाहा*
* *उक्त मंत्र के बाद स्नान करने से गंगा स्नान का फल प्राप्त होता है*
💜💜
📯 *आज* ⤵️
♻️ *शनिवार* ~ *31 मई*
🚩 *पंचमी*
🚩 *नव मनोरथ द्वारकाधीश जी*
☸️☸️ *आगामी* ⤵️
♻️ *मंगलवार* ~‌ *3 जून* ~
🚩 *मासिक दुर्गाष्टमी*
♻️ *गुरुवार* ~ *5 जून* ~
🚩 *गंगा दशमी / गंगा दशहरा*
♻️ *शनिवार* ~ *7 जून* ~
🚩 *निर्जला एकादशी (वै.)*
♻️ *रविवार* ~‌ *8 जून* ~
🚩 *रवि प्रदोष व्रत*
♻️ *बुधवार* ~ *11 जून* ~
🚩 *देव

8 months ago | [YT] | 0

ANMOL IKS

🙏🏼🙏🏼
सोमवार : 26 मई, 2025
*!! ॐ गं गणपतए नमः !!*
🔔
*तृतीय ज्योतिर्लिंग*
*महाकालेश्वर ज्योतिर्लिंग*
*उज्जैन धाम से*
*आज के मंगलकारी पावन दर्शन*
🚩🚩
☀️तदनुसार…☀️ *उदयातिथिनुसार* ~
*सूर्योदय* ~ वृन्दावन ~ *5: 26:52 am*
📯 *विक्रमी संवत् २०८२*
*ज्येष्ठ* कृष्ण पक्ष (वदी)
* *चतुर्दशी (१४)* ~ आज दोपहर (१२:११:०१) 12:11 pm तक
🍂 *तत्पश्चात्*
*अमावस्या (३०)* ~ शुरू होकर कल सुबह 8:11 am तक

🎼 🎼🎼🎼🎼🎼🎼
*पर्व, व्रत एवं त्योहार* आदि का विवरण.. ⤵️
‼️💅🏼📯‼️
👾👾 *सूर्यग्रहण के समकक्ष महत्वपूर्ण पुण्य फलदाई तिथियां ⤵️*
*1️⃣ रविवारी ~ ७,*
*2️⃣ सोमवती ~ ३०,*
*3️⃣ मंगलवारी ~ ४* और
*4️⃣ बुधवारी ~ ८*
‼️👾👾‼️
📯 📯📯📯📯
🚩 *तारीख 2 जून तक नो-तपा*
🚩 *27 मई से गंगा दशहरा पर्व प्रारंभ*
* *ॐ ह्रीं गगाये ॐ ह्रीं स्वाहा*
* *उक्त मंत्र के बाद स्नान करने से गंगा स्नान का फल प्राप्त होता है*
💜💜
📯 *आज* ⤵️
♻️ *सोमवार* ~ *26 मई*
🚩 *(१४) चतुर्दशी* ~
* *(आज दोपहर 12:11 pm से कल सुबह तक अमावस्या)*
* *पितृ कार्य, ‌श्राद्ध कर्म की ~ ज्येष्ठ ~ सोमवती अमावस्या*
🚩 *शनि जयंती*
☸️☸️ *आगामी* ⤵️
♻️ *कल मंगलवार* ~‌ *27 मई* ~
🚩 *(३०) देव कार्य, स्नान दान की ~ ज्येष्ठ अमा

8 months ago | [YT] | 0

ANMOL IKS

💥 *जनसूर्य न्यूज*💥 ▪️▪️▪️▪️▪️▪️ *विट्यातील विद्यार्थ्यांचे सांगली येथे यश* 🔶🔶🔶🔶संपादक.किरण भगत .मो.8805869504. 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/dZRFgEj51W8?si=0YBv0...

1 year ago | [YT] | 0

ANMOL IKS

*_🙏🏼जय गुरुदेव🙏🏼_*

*_🌺दैनिक राशी भविष्य🌺_*

*_🌺संकलन- सुरज राकले, पुणे.🌺_*

*_✒विशेष विनंती- कृपया लेखात व संकलनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावे, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_*

*_1) मेष राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील - परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या - आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदीत व्हाल. पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दु:खी देखील व्हाल. पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल परंतु, ऐन वेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या होतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.
उपाय :- प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेकारक ठरेल.

*_2) वृषभ राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन धन देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.
उपाय :- प्रियकर/ प्रियसी ला भेटायला जाण्याच्या आधी साखर खाऊन निघा हे लव लाइफ साठी लाभकारी आहे.

*_3) मिथुन राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते याने तुमची आर्थिक स्थिती ही बिघडते. आनंददायक सांयकाळ घालविण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. संकलन- सुरज राकले, पुणे‌.
उपाय :- चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी, आपल्या घराच्या मध्याला स्वच्छ ठेवा.

*_4) कर्क राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रीत करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.
उपाय :- आपल्या रोमँटिक पार्टनरसाठी कुठलेही मार्बल आधारित वस्तू/ क्यूरियो / स्मारिका भेट द्या आणि आपल्या प्रेम जीवनाला परस्पर रूपात लाभ मिळावा.

*_5) सिंह राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. प्रेमाचा आनंद घेता येईल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.
उपाय :- रेवडी, तीळ आणि साखर वाहत्या पाण्यामध्ये वाहत घातल्याने नोकरी/बिझनेस साठी फायदेशीर राहील.

*_6) कन्या राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैश्याची आवश्यकता असेल परंतु, तुम्हाला ते मिळणार नाही. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.
उपाय :- गरीब आणि गरजू मुलांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या खेळणी आणि बाहुल्या दान करा.

*_7) तुला राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.
उपाय :- पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे, विशेषतः शनिवारी, आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल.

*_8) वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. - तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. परंतु, त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे खूप रागावलात तर त्यामुळे तुमच्या हिताचेच नुकसान होईल. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.
उपाय :- हायड्रोजनेटेड वस्तुंचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले राहील.

*_9) धनु राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात. संकलन- सुरज राकले, पुणे‌.
उपाय :- आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांबे किंवा सोन्याच्या (शक्य असेल तर) चमच्याचा उपयोग करा.

*_10) मकर राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे - आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. संद्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात परंतु, या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.
उपाय :- गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला आणि प्रेम जीवन चांगले ठेवा.

*_11) कुंभ राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संद्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात तथापि, शेवटी तुम्हाला शेवटी वाटेल की, तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.
उपाय :- एक सक्रिय आणि संपन्न करिअर / व्यवसायासाठी, शिक्षक, गुरु आणि लहान मुलांना स्नेहा सोबत आणि समर्पणासोबत मदत करा.

*_12) मीन राशी भविष्य (Wednesday, February 5, 2025)_*
सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.
उपाय :- कपाळावर केशराचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल.

*_🌺संकलन- सुरज राकले, पुणे.🌺_*

*_✒विशेष विनंती- कृपया लेखात व संकलनकर्त्याच्या नावात काहीही बदल न करता पुढे पाठवावे, ही नम्र विनंती. यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्माचे पातकही लागत नाही.✒_*

*_🙏🏼इति सुर्यार्पणमस्तु🙏🏼_*

1 year ago | [YT] | 0

ANMOL IKS

*!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!*
🗒️ *दैनिक पंचांग*🗒️
*ईंग्रजी दिनांक* २ फेब्रुवारी २०२५.
🔥 *अग्निवास पृथ्वीवर नाही.*
🥄 *अग्नि आहुती* बुध मुखात आहुती.
⏲️ *युगाब्द* -५१२६
⏱️ *संवत* -२०८१
👑 *शालिवाहन शके* -१९४६
⌛ *संवत्सर* - क्रोधीनाम
🧭 *अयन* - उत्तरायण
🌤️ *सौर ऋतु* शिशिर
🪐 *मास* - माघ
🌗 *पक्ष* - शुक्ल
🌕 *तिथी* - चतुर्थी (०९|१५)
पंचमी -(३०|५३)
☀️ *वार* - रवि ( भानु )
🌟 *नक्षत्र* - उत्तराभाद्रपदा (२४|५२)
🌟 *योग* - शिव (०९|१४)
- सिध्द (३०|०६)
✨ *करण* - विष्टि (०९|१५)
- बव (२०|०४)
🌝 *चंद्र राशी* मीन
🌞 *सूर्य राशी* मकर
🌟 *सूर्य नक्षत्र श्रवण*
🪐 *गुरु राशी* वृषभ
🌄 *सूर्योदय* ०७|१४
🌅 *सुर्यास्त* १८|३१
🕉 *दिन विशेष शास्रार्थ*
*श्री पंचमी, वसंत पंचमी, रति व कामदेव पूजन, भद्रा ०९|१५ पर्यंत,*
*राहू काल* १७|०६ ते १८|३१ अशुभ
*गुली काल* १५|४२ ते १७|०६ शुभ
*अभिजित* १२|३० ते १३|१५ शुभ
*प्रदोष काल* १८|३१ ते २१|०२ शुभ
⏳ *शिवलिखीत चौघडीया*
*लाभ* १०|०३ ते ११|२८
*अमृत* ११|२८ ते १२|५२
*शुभ* १४|१७ ते १५|४२
*शुभ* १८|३१ ते २०|०६
*अमृत* २०|०६ ते २१|४२
*लाभ* २६|२७ ते २८|०३
*शुभ* २९|३८ ते ३१|१३
*उपासना 🙏*
*ॐ घृणिः सूर्याय नम: ॥*
*ॐ हृां,हृीं, हृौं सः सूर्याय नमः ॥*
*ग्रहाणामारादित्यो लोकरक्षणकारकः । विषमस्थान संभूतां पिडां हरतु मे रविः ।*
*सुभाषित* 🙏
*यः प्रीणयेत् सुचरितैः पितरं स पुत्रो यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रम् l तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं यदेतत्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते ll*
जो अपने सदाचरणों से पिता को संतुष्ट कर देता है, वही सत्पुत्र है। जो सदा पति का हित चाहती है, वही वस्तुतः पत्नी है। जो विपत्ति और सुख में समान व्यवहार करता है, वही सच्चा मित्र है। इस संसार में पुण्यशील लोग ही इन तीनों को प्राप्त करते हैं l
*शुभाशुभ दिन*
प्रतिकूल दिवस आहे.
*फेब्रुवारी महिन्यातील मुहूर्त*
*साखरपुडा मुहूर्त*
फेब्रु ३, ४, ७, १३, १६, १७, २०, २१
*डोहाळजेवण*
फेब्रु ४, १०, ११, १६
*बारसे*
फेब्रु ४, ७, १०, १७, २५
*जावळ मुहूर्त*
फेब्रु ३, १०, १६, १७, २८
*कान-नाक टोचणे*
फेब्रु ३, १०, १७
*बाळ- बाळंतिणदेवदर्शन*
फेब्रु ४, ९, १०, २५, २६
*नविन वस्र धारण*
फेब्रु १९, २०, २१
*व्यापार मुहूर्त*
फेब्रु ३, ४, ७, १५, १७, २०, २१
*दाराची चौकट बसविणे*
फेब्रु ६, ७, १०, १९
*उपनयन*
फेब्रु ३, ७, १४
*विवाह*
फेब्रु ३, ४, ७, १३, १६, १७, २०, २१, २२, २३, २५
*मूर्ति प्राणप्रतिष्ठा*
फेब्रु ३, ७, १०, १७, २१,
*भूमीपूजन*
फेब्रु १, ५, १२, १३, १४ २०, २४
*वास्तु शांती*
फेब्रु ३, ७, १०, १५, १७, २१
*गृहप्रवेश (लौकिक)*
फेब्रु ३, ७, १०, १५, १७, २१
*विहीर खणणेस / बोअरिंग मारणे*
फेब्रु ३, ४, ७, १५, १७, २०, २१
*बी पेरणी*
फेब्रु १३, १५, १६, १७, २०, २१
*कापणी*
फेब्रु ५, ९, १०, १२, १३, १७, १९, २३, २४
*बागकाम*
फेब्रु ५, ९, १०, १३, १४, २०, २४
*
साहित्यरत्न, ज्योतिषाचार्य, नक्षत्र ज्योतिषप्रविण, ज्योतिषरत्न ज्योतिर्भुषण, विरार.
*|| अथ पंचांग श्रवणफलम् || तिथ्याश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यवर्धनम् | नक्षत्रोध्दारते पापं योगद्रोगनिवारण् || करणाच्चिन्तितं कार्यं पंचांगफलमुत्तमम्। एतेषां श्रवणान्नित्य गंगास्नानफलं लभेत् || इतीदं संवत्सरफलं वत्सरादितिथौ शुभम् | याः शृणोति नरो भक्ता स सुखी वत्सरं भवेत् ||*
*सुचना*
*दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुंबई मानाचे आहेत, त्यामुळे मुहुर्ताच्या वेळा मुंबई मानाच्या आहेत. बाकी सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.*
—*—*—*—*—*—*—*—*
*आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*

1 year ago (edited) | [YT] | 0

ANMOL IKS

माघ शु. चतुर्थी! श्रीविनायक जन्मोत्सव!
भगवान श्री गणेशांच्या हजारो अवतारांचे वर्णन श्रीमुदगल पुराणकारांनी केलेले आहे. या प्रत्येक अवताराचे प्रयोजन मातापिता, राक्षसवध, भक्तसंरक्षण इ. लीला वेगवेगळ्या आहेत.
आपणास मात्र सामान्यत: गणेशजन्माची एकच कथा ज्ञात असते. तीच भाद्रपदी चतुर्थीला आणि तीच माघी चतुर्थीलाही सांगून आपण मोकळ होतो. वास्तविक ती कथा आहे कार्तिक शुध्द चतुर्थीची. त्या दिवशी श्रीगणेशांचा "उमांगमलज'' नामक अवतार झाला. आपणास ज्ञात असलेली सर्वश्रुत कथा त्या चतुर्थीची आहे.
आज आहे माघ शु. चतुर्थी. आजचा गणेशजन्म आहे श्रीविनायक जन्मोत्सव. या चतुर्थीचे वैभव हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे. महामुनी कश्यप तथा देवी अदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे.
श्रीमन मुदगल पुरणाच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक वर्णिले आहे. संक्षिप्तत: त्याचा आढावा घेऊ.
गौड प्रांतात रुद्रकेतू तथा शारदा नामक दाम्पत्याला जुळी अपत्ये झाली. त्यांची देवांतक तथा नरांतक अशी नावे रूढ झाली. देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरणास लावले. वरदान रुपात "श्रीब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा'' असा अदभुत वर भेटला आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेला त्यांची राक्षसीवृत्ती जगाला त्रस्त करू लागली. त्रीभूवनावर सत्ता स्थापन झाली. देवता स्वलोकातून निर्वासित झाल्या. अरण्यवासी ठरल्या. मग यांनी देवता आहार रूप यज्ञाचा विनाश सुरु केला. देवतांना उपवास घडू लागले आणि त्यांच्या या दु:खाने सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता आदिती.
श्रीकश्यपांसमोर तिने आपली व्यथा मांडली आणि उत्तररुपात तिला श्रीगणेशोपासना रहस्य प्राप्त झाले. त्या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरुपात श्रीगणेशदर्शन तथा पुत्ररुपात आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले.
इकडे देवांतक नरांतक अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनाही अंतिम उपाय रुपात श्रीगणेशाराधन सुरु केले आणि या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद रुपात माघ शु. चतुर्थीला कश्यपगृही भगवान श्रीविनायक रुपात अवतीर्ण झाले.
या अवतारात अनेकानेक बाललीला पहावयास मिळाल्या. श्रीमुदगलपुराणापेक्षा या बाललीलांचे कौतुक श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडात अधिक व्यापक रीतीने शब्दबद्ध करण्यात आले आहे.
यातील अनेक लीलांचे तात्पयीर्थ मोठे अदभुत आहेत. उदा. श्री विनायकाच्या उपनयन प्रसंगी अनेक देवतांनी त्यांना भेट रुपात शस्त्रास्त्रे दिली. वरपांगी पाहता उपनयन तर शास्त्राभ्यासाचा आरंभ. मग शस्त्रे का दिली? तर जोवर शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय होत नाही तोवर देवांतक, नरांतक या वृत्तींचा विनाश संभव नाही.
पुराणकारांनी वर्णिलेले राक्षस या केवळ व्यक्ती नसतात तर त्या प्रवृत्ती असतात. देव कार्यास विरोध करतात ते देवांतक. तर मानवीय मूल्यांना उध्वस्त करतात ते नरांतक. यांच्या निर्दालनाकरीता अनिवार्य आहे. हा या कथेचा भाव समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे.
गंधर्वकथा ही अशीच रोचक कथा. गंधर्वाचे राजे हाहा आणि हुहु हे कश्यपाश्रमात आले. बालविनायक तेथे खेळत होते. या गंधर्वांनी पंचायतन पूजा आरंभिली. श्रीगणेश, श्रीविष्णू, श्रीशंकर, श्रीदेवी तथा श्रीसूर्य या पाचही देवतांचे नियमित पूजन करण्यास पंचायतन पूजन असे म्हणतात. याचे मूळ कारण सगळ्या मार्गांचा समन्वय असते. मात्र पाचांची पूजा करतांना त्यांना वेगवेगळे मानण्यात आणि आम्ही पाचांचीही पूजा करतो याचाच अभिमान आणि पुढे जाऊन अहंकार वाटणाऱ्या गंधर्वांना श्री विनायकाने धडा शिकवला.
श्रीविनायकांनी त्या पाचही मूर्ती गिळून टाकल्या. मग आकांडतांडव करणाऱ्या गंधर्वांना स्वत:च पाचही रुपात दर्शन दिले. सगळे काही "मोरयाच'' आहे हे समजावून सांगणारी ही मोरया कृती आहे.
श्री विनायकांच्या लीला स्थानात कश्यपाश्रमाशिवाय काशीक्षेत्रालाही मोठे वैभवशाली स्थान आहे.
काशीराज्याच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने श्रीविनायक काशी नगरीत आले. तेथे त्यांनी सगळ्याच गावकऱ्यांना लळा लावला. सगळ्यांनाच वाटू लागले की श्रीविनायक आपल्या घरी यावेत. हा आग्रह खूपच वाढला आणि मग एकेदिवशी श्रीविनायकांनी घोषित केले उद्या आम्ही सगळ्यांच्याच घरी येऊ.
ही वार्ता सगळ्या गावात पोहोचली. गावाबाहेर एका झोपडीत राहणाऱ्या महर्षी शुक्ल तथा देवी विद्रुमा नामक दाम्पत्याला ही वार्ता कळली. पण आनंदव्यक्त करावा ही व्यथा हेच कळेना. कारण प्रभू घरी येणार हा आनंद पण स्वागताला घरात फुटकी कवडीही नाही याचे दु:ख.
शेवटी आहे त्यासह स्वागताची तयारी सुरु झाली. राखेने रांगोळी, दभीने ध्वजा, फुलाने आसन तयार करण्यात आले. पण खायला काय देणार? शेवटी भिक्षा मागितली. मिळेल त्या सगळ्याचे पीठ करून लापसी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी राजवैभवाने स्वागत करणाऱ्या सगळ्यांना सोडून भगवान श्रीशुक्लांच्या झोपडीतच गेले. भगवान वैभवाचा नव्हे तर भावाचा भुकेला असतो हे सांगणारी ही कथा.
विनायक अवताराची वैभवशाली कथा आहे चतुर्थी वैभव कथनकारी श्री भृशुंडीकथा.
एके दिवशी सकाळीच काशीराजा श्रीविनायकांच्या महाली आले आणि त्यांनी जे दृश्य पाहिले त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. कारण श्री विनायकांची अशा दिव्यतम उपचारांनी श्रीविनायकांची पूजा संपन्न झाली होती की जे उपचार काशिराजाला राजवाडयात सुद्धा संभव नव्हते.
ही पूजा कोणी? कधी? कशी? केली असे अनेक प्रश्न राजाच्या मनात आले. राजवाडयात येऊन कोणी अशी पूजा केली कशी? आणि मग ते आपल्याला कसे कळले नाही? शेवटी काशीराजाने श्रीविनायकांनाच प्रश्न केला. उत्तर रुपात महान गाणपत्य महर्षी श्रीभृशुंडींचे महात्म्य कळले.
राजाने त्यांच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. विनायककृपेने राजा अमलाश्रमात (नामलगाव जि. बीड) पोहोचला आणि त्याच्या आश्र्चर्यास पारावार उरला नाही.
भक्त भगवदरुप होते. महर्षीच्या भ्रुमध्यातून सोंडच फुटली होती. त्यांचे नावच होते महर्षी भृशुंडी. जगातील हे एकमेव उदाहरण.
राजाने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. महर्षी भृशुंडींनी केलेली मानसपूजा विनायकास प्रत्यक्षरुपात पोहोचल्याचे सांगितले तथा दर्शनार्थ येण्याची प्रार्थना केली.
आश्र्चर्याचा आणखी एक धक्का तेव्हा बसला जेव्हा महर्षीनी विचारले विनायक गजशुंडाधारी आहेत का? राजा म्हणाला नाही. महर्षी म्हणाले "मग मी दर्शनार्थ येणार नाही.''
महर्षी भृशुडींच्या या अत्युत्कट एक निष्ठेच्या फलरुपात श्रीविनायक आपल्या मूळ गजशुंडा रुपात नटले. भक्तीमार्गातील या एकनिष्ठेला अधोरेखित करणारा अवतार आहे श्रीविनायक अवतार.
श्रीविनायक अवतारातील एक वैशिष्ठयपूर्ण कथाभाग म्हणजे देवी सिद्धीच्या अधिपत्याखाली स्थापित स्त्री सैन्य. नारी सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा.
श्रीविनायक अवतारातील अंतिम कथा अवतरणकारण रूप लीला म्हणजे देवांतक नरांतक वध.
अशा रुपात आपल्या या अवतारातील विविध लीला संपन्न करून श्रीगणराजप्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले.
अशा या दिव्यस्वरूपातील कृतीयुगीन अवताराची अवतरण तिथी आहे माघ. शु. चतुर्थी.
संदर्भ ग्रंथ : श्री मुद्गल महापुराण.
गणेश जयंतीच्या (१ फेब्रुवारी ) हार्दिक शुभेच्छा !!!

1 year ago | [YT] | 0