नाणेघाट न्यूज हा जुन्नर तालुका व आसपासच्या भागातील स्थानिक न्यूज चॅनल आहे.
स्थानिक घडामोडी, ताज्या बातम्या, समाजातील प्रश्न, राजकीय अपडेट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाची माहिती – हे सर्व आम्ही तुम्हापर्यंत जलद आणि अचूकपणे पोहोचवतो.
आमचा उद्देश :
स्थानिक बातम्यांना योग्य स्थान मिळवून देणे आणि सामान्य नागरिकांचा आवाज बनणे.
👉 Subscribe करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा
ताज्या अपडेट्ससाठी – नाणेघाट न्यूज सोबत रहा!
Naneghat News
प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
नाणेघाट न्यूज | प्रतिनिधी
हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार खलनायक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे ४ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'लगान', 'सरफरोश', 'गजनी' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतील त्यांच्या प्रभावी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी आणि दमदार कलाकार गमावला असून, विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
#PradeepRawat #RIPPradeepRawat #Bollywood #IndianCinema #NaneghatNews #EntertainmentNews #श्रद्धांजली #चित्रपटसृष्टी
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Naneghat News
नाणेघाट न्यूज | जुन्नर
शिवजन्मभूमीतून 'अदानी प्रकल्प' हद्दपार करण्यासाठी पोलिस प्रशासनाला निवेदन
जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित अदानी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला विरोध अधिक तीव्र होत असून, सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आदिवासी बांधवांच्या जमीन, जल, जंगल आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडावे व नागरिकांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
#नाणेघाटन्यूज #Junnar #JunnarNews #AdaniGoBack #SaveJunnar #SaveSahyadri #SaveAdivasi #AdivasiRights #JalJangalJameen #SurajWajage #Pune #Maharashtra #PumpedStorageProject #Environment #TribalRights #लोकशाहीआंदोलन #जुन्नर #सह्याद्री #आदिवासीहक्क #जलजंगलजमीन
4 days ago | [YT] | 0
View 0 replies
Naneghat News
नाणेघाट न्यूज |
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला शुभम नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या नियुक्तीनंतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निर्मला नवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या दमदार नेतृत्व, संघर्षशील कार्यशैली आणि संघटन कौशल्याच्या बळावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसची राज्यभर अधिक प्रभावी बांधणी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निर्मला नवले यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच राज्यातील युवतींना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करण्याचे काम करावे, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून दिल्या जात आहेत.
#निर्मला_नवले #राष्ट्रवादीकाँग्रेस #राष्ट्रवादीयुवतीकाँग्रेस #NCP #NCPMaharashtra #AjitPawar #SunetraPawar #SunilTatkare #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #NaaneghatNews #नाणेघाट_न्यूज #महाराष्ट्र #राजकारण #मराठीबातम्या #LatestNews #Congratulations #Leadership #YouthPolitics
नव्या जबाबदारीबद्दल निर्मला नवले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4 days ago | [YT] | 3
View 0 replies
Naneghat News
नाणेघाट न्यूज | विशेष बातमी
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
कोल्हापूर | प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि क्रीडा संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
#डीवायपाटील
#पद्मश्रीडीवायपाटील
#भावपूर्णश्रद्धांजली
#शिक्षणमहर्षी
#शिक्षणक्षेत्र
#महाराष्ट्र
#कोल्हापूर
#निधनवार्ता
#श्रद्धांजली
#नाणेघाटन्यूज#DYPatil
#PadmaShri
#DrDYPatil
#Tribute
#RIP
#Education
#Educationist
#Kolhapur
#Maharashtra
#NaneghatNews
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Naneghat News
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : साहित्य, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचा जाज्वल्य आवाज
नाणेघाट न्यूज | विशेष लेख
"जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव!" या ओळींमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना लोकशाहीरीची ताकद देणारे थोर साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. शोषित, वंचित, कष्टकरी आणि श्रमिक समाजाचा आवाज बनून त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली.
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या प्रतिभेच्या बळावर साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. औपचारिक शिक्षण कमी असले तरी जीवनातील अनुभव हेच त्यांचे खरे विद्यापीठ होते.
'फकिरा' ही त्यांची गाजलेली कादंबरी आजही मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते. वारणेचा वाघ, माझी मुंबई, स्टॅलिनग्राडचा पोवाडा यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी समाजातील विषमता, अन्याय आणि श्रमिकांचे जीवन प्रभावीपणे मांडले.
अण्णा भाऊ साठे यांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले होते—
"पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून, गोरगरीब कष्टकरी, कामगार आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे."
हा विचार आजही श्रमाची प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देतो.
आजच्या काळात सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांची गरज अधिक अधोरेखित होत असताना अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या लेखणीतून सामान्य माणसाच्या संघर्षाला शब्द मिळाले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा लाखो लोकांना मिळाली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाणेघाट न्यूजकडून विनम्र अभिवादन!
#अण्णाभाऊसाठे #लोकशाहीरअण्णाभाऊसाठे #AnnaBhauSathe #LokshahirAnnaBhauSathe #अण्णाभाऊसाठेजयंती #जयभीम #डॉबाबासाहेबआंबेडकर #समता #सामाजिकन्याय #मराठीसाहित्य #श्रमिक #कष्टकरी #दलितसाहित्य #मराठी #Maharashtra #NaneghatNews #नाणेघाटन्यूज #Junnar #Pune #Trending
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
Naneghat News
तांबे येथे गांजाची लागवड उघड; १.९ किलो गांजा जप्त, शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
नाणेघाट न्यूज |
जुन्नर, दि. २ : जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांबे (आंबेदरा वाडी) येथे गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १,९०० ग्रॅम (१.९ किलो) गांजा जप्त केला. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास तांबे येथील मुरलीधर धोंडू जोशी यांच्या घराशेजारी हिरव्या नेटच्या आडोशाला असलेल्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली असता गांजाची झाडे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन १,९०० ग्रॅम इतके असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी मुरलीधर धोंडू जोशी (रा. तांबे, आंबेदरा वाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध NDPS Act 1985 मधील कलम 20(ब)(ii)(अ) व 8(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गिजरे, हेड कॉन्स्टेबल महेश भालेराव, पोलीस शिपाई दादा पावडे, अमोल सातपुते, कैलास केंद्रे, श्रीराम शिंदे आणि दीपक वणवे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या वनस्पतींची लागवड व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी दिले असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
1 month ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Naneghat News
खामगावमध्ये वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर कुऱ्हाडीने हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
जुन्नर, प्रतिनिधी : खामगाव (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेवरील अनधिकृत तारांचे कंपाऊंड काढण्याच्या वादातून तंटामुक्ती अध्यक्षावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी घडली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील गट क्रमांक ३८१ मधील जागेवर करण्यात आलेले अनधिकृत तारांचे कंपाऊंड काढण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप रामदास घोलप उपस्थित होते. त्यावेळी संतोष गणू कोकणे, प्रसाद संतोष कोकणे व मयूर संतोष कोकणे यांनी या कारवाईला विरोध करत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर प्रसाद कोकणे याने संदीप घोलप यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच, संतोष कोकणे याने फिर्यादी सागर चंद्रकांत घोलप यांच्यावर दगड फेकून दुखापत केली, तर इतरांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी सागर चंद्रकांत घोलप (रा. खामगाव) यांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी संतोष गणू कोकणे व मयूर संतोष कोकणे यांना अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत. या घटनेमुळे खामगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी ठेवली असल्याचे सांगण्यात आले.
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Naneghat News
📌 Advertisement
🏔️ Jivdhan Vanarlingi Adventure Tour 🧗♂️
🔥 Experience the thrill, excitement, and breathtaking beauty of nature! 🔥
✅ Exciting Zipline & Rappelling Experience
✅ Complete Safety with Adventure Insurance
✅ Professional Guides & Trained Team
✅ Full Climbing Equipment Available
✅ First Aid & Safety Support Included
🌄 Feel the real adventure while rappelling from the towering cliffs of Sahyadri!
📸 Create unforgettable memories and amazing photos with your friends!
📍 Special Arrangements from Pune / Mumbai
📅 Every Saturday & Sunday
⚡ Limited Seats – Book Your Adventure Today! ⚡
📞 For Booking Contact Now:
☎️ 9112096454
📲 Instagram: @Ganufire123
📌जाहिरात
🏔️ जिवधन वानरलिंगी साहसी सफर 🧗♂️
🔥 थरार, रोमांच आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव! 🔥
✅ झिपलाईन आणि रॅपलिंगचा भन्नाट अनुभव
✅ पूर्ण सुरक्षितता व अॅडव्हेंचर इन्शुरन्स
✅ प्रोफेशनल गाईड आणि प्रशिक्षित टीम
✅ संपूर्ण क्लाइंबिंग इक्विपमेंट उपलब्ध
✅ फर्स्ट एड व सुरक्षा सुविधांसह
🌄 सह्याद्रीच्या कुशीत उंच कातळावरून रॅपलिंग करताना अनुभवा खऱ्या साहसाची मजा!
📸 मित्रांसोबत अविस्मरणीय फोटो आणि भन्नाट आठवणी तयार करा!
📍 पुणे / मुंबई येथून विशेष आयोजन
📅 दर शनिवार आणि रविवार
⚡ सीट्स मर्यादित – आजच आपली जागा निश्चित करा! ⚡
📞 बुकिंगसाठी त्वरित संपर्क करा:
☎️ 9112096454
📲 Instagram: @Ganufire123
इंग्रजी अनुवादक करा
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Naneghat News
नाणेघाट न्यूज |
अंजुमन हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण कार्यक्रम; विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे
जुन्नर दि.३१ : अंजुमन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच त्यांचा आत्मविश्वास व उत्साह वाढवण्यासाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लहान तसेच मोठ्या मुला-मुलींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे हा असून, आजच्या काळात प्रत्येक शाळेत कराटे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कराटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि धैर्य वाढण्यास मोठी मदत होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंजुमन शाळेचे ट्रस्टी कुददुस बेग उपस्थित होते. तसेच शाळेचे शिक्षक इंतेखांब सर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले असून, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
4 months ago | [YT] | 6
View 2 replies
Naneghat News
नाणेघाट न्यूज |
दि. २९ मार्च २०२६
अपघातग्रस्त कुटुंबाला आदिवासी ठाकर संघर्ष संघटनेचा मदतीचा हात
पाईट ठाकरवाडी येथे अपघातग्रस्त कुटुंबाला आदिवासी ठाकर संघर्ष संघटना, आंबेगाव यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. “एक हात मदतीचा” या संकल्पनेतून संबंधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात संघटनेचे अध्यक्ष अर्जुन काळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष बाळासाहेब भालेऱाव, खजिनदार संदीप केवाळे, युवा संघटक अभिषेक काळे, सल्लागार सुकदेव मधे, सदस्य अंकुश केवाळे, सहसचिव सागर काळे, मार्गदर्शक विजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. या मदतीमुळे अपघातग्रस्त कुटुंबाला दिलासा मिळाला असून, सामाजिक एकजुटीचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
4 months ago | [YT] | 7
View 0 replies
Load more