नमस्कार...
युवांगण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले आभार... या चॅनलच्या माध्यमातुन विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला जातो. त्यांचे अनुभव, त्यांचा संघर्षमय प्रवास यातुन इतरांना देखील मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळावी हाच या मागचा हेतु...
शिवाय, मराठी भाषा, मराठी संस्कृती अधिकाधिक पसरावी यासाठी आमचा प्रयत्न असतो.

आपण आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भुमिकेत राहिलो तर आपली नक्कीच प्रगती होत जाते.
धन्यवाद!


Yuvangan

सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोस्तवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...

2 days ago | [YT] | 3

Yuvangan

1 month ago | [YT] | 5

Yuvangan

सर्व रसिक प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🌹

1 month ago | [YT] | 6

Yuvangan

Jay Jagannath

1 month ago | [YT] | 4

Yuvangan

Jay Jagannath

1 month ago (edited) | [YT] | 4

Yuvangan

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते. रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अशाच वेळी एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत होता. अशा बिकट परिस्थितीत गावकऱ्यांनी जे केले, ते पाहून प्रत्येकजण त्यांच्या धाडसाला सलाम करत आहे.
गावातील प्रियंका रवी यादव यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक होते. मात्र सर्व रस्ते पाण्याखाली असल्याने कोणताही पर्याय उरला नव्हता. तेव्हा ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एक अनोखी कल्पना सुचवली. त्यांनी एका घराचा लाकडी दरवाजा काढून त्याचाच तात्पुरता स्ट्रेचर तयार केला. प्रियंका यांना त्या दरवाजावर सुरक्षित झोपवून अनेक जणांनी खांद्याला खांदा लावून छातीएवढ्या पाण्यातून प्रवास सुरू केला.
पूराच्या वेगवान पाण्यातून अतिशय सावधगिरीने वाट काढत त्यांनी प्रियंका यांना सुरक्षितपणे साफळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि काही वेळातच प्रियंका यांनी एका गोंडस, निरोगी मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची बातमी समजताच संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास सोडला.
ही घटना केवळ एका आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यापुरती मर्यादित नाही, तर संकटाच्या काळात माणुसकी किती मोठी ताकद ठरते, याचे जिवंत उदाहरण आहे. कोणतीही आधुनिक साधने नसतानाही गावकऱ्यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि एकजूट यामुळे अशक्य वाटणारे काम शक्य झाले.
आजच्या काळात अनेकदा नकारात्मक बातम्या समोर येतात. मात्र पालघरमधील ही घटना सांगून जाते की, खरे हिरो हे नेहमी गणवेशातच नसतात. कधी कधी साधे गावकरीही आपल्या धाडसाने आणि माणुसकीने एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. संकट कितीही मोठे असले तरी एकत्र येऊन लढण्याची तयारी असेल, तर आशेचा किरण नक्कीच दिसतो.

1 month ago | [YT] | 4

Yuvangan

“'आई कुठे काय करते'ची कॉपी?” ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले!

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर लवकरच आमच्या लाडक्या नाईकबाई या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, मालिकेचा पहिला प्रोमो समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेची तुलना आई कुठे काय करते या गाजलेल्या मालिकेशी केली आहे.

प्रोमोमध्ये नाईकबाई घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत शाळेत शिक्षिकेची भूमिकाही निभावताना दिसतात. मात्र, घरात त्यांना सतत टोमणे आणि अवहेलना सहन करावी लागते. हा कथानक पाहिल्यानंतर अनेकांनी "ही 'आई कुठे काय करते २.०' आहे", "अशीच कथा पुन्हा का?" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही प्रेक्षकांनी मालिकेला संधी देण्याची भूमिका घेतली आहे.

या मालिकेत अभिनेत्री दक्षता जोईलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, २० जुलैपासून संध्याकाळी ६:३० वाजता मालिकेचा शुभारंभ होणार आहे. आता ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकते की टीकेलाच सामोरी जाते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

2 months ago | [YT] | 6