Hello Friends,
WELCOME To My Channel INDIAN MOM SNEHAL.
I AM SNEHAL and Mother of cute baby boy SHIVAY.
Shivay is 22 month old .He is cute and very naughty boy.
Purpose of this channel to share Parenting,Daily Mom Vlogs,Motherhood,Child Care.Some fun with Shivay,vlogs,Lifestyle - with a intresting Indian twist.I hope you will enjoy to watch my videos, as much as I enjoy it while creating Beautiful journey of my life by making vlogs.
For Business Inquiries : sawasesnehal@gmail.com
Follow me on Instagram:Indianmomsnehal.
DISCLAIMER:An OPINIONS, VIEWS, SUGGESTIONS For general Purposes only my presonal Experiences.
If you like my videos Please Like, Share and Subscribe my channel.
Thanks for Wathching my videos.
Indian Mom Snehal
Happy Women’s day!💐
#IndianMomSnehal
10 months ago | [YT] | 83
View 33 replies
Indian Mom Snehal
माझी आजी आता या जगात नाही😞😭… तिच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करा 🙏🙏🙏..
1 year ago | [YT] | 140
View 37 replies
Indian Mom Snehal
गौराईकडून गृहिणींना पत्र.....
@IndianMomSnehal
प्रिय सखी,
मजेत गेले माझे दिवस..तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले..मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं..मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास...पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार....काही वेळा डोळे भरुन आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले...मग आम्ही दोघीनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू...जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं , ???? आमच्यासाठी पंचपक्वानं, सोळा भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं????? आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं? आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस ,तेवढा स्वत:ला मान कधी देतेस का गं??? जाता जाता एक सांगू ...जेवढं स्वत:ला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील..
कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस...तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस...स्वतःमध्ये ,..... जसं पंचपक्वानं तयार करतेस तसंच नविन कला शिकत जा, छंद जोपासत जा , स्वतःला वेळ दे..जगत जननीपण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस...कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे...आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनों थोडासा आराम करा...असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता ,स्वत:ला नव्याने घडवा...आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहर्या वरच्या तेजाने सारं जग बदलू दे...सोवळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे ...गोळ्या घेऊन पाळया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा..बाकी पुढच्यावर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस..मानसिक, शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी!!!!
तुझीच ,
देवी गौरी🙏🙏🙏🙏🙏
1 year ago | [YT] | 51
View 2 replies
Indian Mom Snehal
आणि मखर रिकाम झालं😞 @IndianMomSnehal
आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता...
आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं..
आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती..
एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या...
रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं...
भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते....
साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात ?
एवढ्यात हा दिवस आणलास पण?
काल तर आलास आणि आज निघालास पण? 🤔😯
कठोर पणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू
जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास देखिल,,,,,
पण गजानना जाताना एवढं कर
फक्त तुझ्या च नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन दे.
भाजी भाकरी असो वा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थीर बुद्धी दे
प्रत्येकाच घर आणि ताट भरलेलं असू दे.
आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे.
लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे
अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे
अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे
सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे
सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे
भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे
शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे
सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे
बहुत काय मागू गणेशा? 🙏🏼
1 year ago | [YT] | 48
View 0 replies
Indian Mom Snehal
*जीवनातून टेन्शन रिटायर्ड केलं की, आनंदाची पेन्शन सुरु होते.*
@IndianMomSnehal
*चिंता करणे म्हणजे, कर्ज न घेता व्याज भरण्यासारखं आहे.*
*माणसाने जसे आहे तसेच राहणे चांगले. ज्यांना तुम्ही आवडलात तो तुम्हाला विसरणार नाही*
*आणि......*
*ज्यांना तुम्ही नाही आवडलात, त्यांच्यावर कितीही जीव ओवाळून टाकला तरी, ते तुमचे होणार नाहीत!*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
1 year ago | [YT] | 43
View 0 replies
Indian Mom Snehal
*१) कोणालाही न दुखवता जगणे*
@IndianMomSnehal
*याच्या इतके अतिसुंदर कर्म*
*जगात दुसरे कोणतेच नाही*
*आणि......*
*ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.*
*२) कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे .*
*विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते*
*शक्तीचे उगमस्थान आहे .*
*खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .*
*वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.*
*स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.*
*....आणि अतिशय महत्वाचे* *"दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते* *नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..*
*३) 'पश्चात्ताप' कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी' कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही....!*
*म्हणूनच... वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...!!*
*४ )माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे.कुणी पाहत नाही. असा अर्थ काढु नये.जेव्हा नियती त्याचा हिशोब करते.तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही.*
*५)भावना कळायला मन लागतं,*
*वेदना कळायला जाणीव लागते,*
*देव कळायला श्रद्धा लागते,*
*माणूस कळायला माणुसकी लागते,*
*चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,*
*आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागतं*
*६) माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा "दरवाज्याचा" जन्म झाला,*
*त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा "कुलूपाचा" जन्म झाला*
*आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही. तेव्हा मात्र "सीसीटीव्ही" चा ज न्म झाला.*
*७) जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,*
*हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,*
*अंतकरणात जिद्द आहे,*
*भावनांना फुलांचे गंध आहेत,*
*डोळ्यासमोर खुले आकाश आहे,*
*तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…*
*८ )देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात.*
*🌴कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते*..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण *ओंजळीत पाणी तर*पकडू शकतो*.... *पण* *टिकवून*
*नाही ठेवू शकत*...
: *आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल*
*तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात....*
*कारण*
*"धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो...*
*९) संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे*
*जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल*
*तर स्वतःला खूप नशिबवान समजा*
*कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,*
*ज्यांच्यामध्ये क्षमता असते*
*१०) कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्या पर्यंत पोहचत असेल,तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली असते.*
*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.*
*काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..*
*काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..*
*काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..*
*आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."*
*११ )माणुस मनापर्यंत पोहोचला ...*
*तरच नातं निर्माण होतं ...*
*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!*
*असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...*
*पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे..!!!*
*१२)चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.*
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते.जास्त वापरली तर झिजते.काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही श्रेष्ठ
1 year ago | [YT] | 30
View 1 reply
Indian Mom Snehal
💐 *"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:*💐
@IndianMomSnehal
🌼 *"हे केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*
*"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*
*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले- :*
*हे पार्थ,*
*"मांजर जेव्हा उंदराला पकडते*
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना*
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त* *परिणाम वेगवेगळे आहेत.."*
*"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."*
*:‼️ विष काय आहे ..?*
*"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...*
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.*
*पैसा असो.*
*भूक असो.."*
*"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l
*सुखाचे १७ पाऊले*👏👏
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
देवाला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
देवाला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच अ अंतिम जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
*-मी कोण ?-* *सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?*
®️ *महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.*
®️ *विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.*
®️ *व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.*
®️ *सुरदासही आंधळे होते.*
®️ *मुक्तेश्वर मुके होते.*
®️ *कुर्मदास पांगळे होते.*
®️ *चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.*
®️ *तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.*
®️ *ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.*
®️ *जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.*
®️ *पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.*
®️ *महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.*
®️ *श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.*
®️ *प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.*
®️ *विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.*
®️ *पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?*
🔰 *"मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.*
🎯 *म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .*
*म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा*
*पुण्याची गणना कोण करी*🌼
1 year ago | [YT] | 24
View 2 replies
Indian Mom Snehal
*महालक्षुम्या आल्या , टेन्शन नका घेऊ !*
@IndianMomSnehal
---------------------------------
महालक्षुम्या आल्या , महालक्षुम्या आल्या
घाबरून नका जाऊ
जेवढं होईल तेवढंच करा
टेन्शन नका घेऊ
काळाप्रमाणे काही गोष्टीत
बदल केले पाहिजे
सोळा भाज्या सोळा चटण्या
कमी केले पाहिजे
एवढेच लाडू तेवढ्या करंज्या
तरकटी नको बाई
काही धरायचं काही सोडायचं
काही होत नाही
( पूर्वीच्या काळी ......)
एकत्र कुटुंब माणसं भरपूर
अन्न खाल्ल्या जायचं
थोडं जास्त झालं तरी
वाया नाही जायचं
गडी माणसं पाहुणे रावळे
चढाओढीने खायचे
Acidity , पोटात गुडगुड
काही नाही व्हायचे
आता काळ बदलला आहे
घरोघरी माणसं चार
माऊल्यांनो खरंच जास्त
होऊ नका तुम्ही बेजार
भला मोठा स्वयंपाक करून
फेकून देऊ नका
अन्न पूर्ण ब्रह्म आहे
कधीच विसरू नका
सण करणं श्रद्धा असणं
हा भाग महत्वाचा
लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो
फक्त भाजी भाकरीचा
जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास
गौरी-गणपती येत नाहीत
थोडं कमीजास्त झालं तरी
कुणावरही कोपत नाहीत
तुमच्यावर राग राग करायला
देव थोडाच माणूस आहे
महालक्ष्मी असो गणपती असो
फक्त भक्तीचा भुकेला आहे
ऐपतीप्रमाणेच सगळं करा
रिन काढून नको सण
नको लायटिंग नको माळा
फक्त हवे शुद्ध मन
सगळ्यांनी सामील होणं
हे महत्वाचं असतं
खरंच ताण घेऊ नका
काही कामाचं नसतं
आमच्याकडे असं असतं
अन त्यांच्याकडे तसं
ताण न घेता काम करावं
जसं जमेल तसं
गाठीभेटी गप्पागोष्टी
सणासुदीला अपेक्षित असतात
प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच
दसरा दिवाळी लक्षुम्या असतात
मंत्र जोर जोरात म्हणायचे
अन सासुशी करायची कट्टी
असं वागल्यावर कशी होईल
महालक्षुम्याशी गट्टी ?
राग अहंकार चांगला नसतो
गोडीगुलाबीने वागलं पाहिजे
फटकळ बोलणं सोडून देऊन
घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे
1 year ago | [YT] | 44
View 3 replies
Indian Mom Snehal
*घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?" हे आवश्य वाचा ****
@IndianMomSnehal
कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत
*ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे*. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया* व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही *प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे*.
*वैशिष्ट्ये* :
(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे *रचयिता वेगवेगळे* आहेत.
(२) ही चारही कडवी *वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली* आहेत.
(३) पहिले कडवे *मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत* भाषेत आहेत.
(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही *सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली* जाते.
(५) यातील एकही कडवे *गणपतीला उद्देशून* नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व *वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून* ही प्रार्थना बनवली गेली आहे.
आता आपण प्रत्येक कडवे *अर्थासह* पाहूया
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे*
अर्थ...
विठ्ठलाला उद्देशुन *संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन*. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर *तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन*.
२) *त्वमेव माता च पिता त्वमेव*
*त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव*
*त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव*
*त्वमेव सर्व मम देव देव*
हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृत मध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
अर्थ..
*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस*.
(३) *कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा*
*बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्येत सकल परस्मै*
*नारायणापि समर्पयामि*
हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ…
*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित* करीत आहे.
(४) *अच्युतम केशवम रामनारायणं* ॥
*कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी ॥ श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ॥ जानकी नायक रामचंद्र भजे*॥
*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे*. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ…
मी *भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला*.
*हरे राम हरे राम*
*राम राम हरे हरे*
*हरे कृष्ण हरे कृष्ण*
*कृष्ण कृष्ण हरे हरे*
*हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे*.
*कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे*.
*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे*. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो
*हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो*.🙏🏻😊🙏🏻
1 year ago | [YT] | 43
View 0 replies
Indian Mom Snehal
https://youtu.be/N-U1ZRpEqNw
ज्याची सगळ्यांना उत्सुकता होती तो क्षण लवकरच येईल
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Load more