Hiii Viewer,
Welcome to my channel !
I create Travel videos, Health related videos, Crochet - macrame work, Pet birds videos, Funny videos, Life hacks and Informative videos for the wider audience.
If you like my videos then please do subscribe my channel...
Let's Live It !
जगातल्या सर्व गोष्टींच्या मुळाशी फक्त पैशाचा विचार आणि अर्थकारण आहे. त्या 9/11 च्या संशयास्पद हल्ल्यात दोन बुलंद बुरुज कोसळले, त्याच्या बाजूच्याच गल्लीत जगाचे सर्वशक्तिमान आर्थिक केंद्र आहे वॉलस्ट्रीट. त्या अरुंद गल्लीत रोज जे घडते, त्याचे पडसाद जगातल्या नऊ स्टॉक बाजारात उमटतात. ही सर्व संरचनाच अशी उभी ठाकली आहे की, गेली अनेक दशके इथे उच्चारली गेलेली अर्थसूत्रेच अंतिम आहेत आणि त्या सूत्रांचे उच्चारण करणारे सूत्रधार, ज्यांच्या निर्देशाबरहुकूम सारे जग निमूटपणे झुकते आहे. जणू एखादा विस्तृत आणि वरवर स्वतंत्र भासणारा ऑर्केस्ट्रा त्याच्या नियंत्याच्या छोट्या दोन काडयांनी अचूकपणे बांधून ठेवावा तसे आहे हे. जणू काही एखाद्या जादुगारासारखे त्यांचे निर्विकार चेहरे कोणत्यातरी मंत्रभाराने, जगाच्या संघर्ष-समझोत्याच्या, स्वामित्व-परावलंबीत्वाच्या, मानसिक बळ-छळाच्या अदृश्य अशा धाग्यांनी कुणीतरी नियमन करीत आहे. म्हणजे प्रत्यक्षाहून कल्पना वास्तव असावी असे तर नाही ना, एखादया अज्ञात अशा ठिकाणी ही माणसे जगातल्या सा-या साधनसंपत्तीचा मोठ्ठा पट मांडून बसली आहेत. त्या पटावरील सर्व खेळ्या या प्रत्यक्षात वरवर सुटया सुटया, अकारण भासत असल्या तरी त्या एका आखलेल्या निश्चित अशा संकेतांचे सारांश आहेत. या जगात काय घडायला हवे ह्याचा ते एक डाव टाकतात, चपळाईने त्यांच्या हातांची बोटांची हालचाल सुरू होते, त्याला बांधलेले धर्म, दहशतवाद, निरक्षरता, सीमावाद, सार्वभौमता यांचे दोर खेचले जातात. अचानक जगात काहीतरी घडू लागते, ते कधी सरळसोट युद्ध असते, कधी एखाद्या देशाचा नकाशा विस्कटलेला असतो, कधी प्रबळ कुठेतरी धर्मांध शक्ती डोके वर काढतात, कधी एखाद्या भूभागाला आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागतात तर कधी एखादा मस्तवाल राष्ट्रप्रमुख अंतर्धान पावतो. कधी यांचे कळसूत्री बाहुले सरकारे असतात, कधी कॉर्पोरेट क्षेत्र असते, कधी युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक , नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्था असतात, तर कधी उजव्या-डाव्या विचारांचे समूह असतात, विविध वादांचे अभिमान बाळगणारे बुद्धिजीवी पंथ असतात आणि कोणीच नसले तर मग अडाणी, आपापल्या देशावर प्रेम करणारी, चेहरा, परिचय नसणारी प्रजा असते. – दीपक करंजीकर (घातसूत्र).
#ghatsutra
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Let's Live It !
#घटस्थापना #गणनायिकांचाउत्सव #मातृसत्ताकसंस्कृती
सिंधुसंस्कृतीचे आद्यजोडपे शिव-पार्वती अन् तेव्हापासून चालत आलेली मातृसत्ताक संस्कृतीची मानवतावादी परंपरा आणि त्याचा एक भाग म्हणजे नवरात्रोत्सव सोहळा होय. घटस्थापने दिवशी गणनायिकांनी म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, म्हणुन माती चौरंगावर ठेवून त्यात धान्य टाकून कोणते पीक दहा दिवसात जोमाने येते ते तपासले जायचे आणि त्याची शेती केली जायची. शेतीचा हा शोध स्त्रियांनी लावला म्हणुन त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नवरात्रोत्सव सण.
मातृसत्ताक संस्कृतींची ओळख म्हणजे सिंधुच्या खोर्यात निऋतीचे, यमुनेच्या खोर्यात उर्वशीचे, नर्मदेच्या खोर्यात ताटकेचे, गोदावरीच्या खोर्यात शूर्पणखाचे, भीमेच्या खोर्यात मावळाईचे, पंचगंगेच्या खोर्यात अंबाबाईचे, तेरणा- मांजरेच्या खोर्यात तुळजाईचे राज्य होते.
निऋतीने प्रगत शेतीचा शोध लावला .
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Let's Live It !
हरितालिका व्रत 🌿🌸💮🙏
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती. #shivshakti #durga #teej #parvati #adishakti
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Let's Live It !
Red-whiskered bulbul in my gallery ❤️🐦
बुलबुल
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
Let's Live It !
नम: शिवाय 🙏
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
Let's Live It !
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
बुधवार पेठ, पुणे. 🕉 गं गणपतये नमो नम: 🌺🙏
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Let's Live It !
Vernekar's Goan Fish Curry
Karve Nagar, Pune. Try for yummy seafood 😋😋
youtube.com/shorts/OT3wzkUM20...
3 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Let's Live It !
नाचणी..
नाचणीला नागली, रागी इ. नावाने ओळखले जाते. नागलीचे शास्त्रीय नाव इलुसाईन कोराकाना(Eleusine coracana).
या पिकाची अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल 👇
youtube.com/shorts/dm2SOiHnxt...
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Let's Live It !
श्री दशभुज लक्ष्मीगणेश देवस्थान, हेदवी, गुहागर, रत्नागिरी.
ॐ गं गणपतये नमो नम: 🌺🙏
3 years ago | [YT] | 7
View 1 reply
Let's Live It !
कोकणातील देव दिवाळी (विडे भरणे)
“इडा पिडा टळो आणि बळिचं राज्य येवो!”
बळीराजा हा प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता. बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हटले जात असे. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा म्हणजेच जिल्ह्याचा प्रमुख जोतिबा आणि मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होते. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुणबी समाज शेतकरी बांधव देव दिवाळीचा सण परंपरेनुसार आणि श्रद्धेने साजरा करतात. देव दिवाळीच्या दिवशी पहाटे गुरांची ओवाळणी केली जाते. ग्रामदेवतेला रूपे लावून नंतर घरोघरी देवाच्या नावाने विडे भरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. शुभ्र वस्त्रावर गादी तयार करून त्यावर पानांची विडे मांडणी केली जाते. हे विडे म्हणजे बळीराजा आणि त्याचे मंत्री व अधिकारी यांचे प्रतीक. विडे भरताना सर्वांना सुख समृद्धी साठी गाऱ्हाणे घातले जाते सम्राट बळीराजाचे स्मरण करून “इडा पिडा टळो आणि बळिचं राज्य येवो" "चांगभलं" ही आळवणी करून उपस्थित सर्वांना विडे वाटप केले जाते.
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Load more