युगंधर..... एका मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमा निमित्त सुंदर सजावट केली जाते....त्या सर्व सजावटीत हा खुद्कन हसताना मला दिसला❤️ मी हरखून गेले.हे माधवा... तुला मनमोहना,चित्तचोरा...का म्हटले असेल याचा प्रत्यय आला.❣️ तुझ्या तेजस्वी मुखावरचं हसू इतकं लोभसवाणं की,कुणाचही चित्त चोरलं जावं... नंदा घरच्या गायी चारण्यासाठी भांडीर वनात जात होतास... तेंव्हा यमुना तीरी कदंब वृक्षाखाली असाचं मुरली घेऊन उभा राहिला असशील नाही.... हे मुरारी... तुझ्या मुरली च्या सुरावटीं नीं चराचरात बहार आली असेल.🤗✨ काय देखणं रुप... नखशिखांत "राजस सुकुमार मदनाचा पुतळा"...हातात मुरली, गळ्यात वैजयंती माला,कटी ला मेखला,पायात नुपूर,मस्तकी मुकूट... अन्... चेहऱ्यावर भान हरपून टाकणारं, निरागस, प्रसन्न हास्य.... मी सगळं विसरून फक्त तुला पाहत बसले... मनात विचार आला...गोपिकांची काही चूक नव्हती.... तुझं दिसणंच इतकं देखणं आहे.... तुझ्या कटी ची विशेष लकब.... शरीराचे सर्व चक्र जागृत असणारा तू श्रेष्ठ पुरुष...तू नारायण...तू सर्व जगाचा नियंता... तुझी कौमुदीनी, तुझं सुदर्शन,तुझा पांचजन्य... अन् निखळ प्रेमात टाकणारं,भुलवणारं तुझं अलौकिक, अवर्णनीय,अविस्मरणीय, सुमधुर हास्य... डोळे तर इतके बोलके...की, आत्ता कमलनयन नेत्र कटाक्षाने माझ्याशी बोलू लागशील🤗✨...ही तुझी आयुधं...सगळंचं शब्दातीत... तुझ्यावर इतकं प्रेम, श्रध्दा, विश्वास आहे...मग तुला आहो जावो...कसं करावं💞... तू सर्वांचा लाडका आहेस... माझा हृदयस्थ आहेस... कुरुक्षेत्रावर पर्थाला गीता सांगितलीस.... परंतु "संभवामी युगे युगे" म्हणणारा तू आजही आमचा मार्गदर्शक आहेसचं.... हे युगंधरा,हे हृदयस्थ शारंगपाणी..🙏🏻.. एका चिंधीच्या बदल्यात द्रोपदीला अनंत वस्त्रे पूरविणारा तू...मी तुझ्याकडे काय मागावे 👏🏻 मी तुझ्या चरणी सदैव नतमस्तक🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️ तू सदैव सद्बुद्धी देत रहा... मार्ग दाखवत रहा... अन्... तुझं मनमोहक रूप नेत्रात स्थानबद्ध राहू दे❤️🩷🧡. तुझ्या चरण स्पर्शाची अभिलाषी.🙏🏻
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. देवाचिये द्वारी.🙏🏻🚩🙂 पिंपळे गुरव.. पुणे ६१.
मकरसंक्रांत.... नवीन वर्षातील प्रथम हर्ष उल्हासाचा सण... आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आपल्या आयुष्यात मधुरता भरत राहो.🙏🏻✨ आपल्या सर्वांच्या आयुष्याच्या प्रगतीचा आलेख पतंगाप्रमाणे गगनात उंच उंच जात राहो.🙏🏻🎉 ही मकर संक्रांत सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्याची जावो, अन् ऊर्जेचा नवीन प्रकाश आपल्या आयुष्यात आनंद पसरवत राहो.🤗 मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला.🌹🌼🌸
नववर्षाची पूर्व संध्या.... दि.३१ डिसेंबर २०२५... पौष शु.१२, भागवत एकादशी 🚩🚩🚩
सालाबादप्रमाणे यंदाही श्री शंकर महाराज मठ ची पायी वारी सुफळ संपूर्ण झाली.🙏🏻🚩🙂 यंदाचे हे चौथे वर्ष. सलग चार वर्षे महाराजांनी पायी वारी करून घेतली🙏🏻. त्याचा आनंद शब्दातीत.... घरापासून २२कि.मी.अंतर होते.परंतू... चालताना रस्त्याच्या सोबत तो मावळतीचा दिनकर असतो.आपूसकचं त्याला दोन्ही हातांच्या नमस्कार चे अर्घ्य दिले जाते.तो मावळतानां सांगत असतो... उद्या चा दिवस ही सुंदर असेल, अन् उद्या ची स्वप्न ही मनोहर असतील.हा विश्वास चालायला हजार हत्तीं चे बळ देतो.... अर्थात महाराज ही आपल्या सोबत असतात.🙏🏻✨.. मजल दरमजल करत मठाची कमान दिसू लागते... अन् आपोआपच पायांना वेग येतो🙂 मठाच्या प्रथम पायरी ला हिना अन् सोनचाफा चा दरवळ स्वागताला हजर असतो.चित्तवृत्ती प्रसन्न, टवटवीत, प्रफुल्लित होतात. सर्व शंकर भक्तांना हा अनुभव नित्याचाच आहे.आज मठात तुलनेने गर्दी कमीआहे.सुरेल भजन सेवा सुरू होती." शंकर बाबा तू माझा कैवारी" कानावर पडत होते.नेत्र सजल अन् मन तृप्त झाले.🤗✨ दत्त महाराज, हनुमंत राया आणि स्वामी नां नमस्कार करून.... महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचे.... सगळं सांभाळणारे महाराज... ही भावना मन तरलं करते... त्यांच्या दर्शनाने डोळे अन् मन तृप्त होते.... नंतर शरीराचा थकवा दूर करायला पुढ्यात येतो खिचडी चा प्रसाद.... अहाहा...त्याची चव काय वर्णावी.... केवळ सुख❤️... पून्हा एकदा दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करतो. दर ३१ डिसेंबर चा हा अविस्मरणीय अनुभव... जय शंकर.
देवाचिये द्वारी. सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. पुणे ६१.🙏🏻🚩🌼
सद्गुरुनाथा.... मार्गशीर्ष..2025... गिरनार...एक अद्भुत, अद्वितीय अनुभव....🚩🚩🚩 ध्यानीमनी नसताना गिरनार यात्रेचा योग जुळून येतो... त्यात मार्गशीर्ष महिना.. नुकतीच दत्त जयंती पौर्णिमा🌕 होऊन गेलेली... गिरनार ची गर्दी काहीशी ओसरलेली... हवेत दाटधुके आणि गुलाबी थंडीचा ओलसर गारवा... आता गुरु शिखराच्या दर्शनाची ओढ लागली आहे.. पहिल्या पायरीला जाऊन संपूर्ण नतमस्तक झालो. महाराज तुम्हीचं पाठीराखे म्हणत संपूर्ण शरणागत झालो. आता गिरनारला रोपे ची चंगळ आहे.. पूर्वी 10,000 पायऱ्या चढून,उतरून यावे लागे.अंबाजी पर्यंत रोपेने गेलो. आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अप्रतिम असे स्वागत केले... गिरनार चा वारा म्हणजे जणू महाराजांचा स्पर्श.... अंबाजी माते वरून गुरुशिखर खुणावू लागले... आणि आपोआप पायांना वेग आला. जय गिरनारी चा नाम घोष करत सहज चढत गेलो. आणि ज्याची खूप आस.. खूप ओढ.. लागली होती ते दिव्य दर्शन झाले. सकाळच्या कोवळ्या किरणांच्या प्रहरात महाराजांच्या दिव्य पादुकांचे दर्शन झाले. काहीतरी असामान्य गवसल्याचा आनंद हृदयात ओतप्रोत भरून राहिला. 🙂 गुरुमाऊलीने पदरात घेणे यापेक्षा वेगळे सुख कोणते. तो प्रेमाचा स्पर्श.. तो आपुलकीचा दर्शन सोहळा.. काय वर्णन करावे त्याचे.. सगळेच शब्दातीत... गिरनार ला लाड करावे ते महाराजांनीच... कमांडलूला धुनीचे दर्शन घेतले.. आणि गरम गरम शिरा, भजी आणि कढी खिचडी पुढयात आली... भजी पाहून शंकर बाबा आपल्या सोबत आहे याचा खरोखरच प्रत्यय आला. इतक्या उंचीवर इतक्या प्रसन्न वातावरणात अमृततुल्य प्रसाद मिळावा.. यापरते भाग्य ते कोणते.... भक्तासाठी गुरुमाऊली ठाई ठाई उभे राहतात. कमंडलू तिर्थ चा प्रसाद आणि जल खरोखर अमृतासमान आहे...🙏🏻 जेव्हा गिरनार चा ध्यास लागतो तेव्हा.. आपसूकच मनात विचार येतो आपले चढणे होईल का... पण महाराज प्रत्येक पायरीला सोबत असतात. गिरनार चा वारा जेव्हा अंगाला लपेटून जातो.. त्या स्पर्शाची महती काय वर्णावी... जे पाहायचं होतं.. जे दिसावं असं मनापासून वाटत होतं.. त्याच्या दर्शनाने डोळे अगदी तृप्त होतात..🤗❤️ गिरनारला सारखं जाऊन काय मिळतं असं कोणी विचारत तेव्हा..... आम्ही म्हणतो.. तेथे माझे मी पण सरते ..तिथे गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळतो.. आणि मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. त्या विश्वासासाठी परत एकदा गिरनारला जावेसे वाटते...✨ खरं आहे... गिरनार दरवेळी नवीन भासतो.. नवीन अनुभव देतो.. नवीन अनुभूती देतो... तेथून पाय निघत नाही... वाटतं इथेच राहून जावं... पुढच्या वेळी परत ये बाळा.. हा गुरूंचा विश्वास मनात रुंजी घालतो...👏🏻 महाराज मार्ग दाखवणारे तेच आनंद देणारे तेच आयुष्य सावरणारे.. सजवणारे... नेहमीप्रमाणे यावेळी ही महाराजांनी अनवाणी पायाने वारी पूर्ण करून घेतली.त्याचा आनंद जगावेगळा..🤗 सजल नेत्राने पुन्हा एकदा गुरु शिखराचे दर्शन घेतले आणि पायउतार झालो... मनात उरला एकच जयघोष जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🙏🏻 तेरा भरोसा है रे भारी🚩🚩🚩
देवाचिये द्वारी सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने पुणे ६१.🙏🏻🚩✨
अथांग, असीम, निस्सीम प्रेमाची सोन्याची द्वारका.....🚩 डिसेंबर 2025.... पुन्हा एकदा द्वारकेच्या दर्शनाचा योग आला.अन् ... त्या द्वारकाधीशाचं सुंदर रूप पाहून मी पुन्हा एकदा भारावून गेले...🤗 श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती म्हणे... किती झळाळती आणि लखलखती असेल ती...✨🪔 त्याची प्रजा निश्चितच खूप संपन्न आणि समाधानी असेल. द्वारकेच्या समुद्राच्या प्रत्येक लाटेत.. तिथल्या धुळीत.. तिथल्या हवेत आणि कणाकणात श्रीकृष्ण भरून उरला आहे.... द्वारकाधीशाच्या मंदिराचा ध्वज लावण्याचा सोहळा खूप अप्रतिम असतो. त्याची धर्माची ध्वजा फडकताना पाहून मनात हर्षाचा उन्माद उठतो. 🚩🚩🚩 पुन्हा एकदा त्याचा श्री सोपान मन भरून पाहिला. तो आहेच त्रिभुवनसुंदर❤️.... मन तृप्त होईपर्यंत त्याला पाहून घेतले. त्याच्या चरणांवरची नजर हटत नव्हती.... खरोखरच तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. गोमतीत तटी... समुद्राला जिथे गोमती नदी मिळते तिथे द्वारका उभी आहे... गोमती नदी समुद्राला मिळण्याचा देखणा सोहळा ही पाहता आला. मन आणि डोळे दोन्हीही तृप्त झाले🙏🏻✨ आणि या तृप्तदर्शनाबरोबरच... आम्हा उभयतांचे चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंग यात्रा सुफळ संपूर्ण झाली. त्याचे समाधान आणि तृप्ती अलौकिक, अवर्णनीय आहे....🙏🏻✨ द्वारका ही नुसती यात्रा कधीच नव्हती आमच्यासाठी.त्याच्या दर्शनाची आस,ओढ अन् तीव्रता मात्र खूप जास्त होती. द्वारकाधीशाच्या दर्शनाचे पूर्णत्व मनात घट्ट,लख्ख अन् सतेज वसले आहे. 💙 100 वर्षे द्वारके वर राज्य करणारा हा द्वारकेचा राणा... परंतु प्रत्यक्षात तो कधीही सिंहासनावर बसला नाही. त्याने मनसोक्त भटकंती केली. उत्तरेत बद्रीनाथ, पूर्वेला जगन्नाथ, पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेला रामेश्वरम मध्ये तो स्थित आहे.... त्याच्या अवघ्या जीवनाचा प्रवास खूप झळाळता आहे....👏🏻 खरंच त्याच्या दर्शनाचे समाधान अभूतपूर्व आहे. तो सर्व जाणतो... तो ठाई ठाई आणि चराचरात वसलेला... त्याच्याच कृपेने त्याने चार धाम यात्रा पूर्ण करून घेतली.... अथांग, असीम,निस्सीम प्रेमाची...सोन्याची द्वारका दर्शन घेऊन मनास मोठा आनंद आणि तृप्तता मिळाली. 🙏🏻✨ याच आनंदासह.. जय द्वारिकाधीश 🙏🏻 🚩 ✨ जय श्रीकृष्ण 🙏🏻🚩✨
देवाचिये द्वारी. सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. पिंपळे गुरव. पुणे ६१.
आज शंकर महाराज प्रकट दिन आहे. आज अगदी निगूतिने महाराजांच्या पुढे शरणागत होऊन साग्रसंगीत पूजा केली.🙏🏻🌼 महाराजांचा आवडता प्रसाद म्हणजे मूग डाळीची खिचडी आणि कांदा भजी. महाराज अंदाजाने कांदे ,बटाटे, टोमॅटो अख्खेच खिचडी टाकत. स्वतःच्या हाताने खिचडी शिजवत आणि सर्वांना प्रसाद देत. महाराजांच्या हातचा प्रसाद कधीही कमी पडला नाही. महाराज म्हणत सर्वांच्या घरी डाळ तांदूळ उपलब्ध असतात. म्हणून हा सोपा प्रसाद. याचबरोबर चहा ही महाराजांना खूप प्रिय.☕. चहाही अंदाजानेच करत. परंतु चार कप पाण्यात 22 माणसे सहज चहा पीत असत. ही अगाध शंकर लीला. 🙏🏻🌼 आज प्रकट दिन म्हणून... मी ही आवडीने प्रसाद करायला घेतला. मूग डाळीची मऊ खिचडी आणि कांदा भजी पापड वगैरे केले. प्रसाद करताना जय शंकर जय शंकर नामस्मरण सुरूच होते.🙏🏻 मोठ्या मनोभावे महाराजांना नैवेद्य दाखवला. केवळ नामस्मरणाने तो प्रसाद अक्षरशः अमृततुल्य लागला. साधी खिचडीच परंतु... महाराजांच्या नामस्मरणाने ती केवळ अमृतमय लागत होती.🤗 भक्तांच्या आयुष्यातला अंधार दूर करून आनंदाने प्रेम पसवणारे महाराज... शरणागताला शाश्वत आधार देणारे महाराज.... आजही श्री शंकर बाबा मठात खिचडीच्या प्रसादाचे वाटप सुरूच असते. तो प्रसाद घेतला की तृप्ती येते.🤗 आज महाराजांच्या प्रकटदिनी आवडीने प्रसाद केला आणि मन आनंदाने भरून गेले. जय शंकर. 🙏🏻🚩🌹
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. देवाचिये द्वारी. पिंपळे गुरव. पुणे 🙏🏻🚩🪔
आज नरकचतुर्दशी... आपणा सर्वांना नरक चतुर्दशीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..... भगवान श्रीकृष्णाने आजच नरकासुराचा वध केला होता. अन् दानवाने डांबून ठेवलेल्या 16 सहस्त्रनारींना भगवानांनी मुक्त केले होते. 🙏🏻 आज आणखी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आमच्या बाळाची कविता उत्सव दिव्यांचा या कवितासंग्रहात प्रकाशित झाली आहे. चि. अथर्व चे लहानपणापासूनच मराठीवर विशेष प्रेम आहे. बाळा माय मराठी सतत वृद्धिंगत करण्यात प्रयत्नशील रहा. तिला शब्दांचे लेणे सतत चढवून शृंगारित करत रहा. 🤗 या नरक चतुर्दशीला दिवाळी फराळाबरोबरच साहित्यिक फराळही मिळाला... याचा विशेष आनंद आहे. आपणा सर्वांच्या आयुष्यातील वाईट नरकासुराचा नाश होवो.... अन परमेश्वराच्या भक्तीचा प्रकाश सर्वत्र पसरू दे. 💫 नरक चतुर्दशीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🪔🙏🏻🚩 शुभ दीपावली 🪔🪔🪔
धनत्रयोदशी 🪷🪷🪷 आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🪔🙏🏻🌹 आज धन्वंतरी पूजन केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात धन्वंतरी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. समुद्रमंथनातून जे चौदा रत्न निघाले त्यापैकी एक धन्वंतरी देवता होय. धन्वंतरी देवतांची वैद्य आहे. म्हणूनच धनत्रयोदशीला तिचे मनोभावे पूजन केले जाते .🙏🏻🙏🏻🙏🏻... आज गुरुद्वादशी... दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या अद्भुत कार्यावताराची सांगता केली. तो दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो 🙏🙏🙏 आपणा सर्वांच्या आयुष्यात माता लक्ष्मीचा वास राहो... सदैव धनवर्षा होत राहो....🪔🪔🪔 धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🪔🙏🏻🌹
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. 'देवाचिये द्वारी'. पिंपळे गुरव. पुणे 🙏🚩😊
वसुबारस.... दिपावली सणाचा प्रथम दिवस... वसुबारस.... आपली भारतीय संस्कृती जगात पूजनीय आहे.गौ मातेला आई चा दर्जा दिलेला आहे.तेहतीस कोटी देवतांचा वास गायी मध्ये आहे. समुद्रमंथनातून जे चौदा रत्न निघाले होते, त्यापैकी एक कामधेनु गाय होय. तेंव्हा पासूनचं गौमातेची पूजा करण्यात येते.🙏🏻🙏🏻🙏🏻 दिपावली च्या प्रथम दिवशी गोठ्यातील गायीं चे पूजन केले जाते. गोपालकृष्ण भगवान यांच्या नंदभवनात नऊ लाख गोधन होते.बाल मुकुंद रोज आपल्या गोपाळसह गोचारण करण्यास यमुनेच्या तीरावर जात असतं... गोधन मुळे भगवंताचे नाम झाले गोपालकृष्ण...गोरस,दही, दूध, लोणी हे भगवंताचे प्रिय झाले... तसेच... मोगलाईत गोरगरीब जनतेला आधार देऊन... आया बहिणींचे आणि गोमातेचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केली..... म्हणून समस्त रयतेने महाराजांचा जयजयकार केला... गोब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩..... वसुबारस पासून सुरू होणाऱ्या तेज पर्वाच्या...आपणा सर्वांना तेजोमय शुभेच्छा...🪔🪔🪔 हे प्रकाशाचे पर्व आपणा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य घेऊन येवो...🪔🪔🪔 दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💥💫🪔 सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने. 'देवाचिये द्वारी'. पिंपळे गुरव. पुणे 🙏🚩😊
कोजागिरी पौर्णिमा.🌕🌕🌕 यमुनेचा सुंदर किनारा.... तिचं निळाशार , स्वच्छ पाणी वाहतंयं.... वृंदावन चां निसर्गरम्य परिसर....शरदाचं टिपूर चांदणं..... चंद्र आपुल्या पूर्णबिंबांने प्रकाशित झाला आहे.🌕....त्याची रूपेरी किरणे ...यमुनेचे पाणी चांदी सारखे चमकते आहे.... आणि.....
वृंदावन च्या त्या बागेत अवतरतो... तो सावळा शामसुंदर..... अहाहा....शरदाच्या टिपूर चांदण्यात रासलीला रंगते.... ढोल अन् टिपरीच्या तालावर तो मुरारी नृत्य करतो आहे.सोबतीला आहे गोपिकांचा घेर... अन् आटीव दूधाचा रूपेरी चषक.... काय अवर्णनीय सोहळा संपन्न होत आहे कोजागिरी पौर्णिमाचा.... जिथे श्रीकृष्ण तिथे आनंद❤️. प्रत्येक गोपिकेला वाटतंय....राधे सारखं तो माझ्याबरोबर नृत्य करतो आहे... म्हणून आजही आटीव दूध आणि पोह्यांचा नैवेद्य करतात... सगळे एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात.... याहून सुंदर कोजागिरी पौर्णिमा चे वर्णन नसेल कदाचित.... आदिमाया,आदिशक्ती अंबाबाई कोजागिरी पौर्णिमेला निद्रेतून जागी होते. आज तिचा जागर केला जातो. अशी मान्यता आहे की.... कोजागिरी च्या रात्री श्री महालक्ष्मी...कोजागर्ती...कोजागर्ती... असं म्हणत भ्रमण करत असते... जो जागा राहून तिचा जागर करतो... तिथे ती वास करते.🙏🚩 कोजागिरी च्या रात्री श्रीमान रायगड कैलासा प्रमाणे देखणा भासतो म्हणतात.... रायगडावरुन एका खड्या, कोरीव,कातळारून हिरकणी गवळण आपल्या लेकरासाठी उतरुन गेली. रयतेच्या राजाने... छत्रपती शिवाजी महाराजांनी या आई चा साडी,चोळी, बांगड्या देऊन सन्मान केला... अन् हिरोजी इंदुलकर यांना सांगून तो कडा तासून घेतला... तिथे बुरूज बांधून त्याचे नाव दिले... "हिरकणी बुरूज"... धन्य ते राजे...🙏🚩
आपणा सर्वांच्या आयुष्यात कोजागिरी पौर्णिमेचे 🌕 शितल, रूपेरी चांदणे आनंद अन् निरामय आरोग्य घेऊन येवो....
देवाचिये द्वारी
युगंधर.....
एका मैत्रिणीच्या घरी कार्यक्रमा निमित्त सुंदर सजावट केली जाते....त्या सर्व सजावटीत हा खुद्कन हसताना मला दिसला❤️
मी हरखून गेले.हे माधवा...
तुला मनमोहना,चित्तचोरा...का म्हटले असेल याचा प्रत्यय आला.❣️
तुझ्या तेजस्वी मुखावरचं हसू इतकं लोभसवाणं की,कुणाचही चित्त चोरलं जावं...
नंदा घरच्या गायी चारण्यासाठी भांडीर वनात जात होतास... तेंव्हा यमुना तीरी कदंब वृक्षाखाली असाचं मुरली घेऊन उभा राहिला असशील नाही....
हे मुरारी... तुझ्या मुरली च्या सुरावटीं नीं चराचरात बहार आली असेल.🤗✨
काय देखणं रुप... नखशिखांत "राजस सुकुमार मदनाचा पुतळा"...हातात मुरली, गळ्यात वैजयंती माला,कटी ला मेखला,पायात नुपूर,मस्तकी मुकूट... अन्... चेहऱ्यावर भान हरपून टाकणारं, निरागस, प्रसन्न हास्य....
मी सगळं विसरून फक्त तुला पाहत बसले... मनात विचार आला...गोपिकांची काही चूक नव्हती.... तुझं दिसणंच इतकं देखणं आहे....
तुझ्या कटी ची विशेष लकब....
शरीराचे सर्व चक्र जागृत असणारा तू श्रेष्ठ पुरुष...तू नारायण...तू सर्व जगाचा नियंता...
तुझी कौमुदीनी, तुझं सुदर्शन,तुझा पांचजन्य... अन् निखळ प्रेमात टाकणारं,भुलवणारं तुझं अलौकिक, अवर्णनीय,अविस्मरणीय, सुमधुर हास्य... डोळे तर इतके बोलके...की, आत्ता कमलनयन नेत्र कटाक्षाने माझ्याशी बोलू लागशील🤗✨...ही तुझी आयुधं...सगळंचं शब्दातीत...
तुझ्यावर इतकं प्रेम, श्रध्दा, विश्वास आहे...मग तुला आहो जावो...कसं करावं💞...
तू सर्वांचा लाडका आहेस...
माझा हृदयस्थ आहेस...
कुरुक्षेत्रावर पर्थाला गीता सांगितलीस....
परंतु "संभवामी युगे युगे" म्हणणारा तू आजही आमचा मार्गदर्शक आहेसचं....
हे युगंधरा,हे हृदयस्थ शारंगपाणी..🙏🏻..
एका चिंधीच्या बदल्यात द्रोपदीला अनंत वस्त्रे पूरविणारा तू...मी तुझ्याकडे काय मागावे 👏🏻
मी तुझ्या चरणी सदैव नतमस्तक🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️
तू सदैव सद्बुद्धी देत रहा...
मार्ग दाखवत रहा...
अन्... तुझं मनमोहक रूप नेत्रात स्थानबद्ध राहू दे❤️🩷🧡.
तुझ्या चरण स्पर्शाची अभिलाषी.🙏🏻
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
देवाचिये द्वारी.🙏🏻🚩🙂
पिंपळे गुरव..
पुणे ६१.
1 day ago | [YT] | 5
View 4 replies
देवाचिये द्वारी
मकरसंक्रांत....
नवीन वर्षातील प्रथम हर्ष उल्हासाचा सण...
आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आपल्या आयुष्यात मधुरता भरत राहो.🙏🏻✨
आपल्या सर्वांच्या आयुष्याच्या प्रगतीचा आलेख पतंगाप्रमाणे गगनात उंच उंच जात राहो.🙏🏻🎉
ही मकर संक्रांत सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्याची जावो, अन् ऊर्जेचा नवीन प्रकाश आपल्या आयुष्यात आनंद पसरवत राहो.🤗
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.🌹🌼🌸
4 weeks ago | [YT] | 1
View 4 replies
देवाचिये द्वारी
नववर्षाची पूर्व संध्या....
दि.३१ डिसेंबर २०२५...
पौष शु.१२, भागवत एकादशी 🚩🚩🚩
सालाबादप्रमाणे यंदाही श्री शंकर महाराज मठ ची पायी वारी सुफळ संपूर्ण झाली.🙏🏻🚩🙂
यंदाचे हे चौथे वर्ष.
सलग चार वर्षे महाराजांनी पायी वारी करून घेतली🙏🏻. त्याचा आनंद शब्दातीत.... घरापासून २२कि.मी.अंतर होते.परंतू...
चालताना रस्त्याच्या सोबत तो मावळतीचा दिनकर असतो.आपूसकचं त्याला दोन्ही हातांच्या नमस्कार चे अर्घ्य दिले जाते.तो मावळतानां सांगत असतो... उद्या चा दिवस ही सुंदर असेल, अन् उद्या ची स्वप्न ही मनोहर असतील.हा विश्वास चालायला हजार हत्तीं चे बळ देतो....
अर्थात महाराज ही आपल्या सोबत असतात.🙏🏻✨..
मजल दरमजल करत मठाची कमान दिसू लागते... अन् आपोआपच पायांना वेग येतो🙂
मठाच्या प्रथम पायरी ला हिना अन् सोनचाफा चा दरवळ स्वागताला हजर असतो.चित्तवृत्ती प्रसन्न, टवटवीत, प्रफुल्लित होतात.
सर्व शंकर भक्तांना हा अनुभव नित्याचाच आहे.आज मठात तुलनेने गर्दी कमीआहे.सुरेल भजन सेवा सुरू होती." शंकर बाबा तू माझा कैवारी" कानावर पडत होते.नेत्र सजल अन् मन तृप्त झाले.🤗✨
दत्त महाराज, हनुमंत राया आणि स्वामी नां नमस्कार करून.... महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचे....
सगळं सांभाळणारे महाराज...
ही भावना मन तरलं करते... त्यांच्या दर्शनाने डोळे अन् मन तृप्त होते....
नंतर शरीराचा थकवा दूर करायला पुढ्यात येतो खिचडी चा प्रसाद....
अहाहा...त्याची चव काय वर्णावी.... केवळ सुख❤️...
पून्हा एकदा दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करतो.
दर ३१ डिसेंबर चा हा अविस्मरणीय अनुभव...
जय शंकर.
देवाचिये द्वारी.
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
पुणे ६१.🙏🏻🚩🌼
1 month ago | [YT] | 9
View 1 reply
देवाचिये द्वारी
सद्गुरुनाथा....
मार्गशीर्ष..2025...
गिरनार...एक अद्भुत, अद्वितीय अनुभव....🚩🚩🚩
ध्यानीमनी नसताना गिरनार यात्रेचा योग जुळून येतो... त्यात मार्गशीर्ष महिना.. नुकतीच दत्त जयंती पौर्णिमा🌕 होऊन गेलेली...
गिरनार ची गर्दी काहीशी ओसरलेली... हवेत दाटधुके आणि गुलाबी थंडीचा ओलसर गारवा...
आता गुरु शिखराच्या दर्शनाची ओढ लागली आहे.. पहिल्या पायरीला जाऊन संपूर्ण नतमस्तक झालो. महाराज तुम्हीचं पाठीराखे म्हणत संपूर्ण शरणागत झालो.
आता गिरनारला रोपे ची चंगळ आहे.. पूर्वी 10,000 पायऱ्या चढून,उतरून यावे लागे.अंबाजी पर्यंत रोपेने गेलो. आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अप्रतिम असे स्वागत केले... गिरनार चा वारा म्हणजे जणू महाराजांचा स्पर्श.... अंबाजी माते वरून गुरुशिखर खुणावू लागले... आणि आपोआप पायांना वेग आला.
जय गिरनारी चा नाम घोष करत सहज चढत गेलो. आणि ज्याची खूप आस.. खूप ओढ.. लागली होती ते दिव्य दर्शन झाले. सकाळच्या कोवळ्या किरणांच्या प्रहरात महाराजांच्या दिव्य पादुकांचे दर्शन झाले. काहीतरी असामान्य गवसल्याचा आनंद हृदयात ओतप्रोत भरून राहिला. 🙂
गुरुमाऊलीने पदरात घेणे यापेक्षा वेगळे सुख कोणते. तो प्रेमाचा स्पर्श.. तो आपुलकीचा दर्शन सोहळा.. काय वर्णन करावे त्याचे.. सगळेच शब्दातीत...
गिरनार ला लाड करावे ते महाराजांनीच... कमांडलूला धुनीचे दर्शन घेतले.. आणि गरम गरम शिरा, भजी आणि कढी खिचडी पुढयात आली...
भजी पाहून शंकर बाबा आपल्या सोबत आहे याचा खरोखरच प्रत्यय आला.
इतक्या उंचीवर इतक्या प्रसन्न वातावरणात अमृततुल्य प्रसाद मिळावा.. यापरते भाग्य ते कोणते.... भक्तासाठी गुरुमाऊली ठाई ठाई उभे राहतात. कमंडलू तिर्थ चा प्रसाद आणि जल खरोखर अमृतासमान आहे...🙏🏻
जेव्हा गिरनार चा ध्यास लागतो तेव्हा.. आपसूकच मनात विचार येतो आपले चढणे होईल का...
पण महाराज प्रत्येक पायरीला सोबत असतात. गिरनार चा वारा जेव्हा अंगाला लपेटून जातो.. त्या स्पर्शाची महती काय वर्णावी...
जे पाहायचं होतं.. जे दिसावं असं मनापासून वाटत होतं.. त्याच्या दर्शनाने डोळे अगदी तृप्त होतात..🤗❤️
गिरनारला सारखं जाऊन काय मिळतं असं कोणी विचारत तेव्हा..... आम्ही म्हणतो.. तेथे माझे मी पण सरते ..तिथे गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळतो.. आणि मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. त्या विश्वासासाठी परत एकदा गिरनारला जावेसे वाटते...✨
खरं आहे... गिरनार दरवेळी नवीन भासतो.. नवीन अनुभव देतो.. नवीन अनुभूती देतो... तेथून पाय निघत नाही... वाटतं इथेच राहून जावं...
पुढच्या वेळी परत ये बाळा.. हा गुरूंचा विश्वास मनात रुंजी घालतो...👏🏻
महाराज मार्ग दाखवणारे तेच आनंद देणारे तेच आयुष्य सावरणारे.. सजवणारे...
नेहमीप्रमाणे यावेळी ही महाराजांनी अनवाणी पायाने वारी पूर्ण करून घेतली.त्याचा आनंद जगावेगळा..🤗
सजल नेत्राने पुन्हा एकदा गुरु शिखराचे दर्शन घेतले आणि पायउतार झालो...
मनात उरला एकच जयघोष
जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
तेरा भरोसा है रे भारी🚩🚩🚩
देवाचिये द्वारी
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने
पुणे ६१.🙏🏻🚩✨
1 month ago | [YT] | 10
View 5 replies
देवाचिये द्वारी
अथांग, असीम, निस्सीम प्रेमाची सोन्याची द्वारका.....🚩
डिसेंबर 2025....
पुन्हा एकदा द्वारकेच्या दर्शनाचा योग आला.अन् ... त्या द्वारकाधीशाचं सुंदर रूप पाहून मी पुन्हा एकदा भारावून गेले...🤗
श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती म्हणे... किती झळाळती आणि लखलखती असेल ती...✨🪔
त्याची प्रजा निश्चितच खूप संपन्न आणि समाधानी असेल.
द्वारकेच्या समुद्राच्या प्रत्येक लाटेत.. तिथल्या धुळीत.. तिथल्या हवेत आणि कणाकणात श्रीकृष्ण भरून उरला आहे....
द्वारकाधीशाच्या मंदिराचा ध्वज लावण्याचा सोहळा खूप अप्रतिम असतो. त्याची धर्माची ध्वजा फडकताना पाहून मनात हर्षाचा उन्माद उठतो. 🚩🚩🚩
पुन्हा एकदा त्याचा श्री सोपान मन भरून पाहिला. तो आहेच त्रिभुवनसुंदर❤️.... मन तृप्त होईपर्यंत त्याला पाहून घेतले. त्याच्या चरणांवरची नजर हटत नव्हती.... खरोखरच तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे.
गोमतीत तटी... समुद्राला जिथे गोमती नदी मिळते तिथे द्वारका उभी आहे... गोमती नदी समुद्राला मिळण्याचा देखणा सोहळा ही पाहता आला. मन आणि डोळे दोन्हीही तृप्त झाले🙏🏻✨
आणि या तृप्तदर्शनाबरोबरच...
आम्हा उभयतांचे चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंग यात्रा सुफळ संपूर्ण झाली. त्याचे समाधान आणि तृप्ती अलौकिक, अवर्णनीय आहे....🙏🏻✨
द्वारका ही नुसती यात्रा कधीच नव्हती आमच्यासाठी.त्याच्या दर्शनाची आस,ओढ अन् तीव्रता मात्र खूप जास्त होती. द्वारकाधीशाच्या दर्शनाचे पूर्णत्व मनात घट्ट,लख्ख अन् सतेज वसले आहे. 💙
100 वर्षे द्वारके वर राज्य करणारा हा द्वारकेचा राणा...
परंतु प्रत्यक्षात तो कधीही सिंहासनावर बसला नाही.
त्याने मनसोक्त भटकंती केली.
उत्तरेत बद्रीनाथ, पूर्वेला जगन्नाथ, पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेला रामेश्वरम मध्ये तो स्थित आहे.... त्याच्या अवघ्या जीवनाचा प्रवास खूप झळाळता आहे....👏🏻
खरंच त्याच्या दर्शनाचे समाधान अभूतपूर्व आहे. तो सर्व जाणतो... तो ठाई ठाई आणि चराचरात वसलेला... त्याच्याच कृपेने त्याने चार धाम यात्रा पूर्ण करून घेतली....
अथांग, असीम,निस्सीम प्रेमाची...सोन्याची द्वारका दर्शन घेऊन मनास मोठा आनंद आणि तृप्तता मिळाली. 🙏🏻✨
याच आनंदासह..
जय द्वारिकाधीश 🙏🏻 🚩 ✨
जय श्रीकृष्ण 🙏🏻🚩✨
देवाचिये द्वारी.
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
पिंपळे गुरव.
पुणे ६१.
1 month ago | [YT] | 6
View 4 replies
देवाचिये द्वारी
सद्गुरू श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा.✨🙏🏻🚩
आज शंकर महाराज प्रकट दिन आहे. आज अगदी निगूतिने महाराजांच्या पुढे शरणागत होऊन साग्रसंगीत पूजा केली.🙏🏻🌼
महाराजांचा आवडता प्रसाद म्हणजे मूग डाळीची खिचडी आणि कांदा भजी.
महाराज अंदाजाने कांदे ,बटाटे, टोमॅटो अख्खेच खिचडी टाकत. स्वतःच्या हाताने खिचडी शिजवत आणि सर्वांना प्रसाद देत. महाराजांच्या हातचा प्रसाद कधीही कमी पडला नाही.
महाराज म्हणत सर्वांच्या घरी डाळ तांदूळ उपलब्ध असतात. म्हणून हा सोपा प्रसाद. याचबरोबर चहा ही महाराजांना खूप प्रिय.☕.
चहाही अंदाजानेच करत. परंतु चार कप पाण्यात 22 माणसे सहज चहा पीत असत.
ही अगाध शंकर लीला. 🙏🏻🌼
आज प्रकट दिन म्हणून... मी ही आवडीने प्रसाद करायला घेतला. मूग डाळीची मऊ खिचडी आणि कांदा भजी पापड वगैरे केले. प्रसाद करताना जय शंकर जय शंकर नामस्मरण सुरूच होते.🙏🏻
मोठ्या मनोभावे महाराजांना नैवेद्य दाखवला. केवळ नामस्मरणाने तो प्रसाद अक्षरशः अमृततुल्य लागला. साधी खिचडीच परंतु... महाराजांच्या नामस्मरणाने ती केवळ अमृतमय लागत होती.🤗
भक्तांच्या आयुष्यातला अंधार दूर करून आनंदाने प्रेम पसवणारे महाराज...
शरणागताला शाश्वत आधार देणारे महाराज....
आजही श्री शंकर बाबा मठात खिचडीच्या प्रसादाचे वाटप सुरूच असते. तो प्रसाद घेतला की तृप्ती येते.🤗
आज महाराजांच्या प्रकटदिनी आवडीने प्रसाद केला आणि मन आनंदाने भरून गेले.
जय शंकर. 🙏🏻🚩🌹
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
देवाचिये द्वारी.
पिंपळे गुरव.
पुणे 🙏🏻🚩🪔
3 months ago | [YT] | 7
View 3 replies
देवाचिये द्वारी
आज नरकचतुर्दशी...
आपणा सर्वांना नरक चतुर्दशीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.....
भगवान श्रीकृष्णाने आजच नरकासुराचा वध केला होता. अन् दानवाने डांबून ठेवलेल्या 16 सहस्त्रनारींना भगवानांनी मुक्त केले होते. 🙏🏻
आज आणखी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आमच्या बाळाची कविता उत्सव दिव्यांचा या कवितासंग्रहात प्रकाशित झाली आहे.
चि. अथर्व चे लहानपणापासूनच मराठीवर विशेष प्रेम आहे. बाळा माय मराठी सतत वृद्धिंगत करण्यात प्रयत्नशील रहा. तिला शब्दांचे लेणे सतत चढवून शृंगारित करत रहा. 🤗
या नरक चतुर्दशीला दिवाळी फराळाबरोबरच साहित्यिक फराळही मिळाला... याचा विशेष आनंद आहे.
आपणा सर्वांच्या आयुष्यातील वाईट नरकासुराचा नाश होवो....
अन परमेश्वराच्या भक्तीचा प्रकाश सर्वत्र पसरू दे. 💫
नरक चतुर्दशीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🪔🙏🏻🚩
शुभ दीपावली 🪔🪔🪔
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
देवाचिये द्वारी
धनत्रयोदशी 🪷🪷🪷
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🪔🙏🏻🌹
आज धन्वंतरी पूजन केले जाते.
वैद्यकीय क्षेत्रात धन्वंतरी पूजनाचे विशेष महत्त्व आहे. समुद्रमंथनातून जे चौदा रत्न निघाले त्यापैकी एक धन्वंतरी देवता होय.
धन्वंतरी देवतांची वैद्य आहे. म्हणूनच धनत्रयोदशीला तिचे मनोभावे पूजन केले जाते .🙏🏻🙏🏻🙏🏻...
आज गुरुद्वादशी...
दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या अद्भुत कार्यावताराची सांगता केली. तो दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो 🙏🙏🙏
आपणा सर्वांच्या आयुष्यात माता लक्ष्मीचा वास राहो... सदैव धनवर्षा होत राहो....🪔🪔🪔
धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🪔🙏🏻🌹
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
'देवाचिये द्वारी'.
पिंपळे गुरव.
पुणे 🙏🚩😊
3 months ago | [YT] | 6
View 2 replies
देवाचिये द्वारी
वसुबारस....
दिपावली सणाचा प्रथम दिवस... वसुबारस....
आपली भारतीय संस्कृती जगात पूजनीय आहे.गौ मातेला आई चा दर्जा दिलेला आहे.तेहतीस कोटी देवतांचा वास गायी मध्ये आहे.
समुद्रमंथनातून जे चौदा रत्न निघाले होते, त्यापैकी एक कामधेनु गाय होय.
तेंव्हा पासूनचं गौमातेची पूजा करण्यात येते.🙏🏻🙏🏻🙏🏻
दिपावली च्या प्रथम दिवशी गोठ्यातील गायीं चे पूजन केले जाते.
गोपालकृष्ण भगवान यांच्या नंदभवनात नऊ लाख गोधन होते.बाल मुकुंद रोज आपल्या गोपाळसह गोचारण करण्यास यमुनेच्या तीरावर जात असतं...
गोधन मुळे भगवंताचे नाम झाले गोपालकृष्ण...गोरस,दही, दूध, लोणी हे भगवंताचे प्रिय झाले...
तसेच...
मोगलाईत गोरगरीब जनतेला आधार देऊन... आया बहिणींचे आणि गोमातेचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केली..... म्हणून समस्त रयतेने महाराजांचा जयजयकार केला...
गोब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩.....
वसुबारस पासून सुरू होणाऱ्या तेज पर्वाच्या...आपणा सर्वांना तेजोमय शुभेच्छा...🪔🪔🪔
हे प्रकाशाचे पर्व आपणा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्य घेऊन येवो...🪔🪔🪔
दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💥💫🪔
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
'देवाचिये द्वारी'.
पिंपळे गुरव.
पुणे 🙏🚩😊
3 months ago | [YT] | 7
View 2 replies
देवाचिये द्वारी
कोजागिरी पौर्णिमा.🌕🌕🌕
यमुनेचा सुंदर किनारा.... तिचं निळाशार , स्वच्छ पाणी वाहतंयं.... वृंदावन चां निसर्गरम्य परिसर....शरदाचं टिपूर चांदणं..... चंद्र आपुल्या पूर्णबिंबांने प्रकाशित झाला आहे.🌕....त्याची रूपेरी किरणे ...यमुनेचे पाणी चांदी सारखे चमकते आहे....
आणि.....
वृंदावन च्या त्या बागेत अवतरतो...
तो सावळा शामसुंदर.....
अहाहा....शरदाच्या टिपूर चांदण्यात रासलीला रंगते....
ढोल अन् टिपरीच्या तालावर तो मुरारी नृत्य करतो आहे.सोबतीला आहे गोपिकांचा घेर... अन् आटीव दूधाचा रूपेरी चषक....
काय अवर्णनीय सोहळा संपन्न होत आहे कोजागिरी पौर्णिमाचा....
जिथे श्रीकृष्ण तिथे आनंद❤️.
प्रत्येक गोपिकेला वाटतंय....राधे सारखं तो माझ्याबरोबर नृत्य करतो आहे...
म्हणून आजही आटीव दूध आणि पोह्यांचा नैवेद्य करतात...
सगळे एकत्र येऊन त्याचा आस्वाद घेतात....
याहून सुंदर कोजागिरी पौर्णिमा चे वर्णन नसेल कदाचित....
आदिमाया,आदिशक्ती अंबाबाई कोजागिरी पौर्णिमेला निद्रेतून जागी होते.
आज तिचा जागर केला जातो.
अशी मान्यता आहे की....
कोजागिरी च्या रात्री श्री महालक्ष्मी...कोजागर्ती...कोजागर्ती... असं म्हणत भ्रमण करत असते...
जो जागा राहून तिचा जागर करतो...
तिथे ती वास करते.🙏🚩
कोजागिरी च्या रात्री श्रीमान रायगड कैलासा प्रमाणे देखणा भासतो म्हणतात....
रायगडावरुन एका खड्या, कोरीव,कातळारून हिरकणी गवळण आपल्या लेकरासाठी उतरुन गेली.
रयतेच्या राजाने...
छत्रपती शिवाजी महाराजांनी या आई चा साडी,चोळी, बांगड्या देऊन सन्मान केला... अन् हिरोजी इंदुलकर यांना सांगून तो कडा तासून घेतला...
तिथे बुरूज बांधून त्याचे नाव दिले...
"हिरकणी बुरूज"...
धन्य ते राजे...🙏🚩
आपणा सर्वांच्या आयुष्यात कोजागिरी पौर्णिमेचे 🌕 शितल, रूपेरी चांदणे आनंद अन् निरामय आरोग्य घेऊन येवो....
कोजागिरी पौर्णिमेच्या शितल अन् रूपेरी शुभेच्छा 🌕🙏🚩
सौ.स्वाती चंद्रशेखर अदमाने.
देवाचिये द्वारी'
पिंपळे गुरव.
पुणे 🙏🏻
4 months ago | [YT] | 7
View 2 replies
Load more