Shree Shiv Shambhoo

नमस्कार 🙏🏻
@ShreeShivShambhoo चॅनेल वर सर्वांचे स्वागत 💐💐💐
सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा.. तुम्हाला कोणत्या भक्तीगीतांचे व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा..


Shree Shiv Shambhoo

सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।|
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ||
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा सण नवरात्रीच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो आणि तो अधर्मावर धर्माचा विजय साजरा करतो. या दिवशी देवी दुर्गा महिषासुराचा वध करते किंवा प्रभू रामाने रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा होतो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना 'सोने' म्हणून वाटली जातात आणि शस्त्रपूजा देखील केली जाते.
दसरा साजरा करण्याची कारणे
धर्मावर अधर्माचा विजय: या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला आणि धर्माचे रक्षण केले, त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात.
देवी दुर्गेचा विजय: या दिवशी, देवी दुर्गाने महिषासुर या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले.
आयुष्यभर विजय आणि यश: जीवनात विजय आणि यश टिकून राहावे यासाठी विजयादशमीच्या दिवशी शस्त्रे आणि अवजारांची पूजा करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धती
शस्त्रपूजा: या दिवशी लोक आपल्या शस्त्रे आणि अवजारांची पूजा करतात, ज्यामुळे त्या गोष्टींचा योग्य आणि यशस्वी वापर सुनिश्चित होतो.
आपट्याची पाने वाटणे: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून एकमेकांना वाटण्याची प्रथा आहे, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
शमीची पूजा: व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते.
मोठ्यांचा आशीर्वाद घेणे: दसऱ्याच्या दिवशी सकाळी आंघोळ करून मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे.

6 months ago | [YT] | 2

Shree Shiv Shambhoo

गणपती बाप्पा मोरया..!!!
पुढच्या वर्षी लवकर या...🙏🏻🙏🏻🙏🏻

7 months ago | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

रक्षाबंधन

श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन, आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणातील कोळी समाज हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करतो. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण केले जाते. हे समुद्राशी असलेले नाते जपण्याचे आणि सुरक्षिततेसाठी वरदान मागण्याचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्त्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो.

रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

श्रावणातील पौर्णिमेला महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटकातील अनेक लोक खासकरून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरी करतात. 'नारळी' म्हणजे नारळ आणि 'पौर्णिमा' म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र. या दिवशी सगळे कोळी बांधव समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूज करतात. या मार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांचा मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून "भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो" अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.


नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव जे प्रामुख्याने मासेमारीचा व्यवसाय करतात, ते लोक समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करतात. असे मानले जाते की, श्रावणी पौर्णिमेला पूजा केल्याने समुद्र प्रसन्न होतो. पावसाळ्यात आणि इतर महिन्यातही येणाऱ्या समुद्राच्या सगळ्या संकटांपासून मासेमाऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण निराळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

किनारी प्रदेशात राहणाऱ्या समुदायामध्ये साजऱ्या होणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी शंकराची देखील पूजा केली जाते. कारण नारळाला असणारे तीन डोळे हे शंकराचे प्रतीक असून श्रावण महिना हा शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे. त्यामुळे शंकराला नारळ आणि त्याच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात.

8 months ago | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

youtube.com/shorts/aegGDfdfub...

चौथा गणपती महागणपती रांजणगाव

महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून  रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.

येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. तिला मोहोत्कट असे म्हणले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.

या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले.

रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी, तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. बांधकाम करताना उत्तम दिशासाधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाशकिरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.

आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते.

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे.

शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते

8 months ago | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

youtube.com/shorts/hRJv618vct...

सिद्धटेक सिद्धिविनायक
तिसरा गणपती
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा तिसरा गणपती आहे. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते. पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे. हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव "सिद्धी-विनायक" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते. येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हणले जाते.

मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते..त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले.या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली.. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे.. पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले - "ओम श्री गणेशाय नमः". प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी ("शक्ती") प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते

8 months ago | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

youtube.com/shorts/bsk62Rn_bm...

अष्टविनायक - दुसरा गणपती

चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
गणपतीचे मंदिरश्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे.
मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

8 months ago (edited) | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

youtube.com/shorts/Tp8TAuSzXg...

अष्टविनायक - पहिला गणपती

मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे . गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस रिद्धि-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर विराजमान आहेत.
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

8 months ago (edited) | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

रक्षण करूया नागराजाचे,
जतन करूया निसर्गदेवतेचे
नागपंचमीच्या शुभेच्छा...!

नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नाग देवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो.
बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात.
घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते.
नागदेवतेला हळदी – कुंकू लावले जाते.
काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते.
नागदेवतेला धूप – दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो.
नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात.

8 months ago | [YT] | 6

Shree Shiv Shambhoo

राम कृष्ण हरी...!!! 🙏🏻🚩
youtube.com/shorts/tO32DMYBQP...

9 months ago (edited) | [YT] | 7

Shree Shiv Shambhoo

विठ्ठल आवडी प्रेम भाव..!!
राम कृष्ण हरी 🙏🏻
youtube.com/shorts/5spyXKOcMq...

9 months ago | [YT] | 6