मुंबई : नृत्यरंजनी ललित कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलागणाम महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मीरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. सूरसिंगार संस्थेचे सचिव मनसुखभाई पटेल, भरतनाट्यम कलाकार रेवती श्रीनिवासराघवम, सतीश कृष्णमूर्ती आणि पंडित भीमण्णा जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाची सुरुवात सोलापूरचे सुंद्रीवादक कलाश्री जाधव आणि मास्टर व्यंकटेशकुमार जाधव यांच्या सुंद्री वादनाने होईल. त्यांना निसर्ग देहूकर तबल्याची साथसंगत करणार आहेत. त्यानंतर ललित कला फाइन आर्ट संस्थेच्या ८० विद्यार्थ्यांचा भरतनाट्यम कार्यक्रम होणार आहे. यानंतर विविध कलाकारांकडून भरतनाट्यमचे स्वतंत्र कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये जयश्री राजगोपालन, गायत्री सुब्रमण्यम, कश्मिरा त्रिवेदी, मनसुखभाई पटेल, ऐश्वर्या हरीश, सविता सुब्रमण्यम, आरती बालसुब्रमण्यम, अंकिता कोतकर, मेघना जें, आकांक्षा बांदकर, संजना पिल्लई, दर्शिनी श्रीनिवासन, रिद्धिका आदिपारंबिल, स्तव्य राघवन, स्वाती बदले, मधुरा पावसकर, रुची कारभारी, वृणाली सकपाळ आणि साक्षी कुलकर्णी यांचा सहभाग आहे. हा कार्यक्रम विनाशुल्क असून संगीत व नृत्यरसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ललित कला फाइन आर्ट संस्थेच्या अध्यक्षा रेवती श्रीनिवासराघवम यांनी केले आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये डोणगाव रस्त्यावरील सलगर वस्ती जवळील इंद्रप्रस्थ फेज तीन येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक सहा मधील इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात मुख्य रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत होती. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इंद्रप्रस्थ फेज तीन कडे जाणारा मुख्य रस्ता व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडे केली होती. आमदार देवेंद्र कोठे यांनी या मागणीची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी निधी देऊन येथील रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी २८ लाख ७२ हजार रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नूतन नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका विजया खरात, महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, पवन खांडेकर आदी उपस्थित होते.
सोलापुरात ‘यश लॅक्मे सलून’चा भव्य शुभारंभ; आधुनिक सौंदर्य सेवांनी शहराला नवा ग्लॅमर टच!
Solapur: सोलापूर शहरातील उद्योजक सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांनी रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतर आता सौंदर्य क्षेत्रात दमदार एन्ट्री करत ‘यश लॅक्मे सलून’ या अत्याधुनिक उपक्रमाची शानदार सुरुवात केली आहे. यश आयकॉन रेल्वे लाईन, मोदी खाना परिसरात १ एप्रिल रोजी या सलूनचा भव्य शुभारंभ सुयश खानापुरे यांच्या मातोश्री गंगाबाई जनबसप्पा खानापुरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. उद्योजक ब्रिजमोहन फोफलिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, आमदार विजयकुमार देशमुख, प्रमोद मोरे, डॉ. किरण देशमुख, संतोष पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सुरज मुलानी, शिंगाडे, RTO निरीक्षक संदीप शिंदे,मृगेंद्र चडचणकर, अक्कलकोटचे सौ.वनिता खेडगी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
४० वर्षांची परंपरा, जागतिक दर्जाच्या सेवा ‘Lakmé Salon’ हा देशातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्युटी ब्रँड असून ४० वर्षांहून अधिक अनुभवासह देशभरातील १२५ हून अधिक शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त शाखांद्वारे सेवा देत आहे. हेअर कट, हेअर कलरिंग, स्किन केअर, फेशियल, ब्रायडल मेकअप आणि आधुनिक ग्रूमिंग सेवांसाठी हा ब्रँड विशेष ओळखला जातो.
सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक सुविधा ‘यश लॅक्मे सलून’मध्ये प्रशिक्षित स्टायलिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट्सद्वारे जागतिक दर्जाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षिततेचे काटेकोर पालन यामुळे ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह अनुभव मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. महानगरांप्रमाणे आधुनिक सौंदर्य सेवा आता सोलापूरमध्येच उपलब्ध होत असल्याने शहराच्या विकासात आणखी एक नवे परिमाण जोडले जाणार आहे. हे अत्याधुनिक सलून येत्या ५ एप्रिलपासून नागरिकांसाठी खुले होणार असून, सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सुयश खानापुरे व सोनाली खानापुरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर गुरुसिद्धप्पा हणमशेट्टी, बापूसाहेब पाटील, अजय फलमारी, मयूर दरगड, राहुल चंडक, धीरेंद्र हैदराबादवाले, रोहन बायस, रितेश बायस, सिद्धेश्वर खानापुरे, अक्षय वाकसे, अखिल हणमशेट्टी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर, दि०४ :- सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते. कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात संपूर्ण फाल्गुन महिना धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या २११ धारकऱ्यांनी गणपती घाटावर सामूहिक मुंडण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन केले.
सोलापूर शहरातील ११७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ४२ जणांनी सामूहिक मुंडण केले. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासानिमित्त मोठ्या संख्येने मुंडण केले.
क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महिनाभर त्यांचा प्रचंड छळ करून अत्यंत क्रूर हत्या केली. देव - देश आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांची आठवण म्हणून हिंदू बांधवांकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.
या संपूर्ण महिन्यात चौकाचौकामध्ये दररोज महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या निधनाचे सुतक संपूर्ण हिंदू समाजाला लागू असल्याच्या श्रद्धेतून महिनाभर चप्पल न घालणे, गोड न खाणे, मुंडण करणे, मांसाहार वर्ज्य करणे, गादी न वापरणे, आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे असे व्रत पाळले जाते.
सोलापुर शहरातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जात असून ७८ ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना दररोज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी (यंदा १८ मार्च) मुकपदयात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर बलिदान मासाची सांगता होणार आहे.
रविवारी सकाळी सामूहिक मुंडण करण्यासाठी गणपती घाटावर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी घाटावर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तरुणांनी सामूहिक मुंडण केले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
सोलापूरच्या कलावंतांच्या सुंद्री वादनाने रंगणार ‘कलागणाम महोत्सव’चे आयोजन
मुंबई : नृत्यरंजनी ललित कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलागणाम महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मीरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे.
सूरसिंगार संस्थेचे सचिव मनसुखभाई पटेल, भरतनाट्यम कलाकार रेवती श्रीनिवासराघवम, सतीश कृष्णमूर्ती आणि पंडित भीमण्णा जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात सोलापूरचे सुंद्रीवादक कलाश्री जाधव आणि मास्टर व्यंकटेशकुमार जाधव यांच्या सुंद्री वादनाने होईल. त्यांना निसर्ग देहूकर तबल्याची साथसंगत करणार आहेत. त्यानंतर ललित कला फाइन आर्ट संस्थेच्या ८० विद्यार्थ्यांचा भरतनाट्यम कार्यक्रम होणार आहे.
यानंतर विविध कलाकारांकडून भरतनाट्यमचे स्वतंत्र कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये जयश्री राजगोपालन, गायत्री सुब्रमण्यम, कश्मिरा त्रिवेदी, मनसुखभाई पटेल, ऐश्वर्या हरीश, सविता सुब्रमण्यम, आरती बालसुब्रमण्यम, अंकिता कोतकर, मेघना जें, आकांक्षा बांदकर, संजना पिल्लई, दर्शिनी श्रीनिवासन, रिद्धिका आदिपारंबिल, स्तव्य राघवन, स्वाती बदले, मधुरा पावसकर, रुची कारभारी, वृणाली सकपाळ आणि साक्षी कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
हा कार्यक्रम विनाशुल्क असून संगीत व नृत्यरसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ललित कला फाइन आर्ट संस्थेच्या अध्यक्षा रेवती श्रीनिवासराघवम यांनी केले आहे.
#कलागणाममहोत्सव #ललितकलाअकादमी #मुंबई #भरतनाट्यम #सुंद्रीवादन #सोलापूर #कलाश्रीजाधव #व्यंकटेशकुमारजाधव #नृत्यकला #संगीतकला #भारतीयशास्त्रीयनृत्य #कला_महोत्सव #मीरा_रोड #कलारसिक #LalitKalaAcademy #KalaganamMahotsav #Bharatanatyam #Solapur #MumbaiEvents #ClassicalDance #IndianClassicalMusic
4 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये डोणगाव रस्त्यावरील सलगर वस्ती जवळील इंद्रप्रस्थ फेज तीन येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक सहा मधील इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात मुख्य रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत होती. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात वाहनधारकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इंद्रप्रस्थ फेज तीन कडे जाणारा मुख्य रस्ता व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडे केली होती. आमदार देवेंद्र कोठे यांनी या मागणीची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी निधी देऊन येथील रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी २८ लाख ७२ हजार रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नूतन नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका मृण्मयी गवळी, नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका विजया खरात, महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, पवन खांडेकर आदी उपस्थित होते.
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
सोलापुरात ‘यश लॅक्मे सलून’चा भव्य शुभारंभ; आधुनिक सौंदर्य सेवांनी शहराला नवा ग्लॅमर टच!
Solapur: सोलापूर शहरातील उद्योजक सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांनी रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील यशस्वी वाटचालीनंतर आता सौंदर्य क्षेत्रात दमदार एन्ट्री करत ‘यश लॅक्मे सलून’ या अत्याधुनिक उपक्रमाची शानदार सुरुवात केली आहे. यश आयकॉन रेल्वे लाईन, मोदी खाना परिसरात १ एप्रिल रोजी या सलूनचा भव्य शुभारंभ सुयश खानापुरे यांच्या मातोश्री गंगाबाई जनबसप्पा खानापुरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला शहरातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. उद्योजक ब्रिजमोहन फोफलिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, आमदार विजयकुमार देशमुख, प्रमोद मोरे, डॉ. किरण देशमुख, संतोष पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सुरज मुलानी, शिंगाडे, RTO निरीक्षक संदीप शिंदे,मृगेंद्र चडचणकर, अक्कलकोटचे सौ.वनिता खेडगी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
४० वर्षांची परंपरा, जागतिक दर्जाच्या सेवा
‘Lakmé Salon’ हा देशातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्युटी ब्रँड असून ४० वर्षांहून अधिक अनुभवासह देशभरातील १२५ हून अधिक शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त शाखांद्वारे सेवा देत आहे. हेअर कट, हेअर कलरिंग, स्किन केअर, फेशियल, ब्रायडल मेकअप आणि आधुनिक ग्रूमिंग सेवांसाठी हा ब्रँड विशेष ओळखला जातो.
सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक सुविधा
‘यश लॅक्मे सलून’मध्ये प्रशिक्षित स्टायलिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट्सद्वारे जागतिक दर्जाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षिततेचे काटेकोर पालन यामुळे ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह अनुभव मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
महानगरांप्रमाणे आधुनिक सौंदर्य सेवा आता सोलापूरमध्येच उपलब्ध होत असल्याने शहराच्या विकासात आणखी एक नवे परिमाण जोडले जाणार आहे.
हे अत्याधुनिक सलून येत्या ५ एप्रिलपासून नागरिकांसाठी खुले होणार असून, सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सुयश खानापुरे व सोनाली खानापुरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला यश डेव्हलपर्सचे डायरेक्टर गुरुसिद्धप्पा हणमशेट्टी, बापूसाहेब पाटील, अजय फलमारी, मयूर दरगड, राहुल चंडक, धीरेंद्र हैदराबादवाले, रोहन बायस, रितेश बायस, सिद्धेश्वर खानापुरे, अक्षय वाकसे, अखिल हणमशेट्टी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी
पंढरपूर, दि०४ :-
सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.
कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात संपूर्ण फाल्गुन महिना धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या २११ धारकऱ्यांनी गणपती घाटावर सामूहिक मुंडण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन केले.
सोलापूर शहरातील ११७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ४२ जणांनी सामूहिक मुंडण केले. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासानिमित्त मोठ्या संख्येने मुंडण केले.
क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महिनाभर त्यांचा प्रचंड छळ करून अत्यंत क्रूर हत्या केली. देव - देश आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांची आठवण म्हणून हिंदू बांधवांकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.
या संपूर्ण महिन्यात चौकाचौकामध्ये दररोज महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या निधनाचे सुतक संपूर्ण हिंदू समाजाला लागू असल्याच्या श्रद्धेतून महिनाभर चप्पल न घालणे, गोड न खाणे, मुंडण करणे, मांसाहार वर्ज्य करणे, गादी न वापरणे, आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे असे व्रत पाळले जाते.
सोलापुर शहरातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जात असून ७८ ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना दररोज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी (यंदा १८ मार्च) मुकपदयात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर बलिदान मासाची सांगता होणार आहे.
रविवारी सकाळी सामूहिक मुंडण करण्यासाठी गणपती घाटावर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी घाटावर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तरुणांनी सामूहिक मुंडण केले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
आवाहन पत्रिका
परमपूज्य लिं.श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 70 व्या पुण्यतिथी...
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू..
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क
8 months ago | [YT] | 4
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
भाजपा उमेदवारांची यादी जाहीर...
#maharashtrapolitics #solapurpolitics #bjpsolapur #SolapurMunicipalElection #SolapurMahanagarpalika #NominationScrutiny #ElectionUpdate #SolapurPolitics #CivicElection #MahanagarpalikaElection #NagarsevakElection #ElectionProcess #SolapurNews #YesNewsMarathi #MaharashtraPolitics
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
Sanghrsh Kranti News संघर्ष क्रांती न्यूज
#ब्रेकिंग-सोलापूर नगरपरिषद निवडणूक निकाल नगराध्यक्ष
1. अक्कलकोट .... मिलन कल्याणशेट्टी भाजपा
2. मैंदर्गी..... अंजली बाजारमठ ...भाजपा
3. बार्शी.... तेजस्विनी कथले... भाजप
4. अनगर..... प्राजक्ता पाटील.. भाजपा
5. दुधनी... प्रथमेश मेहत्रे... शिवसेना शिंदे गट
6. सांगोला.. आनंदा माने....शिवसेना शिंदे गट
7. मोहोळ.. सिद्धी वस्त्रे... शिवसेना शिंदे गट
8. कुर्डूवाडी... जयश्री भिसे... शिवसेना ठाकरे गट
9. मंगळवेढा .... सुनंदा अवताडे...तीर्थक्षेत्र विकास आघाडी
10. अकलूज..... रेशमा अडगळे...शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
11. करमाळा.... मोहिनी सावंत...स्थानिक विकास आघाडी
12. पंढरपूर.... डॉक्टर प्रणिता भालके.... तीर्थक्षेत्र विकास आघाडी
. ......... . ......
पक्षीय बलाबल
भाजपा...04
शिवसेना एकनाथ शिंदे गट...03
तीर्थक्षेत्र विकास आघाडी...02
शिवसेना उद्धव ठाकरे गट..01
राष्ट्रवादी शरद पवार गट...01
स्थानिक विकास आघाडी...01
एकूण ......12
........................................
Sangharsh kranti News
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more