सत्यप्रभा न्यूज | तुमच्या बातम्या, तुमच्या समस्या. बातम्यांसाठी फॉलो करा आणि शेअर करा. तुमच्या समस्या व बातम्यांसाठी संपर्क करा. | Satyaprabha News |



Satyaprabha News

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांना मोठं यश, सगळ्या मागण्या मान्य; पाणी प्यायले पण उपोषणावर ठाम; कारण काय?
.
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळ गावी 29 ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्यावतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पाण्याचा घोट घेतला मात्र उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे सांगत त्या मान्य केल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तुमच्या शब्दाचा मान राखतो, दोन सलाईन आणि पाण्याचा घोट घेतो, पण उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
.
#SatyaprabhaNews #ManojJarange #MarathaReservation #LatestNews

16 hours ago | [YT] | 0

Satyaprabha News

देशाच्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "केंद्र सरकार सर्वकाही ठीक असल्याचे दावे करत असले, तरी जर अर्थव्यवस्था खरोखरच उत्तम स्थितीमध्ये आहे तर मग सामान्यांना सोनं खरेदी करायला काय अडचण येत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ताजा घडामोडी आणि राजकीय अपडेट्ससाठी पाहत राहा Satyaprabha News.
.
#SupriyaSule #IndianEconomy #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #NationalNews

16 hours ago | [YT] | 0

Satyaprabha News

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. "मुंबई ठाकरेंच्या बापाचीच आहे आणि आमचा बाप मजबूत आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले आहे. तसेच, धनुष्यबाण चिन्ह आणि सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करतानाच, अमित ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले आहे.
.
#SanjayRaut #ShivSenaUBT #SatyaprabhaNews #MumbaiPolitics #ThackerayFamily

16 hours ago | [YT] | 0

Satyaprabha News

आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews

1 day ago | [YT] | 2

Satyaprabha News

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बूम-बूमचं पुनरागमन..!
.
.
#cricket #indvsafg #T20I #jaspritbumrah #SatyaprabhaNews #cricket

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. "धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी असून बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुसण्याचे काम सुरू आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

ताजा घडामोडी आणि सर्व राजकीय अपडेट्ससाठी पाहत राहा Satyaprabha News.
.

#EknathShinde #ShivSena #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #BowAndArrow

1 day ago | [YT] | 1

Satyaprabha News

जागतिक संकटे आणि मंदीच्या सावटातही भारतीय अर्थव्यवस्थेने ७.८ टक्के असा दमदार विकासदर नोंदवला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीवर विश्वास व्यक्त केला आहे.
"काही लोक निराशेतून अपप्रचार करत असले तरी भारत वेगाने पुढे जात आहे. ही आर्थिक गती कायम ठेवण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी' या दोन धोरणांचा अवलंब करणे गरजेचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
.
ताजा घडामोडी आणि देश-भरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा Satyaprabha News.

.

#NarendraModi #IndianEconomy #SatyaprabhaNews #AtmanirbharBharat #NationalNews

1 day ago | [YT] | 1

Satyaprabha News

जंतरमंतरवरील आंदोलनाशी संबंधीत सर्व विद्यार्थ्यांवरील FIR रद्द!
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
.
#SatyaprabhaNews #SupremeCourt #StudentProtests #CJP #jantarmantar

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सचा (Laser Lights) वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून, लेझर लाईट्सचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. डोळ्यांना होणारी इजा आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
ताजा घडामोडी आणि सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा Satyaprabha News.
.
#Ganeshotsav #PunePolice #SatyaprabhaNews #LaserBeamBan #PuneNews

1 day ago | [YT] | 0

Satyaprabha News

मोहन भागवत यांना मी हात जोडून विनंती करतो की, अमेरिकेत बोलण्यापेक्षा इथे बोलावं. तुमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रातले भंपक नेते आहेत ना, त्यांना हे बौद्धिक द्या. अमेरिकेतील लोकांना त्याची गरज नाही - अरविंद सावंत
#arvindsavant #MohanBhagwat #SatyaprabhaNews #rss #ShivsenaUBT

2 days ago | [YT] | 0