सर्व सामान्यांच हक्काच विचारपीठ !!


MY NEWS

प्रतिनीधी - मोबीन खान , कोपरगाव

स्व.अजितदादांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कारासाठी शिफारस व्हावी...
आ.आशुतोष काळेंचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीसांना निवेदन...

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्य-कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात अलौकिक योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या स्व.अजितदादांच्या अजोड कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्यात यावा. याकरीता राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०९) रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्याच्या राजकारणात चार दशकाहून अधिक काम करणाऱ्या स्व.अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावरचा एक तेजस्वी,चकाकता तारा कायमचा निखळला आहे. कृषी, सहकार, शिक्षण, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्राची सखोल जाण असणाऱ्या स्व.अजीतदादांची जनतेशी आत्मीय नाळ जूळलेली होती.त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हते, तर एका संपूर्ण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते. त्यांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि निर्णयांमध्ये लोकहिताची झलक होती. आज ते आपल्यात नसल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी केवळ एका व्यक्तीची नसून, एका विचारधारेची, एका मूल्यव्यवस्थेची कमतरता आहे जी सहज भरून निघणार नाही.

मात्र अभ्यासू दृष्टिकोन आणि जनतेच्या मनात अजरामर असलेल्या स्व.अजितदादांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी स्व.अजितदादांच्या सन्मानार्थ त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळावा यासाठी केद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.

मुख्यमंत्री व्यक्तिश: लक्ष घालणार.......

स्व.अजितदादांचे सामाजिक व राजकीय योगदान केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हत, तर संपूर्ण राज्यातील जनतेसाठी होत. त्यांनी आयुष्यभर समाज, माणूस आणि मूल्यांसाठी सातत्याने कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्याची मागणी भावनिक व नैतिकदृष्ट्या योग्य असून या संदर्भात मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस स्वतः व्यक्तिशः लक्ष घालणार आहेत.-आ. आशुतोष काळे.

6 days ago | [YT] | 106

MY NEWS

प्रतिनीधी - कैलास विखे पाटील , लोणी

सुदृढ शरीरातूनच उत्तम प्रशासन घडेल - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

​लोणी - खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो. खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयात नम्रता बाळगायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. मनातील अहंकार गळून पडतो. आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैयक्तिक आयुष्यातही या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपुरते न खेळता, व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा. यातूनच चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी केले.

​गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी - शिर्डी (ता. राहाता) येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या 'पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदा मंत्री ​श्री. महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहित आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे. जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे. जेव्हा आपली शरीरयष्टी चांगली असते, तेव्हा मनही सुदृढ राहते. सुदृढ मनामुळे कामात एकाग्रता वाढते, चिडचिड होत नाही व कामाचा अतिरिक्त ताण जाणवत नाही.

आजच्या धावपळीच्या युगात कामाचे ओझे निश्चितच जास्त आहे, पण त्यावर मात करण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल, तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल, तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सुदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

​पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडूवृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून, स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

​अपर मुख्य सचिव श्री. कपूर म्हणाले, स्पर्धेत केवळ सहभाग महत्त्वाचा नसून जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळा. क्रीडांगणात उतरल्यावर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच खेळले पाहिजे. मंत्रालयातील दैनंदिन कामातून वेळ काढत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सरावाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

​याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेसाठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी खो-खो खेळाडू कु. श्वेता गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

​यावेळी व्यासपीठावर सचिव (लाभक्षेत्र विकास) संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व शानदार पथसंचलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचा शुभंकर असलेल्या 'जलवीर' व‌ विजेता चषकाचे अनावरणही करण्यात आले. उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी क्रीडा विकासाची शपथ घेतली. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते 'क्लॅपर' वाजवून १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला.

*​लोणी -शिर्डी येथे रंगणार तीन दिवस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा*

जलसंपदा विभागाच्या या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी व शिर्डी येथे पार पडणार आहेत. जलसंपदा विभागात २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर सातारा (२०१८), जळगाव (२०२०) आणि नागपूर (२०२५) नंतरचे हे पाचवे पर्व लोणी-शिर्डी (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आले आहे.

​या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स, कॅरम, जलतरण, टेबल टेनिस, बुद्धिबळ व बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. यासाठी मंत्रालय स्तर, विविध महामंडळे तसेच क्षेत्रीय आस्थापनांमधील संघ व खेळाडू उपस्थित राहिले आहेत. विभागीय, मंडळ व महामंडळ स्तरावर पारदर्शक निवड प्रक्रिया राबवून अंतिम फेरीसाठी ११ विभागांतील संघांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात एकूण ९ क्रीडा प्रकार व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून, यात ४८० महिला व ९७० पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे या महोत्सवाचा समारोप होईल.

सिंचन व व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील ताण-तणाव कमी करून त्यांच्यात संघभावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे घोषवाक्य 'खेळात सशक्त तर सेवेत समर्थ' असे आहे.

******

1 week ago | [YT] | 39

MY NEWS

राहाता -

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन

६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहाता शहरामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मोहनराव सदाफळ , मुकुंद नाना सदाफळ , ॲड . रघुनाथ बोठे , रिपाईचे पप्पू भाऊ बनसोडे , डॉ . स्वाधीन गाडेकर, प्रा .राजेंद्र निकाळे , डॉ . संजय उबाळे , धनंजय निकाळे, जयंतराव घोडेराव , माधवराव बिडवे , बाळासाहेब कोळगे , आबा आरणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . भिक्कु आणि संघ यांनी त्रिशरण पंचशील दिले .

यावेळी गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ , मोहनराव सदाफळ , ॲड . हुसळे , राजेंद्र वाबळे , मनोहर बोरुडे , ॲड. भाऊसाहेब सदाफळ , डॉ . संतोष मोकळ , डॉ . स्वाधीन गाडेकर , जयंतराव घोडेराव , प्रा. राजेंद्र निकाळे यांनी अभिवादनपर मनोगते व्यक्त केली.


या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर , सोसायटीचे माजी चेअरमन सुरेशराव गाडेकर , डॉ . संजय गायकवाड, डॉ . संजय उबाळे , समता परिषदेचे संतोष लोंढे , मुन्ना शहा , डॉ . विजय पुंडलिक सदाफळ , दत्तात्रय पद्माकर सदाफळ , रमेश गजानन निकाळे , प्रा . वसंत निकाळे , आबासाहेब बन्सी निकाळे, पंकज पिपाडा , पांडुरंग तुपे , गणेश निकाळे , विलास रामराव पाळंदे , बाळासाहेब भालेराव , ॲड . राजेंद्र पाळंदे ,सागर भालेराव , एकनाथ धिवर , बाबासाहेब पाळंदे , संदीप रामू सोनवणे , भाऊसाहेब दादा निकाळे , आनंदराव भारुड सर , केंद्रप्रमुख घेगडमल सर , बाळासाहेब बनसोडे , दिनकर निकाळे ,संतोष किसन बागुल , राहुल नानासाहेब निकाळे , काशिनाथ निकाळे , साई पाळंदे मान्यवरांसह महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे कार्यकर्ते रावसाहेब बनसोडे , अशोक पारखे आणि शेकडो आंबेडकरांच्या विचारांचे पाईक उपस्थित होते .

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भिमराज निकाळे , जितेंद्र दिवे , ज्ञानेश्वर तान्हाजी निकाळे, विरेश लक्ष्मण सोनवणे , रावसाहेब निकाळे आणि अभिजीत निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

2 months ago | [YT] | 19

MY NEWS

रहिमपूर येथून महिलांची मोफत देवदर्शन यात्रा...

प्रतिनिधी - कैलास विखे , लोणी

रहिमपूर - महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई पाटील यांच्या आशिर्वादाने रहिमपूर गावातील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही विशेष यात्रा होत असून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
या यात्रेत शनिशिंगणापूर, रेणुकामाता काचेचे मंदिर, मोहटादेवी, कानिफनाथ महाराज मढी आणि माळींबा गड (मच्छिंद्रनाथ) या पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यात्रा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता रहिमपूर ग्रामपंचायत कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. गाड्या वेळेवर निघणार असल्याने महिलांनी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यात्रेसाठी इच्छुक महिलांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक सचिन शिंदे पाटील आणि पप्पू शेठ गाढे पाटील यांनी केले आहे.

या यात्रेच्या आयोजनात सरपंच सौ. सविता लक्ष्मण शिंदे, उपसरपंच राहुल अशोक गुळे, नानासाहेब बाळासाहेब शिंदे, राजेंद्र भिमाची वाळुंज आणि अरुण दत्तात्रय शिंदे यांचा सहभाग आहे.

2 months ago | [YT] | 19

MY NEWS

दि.१८ प्रतिनिधी - जावेद सय्यद

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्याच्या जलसंपदा विभागाचा गौरव!

मंत्री विखे पाटील यांनी
केला पुरस्काराचा स्विकार

पुरस्काराने अधिक काम
करण्यासाठी पाठबळ-डाॅ विखे पाटील


केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला "बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ " मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्ली मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.राज्याचे जलसंपदा तथा अहील्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्काराचा स्विकार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती.त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता,तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे.धरण सुरक्षा,जलसंवर्धन सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यासर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने
सन्मानित केल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

महायुती सरकाच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सहकारी मंत्र्याच्या सहकार्याने राज्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी आजच्या पुरस्काराचे मोठे पाठबळ असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी व्यक्त केली.
विभागातील सर्व अधिकारी अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळ्ण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

2 months ago | [YT] | 17

MY NEWS

प्रभाग ६ मध्ये खळबळ! विखे समर्थक वाबळेंची अपक्ष उमेदवारी करून “आव्हान”

प्रतिनिधी - जावेद सय्यद

राहाता – राज्यातील निवडणुकांचे वारे सुरू होताच विविध ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात आहे, तर काही ठिकाणी त्यांना थांबवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, अधिकृत तिकीट न मिळाल्याने नाराज समर्थकही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

राहाता शहरातील विखे समर्थक आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वाबळे कुटुंब हे अधिकृत उमेदवारीच्या प्रतीक्षेत होते. मात्र अपेक्षेप्रमाणे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग क्रमांक सहा मधून स्वर्गीय सुहास वाबळे यांच्या थोरल्या सुनबाई स्नेहल नरेंद्र वाबळे यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विखेंचे कट्टर समर्थक असूनही प्रभाग 6 मधून तिकीट न मिळाल्याने वाबळे कुटुंबाने अपक्ष उमेदवारी दाखल करून एकप्रकारे थेट आव्हान उभे केले आहे.

या घडामोडींमुळे प्रभाग 6 मध्ये मोठी खळबळ उडाली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

3 months ago | [YT] | 20

MY NEWS

राहाता नगरपालिका निवडणुकीत राजकीय समिकरणांना अनपेक्षित कलाटणी देणारे विधान माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केले आहे..." चटणी-भाकरी खाईल पण लाचारी पत्करणार नाही” अशी ठाम गर्जना करत पठारे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरीची ठिणगी पेटवली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारी व स्थानिक पातळीवरील संघटनेवर नाराजी असल्याची चर्चा असून, पठारे यांच्या या भूमिकेमुळे आघाडीपुढे मोठी धास्ती निर्माण झाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

राजेंद्र पठारे यांच्या समर्थकांकडून स्वतंत्र उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असून, निवडणुकीच्या तोंडावर या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या गणितात बिघाड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आता पठारे प्रत्यक्षात बंडखोरीची वाट धरतात का याकडे संपूर्ण राहाता शहराचे लक्ष लागले आहे.

3 months ago | [YT] | 17

MY NEWS

राहाता नगरपालिका निवडणूक: गाडेकर विरुद्ध गाडेकर - महाभारताची राजकीय लढाई रंगणार !!

राहाता नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा थरारक सामना रंगणार आहे. गाडेकर विरुद्ध गाडेकर अशी सरळ लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून शहरातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते धनंजय गाडेकर मैदानात उतरले असून, महायुतीने तरुण, ऊर्जावान आणि वैद्यकीय क्षेत्रातील परिचित चेहरा डॉ. स्वाधीन गाडेकर यांना उमेदवारी देत थेट महाभारत घडवले आहे.


अर्जुन - श्रीकृष्ण जोडगोळीचा राजकीय अवतार

महाभारतातील अर्जुनासोबत रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण होते, त्याप्रमाणे या राजकीय रणांगणात डॉ. सुजय विखे पाटील हे श्रीकृष्णाच्या भूमिकेत तर डॉ. स्वाधीन गाडेकर हे अर्जुनाच्या भूमिकेत असतील. सुजय विखे यांच्या रणनीती आणि जनसंपर्काच्या जोरावर महायुती विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.


🔹 उमेदवारांची स्थिती आणि समीकरणे

महाविकास आघाडी - धनंजय गाडेकर

महायुती - डॉ. स्वाधीन गाडेकर

अपक्ष - तुषार सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , भानुदास गाडेकर तसेच आणखी काही इच्छुक मैदानात असु शकतात.


तुषार सदाफळ हे तरुण शेतकरी, हॉटेल व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते असून कोविड काळात गरजूंसाठी त्यांनी केलेले कार्य लक्षवेधी ठरले. ते डॉ. सुजय विखे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे त्यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते.

धनंजय गाडेकर – अनुभवाचे भांडार

राजकारणातील अभ्यासू, शिस्तबद्ध आणि जुन्या शिवसेना पद्धतीने कार्य करणारे धनंजय गाडेकर हे मागील ३५ वर्षांपासून राहाता नगरपालिकेत प्रभावशाली राहिले आहेत.बालशिवसैनिक म्हणून सुरुवात करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर निष्ठा ठेवणारे धनंजय गाडेकर आता स्वतःच्या जोरावर मैदानात उतरणार आहेत.कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक असल्याने ते किती वेळ प्रचारासाठी देतील हा प्रश्न आहे.

तथापि , विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना निवडणुकीत गाडेकरांनी दिलेली साथ लक्षात घेता, या वेळी त्यांना कोल्हे गटाकडून कितपत पाठिंबा मिळेल हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण भाजपने स्नेहलता कोल्हे यांना उत्तर नगर जिल्ह्याच्या नगरपालिकांची जबाबदारी दिल्याने त्या प्रचारासाठी वेळ देऊ शकतील का हे अनिश्चित आहे.

डॉ. स्वाधीन गाडेकर – तरुणाईचा आवाज

डॉ. स्वाधीन हे प्रख्यात वैद्यकीय दांपत्य डॉ. किसनराव ( KY ) गाडेकर आणि डॉ. मंगला गाडेकर यांचे सुपुत्र आहेत.या परिवाराने राहाता शहरात गेल्या अर्धशतकापासून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.2001 साली डॉ. मंगला गाडेकर यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळवले होते.डॉ. स्वाधीन यांच्या पाठीशी मोठा तरुण वर्ग आणि वैद्यकीय व्यावसायिकांचा समूह आहे.त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ असल्याने त्यांचा प्रचार हा अत्यंत नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने होणार आहे.

सुजय विखे पाटील यांचा प्रभाव -

शिर्डी मतदारसंघातील विकासकामे, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, एमआयडीसी, क्रीडा साधनसामग्री आणि वाड्या-वस्त्यांवरील प्रकल्प यांच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे यांनी मोठा जनाधार तयार केला आहे.त्यांच्या करिष्म्यामुळे डॉ. स्वाधीन गाडेकर यांना महायुतीच्या मतदारसंघात मजबूत गती मिळणार हे निश्चित.


🔹 ओबीसी फॉर्म्युला आणि सामाजिक गणित

दोन्ही आघाड्यांनी यावेळी मूळ ओबीसी चेहरा हा फॉर्म्युला ठरवला आहे.म्हणून जातीय आणि सामाजिक समीकरणे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

राहाता निवडणुकीची रंगत -

राहाता शहरातील जनता हीच ‘माय-बाप’ असून, शेवटी तीच नगराध्यक्ष ठरवणार.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचे गणिते कोलमडवणारी ही निवडणूक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.


राहाता नगरपालिका निवडणूक ही अनुभव विरुद्ध तरुणाई,परंपरा विरुद्ध आधुनिक रणनीती,
आणि गाडेकर विरुद्ध गाडेकर अशी ऐतिहासिक चुरशीची ठरणार आहे.राजकीय महाभारतात कोण अर्जुन ठरणार आणि कोण भिष्म पितामह राहणार ? हे ठरवणार राहात्याची जनता आणि मतदार !!

3 months ago (edited) | [YT] | 49

MY NEWS

प्रतिनीधी - कैलास विखे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २२ ते २६ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे २,७१७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून १,६१४ क्युसेक, जायकवाडी धरणातून ३,१४४ क्युसेक, मुळा धरणातून ५,०० क्युसेक, घोड धरणातून १,०० क्युसेक, सीना धरणातून १,०३० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १८६ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.

जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,

विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.

नदी, ओढे आणि नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

3 months ago | [YT] | 6

MY NEWS

शिर्डीत पूजनीय पंडीत प्रदीपजी मिश्रा यांचे मंगलमय स्वागत !!
साईनगरी ‘हर हर महादेव’च्या जयघोषान दुमदुमली...

प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा यांचे साईनगरीत भव्य स्वागत करण्यात आले. लक्ष्मीनगर चौक ते बसस्थानका पर्यतच्या सर्व मार्गावर फुलांची उधळण करीत भगव्या मंगलमय हर हर महादेवचा जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली.

पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांचे शिर्डीत साडेचार वाजता आगमन झाले.डॉ सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले.पूर्ण मार्ग भगव्या झेंड्यांनी, फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आला होता महीलांनी डोक्यावर कलश घेवून महाराजांच्या स्वागत सोहळ्यात उपस्थिती दाखवली. संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला आहे.

स्वागत सोहळ्यात वारकरी दिंडी, झांज पथक, ढोल पथक, तसेच महिलांकडून फुलांची आरती आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. महिला मंडळांनी विशेष लाईनमध्ये उभे राहून महाराजांवर पुष्पवृष्टी केली.

यावेळी शेकडो भाविकांनी “हर हर महादेव”च्या जयघोषात महाराजांचे स्वागत करत वातावरण दुमदुमविले. लक्ष्मीनगर चौक ते बसस्थानक परिसरात आयोजित स्वागत मिरवणुकीत महिला, युवक व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतले.

पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा यांचे विमानतळावर पालकमंत्री सुजय विखे पाटील यांच्या खासदार सुजय विखे पाटील यांच्यातर्फ़े स्वागत करण्यात आले

शिर्डी विमानतळावर पोहोचताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः कार चालवत महाराजांना विमानतळावरून स्वागतस्थळी आणले.या प्रसंगी नागरिकांनी जोरदार घोषणांनी महाराजांचे स्वागत केले.

राहाता शहरातही भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महाराजांचे स्वागत केले.मोठ्या प्रमाणत पुष्पवृष्टी करण्यात आली.शहरातील चौकात भव्य हार घालून शहरवासीयांनी त्यांचे स्वागत केले.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राहाता ते लोणी या मार्गावरून युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून महाराजांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या स्वागताच्या कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळे, युवक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीत महाराजांच्या प्रवचनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, शहर भक्तिभावाने सज्ज झाले आहे.

4 months ago | [YT] | 91