Rashtravadi Samarthak



Rashtravadi Samarthak

पुणे महानगरपालिकेची सत्ता कुणाकडे जाणार ? तुम्हाला काय वाटत ?

#MahanagaraplikaElection

#PuneMahanagarpalika #MarathiNews

2 days ago | [YT] | 47

Rashtravadi Samarthak

मोरोशी येथील आश्रमशाळेतील आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित प्रशासन व पालकांशी संवाद साधत सखोल माहिती घेतली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक सुरक्षेसाठी आवश्यक त्या तात्काळ उपाययोजना राबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग या प्रकरणात ठामपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा आहे.

1 week ago | [YT] | 11

Rashtravadi Samarthak

नव्या वर्षाचा सूर्योदय नव्या आकांक्षा, प्रगतीच्या संधींना जन्म देणारा आहे. मेहनत करा व जोमाने भरारी घ्या, असा संदेश देणारा हा दिवस. नव्या वर्षांत सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, हीच सदिच्छा. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#HappyNewYear

2 weeks ago | [YT] | 82

Rashtravadi Samarthak

महिला सक्ष्मीकारणासाठी राष्ट्रवादी आघाडीवर...
महिला सक्ष्मीकरण केवळ घोषणा,नाही थेट कृती उपमुख्यमंत्री मा. अजितदादांचा दूरदृष्टीपुर्ण निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक ५२लाडक्या बहिणींना उमेदवारी..!

2 weeks ago | [YT] | 42

Rashtravadi Samarthak

मा. अजितदादांच्या अथक प्रयत्नांना यश!

मुळशी धरणातून वाया जाणारे अतिरिक्त ७ टीएमसी पाणी पुणे शहरास वापरण्यास मिळणार आहे. या माध्यमातून पुणेकरांना दररोज अधिक मुबलक पाणी पुरवठा होणार आहे...!

2 weeks ago | [YT] | 105

Rashtravadi Samarthak

मुंबई📍
आज मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहामध्ये प्रांताध्यक्ष मा. खा.सुनील तटकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या विविध भागातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी लातूरमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक अथरोद्दीन मुजोरोद्दीन काजी, मोसिन हकीम शेख, तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. जयश्री हरिभाऊ तरे, श्री. संदीप हरिभाऊ तरे, श्री दत्तात्रय तुकाराम भंडारी, सौ. मानसी पाटकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी परिवारात मन:पूर्वक स्वागत केले आणि सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांना पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सर्वांना आवाहन केले. याप्रसंगी पक्षाचे नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
l

3 weeks ago | [YT] | 161

Rashtravadi Samarthak

माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.

संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.

सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.

Maharashtra Cabinet Minister and my party colleague Shri Manikrao Kokate has submitted his resignation to me following the outcome of the Hon’ble Court’s verdict. In keeping with our party’s long-standing philosophy that the rule of law is supreme and above all individuals, the resignation has been accepted in principle.

I have forwarded Shri Kokate’s resignation to the Hon’ble CM for due consideration and acceptance, in accordance with constitutional procedure.

Our party has always believed that public life must be guided by constitutional morality, institutional integrity, and respect for the judiciary. We stand firmly by the rule of law and will continue to act in a manner that upholds democratic values and public trust.

4 weeks ago | [YT] | 48

Rashtravadi Samarthak

खेळ पैठणीचा आणि भव्य लकी ड्रॉ!

प्रभाग क्रमांक ३३ "शिवणे खडकवासला धायरी" या प्रभागातील धायरी, खडकवासला, कोल्हेवाडी, जेपी नगर, नांदोशी सणसवाडी, किरकटवाडी, नांदेड, कोंढवे, कोपरे, उत्तमनगर, शिवणे या भागातील महिलांसाठी आयोजित खास "खेळ रंगला पैठणीचा" आणि भव्य लकी ड्रॉ स्पर्धेस उपस्थित राहिले.

प्रभागातील महिलांचा आनंद आणि सहभागाने हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढत महिलांना आनंद, सन्मान आणि आत्मविश्वास देणारा हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. या कार्यक्रमातील उत्साही वातावरण, सुंदर सजावट आणि आकर्षक बक्षीस सगळंच अविस्मरणीय होतं.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खडकवासला विधानसभा मतदार संघ अध्यक्ष श्री. बाबा धुमाळ,श्री.राहुल पोकळे, श्री. कुणाल पोकळे ,श्री. भूपेंद्र मोरे सौ. भागश्री कामठे ,श्री. सौरभ मते, निलेश गिरमे ,अविनाश लगड,शुभम गायकवाड ,कुमार धूपरगुडे,युवक अध्यक्ष सागर कोल्हे,श्री. युवराज वांजळे श्री. विठ्ठल वांजळे, श्री. संभाजी वांजळे, श्री. किरण वांजळे, श्री. सतीश वांजळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

उत्तमनगर, पुणे📍

1 month ago | [YT] | 150

Rashtravadi Samarthak

आदरणीय @pawarspeaks साहेब, आपणांस उदंड, निरोगी व दैदीप्यमान आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!

#happybirthday #pawarsaheb

1 month ago | [YT] | 421

Rashtravadi Samarthak

महिला आयोग ❤️

#rupalichakankar

1 month ago | [YT] | 204