पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या मिथिला’ शासकीय निवासात महाराष्ट्र शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि योगदानाला मनापासून नमन केले. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला अधिक सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
शेतकऱ्यांच्या खताची गरज लक्षात घेऊन आणखी एक महत्त्वाचा निर्णय
शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा मिळावा, यासाठी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाच्या कोल्हापूर येथील खत कारखान्यात कृषि उद्योग १८:१८:१० मिश्र खताचे द्वितीय उत्पादन सत्र सुरू करण्यात आले. या उत्पादन सत्राचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने माझ्या हस्ते करण्यात आला याचा मला नितांत आनंद आहे. सध्या या कारखान्यात दररोज सुमारे ४० मे. टन खताचे उत्पादन होत आहे. दुसरे उत्पादन सत्र सुरू झाल्याने दररोज आणखी ४० मे. टन अतिरिक्त खताचे उत्पादन होणार आहे.
खरीप आणि आगामी रब्बी हंगामातील खताची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून वेळेत निर्णय आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास त्याचा फायदा निक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांना होईल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे.
या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव मा. परिमल सिंग, पणन कृषिमार्केटिंग विभागाचे आयुक्त, कृषी आयुक्त मा. सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. अशोक काकडे, तसेच महामंडळाचे सर्व विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा ‘द्राक्ष व बेदाना परिसंवाद २०२६’ 🍇
📍 पुणे,| दि. २६ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘द्राक्ष व बेदाना परिसंवाद २०२६’ कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
मी स्वतः द्राक्ष उत्पादक शेतकरी असल्याने द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी मी जवळून अनुभवल्या आहेत. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, निर्यात व गुणवत्ता यांसारखी आव्हाने आज शेतकऱ्यांसमोर आहेत.
या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, AI, हवामानाचा अचूक अंदाज, निर्यातवाढ, बेदाणा व मूल्यवर्धित उद्योगांना चालना देण्यावर भर देणे गरजेचे आहे.
कृषी विभाग, संशोधन संस्था आणि द्राक्ष बागायतदार संघाची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकऱ्यांचा कष्टाला जगभर पोहोचवण्यासाठी शासन सदैव आपल्या पाठीशी आहे.
शुभम आणि मृणाल या नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
आज 📍 मंचर येथे बारामती तालुक्यातील रुई गावचे श्री. राजेंद्र साळुंखे यांचे चिरंजीव शुभम आणि आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे श्री. राजकुमार काळे यांची कन्या मृणाल यांच्या शुभविवाह पार पडला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.
शुभम आणि मृणाल यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी सदैव नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागासाठी गौरवाचा क्षण
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री मा. श्री. चिराग पासवानजी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला मनापासून आनंद झाला.
हा सन्मान केवळ शासनाच्या कामगिरीचा नसून महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजक आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची ओळख आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ हजार २४४ वैयक्तिक, ५२२ समूह आणि ७५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी मिळाली. ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तसेच ‘बीज भांडवल’ अंतर्गत ६१ हजार ३२३ सदस्यांना २२१.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतमालाला प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी जोडण्यास चालना मिळत असून, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
हा सन्मान आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे; मात्र त्यासोबत शेतमालाला अधिकाधिक मूल्य मिळवून देण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याची जबाबदारीही वाढली आहे.
नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. राज्यातील शेतकरी, शेती आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांना दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, पीक उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ उपलब्धता तसेच कृषीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या विविध योजनांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्याबाबतही चर्चा झाली.
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे वितरण मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 5086 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरीत करण्यात आला. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
Dattatray Bharane Official
महाराष्ट्र शेतकरी दिनानिमित्त अभिवादन!
📍शिवाजीनगर, पुणे | दि. २७ ऑगस्ट २०२६
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या मिथिला’ शासकीय निवासात महाराष्ट्र शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि योगदानाला मनापासून नमन केले. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला अधिक सक्षम, समृद्ध आणि आधुनिक बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
#dattatraybharane #maharashtrashetkaridin #farmerday #agriculture #maharashtra #महाराष्ट्र_शेतकरी_दिन #शेतकरीदिन #अन्नदाता #कृषी #महाराष्ट्र
2 days ago (edited) | [YT] | 56
View 1 reply
Dattatray Bharane Official
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या शेतकरी दिनानिमित्त अन्नदाता शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
अन्नदाता सुखी भवं! 🌾
#dattatraybharane #farmerday #ShetkariDin #Agriculture #FarmersFirst #maharashtra #शेतकरीदिन #अन्नदाता #शेतकरी #कृषी #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 58
View 3 replies
Dattatray Bharane Official
शेतकऱ्यांच्या खताची गरज लक्षात घेऊन आणखी एक महत्त्वाचा निर्णय
शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा मिळावा, यासाठी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाच्या कोल्हापूर येथील खत कारखान्यात कृषि उद्योग १८:१८:१० मिश्र खताचे द्वितीय उत्पादन सत्र सुरू करण्यात आले. या उत्पादन सत्राचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने माझ्या हस्ते करण्यात आला याचा मला नितांत आनंद आहे. सध्या या कारखान्यात दररोज सुमारे ४० मे. टन खताचे उत्पादन होत आहे. दुसरे उत्पादन सत्र सुरू झाल्याने दररोज आणखी ४० मे. टन अतिरिक्त खताचे उत्पादन होणार आहे.
खरीप आणि आगामी रब्बी हंगामातील खताची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून वेळेत निर्णय आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास त्याचा फायदा निक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांना होईल असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे.
या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे सचिव मा. परिमल सिंग, पणन कृषिमार्केटिंग विभागाचे आयुक्त, कृषी आयुक्त मा. सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. अशोक काकडे, तसेच महामंडळाचे सर्व विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
#dattatraybharane #fertilizer #FarmersFirst #agriculture #Krushi #maharashtra #कृषी #खत #रब्बी #खरीप #शेतकरीहित #महाराष्ट्र
2 days ago | [YT] | 52
View 0 replies
Dattatray Bharane Official
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा ‘द्राक्ष व बेदाना परिसंवाद २०२६’ 🍇
📍 पुणे,| दि. २६ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘द्राक्ष व बेदाना परिसंवाद २०२६’ कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
मी स्वतः द्राक्ष उत्पादक शेतकरी असल्याने द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी मी जवळून अनुभवल्या आहेत. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, निर्यात व गुणवत्ता यांसारखी आव्हाने आज शेतकऱ्यांसमोर आहेत.
या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, AI, हवामानाचा अचूक अंदाज, निर्यातवाढ, बेदाणा व मूल्यवर्धित उद्योगांना चालना देण्यावर भर देणे गरजेचे आहे.
कृषी विभाग, संशोधन संस्था आणि द्राक्ष बागायतदार संघाची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकऱ्यांचा कष्टाला जगभर पोहोचवण्यासाठी शासन सदैव आपल्या पाठीशी आहे.
#dattatraybharane #grapegrowers #grapes #agriculture #FarmersFirst #pune #maharashtra #द्राक्ष_बागायतदार #द्राक्ष #बेदाणा #कृषी #शेतकरीहित #पुणे #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 70
View 2 replies
Dattatray Bharane Official
शुभम आणि मृणाल या नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
आज 📍 मंचर येथे बारामती तालुक्यातील रुई गावचे श्री. राजेंद्र साळुंखे यांचे चिरंजीव शुभम आणि आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे श्री. राजकुमार काळे यांची कन्या मृणाल यांच्या शुभविवाह पार पडला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.
शुभम आणि मृणाल यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी सदैव नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
#dattatraybharane #Wedding #bestwishes #Manchar #maharashtra #शुभविवाह #हार्दिक_शुभेच्छा #मंचर #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 66
View 1 reply
Dattatray Bharane Official
महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागासाठी गौरवाचा क्षण
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री मा. श्री. चिराग पासवानजी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला मनापासून आनंद झाला.
हा सन्मान केवळ शासनाच्या कामगिरीचा नसून महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजक आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची ओळख आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ३१ हजार २४४ वैयक्तिक, ५२२ समूह आणि ७५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी मिळाली. ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तसेच ‘बीज भांडवल’ अंतर्गत ६१ हजार ३२३ सदस्यांना २२१.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतमालाला प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी जोडण्यास चालना मिळत असून, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
हा सन्मान आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे; मात्र त्यासोबत शेतमालाला अधिकाधिक मूल्य मिळवून देण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याची जबाबदारीही वाढली आहे.
#dattatraybharane #PMFME #NationalAwards #foodprocessing #FarmersFirst #agriculture #maharashtra #राष्ट्रीय_पुरस्कार #अन्न_प्रक्रिया #शेतकरीहित #कृषी #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 32
View 0 replies
Dattatray Bharane Official
ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#EidEMilad #ईद_ए_मिलाद #शुभेच्छा #EidMubarak
3 days ago | [YT] | 28
View 1 reply
Dattatray Bharane Official
देशात महाराष्ट्र कृषी विभागाची नंबर १ कामगिरी!
#dattatraybharane #ChiragPaswan #PMFME #NationalAward #foodprocessing #FarmersFirst #newdelhi #maharashtra #राष्ट्रीय_पुरस्कार #अन्न_प्रक्रिया #चिराग_पासवान #शेतकरीहित #नवीदिल्ली #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 2
View 1 reply
Dattatray Bharane Official
नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. राज्यातील शेतकरी, शेती आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांना दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, पीक उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ उपलब्धता तसेच कृषीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या विविध योजनांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्याबाबतही चर्चा झाली.
#dattatraybharane #ShivrajSinghChouhan #newdelhi #Agriculture #FarmersFirst #maharashtra #नवीदिल्ली #कृषी #शेतकरीहित #महाराष्ट्र
3 days ago | [YT] | 74
View 4 replies
Dattatray Bharane Official
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे वितरण मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 5086 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरीत करण्यात आला. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
#dattatraybharane #FarmerLoanWaiver #FarmersFirst #maharashtra #शेतकरी_कर्जमुक्ती #शेतकरीहित #महाराष्ट्र
4 days ago | [YT] | 54
View 5 replies
Load more