मोरोपंत आर्या Moropant Arya



मोरोपंत आर्या Moropant Arya

एक प्रतिक्रिया :

कुडाळजवळील परुळे या पावन भूमीत भरलेला “मोरोपंत साहित्य अभ्यास वर्ग” हा माझ्यासाठी केवळ शिबिर नव्हता, तर एक संस्कारमय आणि आनंददायी अनुभूती होती. या गावाला एका ऐतिहासिक वारसा आहे थोर सत्पुरुष गोपाळ स्वामी ज्यांना बोधले बुवांनी अनुग्रह दिला त्यांचे हे मूळ गाव त्यांच्या पवित्र घराचेही दर्शन श्री देसाई आजोबांच्या मुळे मला शक्य झाले. गावातील वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आणि देसाई आजोबांनी अत्यंत कष्टाने उभारलेले आई भगवतीचे मंदिर पाहण्याचे भाग्य लाभले. सिंधुदुर्ग खरंच कवितेत वर्णन केल्याप्रमाणे कोकणची माणसे साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

श्री प्रभंजन बुवा भगत यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या अभ्यास वर्गाचे आयोजन केले होते. आणि स्वतः बुवा समर्पण वृत्तीने सर्व कामात सहभागी होते.
“योगः कर्मसु कौशलम्” या गीतेतील उक्तीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत कौशल्य आणि शिस्त अनुभवायला मिळाली.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अभ्यासक, हरिभक्त श्री केळकर बुवा, श्री जोशी बुवा, श्री यशोधन, श्री कुलकर्णी बुवा श्री मांडेवाल बुवा आणि इतर विद्वज्जन मंडळींच्या सहवासाने हे तीन दिवस अधिकच समृद्ध झाले.

मोरोपंतांच्या साहित्याचा गोडवा, अभ्यासपूर्ण चर्चा आणि भक्तिरस यांचा सुंदर संगम अनुभवता आला.
अदिनारायण मंदिराचे अध्यक्ष व व्यवस्थापक आदरणीय श्री मकरंद बुवा देसाई, त्यांचे वडील, सौभाग्यवती, मंदिराचे पुजारी आणि त्यांची पत्नी यांनी केलेली सेवा अत्यंत आत्मीयतेची होती.
“अतिथिदेवो भव” या भारतीय संस्कृतीच्या वचनाचा प्रत्यय प्रत्येक क्षणी येत होता. दररोजच्या भोजनात सिंधुदुर्गातील केलेले कोयाडे, पायस, असेल रुचकर पदार्थ आणि
तीन दिवस सर्व हरिभक्तांसाठी केलेली उत्तम भोजन व्यवस्था, प्रेमळ आदरातिथ्य आणि सेवाभाव मनाला स्पर्शून गेला.
“परोपकाराय सतां विभूतयः”
सज्जनांची संपत्ती ही परोपकारासाठीच असते, याचा सुंदर अनुभव येथे आला.
या शिबिरातून ज्ञान, भक्ती, संस्कार आणि स्नेह यांची अमूल्य शिदोरी मिळाली.
सर्व आयोजक, सेवेकरी आणि उपस्थित मंडळींबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
ईश्वरचरणी प्रार्थना की, अशा संस्कारमय उपक्रमांची अखंड परंपरा वृद्धिंगत होत राहो.
“विद्या ददाति विनयं” या उक्तीप्रमाणे हे शिबिर ज्ञानासोबत विनय आणि प्रेमही देऊन गेले.

श्री शैलेश आठल्ये, दापोली

1 month ago | [YT] | 11

मोरोपंत आर्या Moropant Arya

नमस्कार,
उद्या १४ जून, संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीगजानन स्तवाचा दुसरा भाग अपलोड होईल. 😊🙏🏻🚩
तो व्हिडिओ नक्की बघा.👁️‍🗨️ लाईक 👍🏻 करा, फॉरवर्ड ↗️ करा.

आणि

" मोरोपंत आर्या Moropant arya " हें चॅनल सबस्क्राईब करा आणि 🔔 बेल आयकॉन टाईप करायला विसरू नका.

1 year ago | [YT] | 16

मोरोपंत आर्या Moropant Arya

मंगलमूर्ती मोरया!
कविवर्य श्री मोरोपंत आणि अभिजात मराठी भाषेचे अलंकार असलेल्या सर्व पंडित कविंचा काव्य आस्वाद घेण्यासाठी निर्मिलेले एकमेव युट्युब चॅनल!

मोरोपंत
जरूर सबस्क्राईब करा.

1 year ago (edited) | [YT] | 1