लोकविकास मंच

शेती | शिक्षण | रोजगार | आरोग्य | पर्यावरण
जनसामान्यांचा बुलंद आवाज...!✊


लोकविकास मंच

नाशिक - पुणे रेल्वे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत विचार मंथन बैठक आज 19 मैल, नांदूर खंदरमाळवाडी फाटा, घारगाव जवळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर येथे पार पडली. यावेळी नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर येथील विद्यमान व माजी खासदार तसेच आमदार, विरोधक- सत्ताधारी, पक्ष-संघटना यांचे नेते व प्रमुख कार्यकर्ते यांनी ठाम भूमिका घेत रेल्वे यापूर्वी ठरलेल्या मार्गानेच व्हावी यादृष्टीने पुढील कृती कार्यक्रम कसा असावा यावर विचारमंथन केले, सर्वांनी आपली भूमिका मांडली. दोन पातळ्यांवर लढाई लढण्याचे ठरले. एका बाजूने सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी सरकार दरबारी प्रशासन व मंत्र्यांना आपली बाजू पटवून देणे आणि त्याचवेळी जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकभावना सरकारपर्यंत पोचवून सरकारवर दबाव निर्माण करणे. या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे कृती समित्यांनी एकत्र येऊन लढा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

#NashikPuneRailway #शिवआर्मी #shivarmy #relway #akole #pune #sangamner #nashik

7 months ago | [YT] | 6

लोकविकास मंच

आता नाही तर कधीच नाही ! संगमनेर बरबाद करण्याचा कुटील डाव उधळवून लावा.. आंदोलनात सामील व्हा!
.
.
.@lokvikasmanch
.
.
#lokvikassangamner #lokvikas #संगमनेरबचावकृतीसमिती
#आंदोलन #2025 #संगमनेर #sangamnerjilha

1 year ago | [YT] | 1