Dipak Parade हा शैक्षणिक चॅनेल असून यामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना उपयुक्त, गरजेचे आणि महत्वपूर्ण असे शैक्षणिक व्हिडीओ तसेच स्पर्धा परीक्षा , शिष्यवृत्ती संबंधी व्हिडिओ पाहायला मिळतील. (Educational Channel)
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी..! #दातृत्व ❤️ या आमच्या शाळेजवळील वस्तीवर राहणाऱ्या पाटील आजी. वय झालेल्या, थकलेल्या, आजारी असणाऱ्या, धड चालता ही येत नाही अशा अवस्थेतही अंथरुणाला खिळून असणाऱ्या नवऱ्याची स्वतः काळजी घेऊन शेतीवाडी, मुलबाळ नसतानाही, स्वतःचे फक्त एक पत्राशेड आणि नवऱ्याची येणारी तोकडी पेन्शन त्यातच आनंदाने संसार करणाऱ्या..! अशी कधीकधी आजी चक्कर मारायची शाळेत.. तेही "गुरुजी माझ्या दवाखान्याच्या गोळ्या तेवढ्या मोहोळ हून येताना आणा म्हणून सांगायला...!" आज सकाळी ही अशीच आजी शाळेत आली..चालता येत नाही तरी एका पालकाच्या गाडीवरती बसून..थोड्या गप्पा मारल्या. बऱ्याच दिवसातून आलात म्हणालो. तेवढ्यात तिने जवळची ५०० रुपयांची नोट मला दाखवली. मी म्हणालो, ' आजी गोळ्या आणायचेत का..?' त्यावर आजी बोलली, "नाही हो गुरुजी. आज हे ५०० रुपये आपल्या शाळेतील लेकरांना वह्या आणण्यासाठी द्यायचेत." माझ्या डोळ्यात टचकण पाणी उभे राहिले. आपल्या वस्तीवरील लेकरं चांगली शिकतात, अजून चांगली शिकावी म्हणून माझा ही काहीतरी हातभार यांच्या शिक्षणाला लागावा म्हणून आजीची धडपड पाहून मन गहिवरून आले. म्हणतात ना, "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी." यावेळी मनात आलं.. आपण कधीच माणसं ओळखू शकत नाही. आपण समजतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने माणूस वेगळा असतो. स्वतःची परिस्थिती एवढी बिकट असतानाही आजीच्या मनात आलेला हा विचार खूप मोठी शिकवण देऊन गेला. आजी, खरंच तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमच्याकडून आज खूप मोठा अनुभव मिळाला. सध्या जगात स्वतःची परिस्थिती चांगली असताना, स्वतःकडे सर्व काही असतानाही माणूस स्वतः जवळचे काही इतरांना देत नाही,देऊ वाटतही नाही.. अशा काळात आपण आपल्या जवळचे काही रुपये या लेकरांना देऊन मदत करावी ही भावनाच खूप मोठी आहे. आजी तुम्ही आमच्या लेकरांसाठी दिलेले हे ५०० रुपये आमच्यासाठी कितीतरी लाखाहून जास्त आहेत. आजी, तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून आजही वाडी, वस्ती, गावाकडील लेकरांचे शिक्षण सुरू आहे. आजी, तुम्ही आज मला अजून वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघण्यास प्रवृत्त केलंत. एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे या मुलांसाठी काम करण्याचे कर्तव्य नक्कीच यापुढेही पार पाडेन . यावेळी मनात खूप विचार येऊन गेले. आजी कडून पाचशे रुपये घेताना मन अगदी गहिवरून आलं होतं . काही मुलांना समोर बोलावून आजीला फोटोसाठी हट्ट धरला. आजीने नको म्हणत असतानाही फोटो काढला. मुलांनी ज्यावेळी टाळ्या वाजवल्या त्यावेळी आजीच्या डोळ्यातले आनंदाश्रू नजरेस पडले. आजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देव पावेल की नाही हे मी नाही सांगू शकत; पण आमच्या लेकरांच्या सदिच्छा कायम तुमच्या सोबत असतील. तुमच्या उदंड आयुष्यासाठी आमच्या सर्व लेकरांकडून खूप साऱ्या सदिच्छा आणि तुमच्या दातृत्वाला मनापासून सलाम..!! 🙏🏼❤️
कोरोना काळात सुरू केलेल्या माझ्या educational youtube channel ने अगदी अडीच वर्षात 50,000 subscriber's चा टप्पा आज पूर्ण केला. सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. यापुढेही नवनवीन व्हिडिओ देण्याचा माझा प्रमाणिक प्रयत्न असेन. Thank you 🙏🏼🥰
Dipak Parade
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी..!
#दातृत्व ❤️
या आमच्या शाळेजवळील वस्तीवर राहणाऱ्या पाटील आजी. वय झालेल्या, थकलेल्या, आजारी असणाऱ्या, धड चालता ही येत नाही अशा अवस्थेतही अंथरुणाला खिळून असणाऱ्या नवऱ्याची स्वतः काळजी घेऊन शेतीवाडी, मुलबाळ नसतानाही, स्वतःचे फक्त एक पत्राशेड आणि नवऱ्याची येणारी तोकडी पेन्शन त्यातच आनंदाने संसार करणाऱ्या..!
अशी कधीकधी आजी चक्कर मारायची शाळेत.. तेही "गुरुजी माझ्या दवाखान्याच्या गोळ्या तेवढ्या मोहोळ हून येताना आणा म्हणून सांगायला...!"
आज सकाळी ही अशीच आजी शाळेत आली..चालता येत नाही तरी एका पालकाच्या गाडीवरती बसून..थोड्या गप्पा मारल्या. बऱ्याच दिवसातून आलात म्हणालो. तेवढ्यात तिने जवळची ५०० रुपयांची नोट मला दाखवली. मी म्हणालो, ' आजी गोळ्या आणायचेत का..?' त्यावर आजी बोलली, "नाही हो गुरुजी. आज हे ५०० रुपये आपल्या शाळेतील लेकरांना वह्या आणण्यासाठी द्यायचेत."
माझ्या डोळ्यात टचकण पाणी उभे राहिले. आपल्या वस्तीवरील लेकरं चांगली शिकतात, अजून चांगली शिकावी म्हणून माझा ही काहीतरी हातभार यांच्या शिक्षणाला लागावा म्हणून आजीची धडपड पाहून मन गहिवरून आले.
म्हणतात ना, "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी."
यावेळी मनात आलं.. आपण कधीच माणसं ओळखू शकत नाही. आपण समजतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने माणूस वेगळा असतो. स्वतःची परिस्थिती एवढी बिकट असतानाही आजीच्या मनात आलेला हा विचार खूप मोठी शिकवण देऊन गेला. आजी, खरंच तुम्ही खूप श्रीमंत आहात. तुमच्याकडून आज खूप मोठा अनुभव मिळाला.
सध्या जगात स्वतःची परिस्थिती चांगली असताना, स्वतःकडे सर्व काही असतानाही माणूस स्वतः जवळचे काही इतरांना देत नाही,देऊ वाटतही नाही.. अशा काळात आपण आपल्या जवळचे काही रुपये या लेकरांना देऊन मदत करावी ही भावनाच खूप मोठी आहे.
आजी तुम्ही आमच्या लेकरांसाठी दिलेले हे ५०० रुपये आमच्यासाठी कितीतरी लाखाहून जास्त आहेत.
आजी, तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून आजही वाडी, वस्ती, गावाकडील लेकरांचे शिक्षण सुरू आहे.
आजी, तुम्ही आज मला अजून वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघण्यास प्रवृत्त केलंत. एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे या मुलांसाठी काम करण्याचे कर्तव्य नक्कीच यापुढेही पार पाडेन . यावेळी मनात खूप विचार येऊन गेले. आजी कडून पाचशे रुपये घेताना मन अगदी गहिवरून आलं होतं . काही मुलांना समोर बोलावून आजीला फोटोसाठी हट्ट धरला. आजीने नको म्हणत असतानाही फोटो काढला. मुलांनी ज्यावेळी टाळ्या वाजवल्या त्यावेळी आजीच्या डोळ्यातले आनंदाश्रू नजरेस पडले. आजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देव पावेल की नाही हे मी नाही सांगू शकत; पण आमच्या लेकरांच्या सदिच्छा कायम तुमच्या सोबत असतील. तुमच्या उदंड आयुष्यासाठी आमच्या सर्व लेकरांकडून खूप साऱ्या सदिच्छा आणि तुमच्या दातृत्वाला मनापासून सलाम..!! 🙏🏼❤️
4 months ago | [YT] | 50
View 4 replies
Dipak Parade
Thanks all of you for your support 🙏🏼
YouTube Channel Verified ✓
1 year ago | [YT] | 29
View 3 replies
Dipak Parade
आज ठीक 8 वाजून 15 मिनिटांनी प्रीमियर होतोय कळसूबाई शिखर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ... लिंक
https://youtu.be/jGuOX7ZRrnQ
1 year ago | [YT] | 28
View 3 replies
Dipak Parade
कळसूबाई शिखर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ येतोय ...
1 year ago | [YT] | 34
View 0 replies
Dipak Parade
कोरोना काळात सुरू केलेल्या माझ्या educational youtube channel ने अगदी अडीच वर्षात 50,000 subscriber's चा टप्पा आज पूर्ण केला. सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. यापुढेही नवनवीन व्हिडिओ देण्याचा माझा प्रमाणिक प्रयत्न असेन. Thank you 🙏🏼🥰
2 years ago | [YT] | 38
View 1 reply
Dipak Parade
https://youtu.be/5YNy3uFSH_8
प्राचीन कोकण कसा होता हे पूर्ण माहितीसह नक्की पहा🙏🏼
2 years ago | [YT] | 34
View 0 replies
Dipak Parade
https://youtu.be/yKje7g6PwpM
टक्केवारी कशी काढावी
अगदी सोपी पद्धत
नक्की पहा, शेअर करा🙏🏼
3 years ago | [YT] | 18
View 0 replies
Dipak Parade
https://youtu.be/uJ-vsa1g1KM
डॉ बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼
3 years ago | [YT] | 23
View 0 replies
Dipak Parade
https://youtu.be/TyMiYhygbC0
भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
थोर समाजसुधारक,
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
#MahatmaPhule #mahatmajyotibaphule
#महात्मा_फुले
3 years ago | [YT] | 35
View 0 replies
Dipak Parade
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼🥰
3 years ago | [YT] | 33
View 0 replies
Load more