*आनंद वार्ता : अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची "श्रीज्ञानेश्वरी-कुंटे प्रत' प्रदीर्घ कालावधीनंतर पुन:प्रकाशित होत आहे !!*
सद्गुरु भगवान श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी भगवती श्री ज्ञानेश्वरी ही मराठी संतवाङ्मय अभ्यासकांच्या हृदयीची रत्नठेव आहे. त्या कारणानेच आजवरच्या सर्वच थोर साधुसंतांनी व संतवाङ्मयाच्या सगळ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभ्यासक आणि उपासकांनी श्री ज्ञानेश्वरीला अक्षरश: मस्तकी धारण करून अखंड मिरविलेले आहे; आणि ते यथार्थच आहे ! सद्गुरु भगवान श्री माउलींच्या हातची किंवा त्यांच्या समक्ष तयार झालेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत आजतागायत उपलब्ध झालेली नाही. श्री माउलींच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वरीचे प्रत-शुद्धिकार्य संपन्न केलेल्या श्रीसंत एकनाथ महाराजांच्या हातची प्रतही दुर्दैवाने आजमितीस उपलब्ध नाही. नाथपूर्व व नाथोत्तर कालातील अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत, पण त्यांच्यामध्ये अनेक पाठांतरे, अपपाठ, अशुद्धे व क्षेपके यांची रेलचेल आहे. त्यामुळे चांगल्या अभ्यासकांची नेहमी अडचणच होते. १८९४ साली डॉ.श्री.अण्णासाहेब मोरेश्वर कुंटे यांनी महत्प्रयासाने व अत्यंत कष्टाने अनेक हस्तलिखिते तपासून सिद्ध केलेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत प्रकाशित केली. त्यात त्यांनी सतराव्या शतकातील श्री.गोविंद बर्वे नावाच्या साधुपुरुषांनी तयार केलेली श्रीगीतेची पदपद्धती देखील अंतर्भूत केलेली आहे. म्हणून या कुंटे प्रतीला 'बरवा परंपरे'ची प्रत म्हटले जाते. ही पदपद्धती गीता-ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना अतिशय लाभदायक ठरणारी आहे. श्रीज्ञानेश्वरीची कुंटे प्रत तिच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे अभ्यासक आणि उपासकांमध्ये त्या काळापासूनच एवढी मान्यता पावली की आजवर या प्रतीच्या असंख्य आवृत्या निघाल्या. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून कुंटे प्रतीच्या जवळपास अठरा ते वीस आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. मधल्या काळात अनुपलब्ध असलेल्या या प्रतीच्या श्रीवामनराज प्रकाशनाने देखील तीन आवृत्या प्रकाशित केल्या. श्रीवामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीज्ञानेश्वरी - कुंटे प्रतीच्या अतिशय वाचनीय व अभ्यासपूर्ण 'प्राक्कथना'त श्री ज्ञानेश्वरीचे विचक्षण अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या प्रतीचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *" 'कुंटे प्रत' ही सर्वसामान्यांसाठी श्री ज्ञानेश्वरी समजून घेण्याच्या दृष्टीने, तिच्यातील 'बरवा क्रमाच्या पदपद्धती'मुळे निर्विवादपणे श्रेष्ठ होय. आपल्या सद्गुरुपरंपरेतील थोर महात्मे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामीमहाराज, सद्गुरु प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज, सद्गुरु प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे आणि सद्गुरु प.पू.योगिराज श्री.श्री.द. (मामा) देशपांडे यांच्या वाचनात व अभ्यासात श्रीज्ञानेश्वरीची हीच प्रत होती. वारकरी संप्रदायातील ह.भ.प.श्री.केशवराव महाराज देशमुख, श्री.धुंडामहाराज देगलूरकर प्रभृति अनेक थोर अध्वर्यूंच्या अभ्यासाची हीच प्रिय प्रत होती. एवढेच नव्हे तर, वऱ्हाडप्रांतातील प्रज्ञाचक्षु थोर संत श्री गुलाबराव महाराज यांनाही हीच प्रत आवडत असे."* या वरून प्रस्तुत कुंटे प्रतीचे महत्त्व आणि माहात्म्य सुज्ञ वाचकांच्या ध्यानी आलेच असेल ! भगवती श्री ज्ञानेश्वरीचे उपासक, अभ्यासक आणि प्रेमी साधकजनांसाठी सर्वार्थाने अत्यंत मोलाची अशी ही 'कुंटे प्रत' श्रीवामनराज प्रकाशनाच्या वतीने चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वांगसुंदर स्वरूपात पुन:प्रकाशित होत आहे. सद्गुरु भगवान श्री माउलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती-वर्षाचे औचित्य साधून यंदाच्या श्रीजन्माष्टमी उत्सवापर्यंत, म्हणजेच दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कुंटे प्रतीच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण आवृत्त्या आपल्या हाती येणार आहेत ! महत्त्वाच्या अर्थनिर्णायक तळटीपा व पाठांतरे यांचा अंतर्भाव असलेली ही कुंटे प्रत दोन प्रकारांमध्ये अर्थात् नेहमीच्या डेमी साईजमध्ये व त्याचबरोबर डबलडेमी (A4) साईजमध्ये प्रकाशित होणार आहे. डबलडेमी साईजच्या प्रतीतील अक्षरे मोठी असल्याने ही प्रत पारायणासाठी तसेच अभ्यासासाठी अधिक सोयीची ठरेल, बिनाचश्म्याचेही वाचन करता येईल. अत्यंत देखणे सप्तरंगी मुखपृष्ठ, मोहरेदार मॅपलिथो जाड कागदावरील रेखीव व बिनचूक शुद्ध छपाई, टिकावू रेक्झिन बाईंडिंग यामुळे अतिशय सुबक व संग्राह्य ठरतील अशा ह्या दोन्ही विशेष प्रती, खरोखरीच दुर्मीळ असल्याने, नंतरची निराशा टाळण्यासाठी वेळ न दवडता लवकरात लवकर आपल्या ग्रंथसंग्रहात सामील कराव्यात ही प्रेमळ प्रार्थना. लवकरच कुंटे प्रतीची तिसरी आवृत्ती म्हणजेच छोट्या पॉकेट आकारातली, तळटीपा व पाठांतरे नसलेली, प्रवासी सुटसुटीत पारायणप्रतही प्रकाशित होईल. परंतु त्यासाठी अजून थोडा अवधी लागेल. *श्री ज्ञानेश्वरी कुंटे प्रत -*
*_डबलडेमी साईज_* पृष्ठसंख्या - ५७६, छापील मूल्य - ₹ ६०० /- ३०% सवलतीत मूल्य ₹ ४२० /- कुंटे प्रतीसाठी पुढील आठवड्यात कृपया 'श्रीवामनराज प्रकाशना'च्या कार्यालयाला भेट द्यावी अथवा भ्रमणभाष क्र.9322683824 यावर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान संपर्क करून आपली प्रत नोंदवून ठेवावी ही विनंती. -- श्रीवामनराज प्रकाशन, पुणे.
नुकत्याच श्रीक्षेत्र सज्जनगड येथे आम्ही पंत साहित्याच्या अभ्यासकांचे संमेलन घेतले. तिथे सादर झालेल्या सर्व अभ्यास सत्रांचे रेकॉर्डिंग तुम्हाला या यूट्यूब चैनल वर बघायला मिळतील नक्की सबस्क्राईब करा आणि 🔔 आयकॉन दाबायला विसरू नका!
गणेशोत्सवात श्री सत्यविनायक पूजाच का करावी? तिचा विधी काय? त्यासाठी पुस्तक कोणते? या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खालील link ला जाऊन पूर्ण video बघा.
काही शंका असल्यास तिथेच कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा. शंकसमाधान नक्की होईल.
असे नवनवीन वीडियो बघण्यासाठी आमचे *श्रीहरीकीर्तन* हे युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
🙏🏻 नमस्कार 😊
*_श्रीदेवी स्तवनमाला प्रस्तावना वर्ग_*
ऑनलाईन अभ्यासवर्ग, (Google Meet )
🌺 तुम्हांला या वर्गासंबंधी video ची लिंक पाठवली आहे.
🌺 माहितीसाठी स्मरण म्हणून इथे पोस्टर पाठवीत आहे.
🌺 ऑडियो रेकॉर्डिंग आणि pdf मिळतील.
☀️ आज सकाळी झालेल्या
*_श्रीदेवी स्तवनमाला प्रस्तावना वर्ग_* चे रेकॉर्डिंग खालील लिंकवर माझ्या युट्युब चॅनलला उपलब्ध आहे.
🌺 नक्की ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवा.
🌺 हा व्हिडिओ ऐकून तुम्हीं नक्कीच या वर्गात सहभागी व्हाल अशी खात्री आहे.
🌺 नवरात्री विशेष या *श्रीदेवी स्तवनमाला अभ्यासवर्गा* ला प्रवेश घेण्यासाठी नक्की संपर्क करा.
🌺 प्रभंजन : 9075402838
https://youtu.be/_GbvZGhPyEc?si=ZXCZw...
4 months ago | [YT] | 7
View 0 replies
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
*आनंद वार्ता : अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची "श्रीज्ञानेश्वरी-कुंटे प्रत' प्रदीर्घ कालावधीनंतर पुन:प्रकाशित होत आहे !!*
सद्गुरु भगवान श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी भगवती श्री ज्ञानेश्वरी ही मराठी संतवाङ्मय अभ्यासकांच्या हृदयीची रत्नठेव आहे. त्या कारणानेच आजवरच्या सर्वच थोर साधुसंतांनी व संतवाङ्मयाच्या सगळ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभ्यासक आणि उपासकांनी श्री ज्ञानेश्वरीला अक्षरश: मस्तकी धारण करून अखंड मिरविलेले आहे; आणि ते यथार्थच आहे !
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या हातची किंवा त्यांच्या समक्ष तयार झालेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत आजतागायत उपलब्ध झालेली नाही. श्री माउलींच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वरीचे प्रत-शुद्धिकार्य संपन्न केलेल्या श्रीसंत एकनाथ महाराजांच्या हातची प्रतही दुर्दैवाने आजमितीस उपलब्ध नाही. नाथपूर्व व नाथोत्तर कालातील अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत, पण त्यांच्यामध्ये अनेक पाठांतरे, अपपाठ, अशुद्धे व क्षेपके यांची रेलचेल आहे. त्यामुळे चांगल्या अभ्यासकांची नेहमी अडचणच होते.
१८९४ साली डॉ.श्री.अण्णासाहेब मोरेश्वर कुंटे यांनी महत्प्रयासाने व अत्यंत कष्टाने अनेक हस्तलिखिते तपासून सिद्ध केलेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत प्रकाशित केली. त्यात त्यांनी सतराव्या शतकातील श्री.गोविंद बर्वे नावाच्या साधुपुरुषांनी तयार केलेली श्रीगीतेची पदपद्धती देखील अंतर्भूत केलेली आहे. म्हणून या कुंटे प्रतीला 'बरवा परंपरे'ची प्रत म्हटले जाते. ही पदपद्धती गीता-ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना अतिशय लाभदायक ठरणारी आहे.
श्रीज्ञानेश्वरीची कुंटे प्रत तिच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे अभ्यासक आणि उपासकांमध्ये त्या काळापासूनच एवढी मान्यता पावली की आजवर या प्रतीच्या असंख्य आवृत्या निघाल्या. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून कुंटे प्रतीच्या जवळपास अठरा ते वीस आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. मधल्या काळात अनुपलब्ध असलेल्या या प्रतीच्या श्रीवामनराज प्रकाशनाने देखील तीन आवृत्या प्रकाशित केल्या.
श्रीवामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्रीज्ञानेश्वरी - कुंटे प्रतीच्या अतिशय वाचनीय व अभ्यासपूर्ण 'प्राक्कथना'त श्री ज्ञानेश्वरीचे विचक्षण अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या प्रतीचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *" 'कुंटे प्रत' ही सर्वसामान्यांसाठी श्री ज्ञानेश्वरी समजून घेण्याच्या दृष्टीने, तिच्यातील 'बरवा क्रमाच्या पदपद्धती'मुळे निर्विवादपणे श्रेष्ठ होय. आपल्या सद्गुरुपरंपरेतील थोर महात्मे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामीमहाराज, सद्गुरु प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज, सद्गुरु प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे आणि सद्गुरु प.पू.योगिराज श्री.श्री.द. (मामा) देशपांडे यांच्या वाचनात व अभ्यासात श्रीज्ञानेश्वरीची हीच प्रत होती. वारकरी संप्रदायातील ह.भ.प.श्री.केशवराव महाराज देशमुख, श्री.धुंडामहाराज देगलूरकर प्रभृति अनेक थोर अध्वर्यूंच्या अभ्यासाची हीच प्रिय प्रत होती. एवढेच नव्हे तर, वऱ्हाडप्रांतातील प्रज्ञाचक्षु थोर संत श्री गुलाबराव महाराज यांनाही हीच प्रत आवडत असे."* या वरून प्रस्तुत कुंटे प्रतीचे महत्त्व आणि माहात्म्य सुज्ञ वाचकांच्या ध्यानी आलेच असेल !
भगवती श्री ज्ञानेश्वरीचे उपासक, अभ्यासक आणि प्रेमी साधकजनांसाठी सर्वार्थाने अत्यंत मोलाची अशी ही 'कुंटे प्रत' श्रीवामनराज प्रकाशनाच्या वतीने चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वांगसुंदर स्वरूपात पुन:प्रकाशित होत आहे. सद्गुरु भगवान श्री माउलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती-वर्षाचे औचित्य साधून यंदाच्या श्रीजन्माष्टमी उत्सवापर्यंत, म्हणजेच दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कुंटे प्रतीच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण आवृत्त्या आपल्या हाती येणार आहेत !
महत्त्वाच्या अर्थनिर्णायक तळटीपा व पाठांतरे यांचा अंतर्भाव असलेली ही कुंटे प्रत दोन प्रकारांमध्ये अर्थात् नेहमीच्या डेमी साईजमध्ये व त्याचबरोबर डबलडेमी (A4) साईजमध्ये प्रकाशित होणार आहे. डबलडेमी साईजच्या प्रतीतील अक्षरे मोठी असल्याने ही प्रत पारायणासाठी तसेच अभ्यासासाठी अधिक सोयीची ठरेल, बिनाचश्म्याचेही वाचन करता येईल. अत्यंत देखणे सप्तरंगी मुखपृष्ठ, मोहरेदार मॅपलिथो जाड कागदावरील रेखीव व बिनचूक शुद्ध छपाई, टिकावू रेक्झिन बाईंडिंग यामुळे अतिशय सुबक व संग्राह्य ठरतील अशा ह्या दोन्ही विशेष प्रती, खरोखरीच दुर्मीळ असल्याने, नंतरची निराशा टाळण्यासाठी वेळ न दवडता लवकरात लवकर आपल्या ग्रंथसंग्रहात सामील कराव्यात ही प्रेमळ प्रार्थना.
लवकरच कुंटे प्रतीची तिसरी आवृत्ती म्हणजेच छोट्या पॉकेट आकारातली, तळटीपा व पाठांतरे नसलेली, प्रवासी सुटसुटीत पारायणप्रतही प्रकाशित होईल. परंतु त्यासाठी अजून थोडा अवधी लागेल.
*श्री ज्ञानेश्वरी कुंटे प्रत -*
*_डेमी साईज_*
पृष्ठसंख्या - ५८४, छापील मूल्य - ₹ ४०० /-
३०% सवलतीत मूल्य ₹ २८० /-
*_डबलडेमी साईज_*
पृष्ठसंख्या - ५७६, छापील मूल्य - ₹ ६०० /-
३०% सवलतीत मूल्य ₹ ४२० /-
कुंटे प्रतीसाठी पुढील आठवड्यात कृपया 'श्रीवामनराज प्रकाशना'च्या कार्यालयाला भेट द्यावी अथवा भ्रमणभाष क्र.9322683824 यावर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान संपर्क करून आपली प्रत नोंदवून ठेवावी ही विनंती.
-- श्रीवामनराज प्रकाशन, पुणे.
5 months ago | [YT] | 11
View 1 reply
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
भगवान श्रीकृष्ण दह्या दुधाची चोरी का करत? उत्तर ऐका....
youtube.com/shorts/Oi-FQxCx_n...
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
व्याख्यान :
भगवान श्रीकृष्ण : भाग १
व्याख्याते : श्री राम शेवाळकर
जरूर ऐका आणि Prabhanjan Bhagat हें युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
https://youtu.be/QaNadX23NS0
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
नमस्कार,
नुकत्याच श्रीक्षेत्र सज्जनगड येथे आम्ही पंत साहित्याच्या अभ्यासकांचे संमेलन घेतले. तिथे सादर झालेल्या सर्व अभ्यास सत्रांचे रेकॉर्डिंग तुम्हाला या यूट्यूब चैनल वर बघायला मिळतील नक्की सबस्क्राईब करा आणि 🔔 आयकॉन दाबायला विसरू नका!
youtube.com/@moropant-arya
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
गणेशोत्सवात श्री सत्यविनायक पूजाच का करावी?
तिचा विधी काय?
त्यासाठी पुस्तक कोणते?
या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खालील link ला जाऊन पूर्ण video बघा.
काही शंका असल्यास तिथेच कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा. शंकसमाधान नक्की होईल.
असे नवनवीन वीडियो बघण्यासाठी आमचे *श्रीहरीकीर्तन* हे युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
https://youtu.be/RBX9QoCSRc0
3 years ago | [YT] | 1
View 0 replies