श्री स्वामी समर्थ🙏



श्री स्वामी समर्थ🙏

वंदे जगद्गुरू 🙏💐🙏

4 months ago | [YT] | 1

श्री स्वामी समर्थ🙏

*!! श्री स्वामी समर्थ !!*

*परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने, श्रीराम नवमी (रविवार, ६ एप्रिल २०२५) पासून श्रीस्वामी पुण्यतिथी (शनिवार, २६ एप्रिल २०२५) पर्यंत "श्री स्वामी चरित्र – एक ज्ञानयज्ञ" ही सचित्र मालिका श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथून प्रसारित होणार आहे*.

*श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचे चिंतन २१ दिवसांच्या आध्यानक्रमानुसार करण्यात येईल.*

*हे पठण चिंतन आपल्या कष्टमय जीवनात आनंद निर्माण करून, श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी एक दिव्य संजीवनी ठरेल.*

📌* पुढील अध्यायाची माहिती वेळेवर मिळविण्यासाठी खालील YouTube चॅनलला जरूर Subscribe करा!*
🔗 https://youtu.be/EMnD6IsoZ3I


🙏 *श्री स्वामी समर्थ*🙏

10 months ago | [YT] | 4

श्री स्वामी समर्थ🙏

*‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*
*🛑श्री मल्हारी मार्तंड षडरात्रीं घटस्थापना विधी🛑*दि-२/१२/२०२४ ते दि.७/१२/२०२४*
मार्गशीर्ष शु. १ ते मार्गशीर्ष शु.६

*1) श्री स्वामीस्तवन*
*2) एक माळ श्री स्वामी समर्थ जप*

*मुनीनां सप्त कोटीणां वरदं भक्त वत्सलां। दुष्ट मर्दन देवेश वंदे हं म्हालसापती॥*

*💠हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी* *हळदी-कुंकूस्वत:च्या कपाळी लावावे.*

*💠 खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.*
*१) ॐ ऐं आत्मतत्वं शोधयामी नम: स्वाहा।*
*२) ॐ र्हीं विद्यातत्वं शोधयामी नम: स्वाहा।*
*३) ॐ क्लीं शिवतत्वं शोधयामी नम: स्वाहा।*
*४) ॐ ऐं र्हीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नम: स्वाहा।*

*💠गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.*

*💠संकल्प : ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्ती साठी, वर्धना साठी, सर्वदुरीत उपशमनासाठी अशुभशक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकलग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची* *अखंड-अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे*.’

💠 *श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.*
‘ *ॐ श्री गंगा-म्हाळसासहीत मणिमल्हारयेनम:*’
*या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.**

*💠१) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीपप्रज्वलितकरून त्याची पूजा करावी.*
*💠२) एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.*
*💠३) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेढे देऊन ठेवावा. त्यातपाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची पाच पाने व आंब्याचा डहाळा लावावा.*
*💠४) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे, घटावर एका तांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे.*
*💠५) खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी.*
*🌀ध्यानमंत्र*::----*🌀
*💠ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसा भूषिताङकम्।*
*श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणै: सेव्यमानंकृतार्थे:॥*
*युक्तांघ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम्।*
*नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्येमोंकाररूपम्॥*

*💠मंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा.*
*💠खंडोबाच्याटाकावर १ वेळा श्री सूक्त व*
*१ वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करावा.*

*💠घटावर विड्याची दोन पाने पुर्वेकडे देठकरून ठेवावी, त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा.*

*💫👉टाकाची पंचोपचार पूजा करावी.*
*🌀पंचोपचारपूजा🌀*

*💠१) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:।विलेपनार्थे चंदनम् समर्पयामि॥ (गंधलावावे.)*
*अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि॥हरिद्रां कुंकुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥*
*(गंध लावावे, अक्षता वहाव्यात व हळद-कुंकूवहावे.)*

*💠२) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:।ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि॥ (फुलेवहावीत.)*

*💠३) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।*
*आघ्रापयामि॥ (धूपओवाळावा)*

*💠४) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।दीपं दर्शयामि। (दीपओवाळावा.)*

*💠५) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।पंचामृतात्मकं नैवेद्य समर्पयामि॥*
*💫👉(पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.)*

💠 पूजेनंतर १ माळ घटावर खालील मंत्राने बांधावी
*ॐमां माले महामाये सर्वशक्ति स्वरूपिणी।*
*चतूर्वर्ग त्वयी न्यस्ते स्तन्मान्मे सिद्धिदा भव॥’*

*💠पहिल्या दिवशी विड्याच्या पानां ची माळ बांधावी*.
*रोज घटावरील टाकाची दूरूनच पंचोपचार पूजा करून, टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी, आरती करावी*

*💠सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून १४ किंवा २८ पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे.*

*💠चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे.परंपरेनुसार कुलाचार व कुल धर्म पूर्ण करून,तळीभरून महानैवेद्यत्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत,पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी.*

💠 *तळीभरणे* 💠
कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. पाचमुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीनवेळा कपाळ टेकवतात व *येळकोट मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसाकान्त कडे पठार की जय’* असा जय जयकार करतात.
तसेच काही प्रदेशात,.

सदानंदाचा येळकोट,
येळकोट मल्हार येळकोट।हर हर महादेव।चिंतामण मोरया।
भैरोबाचा चांदोबा l अगडबंब नगारा l सोन्याची जेजुरी l मोत्याचा तुरा l निळा घोडा l पायी तोडा l कमर कर गोटा l बेंबी हिरा l गळ्यात कंठी l मोहन माळा l डोईवर शेला l अंगावर शाल l सदा हिलाल l जेजुरी जाई l शिकार खेळी l म्हाळसा सुंदरी l आरती करी l देवा ओवाळी l नानापरी l देवाच्या शृंगारा l कोट लागो शिखरा l खंडेरायाचा खंडका l भंडाराचा भडका l बोल सदानंदाचा येळकोट l
असे म्हणतात.हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते.*विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंदांनी ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात*.नंतर वरील प्रमाणे जयजयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे जायचे असते. (किमान पाच पावले )त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे. आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी .जमल्यास धनगर जोडप्यास जेवू घालावे.
षष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी*.
....*श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित मासिक अंक*🙏🌷‪@PradhanKendraDindori‬#viral#चंपाषाठी

1 year ago (edited) | [YT] | 4

श्री स्वामी समर्थ🙏

अखंड नाम जप यज्ञ सप्ताह कधी पासुन आहे ? 🙏 ( दिंडारी प्रणित )
#shreeswamisamarth #pradhankendra  @ShreeGurupeeth   @PradhanKendraDindori  #gurumauli

1 year ago | [YT] | 2

श्री स्वामी समर्थ🙏

*🚩‼️श्री स्वामी समर्थ ‼️🚩*
🪻 सेवेकरी कुटुंब परिवार 🪻
*श्री कालभैरव जयंती*🙏🌷
*(कार्तिक कृ.८ दि.२३ नोव्हेंबर२०२४)*

*या दिवशी दुपारी १२ वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला. या दिवशी दुपारी चार वाजेनंतर श्री कालभैरवास पुढील प्रमाणे विनंती करावी.*
*आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून, मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत.*
*अशी विनंती करून त्रिवार मुजरा करावा व हार, नारळ, खडीसाखर व नैव्येद्य (वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा व लिंबाची एक फोड असा नैव्येद्य) दाखवावा.*

*आपल्या परिसरात जर कालभैरव नाथांचे मंदिर नसेल तर नजिकच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ठेवलेल्या श्री कालभैरव देवतेच्या फोटो किंवा आपल्या घरीच फक्त ११ वेळा कालभैरव अष्टक म्हणून व नैवेद्य दाखवून सेवा रुजू करावी*...........

*अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित मासिक अंक पहावा*🙏🌷
#seva #kalbhairav #shree #jayanti #shreeswamisamarth #pradhankendra ‪@ShreeGurupeeth‬ ‪@PradhanKendraDindori‬ #gurumauli

1 year ago | [YT] | 4

श्री स्वामी समर्थ🙏

।।श्री स्वामी समर्थ।। सप्ताह सोहळा फक्त 12 दिवस बाकी 🪷
सप्ताह मध्ये पारायण ला बसण्यासाठी आपल्या नावांची नोंद जवळच्या श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित) केंद्रात करा🙏🏼🚩🙏🏼 #viral #gurucharitra

1 year ago (edited) | [YT] | 2