शेती विषयक माहिती व शेतकऱ्याची यशोगाथा आणि शेती मधील नवनवीन तंत्रज्ञान, प्रयोग आणि शेती विषयक योजना,या बद्दल सर्व माहिती आपल्या या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल .
शेतकरी मित्रांनो शेती विषयी व्हिडीओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेयर करा ,धन्यवाद. मित्रांनो आपलाच कृषी मित्र महेश
जय जवान जय किसान
Royal Sheti
लोक म्हणतात घरची शेती असली की माणूस सुखी असतो, पण गरिबी काय असते हे आम्ही जवळून पाहिलंय. आमच्याकडे स्वतःची ५ एकर हक्काची जमीन होती. पण गरिबी, डोक्यावरचं कर्ज आणि परिस्थितीचे चटके इतके भयानक होते की, घरची जमीन असूनही माझ्या बापाला तब्बल ८ वर्षं दुसऱ्याच्या शेतात 'सालगडी' (गडी) म्हणून चाकरी करावी लागली. स्वतःची जमीन असताना दुसऱ्याच्या दारात गुलाम होऊन राबताना माझ्या बापाच्या मनाला रोज किती क्लेश झाले असतील, हे आठवलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं.पण माझा बाप हरला नाही. त्या ८ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा ते पुन्हा आपल्या स्वतःच्या ५ एकर शेतीत उतरला, तेव्हा त्यांना स्वतःच्या घामाने आणि कष्टाने इतिहास घडवला. माझा बाप अडाणी असेल, पण त्यांनी त्या ५ एकरात अशी शेती करून दाखवली, ज्याने चांगल्या चांगल्या सुशिक्षित आणि शिकलेल्या माणसांनाही लाजवले. रात्रीचा दिवस करून त्यांनी कोरड्या मातीतून सोनं पिकवलं. डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर एका-एका पैशाने फेडला आणि घराला सोन्याचे दिवस आणले.पण निसर्गाने नेहमीच आमची परीक्षा घेतली. कधी भयानक दुष्काळ पाचवीला पूजलेला असायचा, तर कधी अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत हातात आलेलं पीक मातीमोल व्हायचं. एवढं सगळं सोसून एखादे वर्ष चांगलं आलं, तर बाजारात पिकाला कधी भावच मिळाला नाही. निसर्गाचा लहरीपणा आणि बाजाराची दलालशाही या दोन्हीशी माझा बाप एकटा लढत राहिला आणि आपली ५ एकर जमीन हिरवीगार ठेवली.पण आता वय झालंय... वर्षानुवर्षे उन्हातानात राबून आता त्यांचं शरीर साथ देत नाहीये. ज्या हातांनी घरची जमीन आणि आमचं भविष्य सावरलं, ते हात आता थकले आहेत. आता ही माझी जबाबदारी आहे. माझ्या बापाने आमच्यासाठी जे हाल उपसले, त्या कष्टाचं चीज करण्याची वेळ आता माझी आहे. ज्या बापानं मला स्वाभिमानाने जगायला शिकवलं, त्यांना आता आयुष्याच्या उत्तरार्धात सुखाची सावली द्यायची आहे.मी आता 'सीएससी सेंटर' (CSC Center) सुरू केलं आहे. या व्यवसायाची नवी सुरुवात आणि बापाने जिद्दीने उभी केलेली ही ५ एकर शेती, या दोन्हीच्या जोरावर मला आमचे दिवस बदलायचे आहेत. आता बापाला शेतात कष्टाचे हेलपाटे खाऊ देणार नाही. त्यांना सुखाचे दिवस दाखवणे हेच आता माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे!- एक अभिमान बाळगणारा
शेतकरी पुत्र ✍️🙏
🙏फक्त आता पाहिजे तुमची साथ 🙏
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
Royal Sheti
अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती 2026?
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Royal Sheti
जालना तालुक्यातील बापकळ गावात 🌧️🌊🌧️अतिवृष्टी 4 तासात महा प्रलय झाला आणि संपूर्ण गावात पाणी शिरले त्याच बरोबर नदी काठच्या जवळपास 50 हेक्टर जमीन खरडून गेल्या तलाठी यांना विनंती आहे की लवकरात लवकर पंच नामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करून सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी
शेतकरी पुत्र महेश सावंत
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Royal Sheti
व्हिडिओ आवश्यक पहा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद 🙏
https://youtu.be/fybHT76tA3I
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Royal Sheti
झाली बरका कपाशी लागवड सुरू 🌱🌱🌱
तुमची झाली का लागवड
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Royal Sheti
जमीन नांगरणे खरंच फायदेशीर आहे का?
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Royal Sheti
IMD चा पहिला अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदाचा
यंदा पाऊस सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडणार
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Royal Sheti
सिंधुदुर्ग किल्ला 🚩🙏
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Royal Sheti
छाव पिक्चर आज बघितला आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास बघायला मिळाला अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाण्याच्या धारा खरंच ज्यांनी स्वतःच बलिदान दिले पण हा धर्म, जात,देश आणि स्वराज्य यासाठी स्वतःच बलिदान दिले पण मागे हटले नाही अशा महापराक्रमी राजाला माझा मानाचा मुजरा 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Royal Sheti
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी महातेजस्वी स्वराज्याचे कैवारी श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏🚩🚩🙏 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे 🙏🚩
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Load more