Jayashree Thorat

Doctor
Haemato-oncologist (Blood cancer)
President of ekvira foundation
Love. Empathy. Courage

#sangamner
#संगमनेर


Jayashree Thorat

भारत देशाला आधुनिकतेची नवी दिशा देणारे, संगणकीकरण व दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#rajivgandhi

2 months ago | [YT] | 15

Jayashree Thorat

#संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या (वकील संघटना) नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

#SangamnerBarAssociation
#Advocates

2 months ago | [YT] | 15

Jayashree Thorat

#संगमनेर तालुक्याच्या मातीतून उगवलेले यशाचे तेजस्वी तारे…!

काकडवाडीचे सुपुत्र श्री. नवनाथ आप्पासाहेब ढवळे, तळेगावचे सुपुत्र श्री. सचिन नंदू दिघे, वडगाव लांडग्याचे सुपुत्र महेश बाळासाहेब बोऱ्हाडे आणि मोधळवाडीचे श्री. चेतन सोमनाथ घाणे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी झालेली निवड ही आपल्या संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.

या सर्व तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश म्हणजे नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!.

#ProudMoment
#Sangamner
#PSISelection
#MaharashtraPolice

2 months ago | [YT] | 17

Jayashree Thorat

समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आज मुलीच्या शुभविवाहाचे निमंत्रण देण्यासाठी सुदर्शन निवासस्थानी भेट दिली.

यावेळी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधून त्यांचा स्नेहपूर्वक सत्कार केला.

#Sangamner
#indurikarmaharaj
#संगमनेर
#इंदुरीकर

3 months ago | [YT] | 87

Jayashree Thorat

काॅ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?”
या पुस्तकाचे सामूहिक वाचन

वाचनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल.

तसेच आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.

🗓️ रविवार, दि. २६ एप्रिल २०२६
⏰ सकाळी ८.०० ते १०.०० वाजता

📍 स्थळ : नेहरू गार्डन, संगमनेर

आयोजक :
महाविकास आघाडी | सर्व राजकीय पक्ष तसेच सर्व पुरोगामी व समाजसेवी संस्था, संगमनेर

✨ “वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडवूया!”

3 months ago (edited) | [YT] | 9

Jayashree Thorat

निमगाव टेंभी येथील सचिन संजय वर्पे, शाम शरद वर्पे या दोघांची महाराष्ट्र पोलीस दल, पुणे शहर येथे नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!

दोघांनाही पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा—तुमच्या कार्यातून समाजाची सेवा अधिक सक्षमपणे घडत राहो, हीच सदिच्छा!

#Sangamner
#संगमनेर

3 months ago | [YT] | 8

Jayashree Thorat

आज #संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये “राष्ट्रीय शिक्षण नीती 2020” विषयावर विद्यार्थ्यांनी लोकसभेच्या धर्तीवर सादर केलेले संसदीय सत्र पाहण्याचा आनंद लाभला.

विद्यार्थ्यांनी खासदारांच्या भूमिकेतून शिक्षणातील संधी, आव्हाने आणि कौशल्याधारित शिक्षणाची गरज यावर प्रभावी मांडणी केली. त्यांचा आत्मविश्वास, वक्तृत्व आणि लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीव प्रेरणादायी वाटली. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती यावर त्यांनी केलेली चर्चा प्रभावी आणि विचारप्रवर्तक होती.

या सुंदर उपक्रमासाठी संगमनेर मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना घोरपडे, शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेविका रचनाताई मालपाणी, यांसह शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.

#Sangamner #DhruvGlobalSchool #StudentParliament
#संगमनेर #राष्ट्रीयशिक्षणनीती2020

3 months ago | [YT] | 10

Jayashree Thorat

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ब्लू पँथर ग्रुपतर्फे संगमनेर बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहीले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन केले.

सुप्रसिद्ध गायिका कडूआई खरात यांनी सादर केलेल्या भीमगीतांमधून बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारांचा प्रभावी जागर घडवण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे , नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे तसेच ब्लू पॅंथर ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#संगमनेर
#Sangamner
#drbabasahebambedkar

‪@kadubaikharatsinger‬

3 months ago | [YT] | 8

Jayashree Thorat

📍गुंजाळवाडी

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर #गुंजाळवाडी येथील युवा उद्योजक प्रशांत गुंजाळ यांनी उभारलेल्या ‘गुंजाळ टर्फ’च्या शुभारंभा प्रसंगी उपस्थित राहून उद्घाटन केले.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत युवकांना आरोग्यदायी आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी अशा क्रीडा सुविधांची अत्यंत गरज आहे. टर्फसारख्या आधुनिक क्रीडांगणांमुळे केवळ खेळाची आवड जोपासली जात नाही, तर शिस्त, आणि आत्मविश्वास यांसारख्या गुणांचीही जडणघडण होते. गावपातळीवर उभारलेली ही सुविधा म्हणजे स्थानिक खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळण्याची सुरुवात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

गुंजाळ टर्फमुळे गुंजाळवाडी परिसरातील युवकांना आता दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या क्रीडाप्रवासाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आहे.यावेळी गुंजाळ परिवार, त्यांचे मित्रपरिवार तसेच स्थानिक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Sangamner
#cricket

3 months ago | [YT] | 2

Jayashree Thorat

उम्मत फाउंडेशन, युनिक प्रॉपर्टीज आणि युनिटी प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑल इंडिया निमंत्रित शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या स्पर्धेनिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आयोजकांनी केलेले उत्कृष्ट नियोजन आणि स्पर्धेचे नेटके आयोजन खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंना आपल्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळते, तसेच क्रीडाभावना, शिस्त, आणि एकजूट अधिक दृढ होते.युवा पिढीने क्रीडा क्षेत्रात अशाच उत्साहाने पुढे यावे आणि तालुक्याचे नाव राज्य तसेच देशपातळीवर उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा.

यावेळी उम्मत फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Sangamner

3 months ago | [YT] | 7