In the morning Sri Kshetra Gangapur Darshan and Sri Girnar Parvat Darshan.
In the afternoon Sri Kshetra Audumbar and Sri Kshetra Akkalkot Darshan.
Night Festival Idol and Palkhi Seva Darshan at Sri Kshetra Gangapur
Special Darshan of Sri Kshetra Peethapur, Sri Kshetra Kuruvapur, Sri Kshetra Nrisihwadi on special occasions.
Also, all the information and video related to all Datta and Datta Sampradaya are shared here.
subscribe Like Share & Comment
More video are awaiting to upload don't miss
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
करुणा त्रिपदीचे महत्व
काही आपत्ति येता जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्ति चे पुर्ण निरसन होइल.
तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एक वीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे.
मित्र हो आपण कुठेही असा प्रवासात घरी दारी न चुकता आपल्या पठनात ठेवा. आर्तभावनेने त्रिपदी पठन करा मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तर मित्रहो दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांन पर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार करा.
मित्र हो मी दत्त चरणी सेवा म्हणून बनवलेलं करुणा त्रीपदी चे रेकॉर्डिंग श्री गुरुदेव दत्त YouTube Channel मध्ये खालील लिंक वरती उपलब्ध आहे. कृपया निरतर ऐकावा Subscribe करा आणि share करा.
youtube.com/playlist?list=PLI...
9 months ago | [YT] | 20
View 0 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
।।श्री गुरुदेव दत्त ।।
सर्व दत्त भक्तांना नमस्कार
सालाबद प्रमाणे दि 31-10-2024 रोजि श्री क्षेत्र गाणगापूर (दत्त मंदिर) येथून सकाळि 8:00 वाजता अष्टतीर्थ स्नान आरंभ होणार आहे ,
नरक चतुर्दशीचे दिवस म्हणजेच् स्वयं दत्त अवतारि श्रीमन् नृसिंह सरस्वति महाराजांनि अष्टतीर्थ प्रगट केलेले दिवस होय. ह्याचि सविस्तार माहिति आपल्याला "श्री गुरु चरित्र " ह्य पवित्र ग्रंथाचे 49 वा अध्यायात मिळेल.
"षट्कुळ व नृसिंह "(1-2) तीर्थात् स्नान केल्याने (भक्ती पूर्वक ) काल मृत्यु व अप मृत्यु नाहीसा होवून शतायुष्य प्राप्त होतो.
◇ह्या तीर्थात् स्नान केल्याने प्रयाग येथील त्रीवेणि संगम् नद्यांचा स्नानचा फळ मिळतो.◇
"भागिरथी"(3) तीर्थात् स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होवून् ◆काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळतो.◆
"पाप विनाशी "(4) तीर्थात् स्नान मात्रें पाप राशी जैसे तृण अग्नि लागे. म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होतो. ह्याच तीर्थात् स्नान केल्यांने स्वयं महराजांचे भगिनि "रत्नाई" चे श्वेत कुष्ठ नाहिसा झाला.
"कोटि तीर्थ"(5) ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्म शुद्धी होवून् मोक्ष प्राप्त होतो व जंबू द्वीपा मध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचे महिमा ह्या तीर्थात् आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळतो व येथे यथा शक्ति दान केल्याने कोटि दान केलेले पुण्य मिळतो.
"रुद्र पाद"(6) हे तीर्थ " गया " समान आहे .गया क्षेत्रातिल सर्व आचरण येथे करून् रुद्र पादाला पूजल्यास् कोटि जन्मांचे दोष नाहीसा होवून् मोक्ष प्राप्ति होतो.
" चक्र तीर्थ "(7) हा तीर्थ द्वारावति तीर्थ समान आहे. येथे स्नान करून् येथील केशव मंदिरात् पूजल्यास द्वारावति चे चौपट् पुण्य मिळतो व अज्ञानिला ज्ञान प्राप्ति होतो.
"मन्मथ तीर्थ "(8) येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंश वृद्धि होवून अष्टैश्वर्य प्राप्त होतो.
तरी शक्य असल्यास या मंगल प्रसंगी वेळेवर उपस्थित राहून दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावे अशी विनंती आहे.
।। भीमातटि असे गाणगा भुवन। पुण्यभूमि असे या त्रिभुवन।।
1 year ago | [YT] | 209
View 22 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
श्री क्षेत्र गाणगापूर महात्म्य.
*दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.*
*"प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥ ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥"*
*श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.*
*श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.*
*श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.*
*श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.*
*श्रीगुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर माहात्म्याची ग्वाही देताना म्हणतात,*
*“मठी आमुच्या ठेविती पादुका । पुरवितील कामना ऐका । अश्र्वत्थ वृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरू ॥*
*कामना पुरविल समस्त । संदेह न धरावा मनात ॥ मनोरथ प्राप्त होतील त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥*
*संगमी करूनिया स्नान । पूजोनी अश्र्वत्थ नारायण । मग करावे पादुकांचे अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥*
*विघ्नहर्ता विनायक । आहे तेथे वरदायक ॥ तीर्थे असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ।।*
*श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.*
*श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.*
*श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला.*
*श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.*
*इथल्या देवस्थानचे पुजारी सत्त्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मणभोजन वगैरे व्यवस्था चांगल्याप्रकारे करतात.*
*श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.*
*‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥ तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’*
*असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दु:खे, संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे.*
https://youtu.be/fUff4Yrdwzo
1 year ago | [YT] | 22
View 2 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
https://youtu.be/Rj_koZ4m9cM
1 year ago | [YT] | 17
View 0 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
आज १.५ आठवडा होत आला, माझ्या दत्तरायाचं वाडीचं मंदिर कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याखाली आहे. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर पाणी वाढायला लागलं की देव त्यांच्या लाडक्या भक्ताच्या अर्थात श्रीनारायणस्वामींच्या मठात विराजमान होतात आणि नित्यपूजा तिथे पार पडते आणि श्रीनारायणस्वामींच्या मठात पाणी आलं की मग श्रींची उत्सवमूर्ती (स्वारी) श्री वासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या मठात स्थानापन्न होते. आणि जसं जसं कृष्णामाईचं पाणी श्री वासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या मठाजवळ यायला लागतं, तसे वाडीकरांना देव वाडीत येण्याचे वेध लागतात. आणि मग श्रींच्या आगमनाची, स्वागताच्या मिरवणूकीची जय्यत तयारी सुरू होते. सालाबादप्रमाणे ठरलेल्या एका भाग्यवान पूजारी काकांच्या घरी, पूर ओसरेपर्यंत देव रहायला येतात. हा सोहळा ह्यावर्षी रात्री १२ ते ३ च्या सुमारास आनंदात पार पडला.. पूराला एवढ्या आनंदात साजरा करणारं वाडी हे मला एकमेव परिचित गाव आहे. वाजत गाजत देव गावात येतात, जणु काही सर्वांकडे एक आश्वस्त आणि प्रसन्न नजर टाकत विचारतात की, 'सर्व काही क्षेम आहे ना?' पुजारी काकांच्या घरात तर दिवाळीपेक्षाही हा मोठा सण असावा. किती भाग्यवान ते घर, जिथे साक्षात परमेश्वर राहायला येतात!! गावातल्या सवाष्ण स्त्रिया श्रींना औक्षण करत स्वागत करतात. आणि सर्व नित्योपचार, नैवेद्य, आरती, दर्शन, सर्वकाही इथेच पार पडतं. मला खरंच वाडीचे गावकरी फार फार भाग्यवान वाटतात.
हे असे सुखाचे निधान सगळ्यांनाच गवसत नाही!! त्यामुळेच वाडीत देवाबरोबर पुजारी वर्गाला फार मोठा मान आहे. वर्षभरात, दिवस असो वा रात्र, ही मंडळी तेवढ्या उत्साहात सर्व सोहळे तन्मयतेने पार पाडतात.
1 year ago | [YT] | 491
View 49 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी
1 year ago | [YT] | 503
View 30 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
https://youtu.be/u0dwkgIwruw
1 year ago | [YT] | 9
View 1 reply
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
https://youtu.be/YQsYf_Ud-zk
1 year ago | [YT] | 20
View 0 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
आपल्या भक्तांना नेमक्या कोणत्या रूपात दत्त महाराज भेट देत असतील ह्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे .दत्त महाराजांना दत्त माहात्म्यात बहुरूपधर आणि मायाध्यक्ष म्हटलेलं आहे ते उगीच नाही .
दत्त माहात्म्यातील गाथांमध्ये विष्णुदत्ताला दिसलेले दत्त महाराज आरंभी एका दारूच्या दुकानात अत्यन्त मलिन आणि ओंगळ अशा वेशात दिसले ,पुढील खेपेस एका स्मशानात दत्त महाराज कावळ्या कुत्र्यांसोबत बसलेले दिसले . अनाकलनीय आणि तिरस्कृत रूपात दत्त महाराज हे नेहेमीच आहेत . केवळ मनुष्य योनीचीच नव्हे तर देव योनीचीही महाराजांनी आपल्या गूढ रूपांनी अनेकदा परीक्षा पाहिलेली आहे .आपल्या मायेसोबत असलेले दत्त महाराज देवांना देखील अनाकलनीय आहेत . पण मग महाराजांना ओळखणे कधीच शक्य नाही का ? तर तसं नाहीये ,आपल्या भक्तीच्या ,श्रद्धेच्या जोरावर महाराजांना ओळखणे त्यांची कृपा असल्यास शक्य आहे . आता मी सांगतोय तो एका दत्त क्षेत्री हा घडलेला प्रत्यक्ष प्रसंग .
एकदा एका प्रख्यात घराण्यात एका वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबुवांच्या घरी एका फकीराची स्वारी संध्याकाळी अवतीर्ण झाली . हिरवी कफनी ,साडे सहा सात फूट उंच ,अत्यंत ओंगळ अर्थात डोळ्याला चिपडे लागलेली ,मलिन अशा वेशात दारावर येत त्या फकिराने खायला काही द्यावे अशी याचना केली . शास्त्रीबुवांचे चिरंजीव पुढे होत म्हणाले ,आणतो ,थांबावे . आत स्वयंपाकघरात पाहता भाकरी होती ,ती चिरंजीवांनी आणून त्या फकीर वेशातील व्यक्तीला दिली . तो फकीर म्हणाला ,नुसती भाकरी कशी खावी ,काही तिखट द्यावे . यावर त्या चिरंजीवांनी थोडी मिरची पूड आणली आणि त्या भाकरीवर ठेवली .आत शास्त्रीबुवा बसले होते त्यांना काहीतरी जाणवले ,आपल्या चिरंजीवांना हाक मारत म्हणाले,कोण आलय रे ? त्यावर चिरंजीव त्यांना म्हणाले कि अशा अशा रूपात एक फकीर आला होता त्याला भाकरी आणि तिखट दिले . शास्त्रीबुवांना सर्व काही कळून चुकले आणि ते म्हणाले अरे नुसतं तिखट कसं दिलंस ?? जा पळ आणि दूध ने त्यांच्यासाठी . बाहेर शास्त्रीबुवांच्या चिरंजीवांनी दुधाची लोटी नेत शोधाशोध केली पण कसचे काय ? पुन्हा म्हणून त्या फकिराचा पत्ता नाही .
हि कथा सांगताना त्या शास्त्रीबुवांच्या चिरंजीवांना रडू आवरत नव्हते ,महाराजांना आपण ओळखू शकलो नाही हे शल्य आणि काही तिखट घालावे या मागणीवर खरोखरीच तिखट घातले हे दुःख . आजही दत्त महाराज नित्य आपल्या भक्तांना भेट देतात मात्र आपल्या उपाध्या आणि बेगडी अहं ची झापडे त्यांना ओळखू शकत नाहीत . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
Forwarded as recieved
1 year ago | [YT] | 136
View 13 replies
श्री दत्त क्षेत्र दर्शन मराठी
1 year ago | [YT] | 510
View 35 replies
Load more