Chhatrapati Sambhajinagar Local



Chhatrapati Sambhajinagar Local

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात आयोजित ''कॉक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) दोन दिवसीय राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीचा गुरुवारी, ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी यशस्वी समारोप झाला. संस्थापक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाचा आगामी ॲक्शन प्लॅन जाहीर केला. देशातील नागरिकांच्या भावना समजून घेण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभर आणि देशभरात 'क्या बोलती पब्लिक?' हे विशेष अभियान राबवण्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
"संविधानाला धरून काम; नागरिकांची भीती संपवणे हेच यश"
माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "CJP ची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित आहे. त्यांनी भारतासाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संविधानाला धरून लढा देत आहोत. आमच्यासाठी आंदोलनाचे यश हे फक्त कुणाचा राजीनामा घेणे नाही, तर देशातील सामान्य नागरिकांच्या मनातील सरकार विरोधातील भीती पूर्णपणे संपणे हे खरे यश आहे."
After the protest at Delhi’s Jantar Mantar drew national attention, the Cockroach Janata Party (CJP) successfully concluded its two-day national core committee meeting in Chhatrapati Sambhajinagar on Thursday, August 6, 2026, in the afternoon. The meeting was held at the residence of founder Abhijit Dipke.

Following the session, Dipke announced the party’s upcoming action plan during a press briefing. He declared that in September, the party will launch a special campaign across the state and the country titled “Kya Bolti Public?” to understand the sentiments of citize
#CockroachJanataParty #CJP #KyaBoltiPublic #kyaboltipublic #cjpcampeign #PublicCampaign #AbhijitDipke #ashutoshranka #ratnasingh #saurabhdas #vaishnavigaur #chhatrapatisambhajinagarlocal #cjpnews #kyaboltipublicupdate

2 weeks ago | [YT] | 2

Chhatrapati Sambhajinagar Local

लाडक्या बहिणींनो, पैसे बंद होण्याआधीच ई- केवायसी करून घ्या.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आता e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्र महिलांनी [https://ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या प्रक्रियेत आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी करावी लागेल. तसेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देऊन संमतीनंतर OTP टाकल्यावर पुढील टप्प्यात जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि आवश्यक घोषणा (Declaration) नोंदवावी लागेल.

ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर प्रणालीवर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. चुकीची माहिती दिल्यास किंवा गैरप्रकार केल्यास महिलांची नावे योजनेतून वगळली जातील. यामुळे केवळ पात्र महिलांनाच दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

#LadkiBahin #LadkiBahinYojana #EKYC #MaharashtraNews #WomenWelfare #GovernmentScheme #AadhaarAuthentication #BreakingUpdates #ladkibahinyojna #ladakibahinyojana #trendingpost #trendingnow #eKYC #AurangabadUpdates #chhatrapatisambhajinagarlocal #chhatrapatisambhajinagarlocal #chhatrapatisambhajinagarnews #chhatrapatisambhajinagar #chhatrapatisambhajinagarupdate #aurangabadupdates #aurangabadnewsupdates #sambhajinagrlocalnews #chhatrapatisambhajinagarlocal #ekycupdate #ladakibahinnews

11 months ago | [YT] | 0

Chhatrapati Sambhajinagar Local

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं वयाच्या ४८व्या वर्षी निधन झालं. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली होती. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू होते.

शिंदे हे संविधान, कायदे आणि न्यायालयीन निर्णय सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगणारे जाणकार वकील म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने न्यायालयीन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज (मंगळवार) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

#SiddharthShinde #SupremeCourt #DelhiAIIMS #SeniorAdvocate #Obituary #MaharashtraNews #LegalFraternity #chhatrapatisambhajinagarlocal
#chhatrapatisambhajinagarnews
#chhatrapatisambhajinagar
#chhatrapatisambhajinagarupdate
#aurangabadupdates
#aurangabadnewsupdates
#sambhajinagrlocalnews
#chhatrapatisambhajinagarlocal
#advsiddharthshindedeath
#advocatesiddharthshindedeath #suddharthshindeonshivsenaspilt
#advsiddharthshindenews

11 months ago | [YT] | 1

Chhatrapati Sambhajinagar Local

ZP ELECTION CHHATRAPATI SAMBHAJINAGAR छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वांसाठी खुले
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तिनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागल्या असून निवडणूक विभागाकडून याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. कमी अधिक प्रमाणात ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण नेत्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालीमुळे राजकीय उत्साह ओसांडून वाहत आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकात प्रचंड चूरस आणि स्पर्धा राहणार हे आतापासूनच स्पष्ट झाले आहे. शेकडोच्या संख्येतील इच्छुक उमेदवार आत्तापासूनच कामाला भिडल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे.कारण आरक्षण जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे.
#sambhajinagrlocalnews
#chhatrapatisambhajinagarlocal
#zpreservation2025
#sambhajinagarzpreservation
#sambhajinagarlocalupdate
#chhatrapatisambhajinagarelection
#jilhaparishadarakshan
#jilhaparishadaurangabad
#chhatrapatisambhajinagarzp
#aurangabadnews
#chhatrapatisambhajinagarnews
#chhatrapatisambhajinagarlocalbodyelection

11 months ago (edited) | [YT] | 0