*श्री स्वामी समर्थ बखर* *महारुद्रराव देशपांड्यांचे जप्त उत्पन्न मोकळे केले*
मोंगल प्रांती जोगाईच्या आंब्यानजीक केज म्हणून गाव आहे. त्या गावी महारुद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण मोठे धनिक होते. निजाम सरकारने त्यांचे उत्पन्न जप्त केले. ते सुटण्यासाठी (त्यांनी) पुष्कळ प्रयत्न केले, पण (ते) व्यर्थ गेले. एके दिवशी बीड प्रांती कोणी साधू आहेत, असे ऐकल्यावरून त्यांनी साधूच्या दर्शनास जाऊन आपली सर्व हकिकत सांगितली. साधू म्हणाले, "अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा, म्हणजे तुमचे कार्य होईल असे वाटते." मग देशपांडे अक्कलकोटी येऊन महाराजांपुढे श्रीफलादि ठेवून, साष्टांग नमस्कार घातला व उभे राहिले. इतक्यात समर्थ म्हणाले, "चार मनोरे आहेत तेथे जा, म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ." असे अंतःसाक्षित्वाचे बोलणे ऐकून देशपांड्यांस मोठे आश्चर्य वाटले. नंतर ते श्रींची आज्ञा घेऊन मोठ्या त्वरेने हैदराबादेस निघून गेले. त्याच दिवशी उत्पन्न सोडून देण्याचा सरकारांतून हकूम आला. हे ऐकून देशपांड्यांस परमानंद होऊन श्रींचे गुणानुवाद गात (ते) अक्कलकोटी आले. श्रद्धापूर्वक श्रींचे पूजन करून झालेली हकिकत सर्वांस सांगितली. तेव्हापासून त्यांची समर्थचरणी भक्ती वृद्धिंगत होत चालली.
एके दिवशी देशपांडे पंढरपूरास विठोबाचे दर्शनास गेले असता विठ्ठलमूर्ती न दिसता श्री समर्थ दिसू लागले. देशपांड्यांनी आश्चर्याने चकित होऊन श्रींचे दर्शन घेतले व षोडशोपचार पूजा केली व ब्राह्मणभोजन घातले, नंतर श्रींचे गुणानुवाद गात (ते) आपल्या घरी गेले.
पुढे काही दिवसांनी त्यासं समर्थ कृपेने पुरलेले द्रव्याचे हंडे सापडले. ते पुन्हा अक्कलकोटी येऊन श्रींचे दर्शन घेऊन उभे राहिले. इतक्यात महाराज म्हणाले, "अरे, हजार ब्राह्मण जेवू घाल!" अशी श्रींची आज्ञा होताच (त्यांनी) हजार ब्राह्मण जेवू घातले व श्रींची आज्ञा घेऊन (ते) आपल्या गावी गेले.
दुसरे दिवशी तापाने आजारी पडून (त्यांची) अत्यवस्थ स्थिती झाली. सर्वांनी त्यांच्या देहाची आशा सोडली. देशपांड्यांचे थोरले मुलगे रघुत्तमराव हे घाबरून जाऊन धावत धावत श्रींच्या दर्शनास अक्कलकोटी आले. महाराजांस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की, "महाराज आमचे वडील तापाने सिक असून अंतकाळ होण्याची वेळ आली आहे. महाराज, त्यांच्याशिवाय आमचा प्रपंच फुकट गेल्यासारखा आहे. करिता मायबाप दयासागरा, वडिलांचे प्रकृतीस आराम द्या!" समर्थ म्हणाले, "जा घरी, होईल आराम" असे श्रीमुखांतील वाक्य ऐकून रघुत्तमरावांस आनंद होऊन, श्रीचरणांचे तीर्थ घेऊन घरी आले व वडिलांचे तोंडात घातले. त्या दिवसापासून देशपांड्यांस आराम पडून आठ दिवसात (ते) बरे झाले. नंतर श्रींच्या दर्शनास येऊन (त्यांनी) साष्टांग नमस्कार घातला व (ते) म्हणाले, "श्रींनी कृपा करून मरणांतून वाचविले, तरी या दासास काही सेवा सांगावी." असे म्हणून श्री समर्थांपुढे (त्यांनी) दहा हजार रुपये ठेविले. ते पाहून समर्थ हांसले व म्हणाले, "आम्हांस रुपये नको, जा निघ घरी ! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव.” त्या वेळी मुंबईचे शेणवी गृहस्थ हरिश्चंद्र म्हणून श्रींचे भक्त तेथे आले होते. त्यांचा व्यवसाय म्हणजे श्रींच्या हजारो पादुका तयार करून, समर्थ भक्तांना फुकट वाटणे असा होता. त्यांनी त्यांना श्रींचे वाक्य ऐकताच देशपांड्यास आपल्याजवळ तयार असलेल्या पादुका दिल्या. त्या घेऊन देशपांड्यांनी श्रींच्या पायास लावून (ते) आपल्या गावी केजला निघून गेले. नंतर श्रींपुढे ठेविलेल्या रुपयांचा घरापुढे उकिरड्यावर मोठा मठ बांधून श्रींच्या पादुका स्थापन केल्या. नंतर (त्यांनी) काशी, प्रयाग वगैरे तीर्थे करून, शेवटी संन्यास घेतला. त्यास कोणी समर्थांची लीला सांगू लागल्यास डोळ्यांतून घळघळ पाणी वाहत असे. इतके ते प्रेमळ असून श्रींच्या ठिकाणी (त्यांची) पराकाष्ठेची निष्ठा होती. (ते) प्रतिवर्षी अक्कलकोटास येऊन हजारो ब्राह्मणांस जेवू घालत असत. पुढे (ते) एक वेळ अक्कलकोटास आले असता प्रकृती बिघडून (त्यांचा) अंतकाळ जवळ आला. तेव्हा त्यांनी सर्व लोकांस सांगितले की, "माझी समाधी श्रींच्या समाधीजवळ करा." असे सांगून केजकर स्वामींनी शके १८१७ साली पौष वद्य नवमी सकाळी पाच वाजता देह विसर्जन केला. नंतर सर्वांनी त्यांची समाधी श्रींच्या समाधीजवळच बांधली. धन्य त्या गुरुभक्ताची, ज्याची समाधी समर्थ-चरणांजवळ झाली. महाराजांच्या भक्तांपैकी केजकर स्वामी हे भक्तिज्ञान वैराग्य संपन्न होऊन समर्थ चरणांचा अखंड वास करून राहिले. पुढे त्यांचे. चिरंजीव रघुत्तमराव हेही भक्तिमान होऊन श्रींची अखंड सेवा करू लागले.
*श्री स्वामी समर्थ बखर* *सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्णदर्शन दिले*
द्वारपकापुरी एक सुरदास म्हणूस साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्त्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस श्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली, "अरे सूरदास, ज्याच्या नावाने (तू) हाक मारतोस तो मी उभा आहे, पाहा." असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्या सरशी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो, तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारतां ? एकदम जाऊन (त्याने) श्रींचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की, "महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करा !"
अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला तेव्हा समर्थ म्हणाले, "तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील !" असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रींच्या भजनपूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखास पावला.
स्वामी महाराजांचे घर हे आपलेच घर असते तेव्हा सहजता येणारच. पिता आणि माता या दोन्ही भूमिकांतून स्वामी महाराज आपले संगोपन अनेक प्रकारे करीत असतात तेव्हा त्यांच्या घरी हक्काने जावे आणि समर्पित भावाने सेवा करावी.
गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ पूर्वी कोर्टात बेलीफ होते. त्यांना कलेक्टरच्या ऑफिसात त्यांच्या बंधूनी खटपट करून कारकुनाच्या जागेवर नेले. पुढे त्यांचे अक्षर वाईट; म्हणून ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही व इकडे बेलिफाचीही जागा गेली आणि त्यांना निवळ घरी बसावे लागले. अशा स्थितीत अशा संकटसमयी मानवाधिकाऱ्यांकडे हांजी हांजी करण्याची पंचाईत न करता त्यांनी श्री समर्थांकडे धाव घेतली. गणपतराव अक्कलकोटास गेले, त्या दिवशी श्री दयाघनांची स्वारी रस्त्यावरच विराजमान झालेली त्यांच्या दृष्टीस पडली. अहाहा ! दत्तमूर्ती पाहून गणपतरावांचे आनंदास पारावार नाहीसा झाला. साष्टांग नमस्कार घालून (त्यांनी) प्रेमाश्रृंनी श्रींचे चरण धुतले. काही वेळ ती आनंदमूर्ती पाहून त्यांना परम समाधान वाटले. मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून श्रीसन्निध घेऊन आले. तो पावेतो समर्थांची स्वारी खासबागेत विहिरीनजीक जाऊन विराजमान झालेली होती. त्या वेळेस महाराजांनी तमोवृत्तीचा स्वीकार केला होता. आसपास शंभर कदमांवर कोणास फिरकू देत नव्हते. सेवेकऱ्याने नैवेद्य पुढे केल्याबरोबर गालीप्रदान करू लागले. तेव्हा गणपतरावजीस नैवेद्य सेवेकऱ्याचे स्वाधीन करून परत जावे लागले. मग तिसरे प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शनास गेले. त्या वेळी शांतवृत्ती होती. पादसेवन वगैरे थोडी सेवा त्यांनी केली. असो.
त्यांनी नोकरी गेल्याबद्दल समर्थांना विचारावे; म्हणून रोज पाच-चार वेळा श्री समर्थांजवळ येऊन चार घटका बसत असत; परंतु ते तेज पाहून त्यांस विचारण्याचा धीर होईना. एक दिवस एका सेवेकऱ्याने गणपतरावांस सांगितले की, उद्या रामनवमी आहे, करिता फराळास अर्धा मण दही घेऊन द्या. गणपतराव म्हणाले - "माझे एक काम कराल, तर मी तुम्हांस दही देईन." सेवेकरी म्हणाला, "काय काम ?" गणपतराव म्हणाले, "माझी नोकरी गेली आहे, त्या बद्दल महाराजांस विचारावयाचे आहे." सेवेकऱ्याने तत्काल श्री प्रभुरायांना विचारले, "महाराज, याची नोकरी गेली आहे. ती केव्हा लागेल ?" महाराज म्हणाले, "नोकरी लागली आहे. जा!" हे ऐकून गणपतरावांना समाधान वाटले, पण थोडी शंका राहिली; पुन्हा सेवेकऱ्यास विनंती केली की, "किती रुपयांची नोकरी लागेल?" असे विचारा. त्याने तत्काळ तोही प्रश्न केला, "महाराज नोकरी किती रुपयांची लागेल ?" महाराज म्हणाले, "लाख रुपयांची लागेल, जा!" हा आशीर्वाद ऐकून गणपतरावास परमानंद वाटला. सेवेकऱ्यास आठ आण्याचे दही घेऊन दिले.
गणपतरावांजवळ खर्चाची टंचाई होती. त्यांनी गाणगापूरचे यात्रेपुरतेच पैसे ठेवले होते. थोडे दिवस राहून गाणगापूरास जावयास निघाले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जाते वेळेस नारळ न घेता पैशाच्या खारका मात्र घेतल्या. त्या वेळेस नारळ चार आण्यांनी झाले होते. असो ! खारका पुढे ठेवून नमस्कार केला. तो महाराज म्हणाले, "जा, नारळ घेऊन ये!" मग नारळ आणून दर्शन घेतले आणि निघाले. खर्चाच्या पैशात चार आणे कमी झाले, म्हणून थोडेसे वाईट वाटले. पुढे गाणगापूरच्या रस्त्यात त्यास आठ आणे सापडले तेव्हा लक्षात आले की, चार आण्याचा नारळ घेतला, पण महाराजांनी चार आण्यांच्या दुप्पट आठ-आणे दिले. मग गाणगापूरची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर, ज्या दिवशी महाराजांनी चाकरी लागेल म्हणून सांगितले, त्या दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांना पंधरा रुपयाच्या कारकुनाच्या जागेवर नेमणूक केली आहे, असा हुकूम आला होता.
थोडे महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे ऑफिसांत वीस रुपयांची जागा मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पॉलिटिकल एजंटसाहेब यांच्या कचेरीत झाली; त्यामुळे श्री समर्थांचे दर्शन वारंवार होऊ लागले व स्वामी महाराजांवर त्याची भक्ती दिवसेंदिवस जास्त वाढू लागली, कारण स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल व अतर्क्य सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली होती. पुढे पाच वर्षांतच गणपतराव अव्वल कारकून होऊन त्याच साली मामलेदार झाले. हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारीचे काम करीत आहेत. श्री स्वामिरायांच्या आशीर्वादे करून त्यांचे लाख रुपयांचे काम झाले. असो. हे श्रीमहाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरून काय होणार नाही ?
एक अलवणीबुवा बडोद्यास राहात असत. हे जगन्नाथास गेले असता त्यांच्या बरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही. त्या ठिकाणी श्री स्वामिराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अलवणीबुवांचे पुढे उभे राहिले. अलवणीबुवांनी ती तेजःपुंज मूर्ती पाहून, जरी त्यांना ताप आला होता, तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व 'आपण कोठे असता ?' म्हणून विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, "सर्व स्थाने आमचीच आहेत !" असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले. हे पाहून बुवांस मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे त्यांचे दृष्टीस पडली. त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह यथेच्छ भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता ? त्यांना प्रेम आवरेना ! साष्टांग नमस्कार करून काही दिवस श्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकिकत सर्व सेवेकऱ्यांस सांगितली.
Swami sadan math bavdhan pune
1 day ago | [YT] | 7
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*महारुद्रराव देशपांड्यांचे जप्त उत्पन्न मोकळे केले*
मोंगल प्रांती जोगाईच्या आंब्यानजीक केज म्हणून गाव आहे. त्या गावी महारुद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण मोठे धनिक होते. निजाम सरकारने त्यांचे उत्पन्न जप्त केले. ते सुटण्यासाठी (त्यांनी) पुष्कळ प्रयत्न केले, पण (ते) व्यर्थ गेले. एके दिवशी बीड प्रांती कोणी साधू आहेत, असे ऐकल्यावरून त्यांनी साधूच्या दर्शनास जाऊन आपली सर्व हकिकत सांगितली. साधू म्हणाले, "अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा, म्हणजे तुमचे कार्य होईल असे वाटते." मग देशपांडे अक्कलकोटी येऊन महाराजांपुढे श्रीफलादि ठेवून, साष्टांग नमस्कार घातला व उभे राहिले. इतक्यात समर्थ म्हणाले, "चार मनोरे आहेत तेथे जा, म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ." असे अंतःसाक्षित्वाचे बोलणे ऐकून देशपांड्यांस मोठे आश्चर्य वाटले. नंतर ते श्रींची आज्ञा घेऊन मोठ्या त्वरेने हैदराबादेस निघून गेले. त्याच दिवशी उत्पन्न सोडून देण्याचा सरकारांतून हकूम आला. हे ऐकून देशपांड्यांस परमानंद होऊन श्रींचे गुणानुवाद गात (ते) अक्कलकोटी आले. श्रद्धापूर्वक श्रींचे पूजन करून झालेली हकिकत सर्वांस सांगितली. तेव्हापासून त्यांची समर्थचरणी भक्ती वृद्धिंगत होत चालली.
एके दिवशी देशपांडे पंढरपूरास विठोबाचे दर्शनास गेले असता विठ्ठलमूर्ती न दिसता श्री समर्थ दिसू लागले. देशपांड्यांनी आश्चर्याने चकित होऊन श्रींचे दर्शन घेतले व षोडशोपचार पूजा केली व ब्राह्मणभोजन घातले, नंतर श्रींचे गुणानुवाद गात (ते) आपल्या घरी गेले.
पुढे काही दिवसांनी त्यासं समर्थ कृपेने पुरलेले द्रव्याचे हंडे सापडले. ते पुन्हा अक्कलकोटी येऊन श्रींचे दर्शन घेऊन उभे राहिले. इतक्यात महाराज म्हणाले, "अरे, हजार ब्राह्मण जेवू घाल!" अशी श्रींची आज्ञा होताच (त्यांनी) हजार ब्राह्मण जेवू घातले व श्रींची आज्ञा घेऊन (ते) आपल्या गावी गेले.
दुसरे दिवशी तापाने आजारी पडून (त्यांची) अत्यवस्थ स्थिती झाली. सर्वांनी त्यांच्या देहाची आशा सोडली. देशपांड्यांचे थोरले मुलगे रघुत्तमराव हे घाबरून जाऊन धावत धावत श्रींच्या दर्शनास अक्कलकोटी आले. महाराजांस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की, "महाराज आमचे वडील तापाने सिक असून अंतकाळ होण्याची वेळ आली आहे. महाराज, त्यांच्याशिवाय आमचा प्रपंच फुकट गेल्यासारखा आहे. करिता मायबाप दयासागरा, वडिलांचे प्रकृतीस आराम द्या!" समर्थ म्हणाले, "जा घरी, होईल आराम" असे श्रीमुखांतील वाक्य ऐकून रघुत्तमरावांस आनंद होऊन, श्रीचरणांचे तीर्थ घेऊन घरी आले व वडिलांचे तोंडात घातले. त्या दिवसापासून देशपांड्यांस आराम पडून आठ दिवसात (ते) बरे झाले. नंतर श्रींच्या दर्शनास येऊन (त्यांनी) साष्टांग नमस्कार घातला व (ते) म्हणाले, "श्रींनी कृपा करून मरणांतून वाचविले, तरी या दासास काही सेवा सांगावी." असे म्हणून श्री समर्थांपुढे (त्यांनी) दहा हजार रुपये ठेविले. ते पाहून समर्थ हांसले व म्हणाले, "आम्हांस रुपये नको, जा निघ घरी ! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव.” त्या वेळी मुंबईचे शेणवी गृहस्थ हरिश्चंद्र म्हणून श्रींचे भक्त तेथे आले होते. त्यांचा व्यवसाय म्हणजे श्रींच्या हजारो पादुका तयार करून, समर्थ भक्तांना फुकट वाटणे असा होता. त्यांनी त्यांना श्रींचे वाक्य ऐकताच देशपांड्यास आपल्याजवळ तयार असलेल्या पादुका दिल्या. त्या घेऊन देशपांड्यांनी श्रींच्या पायास लावून (ते) आपल्या गावी केजला निघून गेले. नंतर श्रींपुढे ठेविलेल्या रुपयांचा घरापुढे उकिरड्यावर मोठा मठ बांधून श्रींच्या पादुका स्थापन केल्या. नंतर (त्यांनी) काशी, प्रयाग वगैरे तीर्थे करून, शेवटी संन्यास घेतला. त्यास कोणी समर्थांची लीला सांगू लागल्यास डोळ्यांतून घळघळ पाणी वाहत असे. इतके ते प्रेमळ असून श्रींच्या ठिकाणी (त्यांची) पराकाष्ठेची निष्ठा होती. (ते) प्रतिवर्षी अक्कलकोटास येऊन हजारो ब्राह्मणांस जेवू घालत असत. पुढे (ते) एक वेळ अक्कलकोटास आले असता प्रकृती बिघडून (त्यांचा) अंतकाळ जवळ आला. तेव्हा त्यांनी सर्व लोकांस सांगितले की, "माझी समाधी श्रींच्या समाधीजवळ करा." असे सांगून केजकर स्वामींनी शके १८१७ साली पौष वद्य नवमी सकाळी पाच वाजता देह विसर्जन केला. नंतर सर्वांनी त्यांची समाधी श्रींच्या समाधीजवळच बांधली. धन्य त्या गुरुभक्ताची, ज्याची समाधी समर्थ-चरणांजवळ झाली. महाराजांच्या भक्तांपैकी केजकर स्वामी हे भक्तिज्ञान वैराग्य संपन्न होऊन समर्थ चरणांचा अखंड वास करून राहिले. पुढे त्यांचे. चिरंजीव रघुत्तमराव हेही भक्तिमान होऊन श्रींची अखंड सेवा करू लागले.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
4 days ago | [YT] | 8
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹
आज गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य महापूजा.
1 week ago | [YT] | 15
View 2 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्णदर्शन दिले*
द्वारपकापुरी एक सुरदास म्हणूस साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्त्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस श्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली, "अरे सूरदास, ज्याच्या नावाने (तू) हाक मारतोस तो मी उभा आहे, पाहा." असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्या सरशी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो, तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारतां ? एकदम जाऊन (त्याने) श्रींचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की, "महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्य दृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करा !"
अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला तेव्हा समर्थ म्हणाले, "तू त्रिविध तापांपासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील !" असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रींच्या भजनपूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखास पावला.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
1 month ago | [YT] | 16
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
बसले येथे स्वामी लक्ष ठेवुन भक्तांवरी, नाही गेलो आपण जरी दरबारी. तरी त्यांचे लक्ष आहे आम्हांवरी🙌🏻🙇🏻♂️🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙌🏻🙇🏻♂️🙏🏻
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
स्वामी महाराजांचे घर हे आपलेच घर असते तेव्हा सहजता येणारच. पिता आणि माता या दोन्ही भूमिकांतून स्वामी महाराज आपले संगोपन अनेक प्रकारे करीत असतात तेव्हा त्यांच्या घरी हक्काने जावे आणि समर्पित भावाने सेवा करावी.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
3 months ago | [YT] | 23
View 2 replies
Swami sadan math bavdhan pune
*आईच्या दर्शनाने मनाला खरी शांतता मिळते*
"आई तुझ्या दर्शनाने जीवनातील प्रत्येक संकट हलकं होतं ✨
भक्ताला नेहमीच दिलासा देणारी शक्तीस्वरूप आई "🌹
जय अंबे, जय भवानी, जय जगदंबे 🙏
3 months ago | [YT] | 9
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*गणेश बल्लाळ मुळेकर*
गणेश बल्लाळ मुळेकर हे गृहस्थ पूर्वी कोर्टात बेलीफ होते. त्यांना कलेक्टरच्या ऑफिसात त्यांच्या बंधूनी खटपट करून कारकुनाच्या जागेवर नेले. पुढे त्यांचे अक्षर वाईट; म्हणून ती जागा कलेक्टरने त्यांना दिली नाही व इकडे बेलिफाचीही जागा गेली आणि त्यांना निवळ घरी बसावे लागले. अशा स्थितीत अशा संकटसमयी मानवाधिकाऱ्यांकडे हांजी हांजी करण्याची पंचाईत न करता त्यांनी श्री समर्थांकडे धाव घेतली. गणपतराव अक्कलकोटास गेले, त्या दिवशी श्री दयाघनांची स्वारी रस्त्यावरच विराजमान झालेली त्यांच्या दृष्टीस पडली. अहाहा ! दत्तमूर्ती पाहून गणपतरावांचे आनंदास पारावार नाहीसा झाला. साष्टांग नमस्कार घालून (त्यांनी) प्रेमाश्रृंनी श्रींचे चरण धुतले. काही वेळ ती आनंदमूर्ती पाहून त्यांना परम समाधान वाटले. मग गावात जाऊन नैवेद्याची तयारी करून श्रीसन्निध घेऊन आले. तो पावेतो समर्थांची स्वारी खासबागेत विहिरीनजीक जाऊन विराजमान झालेली होती. त्या वेळेस महाराजांनी तमोवृत्तीचा स्वीकार केला होता. आसपास शंभर कदमांवर कोणास फिरकू देत नव्हते. सेवेकऱ्याने नैवेद्य पुढे केल्याबरोबर गालीप्रदान करू लागले. तेव्हा गणपतरावजीस नैवेद्य सेवेकऱ्याचे स्वाधीन करून परत जावे लागले. मग तिसरे प्रहरी गणपतराव पुन्हा दर्शनास गेले. त्या वेळी शांतवृत्ती होती. पादसेवन वगैरे थोडी सेवा त्यांनी केली. असो.
त्यांनी नोकरी गेल्याबद्दल समर्थांना विचारावे; म्हणून रोज पाच-चार वेळा श्री समर्थांजवळ येऊन चार घटका बसत असत; परंतु ते तेज पाहून त्यांस विचारण्याचा धीर होईना. एक दिवस एका सेवेकऱ्याने गणपतरावांस सांगितले की, उद्या रामनवमी आहे, करिता फराळास अर्धा मण दही घेऊन द्या. गणपतराव म्हणाले -
"माझे एक काम कराल, तर मी तुम्हांस दही देईन." सेवेकरी म्हणाला, "काय काम ?" गणपतराव म्हणाले, "माझी नोकरी गेली आहे, त्या बद्दल महाराजांस विचारावयाचे आहे." सेवेकऱ्याने तत्काल श्री प्रभुरायांना विचारले, "महाराज, याची नोकरी गेली आहे. ती केव्हा लागेल ?" महाराज म्हणाले, "नोकरी लागली आहे. जा!" हे ऐकून गणपतरावांना समाधान वाटले, पण थोडी शंका राहिली; पुन्हा सेवेकऱ्यास विनंती केली की, "किती रुपयांची नोकरी लागेल?" असे विचारा. त्याने तत्काळ तोही प्रश्न केला, "महाराज नोकरी किती रुपयांची लागेल ?" महाराज म्हणाले, "लाख रुपयांची लागेल, जा!" हा आशीर्वाद ऐकून गणपतरावास परमानंद वाटला. सेवेकऱ्यास आठ आण्याचे दही घेऊन दिले.
गणपतरावांजवळ खर्चाची टंचाई होती. त्यांनी गाणगापूरचे यात्रेपुरतेच पैसे ठेवले होते. थोडे दिवस राहून गाणगापूरास जावयास निघाले. श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास जाते वेळेस नारळ न घेता पैशाच्या खारका मात्र घेतल्या. त्या वेळेस नारळ चार आण्यांनी झाले होते. असो ! खारका पुढे ठेवून नमस्कार केला. तो महाराज म्हणाले, "जा, नारळ घेऊन ये!" मग नारळ आणून दर्शन घेतले आणि निघाले. खर्चाच्या पैशात चार आणे कमी झाले, म्हणून थोडेसे वाईट वाटले. पुढे गाणगापूरच्या रस्त्यात त्यास आठ आणे सापडले तेव्हा लक्षात आले की, चार आण्याचा नारळ घेतला, पण महाराजांनी चार आण्यांच्या दुप्पट आठ-आणे दिले. मग गाणगापूरची यात्रा वगैरे करून घरी आल्यावर, ज्या दिवशी महाराजांनी चाकरी लागेल म्हणून सांगितले, त्या दिवशी सोलापूर कचेरीतून त्यांना पंधरा रुपयाच्या कारकुनाच्या जागेवर नेमणूक केली आहे, असा हुकूम आला होता.
थोडे महिन्यांनी असिस्टंट कलेक्टरचे ऑफिसांत वीस रुपयांची जागा मिळाली व त्यांची नेमणूक अक्कलकोट पॉलिटिकल एजंटसाहेब यांच्या कचेरीत झाली; त्यामुळे श्री समर्थांचे दर्शन वारंवार होऊ लागले व स्वामी महाराजांवर त्याची भक्ती दिवसेंदिवस जास्त वाढू लागली, कारण स्वामींच्या अंतःसाक्षित्वाबद्दल व अतर्क्य सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली होती. पुढे पाच वर्षांतच गणपतराव अव्वल कारकून होऊन त्याच साली मामलेदार झाले. हल्ली ते फर्स्ट क्लास मामलेदारीचे काम करीत आहेत. श्री स्वामिरायांच्या आशीर्वादे करून त्यांचे लाख रुपयांचे काम झाले. असो. हे श्रीमहाराजांचे एकनिष्ठ भक्त बनले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरून काय होणार नाही ?
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
3 months ago | [YT] | 28
View 4 replies
Swami sadan math bavdhan pune
*श्री स्वामी समर्थ बखर*
*अलवणीबुवांची गोष्ट*
एक अलवणीबुवा बडोद्यास राहात असत. हे जगन्नाथास गेले असता त्यांच्या बरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही. त्या ठिकाणी श्री स्वामिराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अलवणीबुवांचे पुढे उभे राहिले. अलवणीबुवांनी ती तेजःपुंज मूर्ती पाहून, जरी त्यांना ताप आला होता, तरी ते खडबडून उठले व त्यांनी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली व 'आपण कोठे असता ?' म्हणून विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, "सर्व स्थाने आमचीच आहेत !" असे म्हणत म्हणत दिसेनासे झाले. हे पाहून बुवांस मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वान्नांनी भरलेली पात्रे त्यांचे दृष्टीस पडली. त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह यथेच्छ भोजन केले आणि फिरत फिरत ते काही दिवसांनी अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता ? त्यांना प्रेम आवरेना ! साष्टांग नमस्कार करून काही दिवस श्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकिकत सर्व सेवेकऱ्यांस सांगितली.
श्री स्वामी समर्थ 🙇🏻♂️🙏🏻
4 months ago | [YT] | 22
View 0 replies
Swami sadan math bavdhan pune
आपले आशीर्वाद, मार्गदर्शन आणि प्रेम आमच्यावर असेच राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुमाऊली रेवतीताई🙇🏻♂️🙏🏻
5 months ago | [YT] | 8
View 0 replies
Load more