माझी Mumbai, आपली BMC

Official YouTube Channel for Brihanmumbai Municipal Corporation


माझी Mumbai, आपली BMC

🚮आपल्या परिसरातील कचरा साचण्याचे प्रवण क्षेत्र (हॉटस्पॉट) मुंबई क्लीन लीगच्या माध्यमातून आता आमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते. 🧹🗑️


🔗त्यासाठी मुंबई क्लीन लीगच्या संकेतस्थळावर नोंदणी करा आणि संपूर्ण माहिती कळवा.


🔹आपला छोटासा प्रयत्न मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मोठा बदल घडवू शकतो.


#cleanmumbai #bethechange #SwachhBharat #MCL2026

1 week ago | [YT] | 7

माझी Mumbai, आपली BMC

🔹महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला.


🔹माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस, कन्या कु. दिविजा फडणवीस, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी डॉ. (श्रीमती) निरुपमा जे. डांगे, जनगणना उप महानिबंधक श्री. ए. एन. राजीव, उप महानिबंधक श्री. यशवंत पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका जनगणना अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


🔹भारत सरकारच्या वतीने जनगणना-२०२७ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, दिनांक १ मे २०२६ पासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे.


#MyBMCUpdates
#Census2027
#जनगणना2027
#maharashtra_census
#selfenumeration
#DigitalIndia

2 weeks ago | [YT] | 46

माझी Mumbai, आपली BMC

🔹महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन या निवासस्थानी स्व-गणना करून भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला.


🔹माननीय राज्यपाल यांच्या पत्नी श्रीमती सुधा देव वर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी डॉ. (श्रीमती) निरुपमा जे. डांगे, माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जनगणना उप महानिबंधक श्री. ए. एन. राजीव, उप महानिबंधक श्री. यशवंत पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिका जनगणना अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


🔹भारत सरकारच्या वतीने जनगणना-२०२७ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, दिनांक १ मे २०२६ पासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे.


#MyBMCUpdates
#Census2027
#जनगणना2027
#maharashtra_census
#selfenumeration
#DigitalIndia

2 weeks ago | [YT] | 21

माझी Mumbai, आपली BMC

🧹घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा संकलन ही सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुरू झाली आहे.

🐕पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे संकलन देखील या सुविधेच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे.

#CleanMumbai #BMCWasteManagement #AnimalWaste #BMC

1 year ago | [YT] | 6

माझी Mumbai, आपली BMC

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल

🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.


#MumbaiRains
#MyBMCUpdates

2 years ago | [YT] | 7

माझी Mumbai, आपली BMC

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
---
Indian Meteorological Department (Mumbai) has issued Extremely Heavy Rainfall Warning (Red Alert) for Mumbai City & Suburban area from 8pm today till tomorrow afternoon.

In view of this, considering the safety of students as a top priority, the Municipal Commissioner and Administratior Dr. Iqbal Singh Chahal has declared a holiday for all Municipal, Government and Private primary, secondary and higher secondary schools and all colleges in the Mumbai City and Suburbs, on tomorrow Thursday, 27 July 2023.

BMC requests all citizens to stay alert, stay indoors and kindly follow instructions from the administration.

#MumbaiRains
#MyBMCUpdates

2 years ago | [YT] | 8

माझी Mumbai, आपली BMC

इरसालवाडी (तालुका खोपोली, जिल्हा रायगड) येथे वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून संयंत्र पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.


त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. श्रावण हर्डीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार -


१) एकूण तीन बॉब कॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत.

२) तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.


#BMC
#mumbairains
#IrshalgadLandslide

2 years ago | [YT] | 9

माझी Mumbai, आपली BMC

मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू, श्री. श्रावण हर्डीकर, श्री. सुधाकर शिंदे, सहआयुक्त श्री. अजीत कुंभार, सहआयुक्त श्री. मिलीन सावंत, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर उपस्थित होते.


#BMC
#monsoonupdates

2 years ago | [YT] | 6

माझी Mumbai, आपली BMC

मुंबईच्या सेवेसाठी भर पावसातही अविरतपणे कार्यरत राहणाऱ्या मॉन्सून हिरोंना सलाम...
---
These Monsoon Heroes are working tirelessly even in heavy rains to keep the City of Mumbai running smooth..!

Salute to them...

#BMC
#monsoonheroes
#bmcformumbai

2 years ago | [YT] | 9