पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID :
instagram.com/paayvata
Facebook ID :
facbook.com/PaayvataYTChannel
E Mail Id :
paayvata@gmail.com
Paayvata
🟠 नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻 🟠
https://youtu.be/JheoU307IuE
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आणि पानशेत धरणाच्या उशाला लपलेलं निसर्गसमृद्ध ठिकाण
1 week ago | [YT] | 308
View 0 replies
Paayvata
रक्ताच्या थेंबाने ज्यांच्या,
फुलली ही आझाद पहाट,
त्या असंख्य वीरांच्या त्यागाने उजळली,
आपल्या स्वतंत्र भारताची सुवर्ण पायवाट!
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
#independenceday #india #payvata
1 week ago | [YT] | 142
View 1 reply
Paayvata
ऊन असो वा पाऊस, रस्ता असो वा पायवाट
तिने कधीच हार मानली नाही.
माझ्या या पायवाटेवर,
तिची सोबत कायम प्रामाणिक राहिली..
माझी सह्यदूत…🛵
#bike #bikeride #traveler #biker #payvata
1 week ago | [YT] | 535
View 12 replies
Paayvata
पावसात भिजलेली ती प्रत्येक पायवाट
माझ्यासाठी एक नवीन कथा घेऊन उभी असते…
Video Link👇🏻
https://youtu.be/1DGZd6dTnJo
#maheshdhindle #payvata #monsoon #monsoon2026
2 weeks ago | [YT] | 552
View 13 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक👇🏻
https://youtu.be/Mhp8GK93MJk
प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या समाजात, अजूनही उपेक्षित राहिलेल्या आयुष्यांची ही एक व्यथा आहे.
निसर्गाच्या जवळ असूनही संघर्षाच्या गर्तेत सापडलेला कातकरी समाज... आजही कशा परिस्थितीत राहतोय एकदा नक्की बघा.
3 weeks ago | [YT] | 673
View 15 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/x-uO5dN-1Jw
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर, जिथे आभाळ जमिनीला टेकल्यासारखं वाटतं,
तिथेच एका शांत वळणावर हे निसर्गसमृद्ध गाव भेटतं
“असं वाटतं की वेळ इथेच थांबून गेलाय...
निसर्गाच्या कुशीत दडलेलं हे गाव, धावपळीच्या आयुष्यात मनाला शांततेची अनुभूती देऊन जातं.”
#village #monsoon #monsoonvibes #waterfalls #khanu
1 month ago | [YT] | 243
View 5 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
आज आपल्या पायवाटा या युट्यूब चॅनल चे १,००,००० ( १ लाख ) सबस्क्रायबर्स पूर्ण झाले.😊
घनदाट जंगलातल्या पायवाटांवरून, निसर्गाच्या कुशीतून, ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरून आणि गावकुसातील माणसांच्या सुख-दुःखाच्या गोष्टींना शब्दांमध्ये गुंफत मी हा प्रवास सुरू केला होता.
आज हा प्रवास एका सुवर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे.
आज आपले व्हिडिओ जगभरातील तब्बल ३५ देशांमध्ये बघितले जातात याचा देखील प्रचंड आनंद आहे.
जेव्हा या 'पायवाटेवर ' मी पहिले पाऊल टाकले, तेव्हा आपल्या मातीचा सुगंध, निसर्गाचं निखळ सौंदर्य आणि आपल्या माणसांच्या मनातील संवेदनशील भावना आपल्या पर्यंत पोहचवणे, त्या कॅमेऱ्यात टिपून त्या जगासमोर मांडण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता.
प्रत्येक व्हिडिओमागे अनेक तासांचा प्रवास, कष्ट, पाऊस, ऊन, चिखल, कठीण रस्ते आणि अनेक आव्हानं होती. पण प्रत्येक वेळी तुमच्या एका कमेंटने, एका शेअरने आणि एका सब्स्क्राइबने पुन्हा जोमाने पुढे चालत राहण्याची ताकद दिली.
आपण फक्त 'सबस्क्रायबर्स' नाही तर या पायवाटेवरचे माझे सहप्रवासी आहात.
*१ लाख* ही केवळ एक संख्या नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या १ लाख संवेदनशील मनांची सोबत आहे.
या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, लहान मुलांचे, गावकऱ्यांचे आणि माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळेच “पायवाटा” हा केवळ एक यूट्यूब चॅनेल राहिले नाही, तर माणुसकी जपणारा एक परिवार बनला.
असेच सोबत रहा..अशा असंख्य पायवाटा आपल्याला सोबत चालायच्या आहेत.
माझ्या सोबत उभ्या राहणाऱ्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे ( Subscribers), माझ्या कुटुंबाचे आणि प्रत्येक हितचिंतकाचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो!❤️
धन्यवाद! 🙏🏻😊
महेश धिंडले
#payvata #payvatayoutubechannel #paayvata #100k #100ksubscribers
1 month ago | [YT] | 627
View 182 replies
Paayvata
माणुसकीचे नवे छप्पर आणि घर पुन्हा उभे राहिले..
गणदादा आणि त्याची पत्नी पारू काकू यांचा छोटासा पण सुखी संसार होता.
गणदादा ही अशी व्यक्ती जि गावात कोणाच्याही उपयोगाला ( कामाला ) सहज उपलब्ध होणारी व्यक्ती.
काही कामा निमित्त गणदादा गावाबाहेर पडले आणि त्याच वेळी कोरोनाचा lockdown सुरू झाला.
शिक्षण नसलेला साधा, सरळ गणदादा लॉकडाऊन त्या परिस्थितीत पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू शकला नाही.
पुढे सर्व नातेवाईक लोकांकडे गण दादांची चौकशी झाली पण ते कुठेच नव्हते.
“आज येतील… उद्या येतील…” या एका आशेवर पारू काकू दिवस काढत राहिल्या. पण दिवस महिन्यांत बदलले, महिने वर्षांत बदलले… आणि आज तब्बल सात वर्षे उलटून गेली, तरी गणदादा परत आले नाहीत.
त्यांचे काय झाले..? ते कुठे आहेत..? आहेत की नाही..? हे आज पर्यंत काही समजले नाही.
मागील सात वर्ष
आयुष्याच्या ओझ्यासोबत त्यांच्या घराचंही ओझं वाढत गेलं. कष्टाच्या वर्षांबरोबर घराच्या भिंती कोसळू लागल्या, वासे पडू लागले.
परवा गावी गेलो असता गण दादाच्या घराची अवस्था पाहून मन अस्वस्थ झाले.
पाऊस वेशीवर येऊन थांबला होता. जर पावसाच्या आधी घराची डागडुजी केली नाही तर घर पारू काकूच्या अंगावर पडून काहीही बरे वाईट घडू शकते.
आपण लवकरात लवकर काही तरी करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कामाला लागलो.
पुढे दोन दिवसात गावातील काही लोकांनी घरावरील पुढील संकट लक्षात घेऊन स्वयं रोजगारातून घर तात्पुरते नीट करण्यासाठी सुरुवात देखील केली.
आणि ही बातमी समजताच मी तातडीने गावी पोहचलो.
प्रत्यक्ष जागी त्या कामात आपली काहीतरी मदत होऊ शकते.
गावातील काही लोकांनी मिळेल ते साहित्य लावून घर पावसापुरते तिच्या राहण्याजोगे बनवून द्यायचा निर्धार केला होता.
गावी जाग्यावर जाऊन मी आपल्या चॅनेल च्या माध्यमातून आजच्या आज त्या घरासाठी नवीन पत्रे आणून देतो असा शब्द दिला..
नवीन पत्रे येणार या आशेने ग्रामस्थांना देखील कामात हुरूप आला आणि दिलेल्या शब्दा प्रमाणे तीन तासाच्या आत गावात गाडी मागवून नवीन *२२,००० हजाराचे १० स्टीलचे पत्रे* उपलब्ध करून दिले.
सर्वांच्या प्रामाणिक कष्टाने एका दिवसात ते घर पुन्हा एकदा उभे राहिले. ज्या भिंती पडल्या होत्या त्या पुन्हा रचल्या गेल्या, कुजलेल्या वाश्यांची जागी आता नवीन वाश्यांनी घेतली होती.
घरावर आता नवीन छप्पर पडले होते.
जुन्याच दगडींचा वापर करून पडलेल्या भिंती पुन्हा दुरुस्त करून घेतल्या.
वरती नवीन पत्रे टाकले.
पूर्ण नवीन नाही पण त्या पुढील काही वर्ष त्या निश्चिंत राहू शकतील अशा पद्धतीने आपण घर बनवून देऊ शकलो.
या कार्यात आपल्यावर विश्वास ठेऊन उभे राहिलेल्या त्या प्रत्येक हाताचे
ज्यामध्ये आपले मान्यवर सबस्क्राईबर
अतुलजी गाडे
सचिनजी गावडे
अभिजीत देसाई
एकनाथ गावडे
मुकुंद गावडे
शंतनु परांजपे
सागर संकपाळ
मंगल बनसोडे
आशा कोले
प्रशांत सरापुरे
राजेश दानवे
रोहित शेडगे
नीलेश जावळे
तसेच
( ग्रामस्थ घिसर , सुनील शिवाजी धिंडले, सुभाष पंढरीनाथ धिंडले, कांताराम अनंत धिंडले ) यांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद !
महेश धिंडले
पायवाटा यूट्यूब चॅनल
1 month ago (edited) | [YT] | 601
View 22 replies
Paayvata
🟡 नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻 🟡
https://youtu.be/EPyDODz4obI
माझ्या गावाकडे पिण्याच्या पाण्याची विहीर गेल्या काही काळापासून गाळ, कचरा आणि अस्वच्छतेने भरत चालली होती. हळूहळू त्या विहिरीचं पाणी दूषित झालं आणि त्याच पाण्यावर अनेक ग्रामस्थांना नाईलाजाने अवलंबून राहावं लागत होतं. आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या होत्या, पण परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पाऊल उचलणं आवश्यक होतं.
आज मात्र गावाने एकजुटीचं खरं उदाहरण दाखवलं. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला. श्रमदानातून सर्वांनी मिळून ती विहीर साफ करण्याचा निर्णय घेतला.
विहीर जवळजवळ ३० ते ४० फूट खोल शिवाय खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील नव्हत्या अशा परिस्थितीत लोखंडी शिड्या एकमेकांना बांधून त्या खाली सोडल्या.
त्या शिड्यांच्या सहाय्याने आम्ही चार पाच जण खाली विहिरीत उतरलो.
कोणी दोर घेऊन आले होते तर कोणी गाळ बाहेर ओढत होतं..कोणी कचरा वेगळा केला, तर कोणी वरून मदत करत राहिलं. प्रत्येकाची एकच भावना होती—“आपलं पाणी, आपली जबाबदारी.”
या सर्व कामात मला देखील सहभागी होता आलं, याला मी माझं मोठं भाग्य समजतो. कारण अशा क्षणांमध्ये फक्त काम होत नाही, तर माणसांमधली एकता, जबाबदारी आणि एकमेकांप्रती आपुलकी अधिक घट्ट होते.
काही तासांच्या मेहनतीनंतर विहीर पुन्हा स्वच्छ झाली. गावाने स्वतःच आपलं आरोग्य परत मिळवलं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
पूर्वीची एकोप्याची गावगाडा संस्कृती, एकमेकांवर अवलंबून असलेली माणसांची नाती आणि निसर्गाशी जोडलेली गावाची नाळ अधोरेखित करणारी अशी गाव आजही आहेत याचा आनंद आहे.
आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान होते.
धन्यवाद!
महेश धिंडले
#payvata
1 month ago | [YT] | 359
View 7 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
सह्याद्रीच्या पायवाटा चालताना अनुभवलेला निसर्ग,
पश्चिम घाटातील जैव विविधता आणि त्यांच्या संवर्धनाची गरज…निसर्ग संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो..तालुक्यातील ऐतिहासिक वारसा स्थळ.
या विषयावर International Tourism Short Film Festival 2025 मध्ये बोलण्याची मला संधी मिळाली होती..
एखाद्या मंचावर बोलण्याची तशी ही माझी पहिलीच वेळ.
वेल्हे, भोर आणि मुळशीच्या समृद्ध निसर्गाचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
या मुलाखतीचा व्हिडिओ नुकताच ITSFF च्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित झाला आहे.
नक्की बघा 🙏🏻
व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/up3gFk92rhs?si=XEhry...
1 month ago | [YT] | 142
View 25 replies
Load more