पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.
Instagram ID :
instagram.com/paayvata
Facebook ID :
www.facebook.com/share/15jnUwAX4/
E Mail Id :
paayvata@gmail.com
Paayvata
काल पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अतिशय दुर्गम भागात जाण्याचा योग आला.
तिथलं निसर्गसौंदर्य जितकं विलोभनीय आहे, तितकंच तिथलं जगणं आजही संघर्षाचं आहे. मूलभूत गरजांसाठीही तिथल्या माणसांना रोज झुंजावं लागतं.
तिथल्या काही गरजू कुटुंबांना रोजच्या अंधारातून मुक्ती मिळावी आणि त्यांच्या रात्री प्रकाशमान व्हाव्यात, म्हणून त्यांना उपयोगी पडतील अशा ‘सोलर दिव्यांची’ (Solar Lights) छोटीशी भेट दिली.
ते दिवे हातात घेताना त्यांच्या डोळ्यात चमकलेला तो कृतज्ञतेचा आणि आनंदाचा प्रकाश... कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा खूप मोलाचा वाटला. माणसाने माणसाच्या सुखासाठी लावलेला हा एक छोटासा दिवा, त्यांच्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर करेल हा विश्वास आहे. 🤝❤️
दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्याच माणसांच्या आयुष्यात प्रकाशाची एक लहानशी किरण होता आलं, याचं मनापासून समाधान आहे.
महेश धिंडले
पायवाटा
#light #माणुसकी #humanity #मानवता #payvata
1 hour ago | [YT] | 129
View 9 replies
Paayvata
जुन्या रस्त्यांच्या कथा आणि
नव्या प्रवासाची वाट..
मी दोन्ही शोधतोय…
#payvata #paayvata #maheshdhindle #solo #travel
3 days ago | [YT] | 255
View 9 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ 📽️ लिंक 👇🏻
https://youtu.be/oy7WmYjHUXQ
याच राजवाड्यामध्ये महाराणी ताराराणी यांचे जळवळजवळ तीस वर्षे वास्तव्य होते..
याच ऐतिहासिक दुर्गावरून महाराणी ताराराणींनी औरंगजेबाला सात वर्षे झुंजवले होते..
याच दुर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आजारपणात मायेने सावरले होते..
याच दुर्गाने कित्येक रथी महारथींना आपल्या पोलादी कैदेत बंदिस्त ठेवले होते..
याच दुर्गाने औरंगजेबाच्या अथांग सेनेला तब्बल साडेचार महिने रडवले होते..
छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर जेव्हा स्वराज्यावर औरंगजेब नावाचे संकट आले होते तेव्हा महाराणी ताराराणींनी औरंगजेबाच्या त्या विशाल फौजेला ज्या जिद्दीने झुंज दिली होती त्या संघर्षात या किल्ल्याचा वाटा खूप मोठा होता.
पण आज मात्र या गडावर काही मन सुन्न करणाऱ्या गोष्टी पहायला मिळाल्या.
अशा या सातारा नगरीत वसलेल्या ऐतिहासिक दुर्गाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चैनल वर प्रदर्शित केला आहे.
नक्की बघा.
आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
धन्यवाद ! 🙏🏻
महेश धिंडले
4 days ago | [YT] | 182
View 2 replies
Paayvata
निष्पाप जीवावर जेव्हा क्रौर्य कोसळतं
तेव्हा माणुसकीच अस्तित्वचं प्रश्नांत येतं..
प्रश्न फक्त त्या निष्पाप चिमुकलीच्या मृत्युचा नाही
तर प्रश्न आहे आपल्या शांततेचा आणि इथल्या मुर्दाड व्यवस्थेचा..
#nasarapur #pune #navalebridge
2 weeks ago | [YT] | 239
View 8 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/l4CmBvASxw0
माझा सिंगापूर गावातील भटकंती मधील चौथा आणि शेवटचा व्हिडिओ घेवून आलोय.
उन्हाळ्यात सह्याद्रीतील ओढे नाले कोरडे पडतात. विशेषता एप्रिल आणि मे महिन्यात तर या ओढ्यांमध्ये पाण्याचा एक थेंब देखील पहायला मिळत नाही. असे असतानाही या गावातील महिला या ओढ्यांमधून खेकड्या पकडून आणतात.
कोरड्या ओढ्यांमधून पाणी नसताना ह्या खेकड्या कशा बाहेर येत असतील, त्यांना ह्या महिला कशा बाहेर काढत असतील याचे कुतूहल होते आणि म्हणून मी देखील यांच्या सोबत गेलो.
हा संपूर्ण प्रवास आणि त्यांची ही अनोखी पद्धत या व्हिडिओ मधून आपल्या समोर घेवून आलो आहे.
नक्की बघा!
महेश धिंडले
पायवाटा
#payvata #paayvata #villagelife
3 weeks ago (edited) | [YT] | 282
View 17 replies
Paayvata
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/UqCW5T7Rk6o
सह्याद्रीच्या डोंगर रांगेत, आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर राहणाऱ्या लहान मुलांचा जीवन प्रवास दाखवणारा व्हिडिओ.
या मुलांसोबत मला दोन तास घालवता आले त्यांचे रानातील बालपण जवळून अनुभवता आले.
व्हिडिओ नक्की बघा.
#payvata #villagelife #villagelifestyle
3 weeks ago | [YT] | 288
View 1 reply
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
नवीन व्हिडिओ लिंक
https://youtu.be/UqCW5T7Rk6o
आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर, सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अवघ्या सहा घरांची एक मानवी वस्ती लपलेली आहे.
इथे एखाद्या आजारी रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत वेळ गेलेली असते तर शाळेसाठी लहान मुलांना जीव धोक्यात घालून दररोज कित्येक डोंगर पार करावे लागतात.
इथला प्रत्येक दिवस एका नवीन संघर्षाने सुरू होतो.
पण तरीही ही माणस आणि त्यांचं हे विश्व आजही ठाम उभे आहे.
आपल्या परंपरा आणि निसर्गाचे जतन करत.
या मानवी वस्तीला आधुनिक जगाशी जोडते ती छोटीशी पायवाट.
या वस्ती पर्यंतचा माझा जंगल प्रवास आणि इथले अद्भुत मानवी जीवन मी व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर घेवून आलो आहे.
नक्की बघा 🙏🏻
महेश धिंडले
पायवाटा
4 weeks ago (edited) | [YT] | 350
View 10 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार 🙏🏻
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/JtQndSCUL3I
मागील व्हिडिओ मध्ये आपण घनदाट जंगलात एकट्याच राहणाऱ्या एका कुटुंबाचा प्रवास बघितला.
तिथून पुढे मी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सिंगापूर या गावी गेलो.
हे छोटसं गाव आणि गावापर्यंतचा माझा प्रवास आपल्याला या व्हिडिओ मधून पहायला मिळणार आहे.
नक्की बघा.
धन्यवाद!
महेश धिंडले
1 month ago (edited) | [YT] | 380
View 11 replies
Paayvata
सर्वांना नमस्कार
नवीन व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/O2GOTRUJ1tU
चारही बाजूने घनदाट जंगलाने, डोंगरांनी वेढलेल्या एका घराची आणि त्या घरात राहणाऱ्या एका दांपत्याच्या जिद्दीची ही गोष्ट आहे.
शेतीची राखण करण्यासाठी त्यांनी या जंगलात आपले घर उभे केले. तेव्हा पासून ते आज पर्यंत दररोज आ वासून उभ्या असणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करणारे हे कुटुंब या दाट जंगलात एकटेच कसे राहते ते या मी या व्हिडिओ मधून जाणून घेतले आहे.
वाटेत अचानक दिसलेल्या या घरापर्यंतचा माझा प्रवास या व्हिडिओ मधून दाखवले आहे.
नक्की बघा !
धन्यवाद 🙏🏻
#payvata #paayvata #village
1 month ago (edited) | [YT] | 334
View 16 replies
Paayvata
तो प्रासाद निवांत स्वास्थ्य कितीही देवो तुम्हांलागूनी
मी वेड्यापरी हिंडणारच सदा या गर्द रानातूनी!
#payvata #trekking #sahyadri #nature #tales
1 month ago | [YT] | 301
View 7 replies
Load more