TRAVEL भटकंती AND FOOD खाद्यभ्रमंती ❤️
Hello Everyone,
Welcome to our world where we travel, eat, roam and capture memories!!
Through this channel, we would like to share our travel memories, experience and information that can entertain and help you to plan your travel. This channel is also dedicated to all who want to explore places, cuisines and lifestyles, which eventually brings joy.
So hit the subscribe button and tune in to Spru Tales❤️❤️
-Spruhit n Mom
Follow us on Instagram
spru_tales
#sprutales
Spru Tales
माझ्या आयुष्यातील कणखर व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई ! मागच्या महिन्यात तिला देवाज्ञा झाली. तेव्हापासून प्रत्येक श्वास घेताना तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आईच्या मांडलेल्या संवेदना !! 🌸🙏🏻
मी कमल…पण अख्खं गाव मला ‘कमा’ या नावानेच ओळखायचं. माझं गाव कुंभवली. लग्न होऊन इथेच राहायला आले, म्हणून कित्येकांना माझं सासर एकलारे आहे हे माहितीच नव्हतं.
खूप आनंदाने संसार केला. आयुष्यातील कित्येक वळणांवर चढ–उतार पाहिले. उताराचा त्रास झाला, पण त्यातून कधीही कोणाबद्दल मनात काही वाईट ठेवलं नाही. मोठं मन करून नेहमी पुढेच जात राहिले.
सासरी मोठा प्रपंच… तोही तेवढ्याच जबाबदारीने आणि प्रेमाने सांभाळला. सासर–माहेर यांच्यात कधीही अंतर पडू दिलं नाही.
एका छोट्या गावात राहूनही माझ्या मुलींना आणि मुलाला चांगले संस्कार आणि शिक्षण मिळावं म्हणून मनापासून लक्ष दिलं.
मला फिरायला खूप आवडायचं. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक देवस्थाने पाहिली. खूप हिंमत करून चारधामसुद्धा फिरून आले. मला एखादं गाव पाहायला फार आवडायचं. कारण प्रेक्षणीय स्थळांपेक्षा गाव पाहिलं की मला जास्त समाधान मिळायचं. दोन वर्षांपूर्वी तर चक्क गोव्याला सुद्धा जाऊन आलो, माझा पहिलाच विमान प्रवास होता तो.
मला माझ्या ह्यांची…माझ्या नवऱ्याची सुंदर साथ लाभली. त्यांच्या सोबत हा प्रवास शांत आणि समाधानाने झाला. ५८ वर्षांचा संसार एकत्र काढला..कधी गोड–गोड बोलत, तर कधी उगाचच थोडंफार भांडत.
माझ्या सुखी संसारात मधूनमधून काही शारीरिक आणि मानसिक दुखणं आली, पण मुलींचा फोन आला की कधीच काही काळजी, चिंता आणि त्रास दाखवला नाही. सणांच्या वेळी मुली, जावई आणि नातवंड येणार म्हटलं की इतक्या वर्षांनीही तेवढीच उत्सुकता असे.
मला माझ्या मुलांना आनंदात, हसत, खेळत आणि नाचत पाहायला फार आवडायचं.
मागच्या दिवाळीत सगळ्यांची एकदम गाठ भेट झाली, नातवंड आली, मस्त फराळ केला सगळ्यांसोबत, माझ्या नणंदेसोबत खूप वेळ गप्पा मारल्या, नातवंडानां दोन चांगल्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यांना आपापल्या घरी जाताना भरपूर आशीर्वाद दिले.
असं सगळं छान चालू असताना दोनच दिवसात अचानक एका रात्री मला काहीतरी झालं. कळेना काय होतंय. सगळी माझी लोक डोळ्यासमोर आली असतील, सगळा आजवरचा प्रवास फ्लॅशबॅक झाला असेल कारण आता मला ते आठवत नाही ना. माझे आई बाबा आले होते बहुतेक घ्यायला, त्यांना असं अचानक आलेलं पाहून गोंधळले. पण त्यांना म्हटलं थोडं थांबा मी अशी कशी येऊ माझ्या घरच्यांशी नीट गाठभेट नको का घ्यायला. मुलाने घाबरत घाबरत हॉस्पिटला नेलं. मला काहीच शुद्ध नव्हती. बहुतेक मला जाणवत होतं त्यांची धावपळ.. एरवी माझा आवाज इतका मोठा असतो ना तो शांत झालेला बघून ते कावरे बावरे झाले होते. हॉस्पिटल मध्ये माझ्या सगळ्या जवळच्या माणसांनी गर्दी केली होती. माझ्या मुलींना, मुलाला, सुनेला, जावयांना आणि सगळ्या माझ्या लोकांना मला डोळे भरून बघायचा आनंद दिला.. चार दिवस त्यांनी माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये काढले. माझा जीव आहे ना त्यांच्यावर असं कसं अचानक गेले असते? तस तर इकडून निघायची इच्छा नव्हती होतं पण जड अंतःकरणाने त्यांना म्हटलं आता माझी वेळ झालीये आई बाबांना नाही जास्त थांबवू शकत आणि त्यांचा सगळ्यांचा मनापासून निरोप घेतला. तो इतका जड जाईल वाटल नव्हतं, माझ्या गावातल्या माझ्या वहिनी, आम्ही मैत्रिणीसारखे जास्त होतो ना त्या आलेल्या मी जाताना मला भेटायला म्हणत होत्या..”कुठे निघालीस हा गोकुळ सोडून” पण काय करणार? त्या भगवंताची तीच इच्छा होती त्याला कोण थांबवू शकलंय का? आणि माझ्या पुढच्या प्रवासाला मी निघाले, माझं गोकुळ मागे ठेवून. तुम्ही सगळे आनंदात रहा एका आईला दुसरं काय हव असत नाही का?
तुमची लाडकी
आई🌸
1 month ago | [YT] | 8
View 1 reply
Spru Tales
Shubh Dhanteras! Wishing you immense prosperity and good luck.🌼💛
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Spru Tales
शुभ दसरा 🌿🍀
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Spru Tales
अंबे माते की जय 🌸🌸
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Spru Tales
New vlog today at 11:00 am 😍😍Stay tuned❤️
Daily vlog madhe new competition 😂 Family.Food.Fun.Repeat
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
Spru Tales
Happy Independence Day 🧡🤍💚
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
Spru Tales
आम्ही अडराई जंगल ट्रेकमध्ये अनेक धबधबे पाहिले, सोबतच थरारक पूरासारखी परिस्थितीही अनुभवली 😨😍🤩
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
Spru Tales
New vlog coming today 😍 stay tuned to Spru Tales!! Any guesses for the location 🤩🤩
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
Spru Tales
Nature and Monsoon…best collab ever 😍😍
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
Spru Tales
जननी जन्मभूमी ❤️🌸🇮🇳
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more