मागच्या रविवारी झपाटल्या सारखं घर आवरलं.....😁 झपाटण्याचे हे झटके मला पुर्वी खुप यायचे पण हल्ली फक्त पाहुणे रावळे येणार असतील तरच येतात...... काय औषध गेलं पोटात काय माहीत पण झटके येण्याची ही कठीण बिमारी आपोआपच बरी झाली माझी 😁म्हटलं चला बिन औषधाचच बरे झालो आपण.... पुर्वी कुणी आलं तर घर घाण झालेलं बघुन काय म्हणेल याचं खुप टेन्शन असायचं... पण आता मी त्याचा विचारही करत नाही... 🤣जे म्हणायचे आहे ते म्हणा...... कारण सोमवार ते शुक्रवार वार नोकरीमधे जेवढे कष्ट होतात तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त शनिवार रविवार घरामधे होतात...आणि आपण एक कष्टकरी महिला आहोत असं वाटायला लागतं... 😍पार झोपेतही दिसतात कपड्यांचे ढिग... दळणाचे डब्बे.. भाज्यांच्या पिशव्या... लोणी करायची गच्च भरलेली साय... घाण झालेलं फ्रिज..... बेडशिट..... पाणि घालायला वेळ न मिळालेली झाडे..... इस्त्रीचे कपडे.. अस्ताव्यस्त झालेले कपाटं.... किचन ट्रॉलीज.......आणि काय काय अन काय काय....... एवढं सगळं केलं ना तरी ते कमीच असतं....... सगळं होईपर्यंत मला तर आंघोळीला तीनच वाजतात..... तरी स्वयंपाक रविवारी वन डिश मिलच असतो....... ज्यांचं घर नेहमी स्वच्छ, टापटीप असतं ना त्या बायकांचं ना मला खुप म्हणजे खुपच आश्चर्य वाटतं... 🤔कि कसं काय बुवा यांना हे जमतं... 🙄पण जर आपण एखादीला विचारलं ना तर अजिबात कुणी काही सांगत नाही उलट काही नाही गं असच... म्हणुन वेळ मारुन नेतात आणि घरी जाऊन पुन्हा साफसफाई करायला लागतात... 😁 बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर नावाच्या या छोट्या इंडस्ट्रीचे कागदोपत्री मालक खुप असतात.... पण साफसफाईची वेळ आली की सगळे धुम ठोकुन पळुन जातात..... 😁आणि आपण एकटेच मालक म्हणुन शिल्लक रहातो आणि बसतो आवराआवर करत.. शेवटी नवरा बिचारा उभा रहातो मदतीला आणि "कशाला नको ते कुटाने करत बसतेस...." 😁 एवढे वाक्य टाकतो नी पुन्हा कपाटातले कागदपत्र उचकण्यात बिझी होऊन जातो.... या नवऱ्यांना सारखं सारखं त्या कागदपत्रातुन काय शोधायचं असतं कळतच नाही... दर आठदिवसाला त्याची उचकपाचक..... 😂 बरं होबातोबा करत ही इंडस्ट्री सांभाळतो खरं आपण...पण ना या इंडस्ट्रीचे शेअरचे भाव वाढतात ना आपला पगार.... 😁पण तरीही जी जान लगाके आपण ही इंडस्ट्री चालवत असतो........ बरं साफसफाई करताना खोल्यांच्या वाटण्या केल्यातरी "घ्या घ्या". म्हणुन आग्रह करुनही कुणी घेत नाही... 😁एरवी खायला काही केलं आणि विचारलं नाही तर म्हणतात "तु आग्रह केला नाहीस तरी मी घेतोच...." पण सफाईची वाटणीची खोली कोणीच घेत नाही... 😁 त्यामुळे आपण बिचारे रविवारी लगे रहो मुन्नीबहन म्हणुन चालुच ठेवायचं काम.... 😢 पण मी पण काही कमी नाही.... या सगळ्याची कसर म्हणुन स्वयंपाक short but tasty असाच करते... तेवढीच वेळेची बचत आणि मुन्नीबहनचे कष्ट कमी.... 😀 कसंबसं सगळं संपवता संपवता मधे मधे करमणुक म्हणुन मोबाईल बघावा तर त्या पाच मिनिटात सगळं घरदार आपल्याला डोळे मोठे करुन करुन बघुन जातं... आणि काम करताना कुणीच बघत नाही... 😭कुठे गायब होतात कोण जाणे.....?? 🤔 असो.... तुम्ही म्हणाल काय पुराण लावलय सकाळी सकाळी...... 😀पण काय करणार.... जे करतो तेच येणार ना बाहेर..... चला तुम्ही पण कामातुन ब्रेक घेऊन वाचत असाल.... तर लवकर संपवा वाचन आणि पकडा आपल्या छोट्या इंडस्ट्रीतली खुर्ची... शिवाय तुम्ही मोबाईल बघताय हे दोनतीन जणं बघुनही गेलेत....😀. शेवटी काय हो.. करना है ही........ आणि एवढं सगळं केलं तरी *तुला काय कामं असतात!!! केलं तर कुठं बिघडतं* अशी मुक्ताफळे ऐकून घेतल्याशिवाय industry ची ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण होतं च नाही😰😰 लेखिका अज्ञात
Ashwini Collection
आरंभ आहे चैत्र मासाचा
गुढी तोरणे सण उत्साहाचा
पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Happy womens day
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
मागच्या रविवारी झपाटल्या सारखं घर आवरलं.....😁 झपाटण्याचे हे झटके मला पुर्वी खुप यायचे पण हल्ली फक्त पाहुणे रावळे येणार असतील तरच येतात......
काय औषध गेलं पोटात काय माहीत पण झटके येण्याची ही कठीण बिमारी आपोआपच बरी झाली माझी 😁म्हटलं चला बिन औषधाचच बरे झालो आपण....
पुर्वी कुणी आलं तर घर घाण झालेलं बघुन काय म्हणेल याचं खुप टेन्शन असायचं... पण आता मी त्याचा विचारही करत नाही... 🤣जे म्हणायचे आहे ते म्हणा......
कारण सोमवार ते शुक्रवार वार नोकरीमधे जेवढे कष्ट होतात तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त शनिवार रविवार घरामधे होतात...आणि आपण एक कष्टकरी महिला आहोत असं वाटायला लागतं... 😍पार झोपेतही दिसतात कपड्यांचे ढिग... दळणाचे डब्बे.. भाज्यांच्या पिशव्या... लोणी करायची गच्च भरलेली साय... घाण झालेलं फ्रिज..... बेडशिट..... पाणि घालायला वेळ न मिळालेली झाडे..... इस्त्रीचे कपडे.. अस्ताव्यस्त झालेले कपाटं....
किचन ट्रॉलीज.......आणि काय काय अन काय काय....... एवढं सगळं केलं ना तरी ते कमीच असतं....... सगळं होईपर्यंत मला तर आंघोळीला तीनच वाजतात..... तरी स्वयंपाक रविवारी वन डिश मिलच असतो.......
ज्यांचं घर नेहमी स्वच्छ, टापटीप असतं ना त्या बायकांचं ना मला खुप म्हणजे खुपच आश्चर्य वाटतं... 🤔कि कसं काय बुवा यांना हे जमतं... 🙄पण जर आपण एखादीला विचारलं ना तर अजिबात कुणी काही सांगत नाही उलट काही नाही गं असच... म्हणुन वेळ मारुन नेतात आणि घरी जाऊन पुन्हा साफसफाई करायला लागतात... 😁
बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर नावाच्या या छोट्या इंडस्ट्रीचे कागदोपत्री मालक खुप असतात.... पण साफसफाईची वेळ आली की सगळे धुम ठोकुन पळुन जातात..... 😁आणि आपण एकटेच मालक म्हणुन शिल्लक रहातो आणि बसतो आवराआवर करत.. शेवटी नवरा बिचारा उभा रहातो मदतीला
आणि "कशाला नको ते कुटाने करत बसतेस...." 😁
एवढे वाक्य टाकतो नी पुन्हा कपाटातले कागदपत्र उचकण्यात बिझी होऊन जातो.... या नवऱ्यांना सारखं सारखं त्या कागदपत्रातुन काय शोधायचं असतं कळतच नाही... दर आठदिवसाला त्याची उचकपाचक..... 😂
बरं होबातोबा करत ही इंडस्ट्री सांभाळतो खरं आपण...पण ना या इंडस्ट्रीचे शेअरचे भाव वाढतात ना आपला पगार.... 😁पण तरीही जी जान लगाके आपण ही इंडस्ट्री चालवत असतो........
बरं साफसफाई करताना खोल्यांच्या वाटण्या केल्यातरी "घ्या घ्या". म्हणुन आग्रह करुनही कुणी घेत नाही... 😁एरवी खायला काही केलं आणि विचारलं नाही तर म्हणतात
"तु आग्रह केला नाहीस तरी मी घेतोच...." पण सफाईची वाटणीची खोली कोणीच घेत नाही... 😁
त्यामुळे आपण बिचारे रविवारी लगे रहो मुन्नीबहन म्हणुन चालुच ठेवायचं काम.... 😢
पण मी पण काही कमी नाही.... या सगळ्याची कसर म्हणुन स्वयंपाक short but tasty असाच करते... तेवढीच वेळेची बचत आणि मुन्नीबहनचे कष्ट कमी.... 😀
कसंबसं सगळं संपवता संपवता मधे मधे करमणुक म्हणुन मोबाईल बघावा तर त्या पाच मिनिटात सगळं घरदार आपल्याला डोळे मोठे करुन करुन बघुन जातं... आणि काम करताना कुणीच बघत नाही... 😭कुठे गायब होतात कोण जाणे.....?? 🤔
असो.... तुम्ही म्हणाल काय पुराण लावलय सकाळी सकाळी...... 😀पण काय करणार.... जे करतो तेच येणार ना बाहेर..... चला तुम्ही पण कामातुन ब्रेक घेऊन वाचत असाल.... तर लवकर संपवा वाचन आणि पकडा आपल्या छोट्या इंडस्ट्रीतली खुर्ची... शिवाय तुम्ही मोबाईल बघताय हे दोनतीन जणं बघुनही गेलेत....😀. शेवटी काय हो.. करना है ही........
आणि एवढं सगळं केलं तरी *तुला काय कामं असतात!!! केलं तर कुठं बिघडतं* अशी मुक्ताफळे ऐकून घेतल्याशिवाय industry ची ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण होतं च नाही😰😰
लेखिका अज्ञात
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Superhit movies super hit saree collection book your order fast limited stock...
What's app wa.me/message/47IEBMMYB5GGF1
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Which one is best plain or printed please suggest which one is trending 👇
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Katan silk sarees beautiful colours and combination available
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Ashwini Collection
Wishing you a very happy new year to my YouTube family
Let's welcome 2023 ...
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Ashwini Collection
New Georgette collection
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Plain or peacock border which one is better
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Collection
Plain or peacock border which one is better
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more