मित्रांनो, Abk Online Tips मराठी YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनेलमध्ये तुम्हाला सरकारी योजनांची आणि इन्टरनेट वर उपलब्ध असलेल्या डिजिटल प्लेटफार्म बद्दल माहिती मराठी भाषेत मिळत राहील.
माझे दुसरे शॉर्टस वीडियो चे यूट्यूब चैंनल @marathidigitaltips
मित्रांनो या चॅनल च्या माध्यमातून तुम्हाला,
सरकारी योजना, सरकारी माहिती बद्दल नॉलेज भेटेल. ऑनलाइन सरकारी कागतपत्र कसे बनवायचे तसेच डिजिटल प्लेटफार्म बद्दल सम्पूर्ण माहिती भेटेल तेहि मराठी भाषेत.
तसेच या व्यतिरिक्त,
a) ब्लॉगिंग कसे करावे? आणि ऑनलाइन ब्लॉगिंग टूल्स कोणते आहेत?
b) सोशल मीडिया साइट्सचा वापर करून आपण व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवू शकतो?
d) शेयर मार्केट माहिती,
e) मोबाइल एप्लीकेशन संदर्भात टिप्स तुम्हाला भेटतील.
मित्रांनो, या सर्व विषयांबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कमेंट करून नक्की विचारा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, वीडियो शेयर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
#marathiyoutubechannel #abkonlinetips #marathitechchannel #digitaltips
Abk Online Tips
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Abk Online Tips
स्पॅम कॉल ची समस्या आता सुटणार..
#spamcall #telecom #digitalnews #abkonlinetips
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Abk Online Tips
सर्व मित्र परिवारांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Abk Online Tips
📙 *रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर, मोदी सरकारची नवी सुविधा, 2024 पर्यंत मिळणार लाभ..*
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील 269 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) फोर्टिफाइड तांदूळ (पोषक घटकांनी समृद्ध) वितरित केला जात आहे. देशातील उर्वरित जिल्हे मार्च 2024 च्या अंतिम मुदतीपूर्वी कव्हर केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे.
🗣️पुढे बोलतांना चोप्रा म्हणाले की, "केंद्र सरकारचा हा एक अनोखा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित आहोत." तसेच, यापूर्वी काही गैरसमज झाले होते, मात्र ते दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या उपक्रमामुळे स्वस्थ भारताचा पाया रचला जाईल, असे संजीव चोप्रा म्हणाले.
👉🏻याचबरोबर, आम्ही आतापर्यंत 269 जिल्ह्यांमध्ये पीडीएसद्वारे (रेशन दुकान) मजबूत तांदूळ वितरण सुरू केले आहे. ज्या गतीने आपण प्रगती करत आहोत, ते पाहता उर्वरित जिल्हे मुदतीपूर्वी योजनेच्या कक्षेत आणले जातील, असे संजीव चोप्रा यांनी सांगितले. तसेच, देशात सुमारे 735 जिल्हे आहेत, त्यापैकी 80 टक्क्यांहून अधिक लोक भात खातात. देशात पुरेसा मजबूत तांदूळ आहे, कारण सध्या या तांदळाची उत्पादन क्षमता सुमारे 17 लाख टन आहे, असेही संजीव चोप्रा म्हणाले.
🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल*
➖➖➖➖
3 years ago | [YT] | 0
View 0 replies
Abk Online Tips
💰 *खुशखबर! आता 15 हजार रुपये मिळणार...*
💁🏻♂️ राज्यातील कोतवालांसाठी मोठी खुशखबर आहे. आता कोतवालांचे मानधन वाढवण्यात आले आहे. कोतवालांच्या मानधनवाढीला राज्याच्या वित्त विभागाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार रुपये होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
👨🏻💼 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोतवालांच्या मानधनवाढीबाबत घोषणा केली होती.
✔️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत सादर प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक 17 मार्च, 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 रुपयावरून 15 हजार करण्यात येणार आहे.
📍 राज्यातील सर्व 12 हजार 793 कोतवालांना यापुढे दर महिन्याला सरसकट 15 हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. माहीतीनुसार, 15 हजार रुपये इतके मानधन दि. 01 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे, अशी माहीती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Abk Online Tips
⛰️ *नागरिकांना स्वस्त दराने मिळणार वाळू, कसे आहे दर आणि कोठे मिळेल? जाणून घ्या...*
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली..
▪️नव्या रेती धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ. खर्चही आकारण्यात येतील.
🚚 *असे होईल वाळूचे उत्खनन आणि वितरण?*
वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.
👥 नदी पात्रातील वाळू गटाचे निरिक्षण करण्याची कार्यवाही तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाइन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल.
🧐 जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकीर, भू-विज्ञान व खनीकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरिल न्यायधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.
🙏🏻 *कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल...*
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Abk Online Tips
👨🏻🌾 *मुख्यमंत्री सन्मान निधीबाबत मोठी बातमी, आजपासून कोणाला मिळणार लाभ?*
🎋 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना सन्मान निधी देणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जसा लाभ मिळतो तसाच लाभ राज्य सरकार सुरू करत असलेल्या 'मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे' दिला जाणार आहे. मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली.
💰 मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली असून योजनेसंबंधी कार्यवाही सुरु झाली असून एप्रिलनंतर राज्यातील 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे राज्य सरकार एकूण 1600 कोटी रुपये निधीचे वाटप करणार आहे. केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झाल्यानंतर पुढील 10-15 दिवसांत राज्याचा हप्ता जमा होईल, असे नियोजन केले जात आहे.
🗓️ मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ आजपासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून दिला जाणार आहे. सरकारने कृषी विभागाकडून माहिती संकलित केली आहे. एकाच सातबारा उताऱ्यावरील कुटुंबप्रमुख त्याची पत्नी व 18 वर्षांखालील दोन अपत्य, असे कुटुंब ग्राह्य धरून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतात.
📌 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचेच निकष मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीसाठी लागू असणार आहेत. योजनेसाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, पण जमीन लागवडीयोग्य असावी, असं बंधनकारक आहे. यासोबतच बॅंक खात्याला आधार लिंक केलेले शेतकरी, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ई-केवायसी केलेले पात्र शेतकरी, लाभार्थीच्या नावावरील सर्व मालमत्तेची माहिती दिलेल्यांनाच लाभ मिळू शकतो, अशी माहीती मिळत आहे.
🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल*
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Abk Online Tips
💰 *गुड न्यूज! आता मिळणार जास्त व्याज..*
💁🏻♂️ केंद्र सरकारने नागरिकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. ज्या नाहरिकांनी अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना आता अधिक फायदा मिळणार आहे. कारण केंद्र सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
➖➖➖➖➖➖➖
👉 पोस्ट ऑफिस ठेव योजना सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ करण्यात आली आहे. या बचत योजनांच्या व्याजदरात 10 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ झाली आहे. तर फक्त पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
📫 सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8.0 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के झाले आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता 8 टक्क्यांऐवजी 8.2 टक्के व्याज मिळणार आहे.
🏦 *मुदत ठेवींवरही मिळणार जास्त व्याजदर:*
¶ 1 वर्षाच्या ठेवींवर 6.6 ऐवजी 6.8 टक्के व्याज मिळणार
¶ 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.8 ऐवजी 6.9 टक्के व्याज मिळणार.
¶ 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.9 नव्हे 7.0 टक्के व्याज मिळणार
¶ 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7 टक्क्यांऐवजी 7.5 टक्के व्याज मिळणार
¶ 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याजदर 5.80 टक्क्यांवरून 6.20 टक्के करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Abk Online Tips
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Abk Online Tips
Pan card aadhar card link last Date Extended upto 30th June 2023
#pancard #pancardaadharlink #panaadharlinkdateextended #panaadhaarnewupdate #panaadhaarcardlink
👉मित्रानों तुम्हाला ही प्रेस रिलीज़ हवी असेल तर इंस्टाग्राम अकाउंट वर DM करा.
👉ऑनलाइन सरकारी आणी डिजिटल माहितीसाठी चैंनल ला SUBSCRIBE करायला विसरू नका 📲
Abk Online Tips Marathi Blog Link👇
abkonlinetips.blogspot.com/2023/03/pan-card-aadhaa…
3 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Load more