धर्म, कला, प्रवास, साहित्य, शिक्षण यासाठी समर्पित


Deshmukh sir

गणिताचे गूढ आणि जीवन

गणितात कोणत्याही अंकाला शून्याने गुणले की उत्तर शून्य येते. हे जीवनाचे मोठे सत्य आहे. तुमचा अहंकार, तुमची संपत्ती किंवा तुमचे ज्ञान कितीही मोठे असले (उदा. १०००), जर त्याला काळाच्या किंवा मृत्यूच्या शून्याने गुणले, तर शेवटी उरते ते फक्त 'शून्य'. पण, याच शून्याला जर तुम्ही एखाद्या अंकाच्या पुढे ठेवले (सहकार्य केले), तर तो त्या अंकाची किंमत दहा पटीने वाढवतो. म्हणजेच, स्वतः 'शून्य' राहून इतरांचे मूल्य वाढवणे, हेच श्रेष्ठ जगणे आहे.

1 week ago | [YT] | 0

Deshmukh sir

श्री अनुग्रहमूर्तये नमः

2 months ago | [YT] | 2

Deshmukh sir

Teachers day

3 months ago | [YT] | 1

Deshmukh sir

#मूलूक पीठाधीश्वर पूज्य संत श्री #राजेंद्रदासजी महाराज हे सरलता, गहन ज्ञान आणि उत्कट भगवद्भक्ती यांचा संगम आहेत. त्यांची वाणी ही खऱ्या अर्थाने #सनातन #वैदिक परंपरेची जिवंत आणि प्रमाण वाणी आहे, जी लाखो लोकांना #आध्यात्मिक मार्गावर प्रेरित करते.
#संतचित्रसेवा
#गणेशदेशमुख

5 months ago | [YT] | 2

Deshmukh sir

*वेदमूर्ती पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड: साधेपणा,तपस्या आणि ज्ञानाचा अद्भुत संगम*

भारताच्या ज्ञान आणि अध्यात्म परंपरेत काही तेजस्वी नक्षत्रे अशी आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानाच्या उपासनेला आणि समाजाच्या कल्याणाला समर्पित केले आहे. याच परंपरेतील एक देदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे मूर्धन्य विद्वान, पंडीत प्रवर, परम पूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड. भारत सरकारने त्यांच्या *शिक्षा आणि साहित्य* क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी *‘पद्मश्री’* पुरस्काराने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

द्रविड शास्त्रीजींचे जीवन म्हणजे वेदांसाठी केलेली एक अखंड तपश्चर्या आहे. त्यांनी वेदांच्या गहन अभ्यासातून केवळ ज्ञान प्राप्त केले नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीही आपले आयुष्य वेचले आहे. त्यांच्या तपस्वी जीवनाची आणि ज्योतिषशास्त्रातील अद्वितीय ज्ञानाची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आदराने चर्चा होते.
पवित्र नगरी काशी, जिथे गंगेच्या अमृततुल्य लाटा ज्ञान आणि अध्यात्माचा संदेश घेऊन अविरत वाहत असतात, अशा पावन भूमीवर द्रविड शास्त्रीजींचा निवास आहे. गंगेच्या रमणीय तीरावर असलेले त्यांचे शांत आणि साधे जीवन अनेक साधकांसाठी आणि जिज्ञासूंसाठी एक प्रेरणास्रोत आहे. या पवित्र वातावरणात त्यांनी वेदांचे सखोल मनन आणि चिंतन केले आणि आपल्या अमूल्य ज्ञानाने असंख्य लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांचे प्रवचन आणि लेखणी वेदांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत लोकांपर्यंत पोहोचवते, ज्यामुळे सामान्य माणसालाही भारतीय संस्कृतीच्या या मूलाधाराची ओळख होते. त्यांनी अनेक निष्ठावान विद्यार्थ्यांना वेद आणि ज्योतिषशास्त्राचे सखोल शिक्षण देऊन या प्राचीन ज्ञानाची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड हे ज्योतिषशास्त्राचे केवळ जाणकारच नव्हे, तर ते या शास्त्रातील एक अद्वितीय आणि प्रकांड पंडित म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ज्योतिषीय गणिताचा आणि भविष्य वर्तवण्याचा अनुभव अनेकदा अचूक ठरला आहे, ज्यामुळे त्यांची ज्योतिषशास्त्रातील विद्वत्ता सर्वमान्य आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे, तर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्था त्यांच्या ज्योतिषीय मार्गदर्शनाचा लाभ घेतात. *याच त्यांच्या अचूक ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा प्रत्यय अवघ्या देशाने अनुभवला, जेव्हा त्यांनी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शुभ आणि कल्याणकारी मुहूर्त निश्चित केला*. त्यांचे हे योगदान केवळ धार्मिक दृष्ट्याच महत्त्वाचे नाही, तर भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे.

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्रविड शास्त्रीजींचे असलेले आत्मीय संबंध त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून द्रविड शास्त्रीजींनी स्वाक्षरी करणे, ही घटना भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि पावित्र्य दर्शवते. एका महान तपस्वी आणि विद्वान व्यक्तीने देशाच्या नेतृत्वासाठी आपले आशीर्वाद देणे, या घटनेने भारतीय मूल्यांची आणि परंपरेची महती वाढवली आहे.

द्रविड शास्त्रीजींच्या तपस्वी वृत्तीची, त्यांच्या अलौकिक ज्योतिषीय ज्ञानाची आणि अत्यंत साध्या व निगर्वी राहणीमानाची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील आध्यात्मिक आणि ज्योतिषीय अभ्यासकांच्या वर्तुळात आदराने केली जाते. अनेक विदेशी अभ्यासकांनी आणि जिज्ञासूंनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेतला आहे, ज्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेचा संदेश जगभरात पोहोचला आहे.

प्रत्येक सनातनी हिंदूला आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यासारख्या महान तपस्वी आणि ज्ञानी गुरुवर्यांवर नितांत आदर आणि अभिमान आहे. त्यांनी आपल्या अगाध विद्वत्तेने आणि अत्यंत साध्या जीवनशैलीने भारतीय संस्कृती आणि वेद धर्माची पताका सदैव उंच ठेवली आहे. त्यांचे जीवन आणि कार्य आम्हा सर्वांसाठी एक अमूल्य आदर्श आहे.

अशा महान वेदमूर्तींच्या चरणी आम्ही भावपूर्ण नमन करतो आणि त्यांनी दाखवलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा आणि वेद धर्माची सेवा करण्याचा संकल्प करतो.

पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी आपल्या समर्पित सेवेतून वेदधर्माची पताका सदैव फडकत ठेवली आहे आणि याबद्दल प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे.

✍️ श्री.गणेश देशमुख
"अक्षयतृतीया" 2025

8 months ago | [YT] | 2

Deshmukh sir

*प्राचीन मणिपूर ते मानवत: स्वामी दिव्यानंद सत्संग परिवाराच्या पसायदान प्रवचनमालेचा दिव्य अनुभव*

प्राचीन काळातील समृद्ध संस्कृती आणि अध्यात्माची भूमी असलेल्या मणिपूर नगरीत, आता मानवतेचे मानवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन भूमीत, स्वामी दिव्यानंद सत्संग परिवाराने एका अद्वितीय आध्यात्मिक पर्वाचे आयोजन केले होते. हरिभक्त परायण, परम वैष्णव, वेदांतसूर्य, संत श्री चैतन्य महाराज देगलुकर यांच्या अमृतवाणीतून 'पसायदान' या गहन विषयावरील तीन दिवसीय प्रवचनमालेने श्रोत्यांना ज्ञान आणि भक्तीच्या सागरात डुबवून टाकले.
परम वैष्णव वैकुंठवासी सद्गुरू धुंडामहाराज यांच्या लोककल्याणाच्या तळमळीची आणि लोक उद्धाराच्या उदात्त परंपरेचा वारसा संत श्री चैतन्य महाराज देगलुकर समर्थपणे पुढे चालवत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अलौकिक सेवेने श्रीगुरु निवृत्तीनाथांना प्रसन्न केले आणि केवळ स्वतःसाठी नव्हे, तर समस्त विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांनी आपल्या गुरुंना जे मागणे मागितले, तेच हे पसायदान! या पसायदानाच्या आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले चैतन्य महाराजांचे विवेचन श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले.
आपण दररोज पसायदान म्हणतो, पण त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ किती खोलवर आणि व्यापक आहे, याचा विचार करण्याची संधी या प्रवचनमालेने दिली. महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वरी आणि पसायदान ही ज्ञानेश्वर माऊलींची दोन परस्परपूरक निर्मिती आहेत. जणू ज्ञानेश्वरीतील ज्ञान आणि अनुभवाचा सार म्हणजेच हे पसायदान! विश्वात्मक देव म्हणजे परब्रह्म परमात्मा, आपले सद्गुरू यांना माऊलींनी हे कल्याणकारी मागणे मागितले आहे. या जगात असलेल्या प्रत्येक जीवातील वाईट विचार, दुर्गुण आणि नकारात्मक वृत्ती समूळ नष्ट व्हाव्यात आणि त्यांच्या मनात सत्कर्म करण्याची ओढ निर्माण व्हावी, ही त्यामागची उदात्त भावना आहे.
पसायदानावर प्रवचन करताना चैतन्य महाराजांनी अत्यंत रसाळ आणि ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी योगवसिष्ठ, महाभारत, उपनिषद, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांसारख्या अनेक प्रामाणिक ग्रंथांतील दाखले देत आपल्या विवेचनाला अधिक उंचीवर नेले. मराठी साहित्यातील अलंकाराचा परिचय महाराजांनी श्रोत्यांना करून दिला .संत संगतीचा महिमा विशद करताना ते म्हणाले की, देवांना देखील दुर्लभ असे संतांचे दर्शन जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे. संतांच्या सानिध्यात आल्याने जीवनातील अनेक क्लेश आणि अज्ञान दूर होते आणि आत्मिक शांतीचा अनुभव मिळतो. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा या दोन प्रासादिक ग्रंथांचे वाचन प्रत्येकाने करून आपले जीवन धन्य करावे असे महाराजांनी आवर्जून सांगितले .
या तीन दिवसांच्या प्रवचनमालेने मानवत नगरीतील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. भगवान श्रीहरि विठ्ठलाच्या नामघोषाने आणि चैतन्य महाराजांच्या ज्ञानवर्षावाने सर्वांना एक अद्भुत चैतन्याचा अनुभव आला. दररोज म्हटले जाणारे पसायदान किती अर्थपूर्ण आणि जीवनात परिवर्तन घडवणारे आहे, याची नव्याने जाणीव या प्रवचनातून उपस्थितांना झाली.
मानवत नगरीतील नागरिकांची ही तीव्र इच्छा आहे की आदरणीय चैतन्य महाराजांचे या पवित्र भूमीवर पुन्हा पुन्हा आगमन व्हावे आणि आम्हाला त्यांच्या चरणांची सेवा करण्याची तसेच त्यांच्या मुखातून वेदांताचे अमृत ऐकण्याची संधी मिळत राहावी. हीच आमची विठुरायाच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे! या प्रवचनमालेने केवळ ज्ञानामृतच पाजले नाही, तर अनेक जीवांना सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनाचा खरा अर्थ गवसला, यात शंका नाही.

राम कृष्ण हरि🙏

✍🏻 गणेश देशमुख . मानवत

8 months ago | [YT] | 1

Deshmukh sir

विरिञ्चि- विष्णु- शङ्करसंस्तुया: भगवत्याः सर्वस्याद्याः महालक्ष्मी देव्याः।

#Budhaashtami #Mahalaxmi #kolapur

10 months ago | [YT] | 4

Deshmukh sir

आज वसंत पंचमी
सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीविद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु में सदा॥

10 months ago | [YT] | 3

Deshmukh sir

पानिपत की रणभूमी में अपनी मातृभूमी राष्ट्र , धर्म , संस्कृती के लिए अपना सर्वोच्च बलिदान देनेवाले सभी नरशार्दूल वीरों को नमन !!!

11 months ago | [YT] | 2

Deshmukh sir

श्री अमृताश्रम स्वामी यांनी चित्रावर स्वाक्षरी करून आशीर्वाद दिला .

1 year ago | [YT] | 3