पुणे न्यूज़

Pune news network

पुणे न्यूज़

Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@पुणेन्यूज़/community

1 month ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

राष्ट्रवादी काँग्रेस हा फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुढे नेणारा पक्ष
-अजित पवार यांचे प्रतिपादन

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे केले.

पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी गावात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, प्रभाग क्रमांक 21 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम,शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, गिरीजा कुदळे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, नाना काटे,राम आधार धारिया , श्रीरंग शिंदे, विजय कापसे, शांती सेन,विजय लोखंडे, राणी कापसे उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी आपले विरोधक आता कोणतेही वाद निर्माण करतील. पण कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, या शहराचे मी 25 वर्ष नेतृत्व केले. जात धर्मभेद न मानता अनेकांना पदे दिली. साधा पानपट्टी चालविणारे अण्णा बनसोडे आता विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. कविचंद भाट यांना महापौर पद दिले.आदिवासी व्यक्तीला महापौर पद दिले.राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. व पिंपरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

1 month ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

*स्टार एचएफएल धोरणात्मक वाढीच्या रोडमॅपचा भाग म्हणून एनएसई लिस्टिंगचा पाठपुरावा करणार !*

मुंबई, १७ मे २०२५ : स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (स्टार एचएफएल), एक बीएसई सूचीबद्ध गृह वित्त कंपनी (बीएसई स्क्रिप कोड बीओएम: ५३९०१७) जी अनेक राज्यांमध्ये कमी किमतीच्या किरकोळ गृह वित्त क्षेत्रात कार्यरत आहे, ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर त्यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रस्तावित सूचीकरण पात्रता निकषांची पूर्तता आणि सर्व आवश्यक नियामक मंजुरी प्राप्त होण्याच्या अधीन आहे.
स्टार एचएफएल सध्या बीएसई वर सूचीबद्ध आहे आणि अर्ध-शहरी आणि ग्रामीण भारतातील कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गृह वित्तपुरवठा करून सातत्याने मजबूत कामगिरी, विवेकपूर्ण जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक समावेशनासाठी खोल वचनबद्धता प्रदर्शित केली आहे.
स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे ​​सीईओ श्री. कल्पेश दवे म्हणाले, “एनएसईवर लिस्टिंग करण्याचा निर्णय दृश्यमानता वाढवणे, आमच्या भागधारकांसाठी तरलता वाढवणे आणि आमचा गुंतवणूकदार आधार वाढवणे या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टांशी सुसंगत आहे. आम्ही एक मजबूत आणि समावेशक गृहनिर्माण वित्त प्लॅटफॉर्म तयार करत असताना, दुहेरी सूचीकरण आमची बाजारपेठेतील उपस्थिती आणखी मजबूत करेल आणि भांडवली बाजारपेठेतील प्रवेश सुधारेल. आम्ही सर्व भागधारकांना दीर्घकालीन मूल्य प्रदान करताना परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
कंपनी नियामक प्रक्रिया आणि प्रस्तावित सूचीकरणाशी संबंधित टप्पे पार करत असताना तिच्या भागधारकांना माहिती देत ​​राहील.
स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (स्टार एचएफएल) बद्दल:
स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (स्टार एचएफएल) ही बीएसईमध्ये सूचीबद्ध रिटेल गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. कंपनी स्थापनेपासून कमी किमतीच्या गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत आहे. स्टार एचएफएल तिच्या कार्यरत भौगोलिक क्षेत्रात कमी किमतीच्या गृहनिर्माण युनिट्स (परवडणारी गृहनिर्माण) खरेदी/बांधकाम करण्यासाठी ईडब्ल्यूएस/एलआयजी कुटुंबांना दीर्घकालीन गृहनिर्माण वित्त सहाय्य प्रदान करते. स्टार एचएफएल ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, एनसीआर आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कार्यरत असलेली व्यावसायिक कंपनी आहे. स्टार एचएफएल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) प्राथमिक कर्ज देणारी संस्था (पीएलआय) म्हणून नोंदणीकृत आहे. स्टार एचएफएलचे नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे

9 months ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल...

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल...

शासकीय जमिनीच्या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी लाचेची मागणी; लाच न दिल्याने चुकीची 'क' प्रत तयार करून नुकसान केल्याचा आरोप...

पुणे : येरवडा पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 198, 201 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय 41, व्यवसाय – व्यावसायिक, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी आपल्या मालकीच्या हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या जमिनीची मोजणी कायदेशीर रितीने सन 2023 व 2024 मध्ये करून घेतली होती. तथापि, या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी आरोपी अमरसिंह पाटील व किरण येटाळे यांनी मिळून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप आहेत.

फिर्यादी यांना धमकी देताना आरोपी येटाळे यांनी रक्कम २५ लाखांवर आणून दिली नाही तर "हेलिकॉप्टर शॉट" लावण्याची आणि मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली. लाच न दिल्याने आरोपींनी मालकाच्या शेजारच्या जमिनीची खोटी 'क' प्रत तयार करून, त्या आधारावर फिर्यादीचे नुकसान केल्याचे नमूद आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त (ACP) मच्छींद्र खाडे तपास करत आहेत. 

या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तपास सुरु असून लवकरच कारवाईची अपेक्षा तक्रारदार व्यक्त केली जात आहे.

भूमी अभिलेख तक्रारदार कृती समितीच्या पाठपुराव्याला यश...

या प्रकरणांमध्ये जवळपास साडेतीनशे तक्रारदार असून या सर्व तक्रार दारांना एका व्यासपीठावर आणण्याचा काम हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार मुज्जम्मील शेख आणि सचिन तापकीर यांनी केले होते. गुन्हा दाखल आणि अमर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि हे बडतर्फ व्हावे यासाठी कृती समितीने सातत्याने महसूल मंत्री व राज्य शासनाकडे प्रयत्न केले होते. या पाठपुराव्याला त्यांना यश प्राप्त झाले आहे.

अमरसिंह पाटील यांची खाते अंतर्गत चौकशीही होती सुरू...

दरम्यान, अमरसिंह पाटील यांच्याविरुद्ध खातेस्तरावरही चौकशी सुरू आहे. हवेली तालुक्यातील मोजणी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याने राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. २२ व २३ मार्च रोजी शासकीय सुट्टी असूनही कार्यालय सुरू ठेवून तपासणी करण्यात आली होती. या चौकशीमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे.

10 months ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल...

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल...

शासकीय जमिनीच्या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी लाचेची मागणी; लाच न दिल्याने चुकीची 'क' प्रत तयार करून नुकसान केल्याचा आरोप...

पुणे, : येरवडा पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 198, 201 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय 41, व्यवसाय – व्यावसायिक, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी आपल्या मालकीच्या हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या जमिनीची मोजणी कायदेशीर रितीने सन 2023 व 2024 मध्ये करून घेतली होती. तथापि, या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी आरोपी अमरसिंह पाटील व किरण येटाळे यांनी मिळून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप आहेत.

फिर्यादी यांना धमकी देताना आरोपी येटाळे यांनी रक्कम २५ लाखांवर आणून दिली नाही तर "हेलिकॉप्टर शॉट" लावण्याची आणि मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली. लाच न दिल्याने आरोपींनी मालकाच्या शेजारच्या जमिनीची खोटी 'क' प्रत तयार करून, त्या आधारावर फिर्यादीचे नुकसान केल्याचे नमूद आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त (ACP) मच्छींद्र खाडे तपास करत आहेत. 

या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तपास सुरु असून लवकरच कारवाईची अपेक्षा तक्रारदार व्यक्त केली जात आहे.

भूमी अभिलेख तक्रारदार कृती समितीच्या पाठपुराव्याला यश...

या प्रकरणांमध्ये जवळपास साडेतीनशे तक्रारदार असून या सर्व तक्रार दारांना एका व्यासपीठावर आणण्याचा काम हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार मुज्जम्मील शेख आणि सचिन तापकीर यांनी केले होते. गुन्हा दाखल आणि अमर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि हे बडतर्फ व्हावे यासाठी कृती समितीने सातत्याने महसूल मंत्री व राज्य शासनाकडे प्रयत्न केले होते. या पाठपुराव्याला त्यांना यश प्राप्त झाले आहे.

अमरसिंह पाटील यांची खाते अंतर्गत चौकशीही होती सुरू...

दरम्यान, अमरसिंह पाटील यांच्याविरुद्ध खातेस्तरावरही चौकशी सुरू आहे. हवेली तालुक्यातील मोजणी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याने राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. २२ व २३ मार्च रोजी शासकीय सुट्टी असूनही कार्यालय सुरू ठेवून तपासणी करण्यात आली होती. या चौकशीमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे.

10 months ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

*भव्य बाईक रॅलीने आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची सांगता*

पुणे : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आरोग्यदूत आमदार सुनील कांबाळे यांच्या प्रचाराची सांगता भव्य बाईक रॅलीने करण्यात आली. झुलेलाल मंदिर, आझाद नगर वानवडी येथून निघालेल्या या रॅलीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅम्प येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात करण्यात आला.

या भव्य बाईक रॅली मध्ये माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (आठवले) चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महेश पुंडे, बाळासाहेब जानराव आदींसह यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील कांबळे म्हणाले,  कॅंटॉन्मेंट मतदारसंघात पुणे स्टेशन आणि रुबी हॉल सोबतच इतरही आवश्यक ठिकाणी मेट्रो यावी व नागरिकांच्या प्रवासाच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मेट्रोचा विस्तार करण्याचा तसेच रिक्षा चालक आणि मालक यांच्यासाठी स्थापन झालेल्या महामंडळामार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम देखभालीची सुविधा उपलब्ध करून त्यांची आर्थिक स्थिती सक्षम करण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प आहे. मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. ज्यामुळे लाखो महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकता आले.  येणाऱ्या काळात महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोळीबार मैदान येथील पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण करून लहुजी वस्ताद स्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असताना आता भारतरत्न  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करून घेतला. सुशोभीकरणाची नियोजित कामे आता प्रगतीपथावर असून येणाऱ्या काळात हे काम पूर्णत्वास नेऊन हा परिसर सुशोभित करणे आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी वाटचाल सुरू आहे.  मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता मला पुन्हा नक्की संधी देईल असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.

1 year ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

*रामदासजी आठवले सुनील कांबळेंच्या प्रचारासाठी उतरले मैदानात*

पुणे कँटॉनमेंट मतदारसंघात सुनील कांबळेंच्या प्रचारासाठी प्रभाग २० येथील भिमशक्ती चौक, ताडीवाला रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.
या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंटचे पदाधिकारी कॅन्टोन्मेंटचे या पदयात्रेसाठी भाजपाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राचे प्रभारी सि.टी.रविजी, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक प्रदीप दादा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे प्रदेशाचे नेते बाळासाहेब जानराव, नेते पुणे शहर प्रभारी मित्र शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका हिमालीताई कांबळे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे, नेते बस्वराज गायकवाड, नेते महेंद्र कांबळे, जयवंत त्रिभुवन, अशोक शिरोळे, विजय बोकेफोडे, संजय बनसोडे, भगवान गायकवाड, लियाकत शेख, राष्ट्रवादी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संयोजक नगरसेवक उमेश गायकवाड, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे, किशोर धायरकर, सनी मेमाणे, दिलीप गिरमकर, गौतम सवाने, द्यानेश्वर कोठावळे, निलेश मंत्री, राहुल गायकवाड, सुरेश माने, जयप्रकाश पुरोहित, श्रीराम चौधरी, किरण कांबळे, चंद्रकांत कांबळे, माउली चौधरी, सुरेश धनगर, स्वातीताई धनगर, सुनिल भोसले, मोनीश पिल्ले, गणेश चौधरी, प्रताप शिर्के, अँडी जाधव, प्रकाश जगधने, महेश पारचा, मनिषाताई चव्हाण, दशरथ शेट्टी, जनार्धन जगताप, रोहित कांबळे, पुष्पक चव्हाण, सोमेश कांबळे, रामचंद्र देवर, राजू पिल्ले, दीपक गोफणे, रुपेश जगताप, रोहन रोमन, विपेश सोनिग्रा, दिनेश नायकू, संतोष थोरात, समीर शेख, भीमराव थोरात, सुरेखा कांबळे, ऋषिकेश थोपटे, वर्षाताई गायकवाड, धनश्रीताई शेट्टी, प्रणोतीताई सोनवणे, नागेश चव्हाण, रफिक शेख, मोनिश सोनार, दिपक शिंदे, सोनू काळे, प्रणय डांगी, रविंद्र खैरे, विद्यानंद बनसोडे, संदीप गायकवाड, तुषार परदेशी, देवांग शेलार, प्रेम तानवडे, प्रणय शिंदे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.

शहरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.

पुणे न्यूजवरील बातम्यांसाठी संपर्क करा.
मुकुंद कदम
9511835528

2 years ago | [YT] | 0

पुणे न्यूज़

नितिन गडकरी

2 years ago | [YT] | 0