चंद्रशेखर देशमुख हे एल . आय . सी . मध्ये यशस्वी विकासअधिकारी म्हणून कार्यरत होते . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन ( फिडे रेटिंग ) प्राप्त खेळाडू असून , एल . आय . सी . तील राष्ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळ पटू आहेत . अनेक मासिकातून कथा / कविता प्रकाशित झालेल्या असून आकाशवाणी जळगाव केंद्रावर विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत , व त्याच बरोबर ते चांगले बासरीवादक असून योगशिक्षक पदवी त्यानी प्राप्त केली आहे , १९८५ साली महाराष्ट्र सरकारने " गुणवंत " कामगार पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे , सुखी होण्याचा मंत्र ते खुल्या व्याख्यानाद्वारे देत असतात . त्याच बरोबर व्यतिमहत्व विकास आणि व्यवसायचे प्रशिक्षण देण्यात त्याचा हातखंडा आहे . त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानी सुखी व्हावे व जीवनात हेतू मानून त्याचे कार्य सुरु असते . त्याचे 'यशाचा राजमार्ग ' हे पुस्तक प्रकाशित झाले असून वाचकांच्या प्रतिसादामुळे सगळ्या आवृत्या संपल्या असून चवथी आवृत्ती प्रकशित झाली आहे .