श्री स्वामी समर्थ नमस्कार
ह्या चॅनल मार्फत आम्ही अप्रसिद्ध मंदिराच्या कथा आणि त्यांचा इतिहास आणि मंदिरात/मठात होणारे कार्यक्रम जसे कीर्तन, भारुड, प्रवचन, अनुभवकथन त्याचबरोबर दैविय उपासना, लक्ष्मी प्राप्तीचे तोडगे उपाय असे बरेच गोष्टींवरती व्हिडिओ बनवतो त्यामुळे आपण नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद
टीम देऊळगाथा
#TheeUntoldStoriesoftemples #swamisamarth #aaplapune #devasthanam #firstvlog #rayaru #mantralaya #akkalkot #TheeUntoldStorieswithsameer #TUSOT #Deoolgatha #देऊळ गाथा
Deool Gatha
चैतन्यमयी वातावरणात गणपती बाप्पांची स्थापना झाली. बघता बघता दिड दिवस, थोड्या कालावधीच्या सेवेनंतर पाच दिवस, गौरी आवाहन पुजन गौरी गणपती सोबत, सात दिवस इ.अशा घरगुती गणपती गौरींचे विसर्जन पुर्ण झाले.
पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व भक्तजन, नागरिक, बंधु भगिनी, मित्र मैत्रिणी आप्तेष्ट पाहुणे मंडळी, नातेवाईक यांनी असंख्य प्रमाणात मानाच्या गणपतींचे, जुन्या नामवंत मंडळांच्या पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक देखावे पाहण्याकरिता, उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याकरिता गर्दी केली.
टु व्हिलर, फोर व्हिलर घेऊन शहरांमधुन गजाननाच्या दर्शनास लाखोंच्या संख्येने लोक येत जात असताना, प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहुन उत्सव कालावधीत ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करित वातावरण कसं उत्तम राहिलं? शहर कसे स्वच्छ ठेवता येईल? आणि कुठलेही गालबोट लागणार नाही यासाठीची सर्व यंत्रणा सुव्यवस्थित चालविण्याचे अतिशय अवघड काम समस्त पोलिस, वाहतुक विभाग,पोलिस मित्र संघटना, मुल्य शिक्षणाचा वसा जोपासणारे शाळेतील एन.सी.सी. एम.सी.सी. चे विद्यार्थी विद्यार्थिनी काही सेवाभावी संस्था महापालिका कर्मचारी प्रशासन स्वच्छता विभाग,आप्तकालीन विभाग, अग्निशामक दल इ. लोकांनी पार पाडली. उत्सवातील शेवटचे चार दिवस तर अहोरात्र ते आपले काम अतिशय चोख बजावत होते. अहो यातील काही लोक तर आपले नोकरी व्यवसाय सांभाळून ही सेवा करतात.
या उत्सव कालावधीत अतिशय प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या समस्त सरकारी, निम-सरकारी, स्वयंसेवी संस्था, पोलिस दल, आरोग्य संस्था, सुरक्षा यंत्रणा आणि आपात्कालीन विभाग या संर्वांच मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ. उत्सव यांची मुहुर्तमेढ रोवली घरातील देव रस्त्यावर आणले यांचा एकमेव हेतु म्हणजे समाज एकत्र येऊन चांगल्या विचारांचे आदानप्रदान होऊन काही तरी उत्तम कार्य त्यांच्या हातुन घडावं. दुष्ट विघातक प्रवृत्तींचा समुळ नाश होऊन सामाजिक ऐक्य सलोखा बंधुता ऐकता सदोदित रहावी असा होता हे विसरून चालणार नाही.
चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती रिद्धी सिद्धी आणि बुद्धी या तिन्ही शक्ती ज्यांच्या बाजुस उभ्या राहुन ज्यांच्या सेवेत लीन आहेत अशा या प्रथम पूजक गजाननाला काल अनंत चतुर्दशीच्या परम पावन दिनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर” या भावपूर्ण स्वरात निरोप देताना एवढंच मागण मागूया,
“हे गणाधीशा या कलियुगात सत्याच्या न्यायाच्या बाजुने लढणाऱ्या सर्वांना प्रचंड बळ दे. दुष्ट शक्तींचा नाश करं. चांगलं तेचं आपलं या तत्वाशी नेहमी प्रामाणिक राहुन समाधानी राहण्याची बुद्धी तू समस्त मानवजातीला दे.”
मंगलमूर्ती मोरया 🙏🏻
3 months ago | [YT] | 878
View 23 replies
Deool Gatha
II श्री स्वामी समर्थ II
गेल्या १ महिन्यापासून आम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने आणि सद्गुरू दादामहाराज दामले यांच्या आशीर्वादाने " प्रश्न तुमचे उत्तर सदगुरूंचे " हा प्रश्न उत्तरांचा सिरीज चालू केली आहे त्याचे ८ भाग सुद्धा झाले आणि बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळाली तर आपल्याला हा आमचा प्रकल्प कसा वाटतो आणि हयात अजून काय बदल हवे आहेत का किंवा आपले काही प्रश्न असतील तर आम्हास नक्की कळवा
7 months ago | [YT] | 27
View 8 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
काही दिवसांपूर्वी आम्ही एक live विडियो करून प्रश्नोत्तरे विचारण्याचा एक नवीन प्रयत्न केला होता त्याला फार उत्तम प्रतिसाद दिला आपण त्यासाठी मनापासून धन्यवाद त्यामुळे पुनः एकदा उद्या म्हणजेच दिनांक २२ /०४/२०२५ रोजी दुपारी ११.१५ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहोत त्यामुळे परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराजांना काही प्रश्न विचारायचे होते तर आज ती संधी आहे आपल्याला साधनेबद्दल किंवा श्री स्वामी समर्थांच्या सेवे बद्दल किंवा नामस्मरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण इथे आपले प्रश्न पोस्ट करू शकता (जर करण्याजोगे असतील तर) किंवा आम्हाला आमच्या व्हाट्सअप नंबर वरती आपण आपले प्रश्न खालील फॉरमॅट मध्ये पाठवा त्यातील काही प्रश्न घेण्याचे आम्ही प्रयत्न करू .
नाव-
आपण कुठून बोलताय -
प्रश्न-
नंबर खालील प्रमाणे (कृपया फक्त व्हाट्सअप वर मेसेज करावा)
+९१९८२३६५२४९८
8 months ago | [YT] | 520
View 18 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ नमस्कार
येत्या 18 तारखेला रामपर्व हा सोहळा आपल्या साताऱ्यामध्ये होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला भेट द्या
ह्या कार्यक्रमांमध्ये विविध संत महंतांच्या पादुका तर येणार आहेच त्याचबरोबर नागा साधू सुद्धा या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहे आणि या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रामसेतू मधली शिळा ...एक वेगळीच देवी ऊर्जा नक्कीच या कार्यक्रमांमध्ये उत्पन्न होणार आहे आपण सर्वांनी या सनातन वैदिक धार्मिक कार्यक्रमाचा भाग होऊया.. ज्यांना ह्या कार्यक्रमांमध्ये किंवा कार्यक्रमासाठी काही दान करायचे आहे त्यांनी खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपली जी काही मदत आहे ती आपण पाठवावी आपली अगदी छोट्यातली छोटी मदत सुद्धा या कार्यक्रमाचा खूप मोठा आधार बनू शकते त्यामुळे सढळ हस्ताने दान करा ...आणि सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावे
8 months ago | [YT] | 89
View 2 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
नमस्कार, आम्हाला व्हाट्सअप वरती भरभरून प्रश्न आले आणि दादा महाराजांबरोबर बऱ्याच लोकांनी भेटण्याची इच्छा देखील दर्शवली आहे. वेळेच्या अभावामुळे सर्व प्रश्न घेता आले नाही परंतु आम्ही अजून काही भाग घेऊन येणार आहोत ज्यामध्ये उर्वरित प्रश्न त्याचबरोबर जे काही नवीन प्रश्न येतील त्या प्रश्नांचा समावेश सुद्धा येत्या भागांमध्ये करण्याचा प्रयत्न करू आपण दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी धन्यवाद असेच आपण आम्हास भरभरून प्रेम देत राहा आणि अजूनही ज्यांच्या कडून चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल त्या सर्वानी नक्की सबस्क्राईब करा.
ज्यांना वेळेच्या अभावामुळे आम्ही केलेला " प्रश्न तुमचे उत्तर सद्गुरूंचे " हा भाग बघता आला नाही त्या सर्वांसाठी त्या भागाची लिंक खाली पोस्ट करत आहोत नक्की बघा आणि आपले जर काही प्रश्न असतील किंवा आपल्याला आमचा हा उपक्रम कसा वाटतो हे आपण खाली कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा.
8 months ago | [YT] | 9
View 0 replies
Deool Gatha
श्री स्वामी समर्थ
आम्हाला सांगायला फार आनंद होत आहे की दिनांक १३/०४/२०२५ रोजी दुपारी ११.१५ वाजता आम्ही लाईव्ह येणार आहोत. बरेच दिवस झाले व्हाट्सअप वरती आम्हाला मेसेज येत होते की परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराजांना काही प्रश्न विचारायचे होते तर आज ती संधी आहे आपल्याला साधनेबद्दल किंवा श्री स्वामी समर्थांच्या सेवे बद्दल किंवा नामस्मरणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण इथे आपले प्रश्न पोस्ट करू शकता (जर करण्याजोगे असतील तर) किंवा आम्हाला आमच्या व्हाट्सअप नंबर वरती आपण आपले प्रश्न खालील फॉरमॅट मध्ये पाठवा त्यातील काही प्रश्न घेण्याचे आम्ही प्रयत्न करू .
नाव-
आपण कुठून बोलताय -
प्रश्न-
नंबर खालील प्रमाणे (कृपया फक्त व्हाट्सअप वर मेसेज करावा)
+९१९८२३६५२४९८
8 months ago | [YT] | 758
View 22 replies
Deool Gatha
योग्याच्या सानिध्यात काही मोजकेच क्षण - भाग १ ( दिवस पहिला )
महाकुंभ नजर लागेल असा पार पडला. लोकांनी, जगाने प्रचंड प्रशंसा केली, त्याचा आनंद घेत मी तेथेच काही दिवस थांबायचं ठरवलं होतं.
ह्या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळणार ह्यात मला काहीच शंका नव्हती. तो नेहेमीच मिळतो. ह्यावेळी फक्त सोशल मिडिया उतरल्या मुळे त्याला वेगळेच स्वरूप आले.
महाकुंभाची माहिती, त्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व लोकांना घर बसल्या कळतं होतं. त्यात हा सोहळा १४४ वर्षांनी आला होता... त्याला अनन्य साधारण महत्व होतं.
हे असे होणार, असे माझे मन मला सहा महिन्यांपासून सांगत होतं. मी पंधरा दिवस आधीच तिथे रहायची सोय बघितली होती. तसा एकटा पोहचलो.... नियतीला ही मी एकटाच हवा होतो.... कदाचित.
महाकुंभ घडायच्या आधी अन् नंतरची ऊर्जा मला अनुभवायची होती. म्हणून मी महाकुंभा नंतर देखील रहायचे ठरवून माझे बुकिंग केलं होतं.
मी जेथे राहिलो होतो तिकडे ४०५ रूम्स होत्या. एक एक करून त्यात भगव्या वस्त्रात, तर काही पांढऱ्या वस्त्रात, तर काही भस्म लाऊन लंगोटीवर असे साधू राहायला येत होते, तर काही साध्वी ही त्यांच्या जटा, केस बांधून आपापल्या रूम्स मध्ये रहायला येत होत्या.
प्रत्येकाच्या गळ्यात वेगवेगळ्या रुद्राक्ष माळा होत्या. ह्या साऱ्या योग्यांच्या अस्तित्वाने एक आगळावेगळा दरवळ पसरत होता. उद, हिना, चंदन, भस्म, कस्तुरी....नक्की दरवळ कशाचा काहीच कळायला मार्ग नव्हता... पण प्रसन्न वाटतं होतं.
माझं अहो भाग्य की माझ्या आजूबाजूला ४०४ अशी देवाची माणसं राहायला येत होती. साऱ्यांच्या मुखात सतत पुट पुट होती. सारे स्वतःत मग्न होते.
महाकुंभाचा पहिला दिवस जवळ येत होता.
मला नीटस आठवत नाही पण बहुतेक दोन दिवस आधीची गोष्ट असावी...
समोर बसलेल्या योग्याचे वेगळेच रूप होते. योगी आपल्या जटा डोळ्यावरून मागे सारत मला बघत म्हणाले ' रिकामपणासाठी वेळ काढ. '
मी नजर चोरली. आजूबाजूला बघितलं, साऱ्यांनी डोळे बंद करून घेतले होते. ते मला बघत पुढे म्हणाले ' प्रथम, स्वतःचे निरीक्षण कर.'
' तु जसा आहेस तसा ... म्हणजे तसाच स्वतःशी रहा. कसली ही घाई न करता,अधीर न होता तुझे निरीक्षण...म्हणजे स्वतःचे निरीक्षण चालू ठेव....सुरु ठेव.'
शांततेत त्यांचे हे शब्द कानी पडू लागले...अन् हळू हळू माझे डोळे बंद होऊ लागले.
अचानक त्यांच्या हातातील छोटासा लाकडी हातोडा त्यांनी एका उपडी घातलेल्या छोट्याश्या घमेल्या सारख्या लाकडी भांड्यावर मारला. त्याला काय म्हणतात मला विचारायचे होते पण तो हातोडा मारल्याने त्याचे जे काही तरंग खोलीभर पसरले.... ते अद्भुत होते... अद्वितीय होते.... अन् खोलीभर एक वेगळाच दरवळ पसरला...
'तुझ्या दैनंदिन जीवनात तुझ्याकडे असा विचार करण्यासाठी वेळ आहे का?'
त्यांची भेदक नजर माझ्याकडे लागली होती...डोळे बंद असूनही ते माझ्याकडे बघत आहेत... बोलत आहेत...मला कळतं होते...
त्यात हे त्यांचे शब्द कानावर जणू वेगळेच संस्कार करू लागले होते....
मी पुन्हा किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला बघितलं. मला वाटलं बहुतेक लोक म्हणतील, 'आमच्याकडे त्यासाठी एकही क्षण नाही.'
पण बाजूला कोणी नव्हतं. सारेच निघून गेले होते.
'आपण वेळेच्या अधीन असतो. काम आणि आपल्या जीवनातील इतर सर्व गोष्टींचा दबाव असतो. आधुनिक जीवन पूर्वीपेक्षा जास्त व्यस्त आहे. दिवसभर, दररोज, आपण जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न करतो.'
'जर आपण अशा प्रकारच्या दिनचर्येत स्वतःला बुडवले तर, नकळतपणे परंतु अपरिहार्यपणे आपण आपल्या ' खऱ्या स्वतःची आणि खऱ्या आनंदाची ' दृष्टी गमावतो.'
' कोणत्याही दिवशी, फक्त दहा मिनिटेच तुम्ही काढा....' शून्यतेसाठी ', काहीही विचार न करण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.' ते बोलतं होते...
' म्हणजे मग तो वेळ फक्त तुमचे मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो ....आणि तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये तुम्ही फार वेळ अडकत नाही.'
एक एक शब्द माझ्या मनावर वेगळेच आघात करत होता....
' तुमच्या मनात विविध विचार येतील, परंतु त्यांना एक एक करून दूर करण्याचा प्रयत्न करा. त्या विचारांवर अगदी अल्प वेळ रेंगाळा.
त्याची आता ह्यावेळी काही गरज नाही हे मनाला समजवा. कदाचित तो कधीचा जुना असेल...नाहीतर अगदी ताजा असेल ... पण डोक्यात ठेवण्यासाठी गरजेचा नसेल... तर त्याला दूर करा...'
' हे असं जेव्हा तुम्ही करू शकाल, तेव्हा तुम्हाला सध्याचा क्षण, निसर्गातील सूक्ष्म बदल लक्षात येऊ लागतील... जे तुम्हाला जिवंत ठेवत आहेत. जेव्हा तुम्ही इतर गोष्टींमुळे विचलित होत नाही, तेव्हाच तुमचा शुद्ध आणि प्रामाणिक स्वभाव प्रकट होऊ शकतो....
त्यांच्या ह्या वाक्यांनी मी क्षणभर कुठे तरी पोहचलो....तर ते थांबले....म्हणले ' हे आता तुझ्या मनात आले आहे.... त्याची गरज आहे का बघ .... मी थांबतो....'
मी विलक्षण शांतता अनुभवली.... मन पुन्हा शून्यात गेलं....ते पुढे म्हणाले....
' कोणत्याही गोष्टीबद्दल विचार न करण्यासाठी वेळ काढ. साधे जीवन निर्माण करण्याच्या दिशेने तू पहिले पाऊल उचल.'
' महाकुंभात, गंगेत डुबकी मारताना जे सारे टाकून द्यायचे आहे ... ते तू टाकून पुन्हा वर उचल स्वतःला....तू पुन्हा नव्याने तिच्या कुशीत तरंग, उभा रहा.... म्हणजे गंगा मातेच्या कुशीत.
... वर आल्यानंतर तो क्षण जग. आपण एकटेच आहोत, आजूबाजूला कुणीही नाही.... तू अन् गंगा माता, हे इतकचं तुला बघता यायला हवं.'
मी जे डोळे बंद ठेवले होते, ते आता उघडू लागले होते. आपण जेव्हा जिथे असतो तिथेच असायला हवं हे सांगून कुणी तरी मला जाग केलं होतं....
डोळे पूर्ण उघडून बाजूला पाहिलं तर कोणीही नव्हतं....
क्रमशः
मंगेश वर्दे
9 months ago (edited) | [YT] | 14
View 2 replies
Deool Gatha
II श्री स्वामी समर्थ II II श्रीशंकर महाराज II ( भाग - ५ )
शंकर निश्चल स्थितीत बसल्यावर, बाबांनी सांगितले, शंकर, शरीर ढीलं सोडून डोळे मिटून घे. दोन भिवयांमध्ये म्हणजे नाकाच्या वरच्या टोकाकडे आतूनच पाहत रहा. हाताचा अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळवून हात मांडीवर ठेव. कणा मात्र ताठ ठेवायचा. ही देहाची स्थिती झाली. आता मन? आपल्या श्वासावर मनाला खिळवून ठेवायचे. मनाची गती वाऱ्यासारखी आणि स्थिती पाऱ्यासारखी असते. लवकर हाती सापडत नाही. शंकर, हा अध्यात्मातला सगळा प्रवास आहे. स्वतःचच अध्ययन करण्याचा. आपल्या देह मनाच्या, बुद्धीच्या सर्व हालचालीवर, चढउतारावर लक्ष ठेवायचं. दूर राहून निरीक्षण करण्याचा. हाच स्वाध्याय. स्व चं अध्ययन!
"पिंडी ते ब्रम्हांडी" हे ऐकलस कधी? म्हणजे जे आपल्यात आहे ते आत आहे. तेच विश्वात आहे. बाहेर आहे. आणखी बरंचसं सांगून ध्यान कसं लावायचं हे नीट समजावून सांगितले. आपल्या जन्मापासून मरेपर्यंत सोऽहं अखंड चालू असतो. मी आणि परमात्मा एकच आहोत. माझं मूळ स्वरूप तोच आहे या जाणिवेन श्वासोस्वास घेणं म्हणजे सोऽहं मंत्राचा जप करणे होय! भगवान शंकरांनी हाच मंत्र देवी पार्वतीला सांगितला होता. म्हणाले.....
" शिवादीक्रिमिपर्यंत प्राणिनां प्राणर्त्मना।
निःश्वासोच्छ् वासरूपेन मंत्रोयं वर्तते प्रिये।।"
विचारमग्न शंकराला पाहून बाबा म्हणाले, अवघड वाटते ना? पण हळूहळू तुझच तुला कळेल. आता तू एवढेच कर. आपलं मूळ स्वरूप तो परमात्मा आहे. आपल्या या देहाच्या देवळात तो परमात्मा राहतो आहे या जाणिवेनं श्वासांतून उमटणारा सोऽहं ध्वनी ऐक. त्यावरच मन एकाग्र कर.
बाबांनी आणलेलं कुशासन अंथरले व त्यावर शंकर बसल्यावर म्हणाले, आधी गुरुस्तवन म्हणायचं. सद्गुरूंना वंदन करायचं. आपली साधना तेच करून घेतात .त्यांच्या कृपेचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे अशी दृढ श्रद्धा ठेव. आणि आतून श्वास घे.
शंकर ध्यानाला बसले. बाह्य जगापासून मुळातच अलिप्त असलेले त्यांचं मन थोड्याच वेळात एकाग्र झाले. त्यांच्या शांत मुखाकडे पाहून बाबांना समाधान वाटले. मनात म्हणाले, समर्थांच्या कृपेने याला सिद्धावस्था यायला जास्त वेळ लागायचं नाही.
शंकरांनी बऱ्याच वेळाने डोळे उघडल्यावर, बाबांनी त्यांना बराच उपदेश केला. जपा मधले स्थळ आणि स्थूल आणि सूक्ष्म भेद समजून सांगितले. यात मध्यान्ह टळून गेली. बाळा तुला भूक लागली असेल ना? होय बाबा. तू चूल पेटव. बाबांनी आपल्या झोळीतून एक पातेली, दोन चमचे, झाकण, दोन ताटल्या काढल्या. त्यांनी पुरचुंडीतून काही पाने काढून चुलीवर पातेलीत शिजवायला ठेवली. पर्णभोजन ताटलीत वाढून बाबा म्हणाले, खा बेटा. आता उद्या दुपारपर्यंत आपल्याला जेवणाची चिंता नाही. एवढ्याशा पानांनी? शंकर, निसर्गांने आपल्याला भरभरून दिलंय. या झाडांवर प्रेम केलं की तीही माणसाशी बोलतात. पण आज आपण हा ईश्वर दत्त अनमोल ठेवा गमावला आहे.
शंकर, तुला सर्व कळेल साधना करून. सोऽहंचा हात धरून जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाला ओळखशील तेव्हा तुला या एकत्वाची जाणीव होईल. अनुभूती येईल.
बाबा परत जायला निघाले. जाताना शंकराला आनंद स्वामींकडे जायला सांगितले. म्हणाले, मी तुझ्या संबंधी त्यांच्याजवळ बोललो आहे. त्यांची भेट घे. त्यांची मर्जी संपादन केलीस तर, तुला अध्यायना साठी दुसरीकडे जावं लागणार नाही. ते तुझा अभ्यास करून घेतील. आणि एक लक्षात ठेव. जे जे कोणी आपल्याला शिकवतात, ज्ञान देतात ते सगळे गुरुच समजून त्यांच्याशी आदराने, विनम्रतेने वागावे. बेटा, गुरु ही एक व्यक्ती नसते. ती एक शक्ती आहे. एक तत्त्व आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण करून त्या सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावे.
बाबांच्या सांगण्यानुसार शंकर आनंद स्वामींच्या आश्रमात गेले. तिथे ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन चालू चालत असे.
प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे आनंद स्वामी त्रिजुणी नारायण परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते. ते बहुभाषिक होते. कोणतीही भाषा ते इतक्या सफाईने बोलायचे की, जणू ती त्यांची मातृभाषाच आहे. आनंद स्वामींच्या चरणावर मस्त ठेवून शंकराने त्यांना प्रणाम केला. आशीर्वाद देत स्वामी म्हणाले, तू शंकर ना? बाबा बोलले तुझ्याबद्दल. इथे येत जा. तुझा प्राथमिक अभ्यास आमचा जनार्दन करून घेईल. उद्यापासून येऊ? उद्या का? आज पासूनच सुरुवात कर. एक लक्षात ठेव, माझी शिस्त फार कडक आहे. कामचुकार पणा चालणार नाही. चुकीला क्षमा नाही. शिक्षा भोगावी लागेल.
मी आपल्या शिस्तीत वागेन. आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. ठीक आहे म्हणून, त्यांनी हाक मारली.. जनार्दनऽ! जनार्दन पळतच आला. त्याला स्वामीं म्हणाले, हा शंकर. याला मी आखून दिला, तसा याचा अभ्यास करून घ्यायचा. याला घेऊन जा. आज्ञा स्वामी! म्हणून स्वामींना प्रणाम करून तो शंकरला घेऊन गेला.
क्रमशः
संकलन,लेखन व ©®
मिनाक्षी देशमुख.
10 months ago | [YT] | 392
View 6 replies
Deool Gatha
II श्री स्वामी समर्थ II II श्रीशंकर महाराज II ( भाग - ४ )
नर आणि नारायण यांच्या तपाची आठवण करून देणारे दोन पांढरे शुभ्र पर्वत बद्री वरून दिसणार, निळकंठ शिखर असणारे बद्रीके क्षेत्रातील ते निसर्गरम्य दृश्य पाहून शंकर हरखून गेले. कानावर पडत असलेल्या अनेक कथा उत्सुकतेने ऐकत होते. कुंडात स्नान करून मंदिराच्या आवारात गेले. अनेक देवांच्या मूर्ती दिसल्या पण वीर मारुतीच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. हे त्यांचे बालपणापासूनचे आवडते दैवत होते.
सकाळी त्यांचं बदरी नारायणाच्या अंगावर अलंकार, फुलांचेचे हार असल्यामुळे नीट दर्शन न झाल्यामुळे काही सोबती घेऊन रात्री निरवानिरव झाल्यावर दर्शनासाठी कांही सोबती घेऊन परत देवळात गेले. मनासारखे चतुर्भुज विष्णू मूर्तीचे दर्शन झाले.
दुसऱ्या दिवशी शंकरांची केदार यात्रा सुरू झाली. केदारनाथ हे पर्वच राजींनी वेढलेले एक विस्तीर्ण त्रिकोणाकृती पठार आहे. गावच्या दुसऱ्या टोकाला हे देऊळ आहे. समोर मोठा नंदी आणि त्याच्या पाठीशी मोठी घंटा. ती वाजवून शंकर तीन दालनांचा सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेले. नंदादीपाच्या मंद, स्निग्ध उजेडात शंकराला हे अद्वितीय लिंग गूढ रहस्यमय वाटले. केदारनाथ दर्शन झाल्यावर शंकराच्या बरोबरीची मंडळी गंगोत्री यमुनोत्रीच्या यात्रेला निघून गेली. शंकर इथेच एका धर्मशाळेत थांबले. केदारनाथच्या परिसरात फिरू लागले. भीम गुंफा पाहताना त्यांना वाटले, आपणही अशाच एखाद्या गुहेत राहावे. पण गुहा मिळेल कुठे? कुणा साधू संन्याशाची भेट झाली तर त्याला विचारता येईल.
शंकर नेहमी मंदाकिनीच्या काठावर फिरायचे. एकदा पुलाच्या कठड्याला टेकून नदीचा अवखळ प्रवाह निरखीत असताना, त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्यांनी दचकून वळून पाहिलं आणि आश्चर्यचकितच झाले. बाबाऽ.. शिवनाथबाबाऽ तुम्ही? तुम्ही इथे कसे? तुला भेटायला.
बाबांच्या भेटीने शंकरांना दिलासा वाटला. आता तेच सांगतील आपण कुठे राहायचे? काय करायचे? बाबांनी त्यांची सगळी व्यवस्था नीट लावून दिली. म्हणाले, इथे राहून केदारनाथाची प्रार्थना कर. त्यांचा आशीर्वाद आणि अनुभूती घे. नंतर खाली उतरून राम वाडा गौरीकुंड किंवा त्रिगुजीनारायण जिथे आवडेल तिथे राहा. शंकरांनी त्रिभुजीनारायणला राहणे पसंत केले. त्यांनी नारायणाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात लहान तीन सोन्याच्या मूर्ती होत्या.मध्ये चतुर्भुज विष्णू. त्यांचा एका बाजूला भूदेवी तर दुसऱ्या बाजूला श्रीदेवी लक्ष्मी.
याच ठिकाणी देवाधिदेव महादेव आणि आदिशक्ती उमाचा विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाच्या वेळी पेटवलेला लाजा होमचा अग्नी देवळातल्या सभा मंडपातील अग्नि कुंडात अजून धगधगतो आहे. ब्रह्मकुंड, विष्णूकुंड, महेशकुंड, सरस्वतीकुंड आणि दत्तात्रयकुंड या कुंडातून सर्व देवतांचा या स्थळी वास आहे.
मंदिरातून बाहेर पडताना बाबा म्हणाले, शंकर, ही जागा तुझ्या साधनेसाठी अतिशय योग्य आहे. इथे आदिनाथ आणि नारायण दोघेही आहेत. उमा, शारदा, दत्तगुरु आहेत. सर्वांचे छत्र तुझ्यावर राहील. बाबांमुळे गावाबाहेरच्या टेकडीवर शंकराला हवी तशी एकांताची जागा मिळाली. धुनीची शास्रोक्त जागा बघून, बाबांनी धुनी प्रज्वलित करून दिली. आसन कुठे असावं? तोंड कुठल्या दिशेने असावं? हे सर्व शंकराला बाबांनी समजावून सांगितल्यावर, शंकरांनी विचारले, पण मी करायचं काय? आपला आपणच शोध घ्यायचा. स्वामी सुद्धा हेच म्हणाले होते. पण नेमके काय करायचे? शोध कसा घ्यायचा? कुणाचा घ्यायचा? बाबा मला अडाण्याला समजेल असे सांगा ना !
बेटा, जो कोणी आत बसून "मी" आणि "माझं" म्हणतो ना त्यालाच पाहायचं आहे. आणि ते सुद्धा त्यानेच पाहायचं आहे. " पहावे आपणासी आपण" पण पहायचा कसा? आपल्या आत शिरुन. तो बाहेर दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी नाही दिसत तो. डोळे मिटून दृष्टी आत वळवावी लागते. कारण तो अंतर दृष्टीने दिसतो, जाणवतो. त्यासाठी डोळे मिटून स्वस्थ बसायचं. आणि लक्षात आणायचं की,
हा देह म्हणजे मी नव्हे I हा विचार म्हणजे मी नव्हे I ही वृत्ती म्हणजे मी नव्हे I हा भाव म्हणजे मी नव्हे I हा श्वास सुद्धा मी नव्हे II
असं आपल्यावरच एक एक आवरण दूर सारत सारत स्वतः खोल उतरायचं. पाण्यात बुडी घेत होतास तसच. शंकर मनात म्हणाले, बुडी मारणं सोपं. पण हे स्वस्थ बसणं आपल्याला जमेल?
जमेल बेटा. त्यांच्या मनातल्या शंकेला उत्तर देत बाबा म्हणाले. ठरवले की सर्व जमेल. " केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे." नियमितपणे निष्ठा पूर्वक अभ्यास केलास तर तुझ्या अंतर्यामीचा सद्गुरू तुला सारं काही आतूनच समजावून देईल. नंतर बाबांनी त्यांना पाठीचा कणा ताठ ठेवून निश्चल कसं बसायचं ते सांगितले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©®
मिनाक्षी देशमुख.
10 months ago | [YT] | 400
View 5 replies
Deool Gatha
सर्वांना दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
1 year ago | [YT] | 491
View 3 replies
Load more