भजन, कीर्तन,धार्मिक प्रवचन,भागवत सप्ताह,काल्याचे कीर्तन ,इत्यादि
महाराष्ट्र , मराठी


Great India

परमपूज्य आचार्य बालयोगी श्री गजेन्द्र चैतन्य महाराज https://youtu.be/-IqLaeossmM?si=FAPW-...

1 year ago | [YT] | 11

Great India

https://youtu.be/121PZbWpFEo
प.पु. आचार्य बालयोगी स्वामी श्री गजेंद्र चैतन्य महाराज
संत लहरी बाबा आश्रम माधापुरी
मु.पो.मूर्तिजापुर, ता.मूर्तिजापुर
जी.आकोला ,
संपर्क: 9767326193
:9730226734

2 years ago | [YT] | 5

Great India

*हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनात जनसागराच्या अफाट गर्दीने कारंजा शहरात नवा विक्रम प्रस्थापीत-*

कारंजा:-आपले राज्य आपला भारत देश आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान ठेवा. हे राज्य थोर अशा संत महात्म्यांची छत्रपती शिवरायांची पावन भूमी आहे. शिवराय जन्माला आले म्हणून त्यांच्या पुण्याईने आपण सुखी समाधानी जीवन जगत आहे. आपली वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकत आहे ते कायम फडकतच राहणार आहे. आपल्या धर्मात पावित्र्य आहे अध्यात्म आहे संस्कृती आहे भक्ती मार्गाने निर्व्यसनी ,शाकाहारी राहून आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. तुमच्या मोबाईलवर चित्रपट अभिनेते ,अभिनेत्रीचे फोटो न लावता तुमच्या आई वडिलांचे फोटो लावा. खरे अभिनेते तुमचे आई वडील आहे. तुमच्या आई वडिलांची सेवा करा. असे प्रतिपादन सुप्रसिध्द युवा कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांनी गुरुवारी दिनांक ९फेब्रुवारी२०२३ रोजी कोहिनूर कॉलनी ,मानोरा रोड येथील संत गजानन महाराज संस्थान द्वारे आयोजित श्रीमदभागवत सप्ताहाच्या व्यासपीठावर कीर्तन सादर करीत असतांना केले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की येत्या सोमवार दिं .१३फेब्रुवारी रोजी ब्रम्हांडनायक संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्य प्रसिध्द युवा कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थान तर्फे हभप शिवलीलाताई यांच्या किर्तना करिता भव्य व दिव्य असे व्यासपीठ ,रसिक श्रोत्यांकरिता भली मोठी बैठक व्यवस्था ,उत्कृष्ठ अशी ध्वनी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ,निस्वार्थ सेवा देणारे सेवाधारी ,स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. हे स्थळ जुन्या कारंजा शहरापासून अंदाजे 2 की. मी .असलेल्या नवीन कोहिनूर कॉलनीमध्ये कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. वातावरणात गारवा आणि कडाक्याची थंडी पडली होती परंतु तरी सुध्दा केवळ कारंजा शहरातील नव्हे तर आजूबाजूच्या चारही जिल्ह्यातील पंचक्रोशीतील खेड्यापाड्यातील वारकरी ,श्रोते, रसिकांचा अंदाजे २०ते २५ हजार लोकांचा जनसमुदाय या कार्यक्रमाला उसळला आणि न भूतो न भविष्यती असा स्वरूपाचा विराट गर्दीचा तरीही शांतता शिस्तबध्द असा कार्यक्रम होऊन कारंजा शहरातील या पूर्वीच्या सर्व क्षेत्रातील कार्यक्रमाचे विक्रम या कार्यक्रमाने मोडल्याचे दिसून येत होते. असे अनेक जाणकारांनी आपले मत नोंदले.कारंजा येथील गजानन महाराज संस्थान कोहिनुर कॉलनी येथे संध्याकाळी ९वाजता कीर्तनाला सुरुवात झाली .प्रसिध्द कीर्तनकार शिवलीलाताई यांच्या अमृतमय वाणीतून कारंजा वासीयांनी कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी जि प अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे,भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, तहसीलदार धिरज मांजरे,नायब तहसीलदार विनोद हरणे, डॉ अजय कांत, माजी पं. स.सभापती सौ रोकडे ,प्रवीण राठोड, देवेंद्र राऊत, संजयभाऊ भेंडे, जयेश लोढाया,चंद्रकांत पाकधाने ,पं स सदस्य दिनेश वाडेकर, पत्रकार किरण क्षार ,यशवंत देशमुख, भाष्कर पाटील,आर के राठोड यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांनी केलेल्या मार्गदर्शनात या गजानन महाराज संस्थानला निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले तसेचआमदार राजेंद्र पाटणी यांच्या कडुन आपण निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले .जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजक श्री संत गजानन महाराज कोहिनूर कॉलनी मानोरा रोड यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रारंभीक अनेक मान्यवरांसह संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभाग लोक कलावंत संघटना साप्ताहिक करंज महात्म्य परिवाराने हभप शिवलीलाताई पाटिल यांची राजीव भेंडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांचा शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ कारंजेकरांची कुलस्वामिनी असलेल्या श्री कामक्षा देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला तसेच अनेक गनमान्य मान्यवर व अधिकारी वर्ग यांनी येथे भेट घेतली .संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य हा महोत्सव साजरा होत असुन व्यसनमुक्ती सम्राट हभप रामेश्वर महाराज खोडे रा. ईसापूर यांच्या अमृत वाणीतून श्रीमद भागवत कथा दररोज दुपारी 1 ते 4 वाजता आहे.उपस्थीतीचे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष विजय राऊत तसेच संस्थेचे मार्गदर्शक राजीव भेंडे व हर्षल काटोले,कमलेश जाधव,पदाधिकारी, कार्यकर्ते व परीसरातील कॉलनीतील नागरीक भविकभक्तांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचलन सुधाकर काळे यांनी केले.कार्यक्रमाला महसूल विभाग, पोलीस विभाग, नगर परिषद विभाग तसेच विद्याभारती कॉलेजचे विद्यार्थी ,धाबेकर कॉलेजचे विद्यार्थी, आय टी आय कॉलेजचे विध्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

2 years ago | [YT] | 1