Rajmudra Films Official

नाट्यं भिन्नरुचे: जनस्य
बहुधाप्येक समाराधनम्
नानारुचि रसिकां दे केवळ
नाटक पुरें समाधान

उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी
एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी
सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी
नम्र विजेत्यांचे अस्मान रंगभूमी
गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी
गंधर्व, पु.ल., वि.वांचा इतिहास रंगभूमी
मज नवख्याचेही झेलते ही पाय रंगभूमी
अन लेकरागत घडविते ही माय रंगभूमी

बिनधास्त गप्पा
With Celebrity
कलाकार घडण्याची गोष्ट

मराठी कलाकार त्यांचे
नाटक, मालिका, चित्रपट
यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम

कलेच व्यासपीठ🎭🎬
नाटकांच्या मुलाखती 🎭

#rajmudra_films
#bindhastgappa
#bindhastgappawithcelebrity
#बिनधास्त_गप्पा

राजमुद्रा फिल्म्स वर आत्तापर्यंत
आपण ढोल ताशा पथक तसेच
सण उत्सव, महाराष्ट्राची संस्कृती,
धार्मिक स्थळे, कला, क्रिडा
यांचे व्हिडिओ पाहिले असतील
पण आता राजमुद्रा फिल्म्स
सादर करत आहे
एक नवा कोरा कार्यक्रम
यात नाटक, चित्रपट, मालिका
आणि साहित्य क्षेत्रात
नावलौकिक मिळालेल्या कलाकारांच्या
आठवणींचा कलापट आपल्यापुढे
सादर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे



Rajmudra Films Official

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. संत तुकाराम महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास चकित करणारा आहे. लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स निर्मित ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगत पाठक चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यासोबत अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर यांनीही निर्मितीची धुरा सांभाळली असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे. प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचे दर्शन घडविताना लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून उभ्या केलेल्या जीवनवादी विवेकदर्शनाची झलक या ट्रेलरमधून दिसुन येते आहे. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे त्यासोबत मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अवधूत गांधी, नुपूर दैठणकर, तेजस बर्वे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

2 months ago | [YT] | 10

Rajmudra Films Official

हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे.
यांच्या भावनांशी खेळलात,
तर याद राखा...
गाठ माझ्याशी आहे.

"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास

#PunhaShivajirajeBhosale #ComingSoon

Written & Directed by:
@maheshmanjrekar

Produced by:
#RahulPuranik
#RahulSugandh

Dialogues : @kahanibazz

Starring:
@siddharthbodkeofficial
@treesha.thosar02_official

8 months ago | [YT] | 9

Rajmudra Films Official

अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे ।।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम म्हणजे
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली.

वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भक्तीमार्गातील त्यांचे योगदान अनमोल असून हरिपाठातील अभंग आजही प्रेरणा देतात. ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी येथे समाधी घेतली, परंतु त्यांची माणूसधर्माची विचारधारा अजरामर आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजाला समता, मानवता आणि प्रेम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. त्यांच्या शिकवणीतून अखंड माणुसकीचा, करुणेचा झरा वाहतो म्हणून त्यांना ‘माऊली’ असे संबोधले जाते.

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या माऊलींनी मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहून वेद-उपनिषदांचे गूढ सामान्यजनांसाठी उलगडले. त्यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या ओवीबद्ध लेखनशैलीत सहजता असूनही त्यात गहन आध्यात्मिक अर्थ आहे. अशा या माऊली ज्ञानेश्वरांच्या लाडक्या बहिणीची चरित्रकथा येत्या १८ एप्रिलपासून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची जनमानसाच्या काळजात घर करणारी भूमिका या चित्रपटात तेजस बर्वे हा गुणी कलाकार साकारणार आहे. मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी असलेला तेजस गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. माऊलींच्या रुपात तेजसने आळंदीच्या समाधी मंदिराच्या गाभार्‍यातून प्रांगणात प्रवेश केला तेव्हा प्रत्यक्ष माऊली मंदिरात अवतरल्याचा भास झाला, असे अनेकांनी म्हटले. अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे ।। असा आनंदानुभव उपस्थितांनी घेतला. कित्येक भाविक त्याला पाहून गहिवरले, कित्येकांना त्याच्या पायी वंदन केल्याशिवाय राहावले नाही. केवळ माऊलींसारखे दिसणेच नव्हे तर माऊलींचे असणेही वाटावे यासाठी, या चित्रपटात माऊली साकारण्यासाठी तेजसने प्रचंड अभ्यास आणि मेहनत केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हृद्य भावाबहिणीचे नाते ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

10 months ago | [YT] | 15

Rajmudra Films Official

शंभूराजांच्या नंतर औरंगजेबाच्या
अंतापर्यत काय घडलं ?
कोण होती रणरागिणी ताराराणी ?
याचे उत्तर मिळेल या नाटकात..

लेख‌ साभार
डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर
936030860

marathistatus.co/ranragini-tararani/

शिवरायांचा छावा गेला…
मग मराठी साम्राज्याचं काय झाल ?

औरंगजेब मेला तेव्हा काय परिस्थिती होती ?
त्या मधल्या काळात काय काय घटनाक्रम घडलेत ?
स्वराज्याच्या लढाईत कुणी साथ दिली ?
कुणावर गद्दारीचा ठपका ठेवला गेला ?
कोण स्वराज्याच्या लढाईत शहीद झाला ?
कुणी स्वराज्याची धुरा सांभाळली ?

कोण होती ताराराणी ?
आणि तिला रणरागिणी का म्हणायचे ?

अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मनात का येवू नये ?

हा योगायोग तर नक्कीच नाही
सध्या मोठ्या पडद्यावर “छावा” चित्रपट महाराष्ट्राच्या नाही तर अख्या हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत असताना शिवछत्रपतींचा छावा गेल्यानंतर इतिहासात काय घडले ? संभाजीराजांवर अतिशय निर्दयीपणे, निष्ठुरपणे छळ करून जीव घेणाऱ्या त्या औरंगजेबाचे काय झाले ?
संभाजी राजानंतर धुरा कुणी सांभाळली ? येसूबाई, राजे राजाराम, ताराराणी आणि इतरही महत्वाच्या व्यक्तींची स्वराज्याच्या लढाईत काय भूमिका होती ? २७ वर्षाचा स्वातंत्र्य लढा कसा होता ? हे दाखवणाऱ्या नाटकाने याच काळात मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. हा केवळ योगायोग तर नक्कीच नसावा, कदाचित छत्रपती संभाजी राजानंतर पुढील इतिहास महाराष्ट्रातील लहान थोर सर्वांच्या नजरेत यावा याकरिता श्री ने केलेली ही तडजोड असावी. असेच म्हणावे लागेल.

मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक व्यक्तिमत्व, कामगिरी, स्वराज्याची कल्पना ते प्रत्यक्ष कृती, गनिमी कावा, पराक्रम, जय, पराजय, तह, आहुती, बलिदान, स्वराज्याची घोडदौड यापुरता मर्यादित आपण सामान्य जनतेला ज्ञात आहे‌ आणि तेसुद्धा पूर्णपणे तर नाहीच, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा मर्यादीतच तो शिकवला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर काय घडलं हे फारच कमी प्रमाणात जनसामान्यांना माहिती आहे.

धाडसाला सलाम..

आणि तो इतिहास माहिती व्हावा याकरिता ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांच्या संकल्पनेतून, चंद्रकांत (अण्णा) सावंत यांच्या मार्गदर्शनातून जवळपास ५० कलाकार, संगीत, प्रकाश, नेपथ्य, Back Stage तंत्रज्ञ यांच्या मेहनतीने एक अप्रतिम भव्य ऐतिहासिक नाट्यकृती निर्माण झाली ती म्हणजे “रणरागिणी ताराराणी” लेखक युवराज पाटील यांनी उत्तम लेखन केले असून दिग्दर्शक विजय राणे यांनी अतिशय सुंदर दिग्दर्शन केले आहे आणि कलाकारांचे काम हे तुम्हाला इतिहासात नक्कीच घेवून जातील. रक्त सळसळनं कशाला म्हणतात ? अंगावर काटा उभा रहाण कशाला म्हणतात ? एखाद्या इतिहासातील पात्रावर प्रेम करणे, त्याचा अभिमान वाटणे कशाला म्हणतात ? औरंगजेब सारख्या पात्राचा तिरस्कार वाटणे कशाला म्हणतात ? हे सर्व अनुभवायचे असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येकाने हे नाटक नाट्यगृहात जावून बघावेच आणि हि सुंदर नाट्यकृती प्रेक्षकांसाठी सादर करण्याकरिता घेतलेला धाडसी निर्णय ज्यांनी घेतला‌ आणि या निर्णयाला पूर्णत्वास नेण्याकरिता निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला या सर्वांच्या धाडसाला, कर्तुत्वाला सलाम…

नाटक का बघावं..

नाटकाची सुरुवात तिथून होते जिथे संभाजी महाराजांचा छळ होतोय, पण स्वराज्यासाठी झटणारा आमचा वाघ तटस्थपणे उभा राहतो आणि त्या औरंगजेबाची महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत होत नाही…
केवळ अप्रतिम..
मी अजून व्यस्ततेमुळे छावा चित्रपट बघितला नाही पण नक्कीच त्या चित्रपटाचा अंत संभाजी महाराज स्वाभिमान राखून न झुकता जग सोडून गेले यानेच होत असावी… तिथूनच हे नाटक सुरु होतं आणि पुढील घडामोडी अप्रतिम रित्या सादर करण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा यशस्वीपणे ते सादर केले आहे असे म्हणावे लागेल..

कलाकारांच्या साथीला उत्तम संगीत, उत्तम प्रकाश योजना तर आहेच पण इतिहासाला जिवंत करण्याकरिता प्रसाद ओक सर यांच्या आवाजाने साथ दिली आहे. ती सुद्धा आपल्याला इतिहासाची फेरी मारून आणते, घटनाक्रम पुढे नेण्याकरिता, समजून घेण्याकरिता त्यांच्या आवाजाची मदत होते, नेपथ्य खूपच सुंदर आहे, त्यापेक्षा त्यामागील मेहनत हि खूप मोठ्या प्रमाणातली आहे हे एक प्रेक्षक म्हणून जाणवते. एवढ्या लवकर आणि येवढ्या कमी वेळात कित्येकदा सेट चेंज करणे हे काही सोपी गोष्ट नाही. ती सुद्धा जबाबदारी पडद्यामागील कलाकारांनी लीलया पेलली आहे. त्यांचे पण आभार मानावे तितके कमीच. विशेष म्हणजे या नाटकात युद्धाचे प्रसंग दाखवलेले आहेत तेही खऱ्या तलवारी वापरून. युद्धाच्या वेळी तलवारींचा आवाज प्रेक्षकांच्या कानात जात होता आणि इकडे आमच्या मनाची घालमेल होत होती. सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलेले आहे. सर्वांची मेहनत आपल्याला इतिहासाचा एक सुंदर अनुभव देवून जाते.

आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याणच्या प्रयोगाविषयी विशेष

श्री सुनील गोडसे सर जे या नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत त्यांची काल एका दुसऱ्या निमित्ताने भेट झाली आणि त्यांना ठरल्या वेळेपेक्षा आधी जावे लागले. त्यामागील कारण विचारले असता या नाटकात ताराराणी ची भूमिका बजावणाऱ्या नायिकेच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि उद्याच प्रयोग आहे म्हणून लवकर जावे लागेल असे सांगितले आणि आज आकाश भोसले या मित्राच्या पुढाकाराने मी आणि आकाश दोघेही आमच्या अरसिक पत्नींना घेवून प्रयोगाला पोहचलो आणि प्रयोगाच्या अगोदर मेकअप रूम मध्ये कलाकारांना भेटायला गेल्यानंतर ताराराणीची भूमिका साकारणाऱ्या हिरोईन आल्यात… आल्यात नाही तर दोन तीन व्यक्तींनी आधार देत, एका पायावर त्यांना आणलं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं.

आणि प्रयोग सुरु झाला…

त्या अगोदर दिग्दर्शकांनी सूचना वजा विनंती केली कि मुख्य नायिकेच्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून त्या पायाला सपोर्ट म्हणून लेग सपोर्टर कीट लावून प्रयोग सादर होणार आहे. आणि ऐतिहासिक नाटक असल्यामुळे त्या काळाशी ते सामंजस्य नाही वाटणार पण पर्याय नाही, प्रेक्षकांनी सांभाळून घ्या. ताराराणीची भूमिका करणाऱ्या ताईची अवस्था स्टेजच्या मागे बघितलेली होती. पायाला किती वेदना होत असतील याची कल्पना आम्हाला होतीच. पण जेव्हा जेव्हा त्यांनी रंगमचावर प्रवेश केला आणि
वीर ताराराणीची भूमिका वठवली तर त्या पायाच्या दुखापातीच्या दुःखाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण अंधार जरी असला तरी आम्ही चौथ्या रांगेत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाला त्यांना दोन तीन व्यक्ती विंगेतून आधार देवून रंगमचावर आणत होते आणि Black Out ला लगेच स्टेज वर येऊन त्यांना घेवून जात होते हे आम्हाला दिसत होत. रंगमंचावरचं, कालेवरचे काय भयंकर प्रेम आहे ? Salute… कदाचित पायाला येवढा त्रास होत असताना सुद्धा वीर रणरागिणी ताराराणी ची भूमिका पार पाडायला खुद्द ताराराणीच्या व्यक्तिमत्वानेच त्यांना ताकद दिली असावी.

पूर्ण नाटकामध्ये फक्त स्टेप घेताना पायाची हालचाल थोडी त्रासदायक दिसत होती. पण चेहऱ्यावर वीरता, स्वराज्यावरचं प्रेम, कठोर निर्णय घेतानाचा आवेश कुठेही कमी दिसू दिला नाही. या करिता खरच त्यांना मानावं लागेल.

आम्ही जवळ असल्याकारणाने स्टेज वरची एक एक हालचाल आम्हाला जवळून दिसत होती. दुसऱ्या अंकामध्ये माझ्या सौ. ने कानात सांगितले कि पहिल्या अंकापेक्षा आता दुसऱ्या अंकात तारा राणी ची भूमिका वठवणाऱ्या नायिकेचा पाय सुजलेला आहे. काय त्या वेदना असाव्यात..
पण त्या जाणवू न देता Show Must Go On म्हणून रंगमंचावर वावरणाऱ्या ताईला लाख लाख सलाम. एकंदरीत सर्व कलाकारांचे काम हे दमदारच होते. त्यात साकारलेला औरंगजेब सुनील गोडसे सरांनी सुंदर साकारला आहे. प्रेक्षकांच्या अगदी मनापासून शिव्या निघत होत्याच तर काही ठिकाणी त्याच्यावर, त्या औरंगजेबाच्या मर्यादेवर तुच्छतेने हसूही येत होतं. हे हि एक प्रकारचे यशच म्हणावे लागेल. सर्व कलाकारांचे काम अप्रतिमच होते. त्याने तुम्हाला इतिहासातला काळ अनुभवायला मिळतोच.

असं एकंदरीत सुंदर, इतिहासात घेवून जाणारं, बऱ्याच गोष्टींची उकल करणारं हे नाटक प्रत्येक गावात, तालुक्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहचावं असं ब्रिगेडियर सावंत सर म्हणाले आणि खरच हे नाटक प्रत्येकाने बघावं, मोठ्यांनी तर बघावच..
पण लहान मुलांनी, युवकांनी हे नाटक आवर्जून बघायला हव.

या नाटकाच्या फोटो Whats App स्टेटस ला ठेवल्या ठेवल्या माझ्या नागपूर च्या एका वकील मित्राचा MSG आला कि हे नाटक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी करता येईल का ? हे त्यांना वाटावं यातच यश आहे. नक्कीच लवकरच महाराष्ट्राच्या गावागावात हे नाटक पोहचावं
हि श्री चरणी प्रार्थना..

डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर

936030860

10 months ago (edited) | [YT] | 25

Rajmudra Films Official

उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी
एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी
सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी
नम्र विजेत्यांचे अस्मान रंगभूमी
गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी
गंधर्व, पु.ल., वि.वांचा इतिहास रंगभूमी
मज नवख्याचेही झेलते ही पाय रंगभूमी
अन लेकरागत घडविते ही माय रंगभूमी

संकर्षण कऱ्हाडे

1 year ago | [YT] | 22

Rajmudra Films Official

कुमार सोहोनी
एक सुवर्णमहोत्सवी रंगप्रवास

https://youtu.be/goLLQQA6otc?si=zw9OD...

कुमार सोहोनी यांची नाट्यकारकिर्द म्हणजे एक वेगवान नाट्य प्रयोगशाळाच! अशी प्रयोगशाळा जी उभ्या नाट्यसृष्टीला दिशा देणारी ठरलीय. दोनअडीच वर्षे त्यांच्यासोबत नाटके बघण्याचा योग जुळून आला होता. राज्य नाट्य अनुदानाच्या समितीत ‘परीक्षक’ म्हणून आमच्या समोर आलेल्या नाटकांवर त्यांच्याशी बोलण्याची, चर्चा करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांच्या नाट्य जाणीव जवळून अनुभवण्याची प्रचिती आली. ‘नाटक’ त्यांचे जसं सर्वस्वच. नवनवीन संहिता, नवोदित कलाकार, सादरीकरणातले वेगळेपण याकडे त्यांची पक्की नजर असायची. आज कुमार सोहोनी हे नाव देशभरात एक ‘नाट्यस्कूल’ म्हणून पोहचले आहे. जे मराठी माणसांच्या दृष्टीने अभिमानाची घटनाच आहे.

दोन घटनांचा उल्लेख करावा लागेल. एक त्यांना मिळालेले दोन पुरस्कार आणि सन्मानाबद्दल आणि दुसरी घटना म्हणजे त्यांनी ठाण्यात स्थापन केलेल्या ‘कलासरगम’ या प्रायोगिक नाट्य चळवळीचा नाबाद पन्नाशीचा सुवर्णसोहळा! याचा आढावा एका दमात येणं जरी शक्य नसलं तरी राज्यनाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत आणि चित्रपटापासून ते नाट्य-सिने तंत्रांपर्यंतचा आवाका मोठा आहे. ‘एक परिपूर्ण दिग्दर्शक’ म्हणून त्यांनी गेली पन्नासवर्षे केलेला रंगप्रवास हा एका कालखंडाचा थक्क करून सोडणारा प्रवाहच. जो नवोदितांना खुणावतो आणि प्रेरणाही देतोय.नरेंद्रकुमार नरहर सोहोनी नावाचा तरुण जो ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात दिसायचा त्याने आपल्या जवळपासच्या मित्रांना गोळा केले आणि ‘कलासरगम’ नावाची नाट्य संस्था ४ मे १९७३ या दिवशी सुरू केली‌. सारेजण शाळकरी. पण नाटक पुरतं शिरलेलं. या युवकाच्या घरातले वातावरण हे पूर्ण सेवादलातले. त्यामुळे बालपणापासूनच स्टेजवर पुढे राहाण्याचे धडे नकळत झालेले. अगदी वयाच्या चारपाच वर्षाचा असतांना ‘चिनी आक्रमणाचा फार्स’ यातून राष्ट्रसेवा दलाच्या निर्मितीत सहभाग घेतलेला. पुढे एकीकडे ‘कलासरगम’ या नाट्यसंस्थेचे काम आणि ‘मुंबईची लावणी’ हे शाहीर दादा कोंडके यांच्या लोकनाट्याचे दिग्दर्शन त्याने पेलले. ठाण्यातल्या या तरुणांच्या ग्रुपकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष हे हौशी नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक निर्मिती – यातून वेधले गेले आणि पन्नास वर्षांपूर्वी ‘कलासरगम’ म्हणजे ठाण्यातली नाट्यचळवळ अशी ओळख झाली. नरेंद्रकुमार उर्फ कुमार सोहोनीकडे नाट्यसृष्टीचे लक्ष पोहचले.

मराठी रंगभूमीवर असलेला प्रत्येक घटक हा कधी ना कधी राज्यनाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून जातच असतो. राज्यानाट्यस्पर्धा आणि अनेक एकांकिका स्पर्धेने महाराष्ट्रातील गावागावातल्या रंगकर्मींच्या आयुष्यात प्रगतीच्या वाटा खुल्या केल्यात हे नाकारून चालणार नाही. एक जबरदस्त सामर्थ्य देणारी ही स्पर्धा जी कुमार सोहोनी यांच्या जीवनातही एक वळण ठरली. ‘ठाणे केंद्र’ म्हणजे त्याकाळी ‘कलासरगम’चे हक्काचे निशाण ठरले. अंधार यात्रा, श्रवणतरंग, असायलम् असंच एक गाव. अरूपचं रूप, मा सबरीन, अथं मनूस जगन हं’ – अशा एकापेक्षा एक नाटकांमुळे त्यांच्यातला दिग्दर्शक बहरत गेला. नाटक स्पर्धेत सादर झालं आणि बक्षिसे मिळाली की ती संस्था किंवा नाट्यचळवळ पुढे कायम राहाते पण नेमकं उलट झालं तर मरगळ येण्याचा धोका असतो. पण ‘अथं मनूस जगन हं’ या नाटकामुळे साक्षात डॉ. श्रीराम लागू यांनी कुमारजींच्या दिग्दर्शन कौशल्याला ओळखले. व्यावसायिक रंगभूमीची दारे अलगद उघडली गेली. नवी दिशा त्यांना मिळाली.

२० वी राज्यनाट्य स्पर्धा असावी. त्यात मुलुंडच्या ‘संस्था’ तर्फे ‘अरुपचे रुप’ नावाची श्रीहरी जोशी यांची संहिता निवडली गेली. कल्पकतेने दिग्दर्शन करून नाट्य ही स्पर्धेत तृतीय क्रमांकावर पोहचले आणि दिग्दर्शक म्हणूनही कुमारजींना द्वितीय पुरस्कार मिळाला. याच संस्थेने या २४ व्या राज्य नाट्यस्पर्धेत प्र. ल. मयेकर यांचे ‘अथ मनूस जगन हं’चा प्रयोग केला तोही गाजला. प्रथम पुरस्कार मिळाला तसेच नेपथ्य रचनेसाठी त्यांना बक्षिस मिळाले. एकूणच राज्य नाट्यस्पर्धेत यंदा कुठलं नाटक? हा प्रश्न तसा परवलीचा ठरला होता. तो काळच मंतरलेला. त्याचे कित्येक किस्से आहेत ज्यातून त्यांच्यातला दिग्दर्शक आणि संघटक हा घडत गेला… नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्लीचा चक्क तीन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. देश-विदेशातील नाटकांवर अभ्यास केला. नाटकाचे तंत्र-मंत्र जाणून घेतले. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात एका प्रकारची परिपक्वता आली. या अभ्यासक्रमानंतर त्यांनी ‘अरुपाचे रूप’ या हौशी – प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शन केले. वेताळ पंचविशीच्या ‘फॉर्म’मध्ये त्याचे सादरीकरण झाले. ‘नाटक’ असेही असू शकतं! – अशी पोचपावती त्याला मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. प्र. ल. मयेकर यांचे माऊस साबरीन, अज्ञांत इतिहास, अग्निपंख, रातराणी, रेशमगाठ – ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली प्रल आणि कुमारजी याचं ट्युनिंग मस्त जमलं होतं. प्रसाद दाणी याचे अर्धसत्य, किरण माने याचे उलटसुलट, अभिराम भडकमकर याचे हसता हा सवता, रणजित देसाई यांचे स्वामी, अभिराम भडकमकर याचे सुखांशी भांडतो आम्ही, डॉ. आनंद नाडकर्णींचे जन्मरहस्य, शेखर पाटील याचे मी रेवती देशपांडे, सुरेश जयराम यांचे कहानी में ट्वीझ!.. अशी नाबाद पन्नास नाटकांत विविध शैली, अनेक तंत्रमंत्र याचा कल्पकतेने वापर त्यांनी केला. वेळोवेळी नाटकात आलेली मरगळ त्यांनी दूर केली. रसिकांनाही नाटक बघण्याची नवी दृष्टी त्यातून मिळाली.

कुमार सोहोनी यांच्या नाट्यवाटचालीतल एक सुवर्णपर्व म्हणजे आचार्य अत्रे यांचे लग्नाची बेडी हे नाटक! ज्याचे दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य हे सबकुछ त्यांनी केले. १९८७ साली महिनाभर महाराष्ट्रभरात न भूतो न भविष्यती दौराही केला. १९२१ च्या नटश्रेष्ठ बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या युतीनंतर तब्बल ६६ वर्षांनी त्याच तोलामोलाचे कलाकार पुन्हा एकत्र आणले गेले. सामाजिक कृतज्ञता निधी करीता महिन्याभरात नॉनस्टॉप २१ प्रयोग गाजले. डॉ. श्रीराम लागू आणि कुमारजी यांच्यातली ‘नाट्यबेडी’ त्यातूनच पक्की झाली. सर्व खर्च वजा आता ३५ लाखाचा निधी त्यातून गोळा झाला‌. पैशापेक्षा अनुभवांनी त्याच्यातला रंगकर्मी गर्भश्रीमंत यातून झाला. म्हणून या नाटकाला त्यांच्या कारकिर्दीत लाखमोलाचे महत्त्व आहे. डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, निळू फुले, सदाशिव अमरापुरकर, सुधीर जोशी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, भारती आचरेकर, मधुकर नाईक, वसंत इंगळे, विजय म्हैसकर आणि रश्मीच्या भूमिकेत ‘सिनेस्टार’ तनूजा. याचा सहभाग होता. ‘लग्नाची बेडी’ याची रंजक कहानी खुद्द त्याच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक नाट्याविष्कारच ठरेल! असो. नाटकांप्रमाणे त्यांनी १९९० पासून वीसएक चित्रपटांना दिग्दर्शन दिले. मराठी नाटकातील कलाकारांना चित्रपटात संधी मिळाली. ‘एक रात्र मंतरलेली’ या चित्रपटाच्या निर्मितीसह त्यांनी दिग्दर्शन केले. तर १९९७ साली ‘वहिनीची माया’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संकलन अशा तिहेरी भूमिका त्यांनी पार पाडल्या. आहुती, अनुराधा, पैसा पैसा पैसा, जिगर, बजरंगाची कमाल, जोडीदार, तुझ्याविना, रेशमगाठ, सवाल माझ्या प्रेमाचा, करायला गेलो एक, निरुत्तर – हे काही चित्रपट ज्यातून त्यांच्यातल्या ‘कॅमेरा’वरल्या हुकमी तंत्राचे दर्शन झाले खरे पण ते सर्वार्थाने रमले, फुलले ते नाटकातच! गेल्या तिसएक वर्षात व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची आलेली बहुतेक सर्व नाटके बघण्याचा, त्यावर परीक्षण करण्याचा योग चालून आला आणि त्यांच्यातला दिग्दर्शक प्रत्येक नाटकातून अधिकाधिक जाणवला. कितीही ‘ग्लॅमरस’ कलाकार जरी असले तरी दिग्दर्शकाची चौकट ही नेहमी बाजी मारून गेली. रंगमंचाचे नेमकेभान असलेले त्याची ट्रिटमेंट तशी लाजवाबच!

‘मी रेवती देशपांडे’ हे नाटक. जे श्री चिंतामणीच्या लता नार्वेकर यांनी रंगमंचावर आणले. स्त्री प्रश्नावर असलेल्या विषयांना स्पर्श करणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा लताबाईंनी यातून सांभाळली. शेखर पाटील यांची संहिता होती. जी ‘नाट्य’ म्हणून विलक्षणच. जेंडर डिसऑर्डर’ यावरलं हे नाट्य. तसे‌ सादर करणे आव्हानात्मक होते. अगदी प्रकाशयोजने पासून ते मोहन जोशी यांच्या ‘रविशंकर’चा ‘रेवती’पर्यंतचा तपशील हा अभ्यासपूर्णच. ‘रेवती’ आजची चर्चेत असते. त्यांनी दिग्दर्शित केलेलं आणखीन एक नाटक जे २०१३-१४ च्या सुमारास रंगभूमीवर आलं ते म्हणजे ‘जन्मरहस्य’. मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची संहिता. त्यात तिला भाटे आणि अमिता खोपकर यांच्या प्रमुख भूमिका. युवराज अवघानी ही सोबत घेतले होते. कठीण विषय हा सहजसुंदर प्रकारे श्रीराम पुढे त्यांनी पेश केला नाहीतर रसिकांना कळणं कठीण झालं असतं. डोक्यावरून गेलं असतं पण त्यांच्यातल्या दिग्दर्शकाने आणि चांगली ट्रिटमेंट दिली. प्रकाशयोजनाही लक्षवेधी होती. ‘जबरदस्त नाट्यानुभव’ म्हणून रसिकांनी त्यावेळी नाटकाला उचलून धरले. मच्छिंद्र कांबळे यांच्या ‘भद्रकाली’ने जे काही मालवणी भाषे व्यतिरिक्त प्रयोग केले त्यात ‘सुखांशी भांडतो आम्ही!’ हे २०११- १२ च्या सुमारास आलेलं नाट्य‌. अभिराम भडकमकर यांचे संहिता आणि डॉ. गिरीश ओक व चिन्मय मांडलेकर या दोघांच्या प्रमुख भूमिका जे त्याकाळात अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. समीक्षक, परीक्षक यांनी दिग्दर्शनाचे कौतुक केले. त्यातील वैशिष्ट्यांची दखलही घेतली. कुमार सोहोनी यांची व्यावसायिक नाटके यावर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल येवढी त्यात विविधता तसेच तंत्रावर हुकमत आहे. दिग्दर्शक म्हणजे ‘तालीम मास्तर’ नाही तर सर्व दालनांवर नजर असलेला ‘प्रतिभासंपन्न नेतृत्व’ आहे, हे चित्र त्यांचे प्रत्येक नाटकातून प्रकाशात आणले.

संगीत नाटक अकादमीचा त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा मिळालेला सांस्कृतिक पुरस्कार
हे दोन्ही सन्मान त्यांना गेल्या काही दिवसात मिळाले आणि पुन्हा एकदा एका रंगकर्मीने केलेल्या रंगसेवेचा भूतकाळ जिवंत झाला. ठाण्याच्या त्यांनी स्थापन केलेल्या ‘कलासरगम’ या प्रायोगिक, हौशी ही नाट्यचळवळीनेही सुवर्णमहोत्सवी निशाण फडकविले. कलासरगमचा सुवर्णमहोत्सवी रंगसोहळा रसिकांनी अनुभविला. यामागे असलेल्या एका रंगप्रवासाचे अभिनंदन!

संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com

* नाटक
अग्निपंख
रातराणी
लग्नाची बेडी
वासूची सासू
देखणी बायको दुसऱ्याची
देहभान
शेवटचे घरटे माझे
अश्रूची झाली फुले
तुजविण
मी रेवती देशपांडे
मायलेकी
उलट सुलट
जन्मरहस्य
सुखांशी भांडतो आम्ही
कहानी मे ट्विस्ट
याच दिवशी याच वेळी
सागरा प्राण तळमळला

* चित्रपट
एक रात्र मंतरलेली
आहुती
अनुराधा
बजरंगाची कमाल
वहिनीची माया
पैसा पैसा पैसा
लपून छपून
जिगर
रेशीमगाठी
जोडीदार
तुझ्याविना
छडी लागे छमछम
निरुत्तर

* मालिका
कालचक्र
हिसाब
पती, पत्नी और वो
संस्कार
किमयागार

1 year ago (edited) | [YT] | 19

Rajmudra Films Official

संगीत माऊली

www.brm.nsd.gov.in/sangeet-mauli/

हे नाटक वैदिक चातुर्वर्ण्य पद्धतीशी संबंधित आहे, जी मूळतः जन्माच्या आधारावर निर्धारित केली जात नव्हती, परंतु कर्मावर- जी नंतर जन्मावर अवलंबून होती आणि अस्पृश्यता ही नवीन संज्ञा अस्तित्वात आली आणि समाज उच्च आणि निम्न वर्गांमध्ये विभागला गेला. जातिवादाचा प्रकाश ज्याने भारतीय समाजाची सामाजिक बांधणी नष्ट केली.

एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले, क्रांतिकारी मनाचे तरुण विठ्ठलपंत, ज्ञानाची तीव्र इच्छा असलेले, कर्मकांडाच्या अतिरेकांमुळे अस्वस्थ होतात आणि तीर्थयात्रेला जातात. तो अलंकापुरी (आळंदी-आताचे दिवस) गावात पोहोचतो. एक दैवी साक्षात्कार होतो आणि तो रुक्मिणीशी विवाह करतो, ब्राह्मण कुळातील अतिशय हुशार स्त्री. ज्ञानाचा अथक प्रयत्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. पत्नीची परवानगी न घेता विठ्ठल काशीला पोहोचला. रामानंद स्वामींचे शिष्य होण्यासाठी अर्धसत्य उच्चारून संन्यास स्वीकारला. तेथे त्यांनी बारा वर्षे ज्ञान घेतले. पण रामानंद स्वामींना विठ्ठलपंतांचे सत्य कळले. विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना त्यांच्या कृत्याची प्रायश्चित्त म्हणून अलंकापुरीला परत पाठवले.

तपश्चर्या करूनही अधीर झालेल्या धर्मवृंदाने एकदा संन्यासी झाल्यावर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणे हे पाप आहे असे सांगून त्या जोडप्याला बहिष्कृत केले.त्यानंतर एका विशिष्ट क्रमाने चार दिव्य मुले जन्माला आली. देवाच्या नियोजनानुसार धर्माची सुधारणा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चार दैवी पुत्रांनी करावयाची होती, ज्यांचा जन्म बहिष्कृत कुळात झाला होता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी त्या मुलांचे संगोपन, पालनपोषण आणि शिक्षण करताना कठीण परिस्थितीत संघर्ष करून दिलेल्या अनोख्या योगदानाची कथा आहे.

दिग्दर्शकाची नोंद

मी 20 वर्षांहून अधिक काळ संगीत नाटकांशी संबंधित आहे. पण माझी रंगभूमीवरील कारकीर्द ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे. १९८२ मध्ये लेखक दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाने मी मुंबई मराठी साहित्य संघात प्रवेश केला. मी अनभिज्ञ होतो. मी अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांच्या कामाचे दिग्दर्शन अगदी अस्सल पद्धतीने करताना पाहायचो. दिग्दर्शनाच्या आवडीमुळे सामाजिक नाटकेही अशा प्रकारे सादर करता येतील का, असा प्रश्न पडला! नेहरू सेंटरचे श्री काझी सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रदीप ओक यांनी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांचे दिग्दर्शन केले. संगीत माऊली हेही असेच एक नाटक आहे, श्री प्रदीप ओक यांनी लिहिलेले आहे. नव्या गायक-अभिनेत्रींसोबत काम करून, ज्यांना नाटकात रस नाही आणि मैफिलीत किंवा स्पर्धेत गाणं सादर करण्यापलीकडे कुठलीही दृष्टी नाही, अशा कलाकारांची मनं नाटक करण्यासाठी मी तयार केली. नवे संगीत दिग्दर्शक डॉ.राम पंडित यांची भेट झाली, त्यामुळे संगीत माऊली हे नाटक सादर करताना नव्या-जुन्याचे सुंदर जाळे विणता आले, असे मला वाटते. नाटक सोपे व्हावे म्हणून मी पटकथा सोपी केली आहे, पण प्रकाशयोजना करून ती आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत नाटकाची 175 वर्षे जुनी परंपरा नव्या पिढीच्या हाती देण्याचे कर्तव्य मी पार पाडत आहे.

दिग्दर्शक

प्रमोद पवार हे मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आहेत. त्यांनी विविध मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. भारतातील अनेक थिएटर सोसायटीमध्ये सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात, प्रमोद पवार यांनी अनेक उल्लेखनीय एकांकिका दिग्दर्शित करून आणि अभिनय करून अनेक पुरस्कार पटकावले, ज्यात INT सारख्या संस्थेचा समावेश आहे. त्यांनी मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवरही काम केले आहे. 'उठवा', 'काहूर', 'अनोळखी', 'अनामिक', 'अर्ज मोथा नामी' इत्यादी नाटकातील त्याच्या कामासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि/किंवा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 'आघात' या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवाजी गणेशन पुरस्कार आणि इतर उल्लेखनीय सन्मान.

त्यांनी ‘टिळक आणि आगरकर’ नाटकात लोकमान्य टिळकांची आणि ‘आर्य चाणक्य’ या नाटकात चाणक्याची भूमिका साकारली, ज्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी सहा हजारांहून अधिक स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. ते ऑल इंडिया रेडिओचे ए ग्रेड कलाकार आहेत.

प्रमोद पवार हे साहित्य संघ या 85 वर्ष जुन्या संस्थेच्या नाट्य विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत साहित्य संघासाठी खडग, गोरा कुंभार, स्वयंवर, माऊली आदी संगीत नाटकांचे दिग्दर्शन केले असून नेहरू केंद्रासाठी सीता वियोग, गंधर्व गाथा, गिधाडे, हमीदाबाईची कोठी आदी दहा नाटकांचे दिग्दर्शन केले असून सध्या ते राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. संस्कार भारतीच्या केंद्रीय कार्यकारिणीत रंगभूमीचे समन्वयक.

नाटककार

प्रदीप हरी ओक उप. मुख्य अभियंता (निवृत्त) भारतीय रेल्वे अभियंता सेवा, 1986 पासून सतत संगीत नाटके लिहित आहेत. त्यांनी पश्चिम रेल्वे कला आणि संस्कृती विभागातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धांमध्ये संगीत नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यापैकी 3 नाटकांना प्रथम क्रमांक आणि एक, तृतीय क्रमांक मिळाला.

त्यांना बाल गंधर्व संगीत रसिक मंडळ पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार, 2018 मिळाला. शापित गंधर्व (दिवंगत के. एल. सैगल यांच्या जीवनावर आधारित) मदन भूल, सीता वियोग, गंधर्व गाथा, बैजू लीला, भागमती, उमराव, उदयन चरितम, मौल्यवान नाटक हे काही नाटके आहेत. त्यांच्याद्वारे लिहिलेले.

संघ
मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना जुलै 1935 मध्ये झाली. मुंबई मराठी साहित्य संघ – मुंबईची एक आघाडीची संस्था! जे आजही नाटक, साहित्य, व्यावहारिक प्रशिक्षण अशा सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहे. मुंबई मराठी साहित्य संघाने शेकडो नाटकांची निर्मिती केली आहे. यामध्ये मुख्यतः संगीत नाटकांचा समावेश असतो (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित). मराठी संगीत नाटकाला १८० वर्षांची परंपरा आहे. हे जतन आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या एकमेव आकांक्षेने, मुंबई मराठी साहित्य संघ अनेक आगामी गायक/दिग्दर्शक/लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कलाकृतींना वाव देण्यासाठी आणि त्यांच्याशी सहयोग करण्यासाठी समर्पित आहे. महाराष्ट्रातील काही संस्था/कलाकार हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली संगीत संन्यस्त खड्ग, स्वयंवर, संत गोरा कुंभार, माऊली अशा नाटकांची निर्मिती करून संघ पुढे जात आहे.

1 year ago (edited) | [YT] | 21

Rajmudra Films Official

https://youtu.be/C8WlrKRrnXo?si=ie6Q8...

अमृतनयना
नयना आपटे यांच्या
कलायोगदानाचा प्रवास

#प्रतिबिंब
#जाऊमीसिनेमात
#rajmudra_films 🎬🎭

1 year ago | [YT] | 20

Rajmudra Films Official

मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकादरम्यान
निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या...

https://youtu.be/J5etoi0R1Sk?si=RW_lt...

1 year ago | [YT] | 19