Rahul Mahajan Journalist and YouTube Creater | नमस्कार मी राहुल महाजन या सोशल मीडियाच्या युगात सोशल मीडियावर आपले विचार मांडणे अगदी सोपे झाले असून मी पत्रकार म्हणून समाजात काम करीत असतांना अशा बऱ्याच गोष्टी मला पत्रकार म्हणून मांडता नव्हत्या त्या अनुषंगाने मी ६ ऑगस्ट २०२३ पासून एक Madhur Khandsh ह्या नावाचे You Tube Account सुरु केले आहे. मधुर खान्देश हे भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या वृत्तपत्राचे डिजिटल माध्यम असून समाजातील विविध घडामोडी या चॅनेल च्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न राहील.....
Thanks All & You Tube Team | Contact Info: +91 9860632676 | 9529959779 | (कार्यक्षेत्र पाचोरा न्यायालय अंतर्गत)
Rahul Mahajan_official
आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देणार! आपल्या प्रतिक्रिया नोंदवा
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
Rahul Mahajan_official
निवडणूक विशेष:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचोरा भडगाव मतदार संघात कोणत्या पक्षाचे वर्चस्व असणार?- आपली पसंती नोंदवा...
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Rahul Mahajan_official
Madhur Khnadesh new logo
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Rahul Mahajan_official
तुमच्या गाडीवर काळी फ्लिम व फॅन्सी नंबर प्लेट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! पाचोऱ्यात झाली कारवाई👇🏻 madhurkhandesh.com/519/
*राहुल महाजन,संपादक | मधुर खान्देश*
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Rahul Mahajan_official
ब्रेकिंग न्यूज:भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये रोमांचक सामन्यात भारताचा विजय 👇🏻madhurkhandesh.com/327/
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Rahul Mahajan_official
जागतिक महिला दिनानिमित्त नव्हे तर दररोज महिलांचा सन्मान व्हायला हवा!निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.👇🏻 madhurkhandesh.com/282/
राहुल महाजन,संपादक | मधूर खान्देश
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Rahul Mahajan_official
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन! जल ही जीवन वर विशेष प्रकल्प
राहुल महाजन,संपादक | (मधुर खान्देश) दि.२८/०२/२०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील गुरुकुल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाशी संबंधित विविध मॉडेल्स व प्रोजेक्ट्स बनविले. त्यामध्ये ३२८ विविध प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता. तसेच पाणी कसे वाचविले जाऊ शकते याच्याशी म्हणजे " जल ही जीवन है" शी संबंधित विशेष विविध प्रकल्प तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या प्रतिकृतींशी संबंधित मराठी,हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये प्रमुख पाहुण्यांना , उपस्थित पालकांना माहिती देऊन सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन अनिलभाई दुलानी यांच्या हस्ते फीत कापून व *चंद्रयान मिशन-३* या वर्किंग मॉडेल रॉकेट प्रतिकृतीच्या सहाय्याने करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेवक राम भाऊ केसवानी, हरिभाऊ पाटील ,डॉ.मनीष दादा चंदनानी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी " पाण्याचे विविध प्रतिकृती बनवून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे लक्ष वेधून होते. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी भारतीय जैन संघटना महिला शाखेच्या महिला सदस्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक प्रेमकुमार शामनाणी सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमिना बोहरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले.
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Rahul Mahajan_official
मुली घरातून निघून जाणे! याला जबाबदार आई-वडिल का? उत्तर पाहिजे असेल तर नक्की हा लेख वाचा.....पालकांनी नक्की वाचा
● पोलिसांना वेठीस धरणे कितपत योग्य? सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन फक्त फोटो काढण्यापुरता नव्हे तर समाज घडवण्यासाठी कार्य करावे.
● मोबाईलचा चांगला वापर करून शासकीय सेवेत भरती झालेल्या मुली व महिलांचा आदर्श घरातून निघून जाणाऱ्या मुली व महिलांनी घ्यावा.
(राहुल महाजन,संपादक | मधुर खान्देश वृत्तसंस्था)
अलीकडच्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये दिवसेंदिवस जग बदलत चालले आहे. सद्यस्थितीत आपल्या घरातील नाती ही इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाला कनेक्ट होऊन डिजिटल झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो आजच्या 25 ते 50 वर्षांपूर्वीचा काळ बघा त्यावेळी परिवारात एकोपा होता, घरातील प्रमुख व्यक्ती सांगतील असाच निर्णय घरातील सर्व मंडळींना लागू असायचा. पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती मध्ये राहणाऱ्या जवळपास सर्वच कुटुंबामध्ये गोडी गुलाबी होती, मान मर्यादा होत्या. ते दिवस आता फक्त जुन्या चित्रपटांमध्ये आपल्याला बघायला मिळतात! ही परिस्थिती बदलली का? काळानुसार आपण बदललो, अनेक बदल समाजात झाले, अनेक प्रबोधन करणारी मंडळी आपला समाज साक्षर करण्यासाठी पुढे आली. अनेकांनी हातभार लावला परंतु आपला समाज मात्र साक्षर झाला! अश्यावेळी समाजातील काही घटक वेगळ्या दिशेला भरकटले का? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जुन्या काळामध्ये घरामध्ये लग्न समारंभ असल्यावर अशावेळी जवळपास महिनाभरापासून लग्न समारंभाची तयारी सुरू असायची अतिशय थाटामाटात घरगुती पद्धतीने लग्न समारंभ पार पाडायचे परंतु काळ बदलत गेला. चित्रपटांची निर्मिती झाली चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अजून थोडा पुढे काळ सरकल्यानंतर या चित्रपटांमधून पारिवारिक वाद, हेवेदावे,रुसवे-फुगवे अशा अनेक गोष्टी चित्रीकरण करून मनोरंजनाच्या माध्यमातून समाजात दाखवल्या गेल्या.
कदाचित येथूनच एकत्र कुटुंबामध्ये फूट पडत गेल्या आणि एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत गेली. मान मर्यादा संपत गेल्या चित्रपटांप्रमाणेच घरांमध्ये अनेकांची वर्तणूक सुरू झाली आणि या ठिकाणी समाजामध्ये गोडी गुलाबिने जीवन जगणारे अनेक कुटुंब या ठिकाणी उध्वस्त झाले. मोबाईलचा युगाने समाजाचा सत्यानाश झाला का? असा सवाल याठिकाणी उपस्थित होतो. आपण वाचक आहात आपल्याला अनेक चित्रपट आठवतही असतील परंतु या चित्रपटांमधून शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आपला सुशिक्षित समाज मात्र याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. मी मोठा तू मोठा असे विषय चव्हाट्यावर येऊ लागले आणि कालांतराने २१ व्या शतकामध्ये या संपूर्ण विषयाचे जणूकाही प्रॅक्टिकल सुरू आहे का? असे चित्र समाजात बघायला मिळत आहे. १५ वर्षांपासून पत्रकारिता करत असतांना अनेक वेळा पोलीस स्टेशनला येणे जाणे झाले. नवरा असतांना बायको दुसऱ्यासोबत पळून गेली किंवा नवऱ्याने बायको असल्यावरही दुसरी बायको केली असे अनेक विषय आमच्यासमोर येतात. अनेक घरगुती वादामध्ये देखील पोलीस बांधव पत्रकार म्हणून आम्हाला बोलवून दोघं पार्ट्यांना समजावण्याचा प्रयत्न करा असे सांगतात. अनेकदा आम्ही देखील या गोष्टींमध्ये समाविष्ट झालो. परंतु दिवसेंदिवस घरगुती होणारे वाद हेवे दावे याबाबतच्या तक्रारी मात्र वाढत चालल्या आहे. पूर्वीच्या काळामध्ये परिवार एकत्र असल्यामुळे घरातील महिला व मुलींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी होती. त्या काळातील महिला आणि मुली देखील जबाबदारीने आपल्या परिवाराची कुठेही बदनामी होणार नाही याबाबतची विशेष काळजी घ्यायच्या परंतु अलीकडच्या काळामध्ये ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धत संपुष्टात आल्याने समाजात असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. बर डिजिटल युगाच्या या काळामध्ये असो की इतिहासातील युगात एकत्र कुटुंब पद्धतीतील या सर्व ठिकाणी परिवाराची जबाबदारी ही पुरुषाच्या खांद्यावरच होती. पुरुष मंडळी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करणार की परिवाराकडे लक्ष देणार अशी परिस्थिती या पुरुषाची असते.
"मुलगी शिकली प्रगती झाली" असे आपण कुठेतरी वाचले असेल "मुली वाचवा मुली शिकवा" असे देखील आपण अनेक ठिकाणी वाचले असेल या सर्व गोष्टींचा किशोरवयीन मुलींकडून सध्याच्या काळामध्ये दुरुपयोग होतांना दिसून आल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये आईची जबाबदारी देखील तेवढीच आहे परंतु घराच्या बाहेर पडताना आई-वडिलांचा विश्वास संपादन करून अनेक मुली घराबाहेर पडल्यानंतर अल्पावधीतच आपल्या सोना,बाबू, पिल्लू सोबत रेशीमगाठ बांधण्याची तयारी करतात परंतु ती रेशीमगाठी कुठपर्यंत असणार याचा अंदाज मात्र या किशोरवयीन मुलींना मात्र नसतो?
● पोलिसांची भूमिका काय?
घरातील अल्पवयीन मुली किंवा विवाहित महिला पळून जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्ते,पोलीस विभाग, पत्रकार या बांधवांकडून जनजागृती केली जाते. पोलीस लक्ष देत नाहीत अश्या अनेकांच्या तक्रारी असतात. हा केवळ कागदावरचा खेळ आहे. मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणाऱ्याच महिला, मुली घरातून निघून जाण्याचे बघायला मिळाले आहे. घरातून मुली निघून जाण्याच्या किंवा विवाहित महिला पळून जाण्याच्या प्रकरणांमध्ये राजकीय सामाजिक हस्तक्षेप बंद झाल्यास नक्कीच पोलिसांकडून कौतुकास्पद कारवाई होईल असे माझे स्पष्ट मत आहे. अनेक समाज कंटक अशा प्रकरणांना मदत करत असतील तर त्यांना देखील पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला पाहिजे.
● मोबाइल चा उपयोग चांगला कसा करावा याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक योजना या ठिकाणी आणल्या आहेत. महिलांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी रात्रंदिवस सरकार काम करत आहे. याचा लाभ घेणाऱ्या महिला आणि मुलींचा आदर्श या घरातून आई वडिलांना न सांगता निघून जाणाऱ्या मुलींनी घ्यावा....सोशल मीडियाचा वापर शिक्षणासाठी करावा! तुमच्या सोना, बाबू,पिल्लूचा इंस्टाग्राम चे स्टेटस बघण्यासाठी किंवा त्याचे स्टंट बघण्यासाठी हाय हॅलो करण्यासाठी व्हाट्सअप चा वापर न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक शिक्षण कसे घेता येईल आणि आपल्या आई-वडिलांचे नाव कसे चांगल्या पद्धतीने लौकिक करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अलीकडच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अनेक महिला मुली यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसत येत आहेत. या सर्व महिला, मुलींचा या किशोरवयीन मुलींनी आदर्श घ्यावा, आपल्या आई वडील व आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या शिक्षणासाठी योग्य तो परिस्थितीनुसार पैसा खर्च करून आपल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी काम करतात याचा विचार नक्कीच करून भरकटलेल्या दिशेने न जाता योग्य दिशेने प्रवास करावा.... हेच या लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होता.
आपला अभिप्राय नक्की कळवा
राहुल महाजन,संपादक
मधुर खान्देश-9860632676
1 year ago | [YT] | 5
View 1 reply
Rahul Mahajan_official
ब्रेकिंग न्यूज : पाचोऱ्यात पुन्हा गावठी कट्ट्यासह इसमास पकडले!जळगाव एल.सी.बी शाखेची कारवाई!
राहुल महाजन,संपादक (मधुर खान्देश) शहरातील भारत डेअरी चौफुलीवर गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील मुख्य महामार्गावर भारत डेअरी चौफुलीवर एक इसम गावठी कट्ट्यासह येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर पो. नि. बबन आव्हाड यांनी पो. उ. नि. शेखर डोमाळे, पो. हे. काॅ. लक्ष्मण पाटील, पोलीस जितू पाटील,पो. ना. रणजीत जाधव, पो. हे. काॅ. राहुल महाजन, पो. काॅ. प्रमोद ठाकुर यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. सदर पथकाने भारत डेअरी चौफुलीवर एक इसम संशयास्पद फिरत असतांना त्याची चौकशी केली असता त्याने अश्विन उर्फ विशाल शंकर पाटील रा. देशमुखवाडी ता. पाचोरा असे सांगितले. अश्विन पाटील याची झडती घेतली असता त्याचे कमरेला 20 हजार रुपये किंमतीचा एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी गावठी पिस्टल (कट्टा) आढळून आला. अश्विन शंकर पाटील यास पथकाने ताब्यात घेत त्याचे विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.
1 year ago (edited) | [YT] | 11
View 1 reply
Rahul Mahajan_official
पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक गावातील शेतकऱ्याचा मृत्यू!
● राहुल महाजन (मधुर खान्देश) पाचोरा तालुक्यातील वेरूळी बु. येथील रहिवासी असलेले शेतकरी पितांबर त्रंबक पाटील (बालु आण्णा) वय 58 हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना काहीतरी चावल्यासारखे जाणवल्याने तात्काळ ते घरी आले असता त्यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. परंतु उपचाराआधीच त्यांचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व विवाहित तीन मुली असा त्यांचा परिवार होता. सदर शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे एकच वेरूळी परिसरात शोकडा पसरली होती.
1 year ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
Load more