महाराष्ट्राची लाखो पावले चालली… जलसुरक्षित भविष्यासाठी! आज मुंबईच्या वरळी प्रोमेनेडवर ‘महा वॉकेथॉन – Walk for Water’ च्या मुख्य कार्यक्रमाचा फ्लॅग ऑफ करताना लोकांचा उत्साह बघून आनंद गगनात मावेनासा झाला.
हा उत्सव केवळ मुंबईपुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांत एकाच वेळी माती व पाण्याच्या संवर्धनाचा जागर झाला.
या ऐतिहासिक क्षणाला मा. उपसभापती सचिन अहीर, मा. इंद्रनील नाईक, राज्यमंत्री, मृद व जलसंधारण तसेच क्रिकेटपटू इरफान पठाण, अभिनेते जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजू राठोड, संजीव-श्रवण, पुष्कर श्रोत्री आणि अनिल सिंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीज उपस्थित होते.
मुंबईत हजारो नागरिक, विशेषतः तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या ऊर्जेने आणि महाराष्ट्रभर उमटलेल्या जनसहभागाने ‘माती वाचवा, पाणी जपा’ हा संदेश आणखी बुलंद झाला. आज पडलेली ही लाखो पावलं केवळ वॉकेथॉनची नव्हती... ती होती जलसुरक्षित महाराष्ट्राच्या भविष्याकडे टाकलेली पावलं!
आजच्याच दिवशी माजी मुख्यमंत्री दिवंगत स्व. सुधाकरराव नाईक साहेब यांना जलसंधारण दिनानिमित्त अभिवादन करता आले. चला, माती वाचवूया... पाणी जपूया... आणि महाराष्ट्र जलयुक्त करूया!
_______________
Millions of steps. One shared resolve — a water-secure Maharashtra! Today, Worli Promenade witnessed the inspiring spirit of Maha Walkathon – Walk for Water.
The event was graced by Hon. Deputy Chairman Sachin Ahir, Hon. Minister of State Indranil Naik, along with Irfan Pathan, Jackky Bhagnani, Rajneesh Duggal, Sanju Rathod, Sanjeev–Shravan, Pushkar Shrotri and Anil Singh.
From Mumbai to 35 districts across Maharashtra, thousands came together with one powerful message: Save Soil. Save Water. Secure Tomorrow. On Water Conservation Day, I also paid my respects to the late Shri Sudhakarrao Naik.
Every step today was a step towards a water-secure Maharashtra!
उत्तराखंड येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय आइसस्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करणारे रोहित राठोड, बिभीषण चव्हाण, आदित्य राठोड आणि स्वराज राठोड यांनी आज शिवनेरी येथे सदिच्छा भेट घेतली.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. या युवा खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून त्यांना विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आज पोहरादेवी येथील बणजारा विरासत संग्रहालयाला लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी १३५ फूट उंच सेवा ध्वज व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. बंजारा समाजाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
आज शासकीय निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे पोहरादेवी गडाचे महंत पूज्य जितेंद्र महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्हा परिषदचे माजी सदस्य विशाल जाधव तसेच त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
आज पुर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित “जलक्रांती परिषद २०२६” या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्य शासनाच्या “शाश्वत जलव्यवस्थापन” संकल्पनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे, वृक्षलागवड आणि जल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांद्वारे राज्यात प्रभावी जलसंवर्धनाची कामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.०” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढत असल्याचेही नमूद केले.
पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, जैन फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील जलक्रांती अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार सौ. मायाताई इवनाते, महापौर सौ. नीता ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार, जलतज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील एसएसपी स्टेडियम, वरळी येथे आयोजित युवासेना महायुवोत्सव २०२६ या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या भव्य कार्यक्रमातून युवकांमध्ये नवचैतन्य, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “शिवगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सहभागी सर्व युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथे आज राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पांढरकवढा व नेर तालुक्यातील मौजे वटफळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत उभारण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळणार आहे.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आज मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील किल्लोद (पाटाखाली) येथील श्री हरिहर चैतन्य सेवाधाम, चैतन्य नगर येथे आयोजित “श्रीराम कथा”, “श्री हरिहर महायज्ञ” व आश्रम लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून रामकथेचा पवित्र अनुभव घेतला.
या प्रसंगी आश्रमाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. तसेच महादेवांचे दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला.
संत श्री आनंद चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीराम कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यावेळी महंत महाराज, मांधाता विधानसभेचे आमदार तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
Sanjay Rathod
महाराष्ट्राची लाखो पावले चालली… जलसुरक्षित भविष्यासाठी!
आज मुंबईच्या वरळी प्रोमेनेडवर ‘महा वॉकेथॉन – Walk for Water’ च्या मुख्य कार्यक्रमाचा फ्लॅग ऑफ करताना लोकांचा उत्साह बघून आनंद गगनात मावेनासा झाला.
हा उत्सव केवळ मुंबईपुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांत एकाच वेळी माती व पाण्याच्या संवर्धनाचा जागर झाला.
या ऐतिहासिक क्षणाला मा. उपसभापती सचिन अहीर, मा. इंद्रनील नाईक, राज्यमंत्री, मृद व जलसंधारण तसेच क्रिकेटपटू इरफान पठाण, अभिनेते जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजू राठोड, संजीव-श्रवण, पुष्कर श्रोत्री आणि अनिल सिंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीज उपस्थित होते.
मुंबईत हजारो नागरिक, विशेषतः तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या ऊर्जेने आणि महाराष्ट्रभर उमटलेल्या जनसहभागाने ‘माती वाचवा, पाणी जपा’ हा संदेश आणखी बुलंद झाला.
आज पडलेली ही लाखो पावलं केवळ वॉकेथॉनची नव्हती...
ती होती जलसुरक्षित महाराष्ट्राच्या भविष्याकडे टाकलेली पावलं!
आजच्याच दिवशी माजी मुख्यमंत्री दिवंगत स्व. सुधाकरराव नाईक साहेब यांना जलसंधारण दिनानिमित्त अभिवादन करता आले.
चला, माती वाचवूया... पाणी जपूया... आणि महाराष्ट्र जलयुक्त करूया!
_______________
Millions of steps. One shared resolve — a water-secure Maharashtra!
Today, Worli Promenade witnessed the inspiring spirit of Maha Walkathon – Walk for Water.
The event was graced by Hon. Deputy Chairman Sachin Ahir, Hon. Minister of State Indranil Naik, along with Irfan Pathan, Jackky Bhagnani, Rajneesh Duggal, Sanju Rathod, Sanjeev–Shravan, Pushkar Shrotri and Anil Singh.
From Mumbai to 35 districts across Maharashtra, thousands came together with one powerful message: Save Soil. Save Water. Secure Tomorrow. On Water Conservation Day, I also paid my respects to the late Shri Sudhakarrao Naik.
Every step today was a step towards a water-secure Maharashtra!
#mahawalkathon #walkforwater #jalsandharandin #savesoilsavewater #waterconservation
3 weeks ago | [YT] | 161
View 1 reply
Sanjay Rathod
उत्तराखंड येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय आइसस्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करणारे रोहित राठोड, बिभीषण चव्हाण, आदित्य राठोड आणि स्वराज राठोड यांनी आज शिवनेरी येथे सदिच्छा भेट घेतली.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. या युवा खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
3 months ago | [YT] | 174
View 0 replies
Sanjay Rathod
यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उपस्थित राहून त्यांना विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#vidhanparishadelection #yavatmal #mahayuti
3 months ago | [YT] | 135
View 0 replies
Sanjay Rathod
आज पोहरादेवी येथील बणजारा विरासत संग्रहालयाला लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी १३५ फूट उंच सेवा ध्वज व संत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करून संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. बंजारा समाजाचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
#banjarasamaj #poharadevi #sevalalmaharaj #nangaramuseum #gorbanjara
3 months ago | [YT] | 202
View 0 replies
Sanjay Rathod
आज शासकीय निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे पोहरादेवी गडाचे महंत पूज्य जितेंद्र महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्हा परिषदचे माजी सदस्य विशाल जाधव तसेच त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
3 months ago | [YT] | 138
View 0 replies
Sanjay Rathod
आज पुर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित “जलक्रांती परिषद २०२६” या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्य शासनाच्या “शाश्वत जलव्यवस्थापन” संकल्पनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, बंधारे, वृक्षलागवड आणि जल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांद्वारे राज्यात प्रभावी जलसंवर्धनाची कामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.०” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढत असल्याचेही नमूद केले.
पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, जैन फाऊंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील जलक्रांती अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार सौ. मायाताई इवनाते, महापौर सौ. नीता ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार, जलतज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 नागपूर | स्व. वसंतराव देशपांडे सभागृह
#jalkranti #जलक्रांती_परिषद #waterconservation #nagpur
3 months ago | [YT] | 131
View 1 reply
Sanjay Rathod
मुंबईतील एसएसपी स्टेडियम, वरळी येथे आयोजित युवासेना महायुवोत्सव २०२६ या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या भव्य कार्यक्रमातून युवकांमध्ये नवचैतन्य, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “शिवगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सहभागी सर्व युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#shivsena #yuvasena #शिवसेना #युवासेना
4 months ago | [YT] | 128
View 2 replies
Sanjay Rathod
श्री. प्रभाकरराव भबुतकर (रा. माळीपुरा, नेर ता. नेर) यांची कन्या चि. सौ. कां. धनश्री/ पल्लवी हिच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो.
नवदांपत्यास सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण अशा भावी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
5 months ago | [YT] | 178
View 0 replies
Sanjay Rathod
मुंबई येथे आज राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पांढरकवढा व नेर तालुक्यातील मौजे वटफळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत उभारण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळणार आहे.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#yavatmal #midc #maharashtradevelopment #employment #guardianminister
5 months ago | [YT] | 123
View 2 replies
Sanjay Rathod
आज मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील किल्लोद (पाटाखाली) येथील श्री हरिहर चैतन्य सेवाधाम, चैतन्य नगर येथे आयोजित “श्रीराम कथा”, “श्री हरिहर महायज्ञ” व आश्रम लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून रामकथेचा पवित्र अनुभव घेतला.
या प्रसंगी आश्रमाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले. तसेच महादेवांचे दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला.
संत श्री आनंद चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीराम कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
यावेळी महंत महाराज, मांधाता विधानसभेचे आमदार तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
#श्रीरामकथा #shriramkatha #jayshriram #harharmahadev
5 months ago | [YT] | 142
View 0 replies
Load more