नव्या युवा लेखकांना प्राधान्य देणारे हक्काचे व्यासपीठ.....
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था २०१७ साली मराठी साहित्यविश्वात नवनिर्मिती आणि परिवर्तनाची बीजे रोवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उदयास आली.
आजवर विविध धाटणीतल्या दर्जेदार साहित्य कृती प्रकाशित करून महाराष्ट्रातील नव्या दमाच्या लेखकांना प्रकाशन संस्थेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस हे पदार्पणाच्या केवळ चारच वर्षांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले आहे.
नव उदयोन्मुख लेखकांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस नेहमीच प्रयत्नशील आहे.
भविष्यातही केवळ जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा मानस ठेवून ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ मार्गक्रमण करत आहे.