अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर सूक्ष्म कचरा स्वच्छता कर्मचारी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित करीत आहेत.
गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची पुढील विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी तत्पर आहेत.
स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती शहराप्रती आपली जबाबदारी आहे!
अहिल्यानगर व परिसरातील समृद्ध प्राणी संपदा, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या अधिवासाचे जतन करून मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्व अधिक दृढ करूया.
🌍❤️ “वसुंधरेचे सौंदर्य साकार, प्राणी हेच सृष्टीचा आधार!”
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियानाच्या दहाव्या आठवड्यानिमित्त गांधीनगर परिसरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती, पाणीसाठ्यांची तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यू प्रतिबंधाविषयी प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचा संदेश दिला. तसेच निबंध, वक्तृत्व व विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अभियानांतर्गत आतापर्यंत ९ हजार घरांना भेटी देऊन २८ हजार पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी २७० पाणीसाठे दूषित आढळून डेंग्यूच्या अळ्या निदर्शनास आल्या. संबंधित ठिकाणी तातडीने उपाययोजना करून धूर व औषध फवारणी, पाण्यात अबेट औषध टाकणे तसेच दूषित पाणीसाठे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.
शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले असून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डेंग्यूची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, निबंध, वक्तृत्व व सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. अशा जनजागृती कार्यक्रमातून सामाजिक कार्याची लोकचळवळ उभी राहते, असेही त्यांनी नमूद केले.
स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आठवड्यातून एकदा घरातील व परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करावी आणि ‘एक दिवस कोरडा’ पाळावा, असे आवाहन केले. महापालिकेच्या आरोग्य सुविधा मोफत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर मनपा अधिकारी व आरोग्य पथकाने घरोघरी तसेच सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पाणीसाठ्यांची तपासणी केली. काही ठिकाणी डेंग्यूसदृश्य अळ्या आढळल्यानंतर पाणीसाठे नष्ट करून परिसरात धूर फवारणी करण्यात आली.
कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, कुमारसिंह वाकळे, नगरसेविका आशाताई कातोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. शिल्पा चेलवा, डॉ. प्रवीण डुंगुरवाल, शाळेचे मुख्याध्यापक ए. एल. सातपुते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कराचीवाला नगर ते अयोध्या नगर… नाव बदलले, ओळख बदलली आणि नव्या कमानीने परिसराच्या इतिहासात मानाचा अध्याय जोडला!
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील तारकपूर बसस्थानक मागील परिसराचे पूर्वीचे ‘कराचीवाला नगर’ हे नाव बदलून ‘अयोध्या नगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या ‘अयोध्या नगर’ नामफलक कमानीचे उद्घाटन अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी संग्राम अरुणकाका जगताप (विधानसभा सदस्य, अहिल्यानगर शहर), महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे,धनश्रीताई विखे पाटील,शीतलताई जगताप यांच्यासह महानगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्या नगर — नव्या नावाची नवी ओळख, संस्कार आणि श्रद्धेचा नवा अध्याय! 🚩
कुत्र्याजवळ जाऊ नका किंवा त्याला त्रास देऊ नका. झोपलेला, खात असलेला, पिल्लांना दूध पाजणारा, घाबरलेला किंवा चिडलेला कुत्रा चावू शकतो. त्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित अंतर ठेवा.
### सफाई मित्र सुरक्षा शिबिरात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
**सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व आरोग्य साहित्याचे वाटप**
**सफाई कर्मचारी हेच शहराचे खरे आरोग्यदूत - महापौर ज्योतीताई गाडे**
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर, अधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, सफाई कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे खरे आरोग्यदूत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ते शहराच्या स्वच्छतेचे काम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्यही सुदृढ राहणे आवश्यक आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त यशवंत डांगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामात १०० टक्के योगदान देऊन आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे सांगितले. तसेच व्यसन व खासगी सावकारांकडून कर्ज घेण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे एक्स-रे, रक्तदाब, शुगर व रक्त तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य तपासणीची पाहणी करून स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली.
शिबिराच्या निमित्ताने महापौर, आयुक्त व सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
AMC Nagar
🧹 स्वच्छतेसाठी हात पुढे स्वच्छ अहिल्यानगरसाठी संकल्प दृढ!
“झाडूच्या पलीकडेही स्वच्छतेची जबाबदारी…
हातांनी उचलला कचरा, शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार!”
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी झाडूने सहज न उचलता येणारे प्लास्टिकचे तुकडे, कागद, पिशव्या तसेच इतर सूक्ष्म कचरा स्वच्छता कर्मचारी स्वतः हाताने गोळा करून कचरा संकलित करीत आहेत.
गोळा केलेला कचरा योग्य पद्धतीने संकलित करून त्याची पुढील विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी तत्पर आहेत.
स्वच्छता ही केवळ मोहीम नाही,
ती शहराप्रती आपली जबाबदारी आहे!
#Amc #Amccommissioner #SwachhAhilyanagar #CleanAhilyanagar #Swachhata
7 hours ago | [YT] | 2
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
11 hours ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
🐾🌿 जागतिक प्राणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🐾
अहिल्यानगर व परिसरातील समृद्ध प्राणी संपदा, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या अधिवासाचे जतन करून मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्व अधिक दृढ करूया.
🌍❤️ “वसुंधरेचे सौंदर्य साकार,
प्राणी हेच सृष्टीचा आधार!”
प्राणी वाचवा… निसर्ग वाचवा… भविष्य जपवा! 🐾🌱
#जागतिकप्राणीदिन #WorldAnimalDay #WildlifeConservation #AnimalProtection #अहिल्यानगर अहिल्यानगरमहानगरपालिका प्राणीसंपदा जैवविविधता AMC
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
गांधीनगरमध्ये ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत जनजागृती
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियानाच्या दहाव्या आठवड्यानिमित्त गांधीनगर परिसरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती, पाणीसाठ्यांची तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यू प्रतिबंधाविषयी प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचा संदेश दिला. तसेच निबंध, वक्तृत्व व विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अभियानांतर्गत आतापर्यंत ९ हजार घरांना भेटी देऊन २८ हजार पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी २७० पाणीसाठे दूषित आढळून डेंग्यूच्या अळ्या निदर्शनास आल्या. संबंधित ठिकाणी तातडीने उपाययोजना करून धूर व औषध फवारणी, पाण्यात अबेट औषध टाकणे तसेच दूषित पाणीसाठे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.
शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले असून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डेंग्यूची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, निबंध, वक्तृत्व व सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर केल्याबद्दल त्यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. अशा जनजागृती कार्यक्रमातून सामाजिक कार्याची लोकचळवळ उभी राहते, असेही त्यांनी नमूद केले.
स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आठवड्यातून एकदा घरातील व परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करावी आणि ‘एक दिवस कोरडा’ पाळावा, असे आवाहन केले. महापालिकेच्या आरोग्य सुविधा मोफत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर मनपा अधिकारी व आरोग्य पथकाने घरोघरी तसेच सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी पाणीसाठ्यांची तपासणी केली. काही ठिकाणी डेंग्यूसदृश्य अळ्या आढळल्यानंतर पाणीसाठे नष्ट करून परिसरात धूर फवारणी करण्यात आली.
कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, कुमारसिंह वाकळे, नगरसेविका आशाताई कातोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. शिल्पा चेलवा, डॉ. प्रवीण डुंगुरवाल, शाळेचे मुख्याध्यापक ए. एल. सातपुते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
#डेंग्यूमुक्तअहिल्यानगर #AhilyanagarMunicipalCorporation #AMC #AMCCommissioner #DengueFreeAhilyanagar
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
माध्यमांच्या दृष्टिक्षेपातून… 👀
#epaper #news #ahilyanagar #amc #amccommissioner 📰
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
AMC Nagar
🚩 नावात बदल… ओळखीत नवा अध्याय!
कराचीवाला नगर ते अयोध्या नगर…
नाव बदलले, ओळख बदलली आणि नव्या कमानीने परिसराच्या इतिहासात मानाचा अध्याय जोडला!
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील तारकपूर बसस्थानक मागील परिसराचे पूर्वीचे ‘कराचीवाला नगर’ हे नाव बदलून ‘अयोध्या नगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या ‘अयोध्या नगर’ नामफलक कमानीचे उद्घाटन अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी संग्राम अरुणकाका जगताप (विधानसभा सदस्य, अहिल्यानगर शहर), महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे,धनश्रीताई विखे पाटील,शीतलताई जगताप यांच्यासह महानगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्या नगर — नव्या नावाची नवी ओळख, संस्कार आणि श्रद्धेचा नवा अध्याय! 🚩
#AyodhyaNagar #NirantarNagarseva #AMC #AMCCommissioner #ShriRam
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
🐾 कुत्र्यांपासून सुरक्षित राहा, काळजी घ्या!
कुत्र्याजवळ जाऊ नका किंवा त्याला त्रास देऊ नका. झोपलेला, खात असलेला, पिल्लांना दूध पाजणारा, घाबरलेला किंवा चिडलेला कुत्रा चावू शकतो. त्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित अंतर ठेवा.
सुरक्षित रहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा! 🐕
#DogSafety #StaySafe #AnimalSafety #DogBitePrevention #PublicAwareness #SafetyFirst #Ahilyanagar #AhilyanagarMunicipalCorporation #AMC #Amccommissioner
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
AMC Nagar
### सफाई मित्र सुरक्षा शिबिरात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
**सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व आरोग्य साहित्याचे वाटप**
**सफाई कर्मचारी हेच शहराचे खरे आरोग्यदूत - महापौर ज्योतीताई गाडे**
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर, अधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, सफाई कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे खरे आरोग्यदूत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ते शहराच्या स्वच्छतेचे काम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्यही सुदृढ राहणे आवश्यक आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त यशवंत डांगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामात १०० टक्के योगदान देऊन आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे सांगितले. तसेच व्यसन व खासगी सावकारांकडून कर्ज घेण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे एक्स-रे, रक्तदाब, शुगर व रक्त तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य तपासणीची पाहणी करून स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली.
शिबिराच्या निमित्ताने महापौर, आयुक्त व सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
#Ahilyanagar #SanitationWorkers #SafaiMitra #HealthCheckup #Amccommissioner #Amc
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Load more