YOGESH RAMDAS KADAM Official

श्री. योगेश रामदास कदम
गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री.


YOGESH RAMDAS KADAM Official

आज मुंबई येथे मा. ना. स्व. अजित दादा पवार यांच्या शोकसभेस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. या कठीण प्रसंगी पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धैर्य व बळ मिळो, अशी प्रार्थना केली.

जीवनाच्या प्रवासात असे काही दुर्दैवी प्रसंग आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात आणि माणुसकी, संवेदना व आपुलकी यांचे महत्त्व अधोरेखित करतात. अजित दादांच्या दिवंगत आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, हीच प्रार्थना. 🙏

🗓️ २३ फेब्रुवारी २०२६ | 📍एनएससीआय डोम, वरळी, मुंबई

‪@DevendraFadnavis‬
‪@mieknathshindeofficial‬

#अजितदादापवार #AjitPawar #OmShanti #शोकसभाश्रद्धांजलि #RestInPeace

58 minutes ago | [YT] | 3

YOGESH RAMDAS KADAM Official

आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेकरिता TMS 2.0 या अद्ययावत संगणक प्रणालीचा शुभारंभ झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान लाभला.

ही अत्याधुनिक प्रणाली म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाचा नवा टप्पा आहे. पारदर्शकता, गती आणि अचूकता यांचा संगम साधत गरजू रुग्णांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी TMS 2.0 महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

TMS 2.0 प्रणाली लागू झाल्यानंतर महत्वाचे बदल होणार आहेत. एकत्रित योजनेची अंमलबजावणी आतापर्यंत राज्याच्या जीवनदायी या पोर्टलवरुन केली जात होती, आता राष्ट्रीय स्तरावरुन NHA कडून वापरल्या जाणा-या 'TMS 2.0' प्रणाली‌द्वारे कामकाज होणार आहे. तसेच रुग्ण नोंदणी पासून रुग्णालयांचे दावे अदा करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, सुलभ व पारदर्शक होणार आहे. शिवाय अद्ययावत डॅशबोर्ड, तुलनात्मक सांख्यिकी माहितीची उपलब्धतता, रुग्णांची बायोमेट्रिक ओळख पटवून नोंदणी, Al तंत्रज्ञानावर आधारित गैरप्रकार रोखणारी यंत्रणा आणि प्रत्येक स्तरावरील प्रक्रिया पारदर्शक आणि विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्यावर पर्यवेक्षण असे बरेच बदल पाहायला मिळणार आहेत.

या प्रणालीच्या शुभारंभ प्रसंगी मा. आरोग्य मंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर, मा. गृहराज्य मंत्री (ग्रामीण) श्री. पंकजजी भोयर, मा. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती. मेघना बोर्डीकर, मा. प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय श्रीमती. अश्विनी भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

🗓️ २३ फेब्रुवारी २०२६ | 📍 विधान भवन, मुंबई

‪@DevendraFadnavis‬

#DevendraFadnavis #Maharashtra #Mumbai #AayushmanBharat #YogeshKadam

2 hours ago | [YT] | 3

YOGESH RAMDAS KADAM Official

विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ | आठवडा पहिला, दिवस पहिला

🗓️ २३ फेब्रुवारी २०२६ | 📍विधानभवन, नरिमन पॉइंट, मुंबई

‪@mieknathshindeofficial‬

#Shivsena #BudgetSession2026 #YogeshKadam #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Mumbai

9 hours ago (edited) | [YT] | 12

YOGESH RAMDAS KADAM Official

थोर समाजसुधारक, स्वच्छता अभियानाचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

#GadgeMaharaj #राष्ट्रसंत #विनम्र_अभिवादन
#YogeshKadam #Shivsena

13 hours ago | [YT] | 10

YOGESH RAMDAS KADAM Official

शिवसेना सचिव मा.श्री. संजयजी मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#SanjayMore #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #YogeshKadam #Shivsena

1 day ago | [YT] | 25

YOGESH RAMDAS KADAM Official

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, थोर स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#MaulanaAbulKalamAzad #AbulKalamAzad #IndianFreedomFighter #YogeshKadam #Shivsena

1 day ago | [YT] | 14

YOGESH RAMDAS KADAM Official

भाषा ही फक्त संवादाचे साधन असली तरी, आपली मातृभाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते.

जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#InternationalMotherLanguageDay #Shivsena #YogeshKadam

2 days ago (edited) | [YT] | 23

YOGESH RAMDAS KADAM Official

दापोली नगरपरिषद हद्दीतील नागरी सुविधा २०२५/२६ योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या जालगाव बाजारपेठ रुद्रेश्वर मंदिर ते सुतारकोंड फाट्यापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच, मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या विकासकामांना गती देत लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

🗓️ १९ फेब्रुवारी २०२६ | 📍दापोली

‪@shivsenaofc‬

#YogeshKadam #Shivsena #RoadDevelopment #Dapoli #Maharashtra

3 days ago | [YT] | 25

YOGESH RAMDAS KADAM Official

खेडमधील उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने खेड येथील शिवसेना शाखेत उबाठा गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी माझा उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

🗓️ १९ फेब्रुवारी २०२६ | 📍खेड

‪@shivsenaofc‬

#Shivsena #YogeshKadam #पक्षप्रवेश #Khed #Maharashtra

3 days ago | [YT] | 15

YOGESH RAMDAS KADAM Official

१०वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! "यशाची वाट परिश्रमानेच सुकर होते. खंबीर राहा, प्रयत्न करा आणि यश मिळवा."

#10thExam #SSCExam #AllTheBest #YogeshKadam #Shivsena

3 days ago | [YT] | 13